तुम्ही ब्रेकिंग बॅड फॅन असाल तर सॉल ला नोटिस न करणे शक्य नाही. ब्रेबॅ च्या दुसर्याच सीझन मधे सॉल, द "क्रिमिनल" लॉयर ची एन्ट्री झाल्या झाल्या बॉब ओडेनकर्क उर्फ सॉल गुडमन भयंकर भाव खाऊन गेला.
ब्रेबॅ च्या जिनियस दिग्दर्शक विन्स गिलिगन ला सॉल च्या पात्रासाठी दुसरी आख्खी सीरीज बनवावीशी वाटली हेही त्याच्या अफलातून क्रिएटिविटीला साजेसेच. अन्यथा प्रचंड गाजलेल्या सीरीज चा स्पिन ऑफ पण तितकाच प्रभावी असणे हेही जवळपास अशक्यच. पण गिलिगन ने करून दाखवलेय!!
ब्रेबॅ संपते तेव्हा सॉल चे शेवटचे स्टेटस आपल्याला "हूवर वॅक्यूम क्लीनर रीपेअर्स " वाल्याच्या मदतीने आयडेन्टिटी बदलून तो एक साधा सिनॅबन चा मॅनेजर बनून ओमाहा मधे कायमचा निघून जातो इतके माहित आहे. तिथेच बेटर कोल सॉल ची सुरुवात आहे. आता सिनॅबन मधे अत्यन्त सुमार, एकाकी, बोरिंग, आणि कुणी कधी आपल्याला ओळखले तर काय या कायमच्या भितीसकट आयुष्य जगणार्या सॉल ला त्याचा भूतकाळ आठवतो.. ब्रेबॅ चे कथानक घडण्याच्या आधी काही वर्षांचा काळ.
सॉल गुडमन चं खरं नाव जिमी मॅकगिल. त्याचा मोठा भाऊ चक हा एक मोठा यशस्वी लॉयर आणि प्रसिद्ध लॉ फर्म चा पार्टनर. जिमी मात्र चलाख असला तरी लहानपणापासून शिक्षणात आपट्या खाल्लेला, राजमार्गाऐवजी कायम धोक्याचे किंवा गैर असे शॉर्टकट शोधणारा, कुठल्यातरी समोअन आयलंडवरच्या कॉलेज मधून कॉरस्पॉन्डन्स कोर्सेस करून लॉ ची डिग्री घेतलेला पण भावासारखा मोठा लॉयर होण्याची स्वप्नं बघणारा.
जिमीचा सॉल गुडमन होण्यापर्यन्त चा प्रवास म्हणाजे ही सीरीज. आतापर्यन्त ५ सीझन आले आहेत. पाचवा अॅक्चुअली नुकताच रिलीज झाला आहे. या सीरीज ची चर्चा इथे करता येईल.
माझ्यासाठी या सीरीज चे अजून एक आकर्षण म्हणजे ब्रेबॅ मधली पुन्हा भेटणारी कॅरेक्टर्स! माइक अर्मनट्रॉट चा पॅरलल लीड सारखाच रोल आहे. गस फ्रिन्ग चे पण महत्त्वाचे पात्र आहे, बाकी टुको, हेक्टर आणि सालामान्का फॅमिली, लिडिया, या सीझन ला हॅन्क ची पण एन्ट्री झाली आहे!! शिवाय ब्रेबॅ मधे नसलेली सॉल ची गर्लफ्रेन्ड किम, भाऊ चक, सालामान्कांचा उजवा हात नाचो, अशी बरीच इंटरेस्टिंग पात्रं आहेत. ब्रेबॅ पाहिलेली नसली तरी ही सीरीज स्वतंत्र पणे बघू शकता पण ब्रेबॅ बघितली असेल तर जास्त मजा येईल हे नक्की!
४ सीझन्स नेटफ्लिक्स वर आहेत. पाचवा AMC वर सध्या सुरू आहे.
imdb लिन्क - https://www.imdb.com/title/tt3032476/
https://en.wikipedia.org/wiki/Better_Call_Saul
*********** स्पॉयलर वार्निंग - खालील चर्चेत बरेच स्पॉयलर्स येऊ शकतील. जपून वाचा!!
बेटर कॉल सॉल!
