तुम्ही ब्रेकिंग बॅड फॅन असाल तर सॉल ला नोटिस न करणे शक्य नाही. ब्रेबॅ च्या दुसर्याच सीझन मधे सॉल, द "क्रिमिनल" लॉयर ची एन्ट्री झाल्या झाल्या बॉब ओडेनकर्क उर्फ सॉल गुडमन भयंकर भाव खाऊन गेला.
ब्रेबॅ च्या जिनियस दिग्दर्शक विन्स गिलिगन ला सॉल च्या पात्रासाठी दुसरी आख्खी सीरीज बनवावीशी वाटली हेही त्याच्या अफलातून क्रिएटिविटीला साजेसेच. अन्यथा प्रचंड गाजलेल्या सीरीज चा स्पिन ऑफ पण तितकाच प्रभावी असणे हेही जवळपास अशक्यच. पण गिलिगन ने करून दाखवलेय!!
ब्रेबॅ संपते तेव्हा सॉल चे शेवटचे स्टेटस आपल्याला "हूवर वॅक्यूम क्लीनर रीपेअर्स " वाल्याच्या मदतीने आयडेन्टिटी बदलून तो एक साधा सिनॅबन चा मॅनेजर बनून ओमाहा मधे कायमचा निघून जातो इतके माहित आहे. तिथेच बेटर कोल सॉल ची सुरुवात आहे. आता सिनॅबन मधे अत्यन्त सुमार, एकाकी, बोरिंग, आणि कुणी कधी आपल्याला ओळखले तर काय या कायमच्या भितीसकट आयुष्य जगणार्या सॉल ला त्याचा भूतकाळ आठवतो.. ब्रेबॅ चे कथानक घडण्याच्या आधी काही वर्षांचा काळ.
सॉल गुडमन चं खरं नाव जिमी मॅकगिल. त्याचा मोठा भाऊ चक हा एक मोठा यशस्वी लॉयर आणि प्रसिद्ध लॉ फर्म चा पार्टनर. जिमी मात्र चलाख असला तरी लहानपणापासून शिक्षणात आपट्या खाल्लेला, राजमार्गाऐवजी कायम धोक्याचे किंवा गैर असे शॉर्टकट शोधणारा, कुठल्यातरी समोअन आयलंडवरच्या कॉलेज मधून कॉरस्पॉन्डन्स कोर्सेस करून लॉ ची डिग्री घेतलेला पण भावासारखा मोठा लॉयर होण्याची स्वप्नं बघणारा.
जिमीचा सॉल गुडमन होण्यापर्यन्त चा प्रवास म्हणाजे ही सीरीज. आतापर्यन्त ५ सीझन आले आहेत. पाचवा अॅक्चुअली नुकताच रिलीज झाला आहे. या सीरीज ची चर्चा इथे करता येईल.
माझ्यासाठी या सीरीज चे अजून एक आकर्षण म्हणजे ब्रेबॅ मधली पुन्हा भेटणारी कॅरेक्टर्स! माइक अर्मनट्रॉट चा पॅरलल लीड सारखाच रोल आहे. गस फ्रिन्ग चे पण महत्त्वाचे पात्र आहे, बाकी टुको, हेक्टर आणि सालामान्का फॅमिली, लिडिया, या सीझन ला हॅन्क ची पण एन्ट्री झाली आहे!! शिवाय ब्रेबॅ मधे नसलेली सॉल ची गर्लफ्रेन्ड किम, भाऊ चक, सालामान्कांचा उजवा हात नाचो, अशी बरीच इंटरेस्टिंग पात्रं आहेत. ब्रेबॅ पाहिलेली नसली तरी ही सीरीज स्वतंत्र पणे बघू शकता पण ब्रेबॅ बघितली असेल तर जास्त मजा येईल हे नक्की!
४ सीझन्स नेटफ्लिक्स वर आहेत. पाचवा AMC वर सध्या सुरू आहे.
imdb लिन्क - https://www.imdb.com/title/tt3032476/
https://en.wikipedia.org/wiki/Better_Call_Saul
*********** स्पॉयलर वार्निंग - खालील चर्चेत बरेच स्पॉयलर्स येऊ शकतील. जपून वाचा!!
बेटर कॉल सॉल!
Submitted by maitreyee on 11 April, 2020 - 14:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो ती जिमीच्या बर्याच अ
हो ती जिमीच्या बर्याच अॅक्शन / चॉइसेस नी हर्ट होताना दिसते आधीच्या सीझन्स मधे. तसे तर मेसा वर्डे च्या त्या प्लॉट च्या केस मधे जिमी त्या म्हातार्याला कॉम्पेन्सेशन देववतो आणि वर केविन ला त्या लोगो आर्टवर्क साठी फाइन बसतो तेव्हा मला वाटले आता जोराचे भांडण करेल किम पण ती चक्क शांतपणे "ऑर.... ऑर वी कॅन गेट मॅरीड " असे म्हणते ! इन फ्युचर तिला त्याच्या अगेन्स्ट टेस्टिफाय करायची वेळ येऊ नये हे कारण असले तरी तेव्हा मला चकित व्हायला झाले होते.
