बेटर कॉल सॉल!
तुम्ही ब्रेकिंग बॅड फॅन असाल तर सॉल ला नोटिस न करणे शक्य नाही. ब्रेबॅ च्या दुसर्याच सीझन मधे सॉल, द "क्रिमिनल" लॉयर ची एन्ट्री झाल्या झाल्या बॉब ओडेनकर्क उर्फ सॉल गुडमन भयंकर भाव खाऊन गेला.
ब्रेबॅ च्या जिनियस दिग्दर्शक विन्स गिलिगन ला सॉल च्या पात्रासाठी दुसरी आख्खी सीरीज बनवावीशी वाटली हेही त्याच्या अफलातून क्रिएटिविटीला साजेसेच. अन्यथा प्रचंड गाजलेल्या सीरीज चा स्पिन ऑफ पण तितकाच प्रभावी असणे हेही जवळपास अशक्यच. पण गिलिगन ने करून दाखवलेय!!