Submitted by maitreyee on 11 April, 2020 - 14:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आधी वेबसीरीज च्या बाफ वर
आधी वेबसीरीज च्या बाफ वर झालेली चर्चा:
बेटर कॉल सोल चे नविन एपिसोड्स येताहेत ते पहायचे म्हणून ती पुन्हा पहिल्यापासून बघायला घेतली आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन तीच बघत बसलेय.
आज अॅमेझॉन प्राईम चाळत असताना Undone ही अॅनिमेटेड सिरीज दिसली. माहिती वाचून रोचक वाटली म्हणून बघायला घेतलीये. वेगळी आहे. ग्राफिक नॉव्हेल बघतोय असं वाटत राहतं. यात त्या मुलीचा डॅडी म्हणजे सोलच (Bob Odenkirk) निघाला त्यामुळे मजा वाटली.
Submitted by मामी on 11 April, 2020 - 10:06
बेटर कॉल सोल चे नविन एपिसोड्स येताहेत ते पहायचे म्हणून ती पुन्हा पहिल्यापासून बघायला घेतली आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन तीच बघत बसलेय. >>> अर्रे मामी दे टाळी! मी पण जबरा फॅन आहे सॉल ची. बेटर कॉल सॉल मी ब्रेबॅ इतकीच किंबहुना जास्तच एंजॉय करते आहे. पण समहाऊ ही पाहिलेले फेलो फॅन्स भेटत नाहीत फारसे.
Submitted by maitreyee on 11 April, 2020 - 10:10
>>आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन तीच बघत बसलेय.<<
जबरदस्त ग्रिपिंग आहे, ब्रेबॅ पेक्षा जास्त माझ्या मते. या वीकचा एपिसोडतर अत्यंत उच्च कॅटेगोरीतला. काहि प्रसंगातले बारकावे, फोरशॅडोइंग इतके बेमालुम घेतलेले आहेत कि त्यांची खातरजमा नंतर घडलेल्या ब्रेबॅमध्ये होते. या दर्जाचं लेवल ऑफ डिटेलिंग मेंटेन केल्याबद्दल लेखक्/दिग्दर्शक टिम कौतुकास पात्र आहे.
जिमी मगिलच्या नंतर गस फ्रिंगवर एक स्पिनऑफ निघु शकेल एव्हढं ते कॅरेक्टर स्ट्राँग आहे, हे माझं मत... Wink
Submitted by राज on 11 April, 2020 - 10:43
बेटर कॉल सॉल मलाही आवडली. सॉल बरोबरच त्यातला किम चा रोलही मस्त आहे. इव्हन त्या कंपनीचा सीईओ जो दाखवला आहे त्याचाही.
बाय द वे, सॉलचा भाऊ फ्रेण्डस मधे एका छोट्या रोल मधे आठवतोय का कोणाला? Happy
Submitted by फारएण्ड on 11 April, 2020 - 10:49
वा वा! बरेच सॉलमेट्स आहेत की. जबरदस्त आहे ती सिरीयल खरंच.
सॉल बरोबरच त्यातला किम चा रोलही मस्त आहे. इव्हन त्या कंपनीचा सीईओ जो दाखवला आहे त्याचाही. >> येस्स. हॉवर्ड.
काहि प्रसंगातले बारकावे, फोरशॅडोइंग इतके बेमालुम घेतलेले आहेत कि त्यांची खातरजमा नंतर घडलेल्या ब्रेबॅमध्ये होते. या दर्जाचं लेवल ऑफ डिटेलिंग मेंटेन केल्याबद्दल लेखक्/दिग्दर्शक टिम कौतुकास पात्र आहे. >> अगदी अगदी.
Submitted by मामी on 11 April, 2020 - 11:09
>>येस्स. हॉवर्ड.<<
हॉवर्ड लॉ फर्मचा पार्टनर आहे, सीइओ नाहि. तो अॅक्टर (पॅट्रिक फेबियन) ऐटबाज आहे पण समहाउ त्याला "बिचारा" पोरट्रे केलं आहे. सीइओ आहे तो लिडियाचा बॉस, जर्मन कंपनीचा (मेड्रिगल) हेड - गसचा फायनांसर/मेंटॉर मेथ लॅब (बिल्ड, डिस्ट्रिब्युशन) करता. पण त्याचं कॅरेक्टर अजुन डेवलप झालेलं नाहि...