हो ती जिमीच्या बर्याच अ
डबल.
"ऑर.... ऑर वी कॅन गेट मॅरीड "
"ऑर.... ऑर वी कॅन गेट मॅरीड " असे म्हणते ! इन फ्युचर तिला त्याच्या अगेन्स्ट टेस्टिफाय करायची वेळ येऊ नये हे कारण असले तरी तेव्हा मला चकित व्हायला झाले होते. >> टोटली. मला तर ते पुढचे कारण कळेपर्यंत ही काय एकदम मराठी सिरीज सारखी ट्विस्ट असे वाटले होते
पण तिच्यात तो कॉन एलेमेन्ट
पण तिच्यात तो कॉन एलेमेन्ट आहेच ना! फक्त तो रॉबिनहुड (मायबोलीवरचा नव्हे! ) व्हरायटी आहे. ते उंची टकीलाचं झाकण त्याचाचतर सिम्बॉल केला आहे ना गिलिगनने! कॉमन मॅनला नाडणार्या मोठमोठ्या कंपन्या इन प्रिन्सिपल माफिया/कार्टेलपेक्षा फारशा वेगळ्या नाहीत हे तिला कळलेलं आहे.
हॉवर्ड जिमीला त्या माल्प्रॅक्टिस इन्शुरन्सबद्दल सांगतो - वरकरणी दोष स्वतःकडे घेतो - तेव्हा त्याने ते 'फक्त' जिमीलाच सांगण्यातली गोम तिला एकटीलाच कळते!
ती सॉलचे निर्णय नुसते 'समजून घेत' नाही, ती त्याच्याशी रेझोनेट करते. पण तिला शक्यतो तसं व्हायचं नाहीये. शक्यतो.
लालोला ती जे झाडते ते तर एकदम टाळ्याशिट्ट्या प्रकरण आहे! तसंच हॉवर्डने तिला जिमीविरुद्ध वळवायचा प्रयत्न केल्यावर जे हसते तेही!
लालोचं काम केलेला अॅक्टर हे
लालोचं काम केलेला अॅक्टर हे एक भारीच फाइंड आहे! त्याच्या एन्ट्रीला मला वाटलं इतकं ब्रॉड स्माईल आधी कुणाचं बघित्ल्याचं आठवततरी नाही. आता तेच स्माइल कसलं स्केअरी डेडली वाटतं! >> करेक्ट! समस्त सालामांका 'फॅमिली'च भयानक आहे. तो हेक्टर सालामांकाही महाखट म्हातारा आहे आणि ते दोन चंगुमंगु सालामांका तर कंप्लिट सायको आहेत.
हो हो! फॅमिलीच सायको आहे सगळी
हो हो! फॅमिलीच सायको आहे सगळी!
हेक्टर सालामांकाची
हेक्टर सालामांकाची व्हिलचेअरवर आल्यानंतरची अॅक्टिंगही कसली मस्त आहे.
त्या हेक्टर आणि लालोचं
सालामान्का फ्यामिली मधे एकमेकात बंधूप्रेम फार आहे पण, फॅमिली इज एवर्रीथिंग त्या हेक्टर आणि लालोचं बाँडिंग किती घट्ट दाखवलंय! हेक्टर फक्त घंटी वाजवून " लालो ला मारण्याचा प्रयत्न केलेली माणसे गस ने पाठवली होती याचा एविडन्स गोळा कर " असं लालो ला सांगतो ( आणि लालोही ते बरोब्बर समजून घेतो) तो पार्ट फार भारी होता.
हो हो!! भारी होता तो!
हो हो!! भारी होता तो!
बाय द वे, अजून पाच एपिसोड्स
बाय द वे, अजून पाच एपिसोड्स आहेत ना बीसीएसचे?
लालो आणि हॉवर्ड दोघेही नाहीत तर पुढे कसा जाणार शो?
अर्थात ब्रेबॅमध्ये गसला मारल्यावर असंच वाटलं होतं.
आता गिलिगन काय काढेल हॅटमधून?
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 July, 2022 - 09:00
अजून ५ भाग आहेत का? मला वाटले ३. खुद्द वॉल्ट अन जेसी या सीझन ला यायचे होते असे वाचले होते . पण ते कसे स्टोरीत बसवतील काय माहित. पण कदाचित फ्लॅशबॅक संपून ओमाहाच्या सिनॅबन च्या पुढचे काही कल्न्च्लुजन असल्यास ते असू शकेल. किम चे काय होणार अन ती ब्रे बॅ मधे का नाही त्याचा तर अजून काहीच पत्ता नाही.
