Submitted by प्रतिक सोमवंशी on 28 May, 2020 - 01:45
जमीन मुकी झालीय
शुष्क फांद्यांवर दुःखी झालेली
पाखरे गप्प सगळं ऐकताय
रात्रीच्या नग्न शरीरावर
झोपेचे उलटे प्याले सांडताय
मेलेल्या मुडद्यांचा वास
फुलांच्या बगिच्यात पसरलाय
मृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधून
समुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरून
म्हतारी खिडकीतून ओरडतेय
तिला कुठला धर्म लगाम घालेल आता?
कोणत वरदान गळा घोटेल तिचा?
त्या म्हतारीला सांगा
तिचा रोल संपलाय
आता पडदा पडेल
नाटक संपल
पण
खिडकीबाहेर मृत्यू तसाच फिरतोय!
©प्रतिक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
Chan
Chan
कोणता रस म्हणायचा हा - रौद्र
कोणता रस म्हणायचा हा - रौद्र/बीभत्स? नाही 'भयानक' रसात आहे ही कविता.
आवडली.
धन्यवाद
धन्यवाद
रचना मस्तच! आवडली
रचना मस्तच! आवडली
अप्रतिम....
अप्रतिम....