मामी, नविन धागा काढा... Happy
Submitted by राज on 11 April, 2020 - 12:20
येस पार्टनर बरोबर आहे. सुरूवातीला त्याच्या रोलला निगेटिव्ह शेड्स वाटतात, जोपर्यंत सॉलला असे वाटत असते की तो त्याला विरोध करतोय. पण पुढे ते कॅरेक्टर चांगले डेव्हलप केले आहे. सॉल आणि किम दोघांच्याही डेडपॅन कॉमेण्ट्स मस्त आहेत.
"I am helping a mid size local firm become a mid size regional firm. So yay! for me!"
Submitted by फारएण्ड on 11 April, 2020 - 13:19
बाय द वे, फ्रेण्ड्स मधला रोल ज्यांना आठवत नाही त्यांनी हे पाहा Happy
https://www.youtube.com/watch?v=yEhBbVS8Pro
नवीन Submitted by फारएण्ड on 11 April, 2020 - 13:30
अरे बघावी का? नवीन काही
अरे बघावी का? नवीन काही बघण्याच्या शोधात आहेच.
थॅन्क्स मै
थॅन्क्स मै
यातला माइक हा एअरप्लेन! आणि बिव्हरली हिल्स कॉप मधे होता हे आठवत नाही. आता बघताना जाणवेल.
माइक सॉल्लिड बॅडॅस कॅरेक्टर
माइक सॉल्लिड बॅडॅस कॅरेक्टर आहे! काय डायलॉग आहेत त्याचे! "आर यू स्टिल द लॉयर विथ समव्हॉट फ्लेक्झिबल मोराल्स?"
सायो बस क्या? रेकमेन्ड करून थकले मी
सॉल सही आहे. फार आवडली.
सॉल सही आहे. फार आवडली.
५ वा सीझन नेटफ्लिक्स वर आल्यावरच बघणार.
इंटरेस्टिंग आहे का? किती
इंटरेस्टिंग आहे का? किती एपिसोडस्? बघीन म्हणते.
यातले चौथ्या सीझनच्या एका
यातले चौथ्या सीझनच्या एका एपिसोड मधे Something Stupid हे गाणे एकदम कॅची वाटले. बहुतांश इंग्रजी गाण्यांबद्दल काही गंध नसल्याने शोधले, तर ओरिजिनल फ्रँक सिनात्रा चे दिसते. इथे लिन्क मिळाली. मस्त गाणे आहे एकदम.
https://www.youtube.com/watch?v=0f48fpoSEPU
हो, माइकचं कॅरेक्टर पण
हो, माइकचं कॅरेक्टर पण गुंतागुंतीचं आहे. आणि ते उत्तम वठवलं हि आहे, जोनॅथन बँक्सने. बर्याच शॉट्स्/सीन्स मध्ये त्याने बॉडि लँग्वेज पोकर फेस ठेउन, निव्वळ नजरेने आणि डायलॉग डिलिवरीवर क्म्युनिकेट केलेली आहे.
जिमीचं कॅरेक्टर तर अफलातुनच आहे. ए ट्रु हसलर, वेळ प्रसंगी काहिहि करुन बाजी उलटवणारा. कधी मार खाणारा तर बर्याचदा सुमडीत निसटणारा. बायकर्स, इन्मेट्स, लो-लाइफ स्लिंगर्सना बर्नर्स विकण्याचा एपिसोड तर धमाल आहे.
मैत्रेयी, धन्यवाद धागा काढल्याबद्धल. वर हेडर मध्ये स्पॉयलर वॉर्निंग देउन ठेवा. हातचं राखुन न ठेवता इथे लिहिणार आहे, न बघितलेल्यांचा रसभंग होउ शकतो...
>>५ वा सीझन नेटफ्लिक्स वर
>>५ वा सीझन नेटफ्लिक्स वर आल्यावरच बघणार.<<
नेफिच्या टाइमटेबल नुसार पांचवा सिझन, जो सध्या चालु आहे, पुढच्या वर्षी किंवा सहावा सिझन सुरु व्हायच्या थोडं आधी स्ट्रिमिंगला ड्रॉप करतील. एक वर्ष थांबण्या ऐवजी एमसीच्या अॅपवर पांचवा सिझन स्ट्रिंमिंगला आहे. त्यावर पहा, कमर्शियल्स आहेत पण अगदि तोकड्या. तुमच्या टिवी/केबल्/सर्विस प्रोवायडरचे क्रेडेंशियल्स द्यावे लागतील...