Submitted by maitreyee on 14 July, 2022 - 09:34
*****************************बेटर कॉल सॉल - स्पॉयलर्स अहेड************************
काही तरी मोठा झोल होणार आहे नक्की. मागच्या काही एपिसोड मध्ये नाहीका खुप एक लॅविश घर पोलिस लोकं पॅक अप करताना दाखवले आहेत. तेव्हा स्टॉर्म ड्रेन पाशी त्या वोडकाचे स्पेशल कॉर्क जे जिमी कडे असतं ते पडलेलं दाखवलं आहे. सध्या तरी ते दोघं लहान घरातच होते. म्हणजे पुढे काहीतरी अपस्विंग आणि नंतर तो भुमीगत होतो सिनॅबन वगैरे. आणि तिथून पुढे मग ब्रे बॅ बहुतेक. की सॉल ची सिनॅबनची वाताहत ही ब्रे बॅ च्या पुढची स्टेज आहे?
Submitted by वैद्यबुवा on 14 July, 2022 - 11:14
सॉल आणि वॉल्ट ‘व्हॅक्यूम रिपेअर’साठी एकाच वेळी गेले होते ब्रेबॅच्या शेवटी. त्या वेळी सिनॅबन इन्डिकेट केलं आहे.
आणि गसची लॉन्ड्री लॅब आता निर्धोक झाली. म्हणजे आता आपण बघणार तो ब्रेबॅचा प्यारलल थ्रेड असं दिसतंय.
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 July, 2022 - 11:29
ह्म्म्म शक्य आहे. पण तरी अजून लॅब इस्टॅब्लिश व्हायची आहे. तो फटिचर प्रोफच अजून मेथ बनवतोय गस करता. वॉल्ट ची एंट्री नाही व्हायची इतक्यात.
Submitted by वैद्यबुवा on 14 July, 2022 - 11:30
Funny thing is, in one of their earlier meetings, Sol asks Walt and Jesse if Nacho or Lalo sent them.
आता हे दोघेही मेलेत हे त्याला या पॉइंटला कळलं आहे ना? की नाही अजून?
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 July, 2022 - 11:37
बाय द वे, वॉल्ट आणि जेसीला इन मीन तीन सीन्ससाठी फ्लाय करून आणलं आणि ते सीन्सही इन अ सीमिंगली रॅन्डम ऑर्डर शूट केले असं ऐकलं.
(माझ्या एका एरवी खत्रूड पण बेकॉसॉचं नाव निघताच इन्स्टन्ट फ्रेन्डशिप झालेल्या कलीगकडून ऐकलं. Proud )
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 July, 2022 - 11:50
लालो नाहीये ब्रेबॅमध्ये म्पण आपली ती ही पण नाहीये. म्हणजे ती पण Uhoh
Submitted by सायो on 14 July, 2022 - 12:35
आता हे दोघेही मेलेत हे त्याला या पॉइंटला कळलं आहे ना? की नाही अजून?>>नाही. SPOILER
Mike did not tell him about Lalo clearly and Saul doesn't know about Nacho died. So he doesn't know for sure that both are dead.
Submitted by mandard on 14 July, 2022 - 13:03
स्टिल थिंकिंग अबाउट कालचा एपिसोड Happy ते त्या ह्यांनी बेसमेन्ट मधे गन ठेवलेली मला आठ्वत नव्हते अजिबात. तुम्हाला कोणाला लक्षात होते का? मी तो सीन दोनदा पाहिला! आणि गिलिगन स्पेशल - एपिसोड च्या सुरुवातीला तो आधी टोटल रँडम वाटावा पण लक्षात आल्यावर फ्रीकिश वाटेल असा शू ओन द शोअर वाला सीन फार भारी!
Submitted by maitreyee on 14 July, 2022 - 13:15
तुम्हाला कोणाला लक्षात होते का?>>>हो spoiler
And my guess was right about using the same gun to kill lalo
Submitted by mandard on 14 July, 2022 - 13:18
पण माइक बेकॉसॉ मधे ब्रेबॅ पेक्षा म्हातारा का दिसतो याचा विचार केलात का?
सूर्यवंशम जर विन्स गिलिगन ने काढला तर त्यात ब्रेबॅ मधला माइक हा हीरा ठाकूर असेल व बेकॉसॉ मधला माइक हा ठाकूर भानूप्रताप सिंग असेल Happy
Submitted by फारएण्ड on 14 July, 2022 - 13:38
https://screenrant.com/better-call-saul-digital-deaging-vfx-why-explained/
फारेंड हे बघ
Submitted by mandard on 14 July, 2022 - 14:05
दिसणारच ना आता पण उतना चल जायेंगा. एनर्जी आणि बॅडॅसरी मध्ये तिळमात्रही फरक नाही पडलेला हे धेनात घ्यावा लोखो!