अरे हो म्यूझिक बद्दल मेन्शन
अरे हो म्यूझिक बद्दल मेन्शन करायलाच हवं. हे वरचं आहेच, शिवाय हू कॅन फर्गेट "विनर टेक्स इट ऑल"!!! काय पर्फेक्ट सीन, पर्फेक्ट साँग!!
https://www.youtube.com/watch?v=qll7hCYFNjs
हे बहुधा ओरिजिनल :
https://www.youtube.com/watch?v=iyIOl-s7JTU
मस्त आहेत दोन्ही वेबसीरीज ..
मस्त आहेत दोन्ही वेबसीरीज .. आधी ब्रेकिंग बॅड पहिली त्यामुळे Better Call Saul ला ignore करणे शक्यच नव्हते .. नेक्स्ट season ची आतुरतेने वाट पाहतेय .
आला धागा! शाब्बास!
आला धागा! शाब्बास!
आणखी एक. विंस गिलिगनची स्टाइल
आणखीन एक. विंस गिलिगनची स्टाइल मला कोएन ब्रदर्सच्या जवळपास जाणारी वाटते. अगदि रटाळ सीन असला तरी प्रेक्षकांची उत्कंठा ताणुन ठेवणारं चित्रीकरण, आणि त्याला पुरक संवाद. अगदि खुर्चीला खिळवुन ठेवणारे. उदाहरणा दाखल लेटेस्ट एपिसोड (५/८) बघा...
उत्कंठा ताणुन ठेवणारं
उत्कंठा ताणुन ठेवणारं चित्रीकरण >> अरे त्याच्या एकेक इंटरेस्टिंग सिनेमॅटोग्राफीबद्दल सेपरेट बोलायला हवे. अफलातून कॅमेरा अँगल्स!!
कधी कॉफी मशीन च्या आतून बघतोय असे वाटावे असे , कधी ट्रॅश कॅन च्या आतून, रस्त्यावरचं मुंग्या आलेलं आइसक्रीम असल्या एकेक कल्पना गिलिगन लाच सुचू शकतात.
बायदवे या वीक चा एपि पाहिला. ब्रेबॅ - एस२ इ९ दि ४ डेज आउट ची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही!!
ब्रेकिंग बॅड इतकी भिकार शिरेल
ब्रेकिंग बॅड इतकी भिकार शिरेल दुसरी नसावी...त्याचा स्पिन ऑफ म्हणजे काय घाण लेवल असेल... कल्पना करवत नाही...
बेकॉसॉ ट्रिविया : भारतीय
बेकॉसॉ ट्रिविया : भारतीय कनेक्शन
* S02E06 च्या शेवटी एक बंगाली गाणं आहे. The Bombay Royale बँडचं ते Henna Henna गाणं आहे. https://www.youtube.com/watch?v=fX3RXsMn5NE
* S03E09 जेव्हा माईक लिडियाला भेटायला पहिल्यांदा मॅड्रिगलच्या ऑफिसमध्ये जातो आणि वेटिंग लाउंजमध्ये बसलेला असतो तेव्हा बॅकग्राउंडला एकजण हिंदीतून फोनवर बोलताना ऐकू येतो ( नंतरच्या शॉटमध्ये तो दिसतो पण).
>> ब्रेकिंग बॅड इतकी भिकार
>> ब्रेकिंग बॅड इतकी भिकार शिरेल दुसरी नसावी...त्याचा स्पिन ऑफ म्हणजे काय घाण लेवल असेल... कल्पना करवत नाही...
नवीन Submitted by च्रप्स >> कमॉन च्रप्स.. हे बाहेर बोलू नका.
>>S02E06 च्या शेवटी एक बंगाली
>>S02E06 च्या शेवटी एक बंगाली गाणं आहे.<<
बिंजवॉचच्या नादात नोटिस नाहि केलं. पण त्याचाहि काहितरी रेफरंस (मेटफोर?) असावा. जिओटीच्या एपिसोडच्या शेवटि डायरेक्टर्सची कामेंटरी असायची, तशीच बेकॉसॉ मधे पण असती तर मजा आली असती...
भावनेच्या भरात किम एक मोठं ब्लंडर करुन बसली आहे; फोर्सिंग हरसेल्फ इन्टु दि गेम. ब्रेबॅ मध्ये तिच्या गैरहजीरीचं हेच कारण असावं...
ब्रेबॅ मध्ये तिच्या
ब्रेबॅ मध्ये तिच्या गैरहजीरीचं हेच कारण असावं...>>> काल माइक म्हणाला "शी इज इन द गेम नाऊ" तेव्हा असाच विचार आला मनात. होपिंग ते किम फक्त त्याला कायमचे सोडून जाते इतकेच असावे.
किम फार आवडते मला. बहुधा दुसर्या सीझन मधे चक आणि हावर्ड तिला जिमीला सपोर्ट केल्याची शिक्षा म्हणून डॉक्युमेन्टेशन च्या कामावर तिला डीमोट करतात तेव्हा जिमी ने इन्टरफिअर करण्याचा प्रयत्न केल्यावर ती म्हणते " नो जिमी यू डोन्ट रेस्क्यू मी, आय रेस्क्यू मी!!" लव्ड इट! आणि मग नेटाने स्वतः ते मेसा वर्डे चे अकांऊट मिळवते. जिमीला काय वाटेल ते करून सपोर्ट करताना सुद्धा कायम शी मेक्स अ पॉइन्ट टु प्रोटेक्ट हर ओन आयडेन्टिटी, हर ओन वॅल्यूज. व्हेरी पावरफुल कॅरेक्टर.
गुगलचं आजचं रेकमेंडेशन, इट्स
गुगलचं आजचं रेकमेंडेशन, इट्स सो एफिंग ऑफ. हे कोण आहेत सेतुपती आणि देवेरकोंडा? आणि अनिल कपुर अॅज हँक?
माझ्या मते माबोकर कॅन डु ए बेटर जॉब अॅज कास्टिंग डायरेक्टर. व्हॉड्डाया थिंक...
हाहाहा कुठल्यातरी तेलगु फॅन
हाहाहा कुठल्यातरी तेलगु फॅन ने केलेले दिसते हे वर्जन
या आठवड्याचा एपिसोड पाहिला असेलच. लालो अँड किम रॉक्ड. आता पुढच्या आठवड्यात फिनाले?!
किमचं ट्रांस्फॉर्मेशन अचंबित
किमचं ट्रांस्फॉर्मेशन रिमार्केबल आहे. आधिच्या सिझन्समध्ये प्रत्येक बाबतीत एथिकल वागणारी, जिमीला वेळोवेळी मॉरल कंपस दाखवणारी किम, आणि शेवटच्या दोन एपिसोड्स मधे लालोला भिडणारी, हावर्ड समोर जिमिचं वागणं रॅशनलाइज करणारी किम इथपर्यंतचा तिचा प्रवास पाहिलात तर मी काय म्हणतो आहे याची कल्पना येइल. आता सहाव्या सिझनमध्ये तिच्यासमोर काय वाढुन ठेवलंय याची काळजी वाटतेय...
लालोचा सूडाचा प्रवास सुरु झाला आहे. फायनल सिझनमध्ये आता कोणाच्या विकेट्स पडतील हे माहित असुनहि त्या कशा पडतील याची उत्सुकता आहे...
मी काल पाहिली फिनाले. जरा
मी काल पाहिली फिनाले. जरा अपेक्षेपेक्षा कमी ईवेन्टफुल निघाली. तरी इंटरेस्टिंग.
जिमी आणि किम हावर्ड बद्दल बोलतात त्यात किम मला सिरियस असेल असे वाटले नाही. इज शी सेयिंग दॅट टु ट्राय अँड मेक अ पॉइन्ट ? असं वाटलं. कारण ती जे सजेस्ट करते ते तिच्या कॅरेक्टर मधे नाही बसत अजूनही.
लालो खतरनक प्राणी निघाला. नाचो आणि लालो पैकी एकाची तरी विकेट उडेल असे वाटले होते पण नोप!