Happy
Submitted by वैद्यबुवा on 14 July, 2022 - 14:37
हो आता आठ-दहा वर्षं झाली ना. दिसणारच वय. क्या करनेका! दुसरा कोणी त्याच्या जागी इमॅजिन करता येणार नाही.
Submitted by maitreyee on 14 July, 2022 - 14:48
हो, हो मायकल एक्दम अमिताभ आहे सिरीजमधला. काय अॅटिट्युड वा वा.
Submitted by सायो on 14 July, 2022 - 14:48
व्हय! तो मला सिट म्हनला तर मी असल तिथे सिटेन लगेच!
आवाज, अॅटिट्युड आणी त्याला अनुभवाची जोड. खत्तरनाक पॅकेज!
Submitted by वैद्यबुवा on 14 July, 2022 - 14:55
मला नव्हती आठवत गन लपवलेली. पुन्हा बघावेत काय आधीचे एपिसोड! Proud
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 July, 2022 - 15:44
संपादन (4 hours left)
मलाही नाही आठवत.
https://www.yahoo.com/entertainment/bob-odenkirk-reveals-next-weeks-2058...
:आवंढा:
Submitted by वैद्यबुवा on 14 July, 2022 - 15:48
गन लपवताना गस. S6E5
त्याने तो प्लग ते गन या अंतराचा अंदाजही घेतला. इन्टरेस्टिंग! It takes one to know one!
***** स्पॉइलर *****
किम जेव्हा 'माय हजबन्ड चेन्ज्ड हिज माइंड' म्हणते तेव्हा त्याला गडबड लक्षात येते. लालो इतक्या सहज प्लॅन बदलणार नाही - एकतर त्याला असं होईल याचा अंदाज असणार आणि/किंवा कोणीही गेलं तरी त्याच्या मेन प्लॅनमध्ये फरक पडणार नाही हे गणित असणार.
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 July, 2022 - 16:00
संपादन (4 hours left)
पुन्हा पहिल्या सिझनपासून पाहत
पुन्हा पहिल्या सिझनपासून पाहत आहे . किमला मेसा वर्डे मिळावी म्हणून जिमीने अक्षरशः चकचा बळी दिला असं वाटतं . चक फार वाईट वागला हे खरं आहे पण जिमी जर मॅच्युरिटी दाखवून चकपासून लांब राहिला असता तर चक बरा होण्याच्या , पुन्हा काम करू लागण्याच्या मार्गावर होता . भाऊ आपल्याशी जसा वागला ते कळल्यामुळे जिमीचं सगळं प्रेम आटून गेलं म्हणावं तर चकच्या ट्रायल सीनमध्ये जिमीला होणारा मनस्ताप आणि दुःख स्पष्ट दिसतं ... आजार मानसिक आहे हे सिद्ध केल्यामुळे चकला फार धक्का बसेल , त्रास होईल याची त्याला कल्पना होती पण आत्महत्या करण्याइतपत परिणाम होईल असं त्याला वाटलं नसणार अजिबात ..
एवढं सगळं होऊन एकदाची ती मेसा वर्डे मिळाल्यावर किम शांत झाली का तर नाही , लगेच त्या कामाला कंटाळली , ह्यात काही नावीन्य नाही , बोअर आहे म्हणून ... बेटर कॉल सॉल , ब्रेकिंग बॅड बघताना काही वेळा असे कसे वागतात हे लोक म्हणून चडफडायला झालं आहे .. प्रेक्षकाला स्टोरीत इमोशनली इनवॉल्व करून मग कधीकधी फ्रस्टेट करतात या 2 मालिका . माइक काय आयुष्य जगला , कशाकशातून वाचला , टिकून राहिला .. कशासाठी तर काहीही कारण नसताना वॉल्टरच्या मूर्ख इगो मुळे मरण्यासाठी !! ब्रे बॅ तर लास्ट 3 एपिसोड पाहिलेच नाहीत , एन्ड वाचला फक्त वेबसाईटवर .. इतका निगेटिव्ह एन्ड बघायची इच्छा होईना ... तेही सुरळीत होतंय , आता वॉल्टसमोरचे सगळे प्रॉब्लेम्स सुटत आले अशी आशा निर्माण करून मग सगळी परिस्थिती गडगडत गेलेली दाखवली आहे .. बेटर कॉल सॉल लास्ट सिझन पाहायचा राहिला होता , आता पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहणार आहे .
तेच दाखवणं आवश्यक होतं ना!
तेच दाखवणं आवश्यक होतं ना! ब्रेकिंग बॅडचा शेवट सुरळीत होऊन कसा काय चालेल?
Pages