>>ती जे सजेस्ट करते ते तिच्या
>>ती जे सजेस्ट करते ते तिच्या कॅरेक्टर मधे नाही बसत अजूनही.<<
म्हणुनंच वर म्हणालो, किम्स कॅरेक्टर इज ट्रांस्फॉर्म्ड ड्रॅस्टिकली...
वेल, आता सिझन संपला असल्याने वी कॅन स्पेक्युलेट व्हॉट कुड हॅपन टु नाचो, लालो अँड किम...
१. नाचोला बाहेर पडायचं होतं, वडिलां खातर पण त्याला गसने डबल एजंट बनवलं. बहुतेक फिनाले सिझनमध्ये गस विल कट हिम लूझ. जिमीच्या मदतीने तो वॅक्युम क्लिनरला गाठेल आणि अदृश्य होइल...
२. लालो हॅज टु डाय. सूनर ऑर लेटर, इट्स जस्ट ए फंक्शन ऑफ (गिलिगन्स) टाइम...
३. अँड किम? आय जस्ट होप, गिलिगन वुडंट (रादर शुडंट) ब्रेक एव्हरिबडिज हार्ट...
जस्ट पहिल्या सिजनचा नववा
जस्ट पहिल्या सिजनचा नववा एपिसोड पाहून होतो आहे .... मालिकेच्या प्रेमात पडले आहे .. चक यू आर नॉट रियल लॉयर , यू आर स्लिपिंग जिमी सांगतो , जिमी आय थॉट , यू वेअर प्राउड ऑफ मी असे उद्गार काढतो तो सिन हार्टब्रेकिंग आहे ..... बिचारा भावाला आपली इतकी काळजी आहे की आपल्याकडून स्लिपिंग जिमी सारखं वर्तन दिसू लागताच त्याचे सिम्प्टम्स बळावतात इतक्या घोर गैरसमजात होता ... किती विश्वास , किती प्रेम ... चकची तो इतकी काळजी घेत असतो पदोपदी आणि त्याच माणसाकडून असलं ऐकून घेणं म्हणजे .. चकसाठी जिमी मेल रूम मध्ये कामाला होता तोवर ठीक होतं पण त्याचं वकील होणं तो पचवू शकला नाही .. It's very sad from Jimmy's perspective .
काही पुढचे सिन युट्युब वर पाहिले .... मृत्यूशय्येवर आई जिमीच्या भेटीसाठी तळमळत असते तो वगैरे .... एवढा प्रथितयश , यशस्वी वकील होऊनही चक जेलसी सारख्या भावनेच्या इतका आहारी गेला आहे ...
In better call saul , why does Chuck hate Jimmy so much and try to sabotage him while Jimmy helps him so much ? Quora ( कॉपी पेस्ट फंक्शन बंद आहे )
या प्रश्नात चकच्या वागण्याचं सुरेख विश्लेषण केलं आहे .... मानवी स्वभावाच्या एकेक गुंतागुंती उकलून दाखवणाऱ्या सिरिजेस पाहताना खूप बरं वाटतं ....
इट्स कांप्लिकेटेड. थोडिफार
इट्स कांप्लिकेटेड. थोडिफार सिबलिंग रायव्लरी, लहान भावाला प्रोटेक्ट करण्याची तळमळ, मोठ्या भावाविषयी असणारा आदर, प्रेम इ. सगळ्यांचं सुरेख मिश्रण आहे चक-जिमीच्या कॅरेक्टर्समध्ये. भावा-भावाच्या संबंधात आढळ्णारा अॅम्बविलंस खुप इफेक्टिवली दाखवला आहे, कुठलाहि बिभत्स रंग न देता. जिमीला बारचं लायसंस मिळाल्यावर दोघे भाऊ अॅबाचं गाणं गातात तो प्रसंग त्यांच्यातल्या नात्याचा इपिटमी म्हणायला हरकत नाहि...
ते "विनर टेक्स इट ऑल ... "
ते "विनर टेक्स इट ऑल ... " ना? फारच अॅप्ट झालाय तो सीन अन ते गाणे . हायलाइट ऑफ देअर रिलेशन.
हो हो, तेच गाणं...
हो हो, तेच गाणं...
ब्रेकीन्ग bad नसेल पाहीली तरी
ब्रेकीन्ग bad नसेल पाहीली तरी यात link लागु शकेल का?
हो.
हो.
Pages