तुम्ही ब्रेकिंग बॅड फॅन असाल तर सॉल ला नोटिस न करणे शक्य नाही. ब्रेबॅ च्या दुसर्याच सीझन मधे सॉल, द "क्रिमिनल" लॉयर ची एन्ट्री झाल्या झाल्या बॉब ओडेनकर्क उर्फ सॉल गुडमन भयंकर भाव खाऊन गेला.
ब्रेबॅ च्या जिनियस दिग्दर्शक विन्स गिलिगन ला सॉल च्या पात्रासाठी दुसरी आख्खी सीरीज बनवावीशी वाटली हेही त्याच्या अफलातून क्रिएटिविटीला साजेसेच. अन्यथा प्रचंड गाजलेल्या सीरीज चा स्पिन ऑफ पण तितकाच प्रभावी असणे हेही जवळपास अशक्यच. पण गिलिगन ने करून दाखवलेय!!
ब्रेबॅ संपते तेव्हा सॉल चे शेवटचे स्टेटस आपल्याला "हूवर वॅक्यूम क्लीनर रीपेअर्स " वाल्याच्या मदतीने आयडेन्टिटी बदलून तो एक साधा सिनॅबन चा मॅनेजर बनून ओमाहा मधे कायमचा निघून जातो इतके माहित आहे. तिथेच बेटर कोल सॉल ची सुरुवात आहे. आता सिनॅबन मधे अत्यन्त सुमार, एकाकी, बोरिंग, आणि कुणी कधी आपल्याला ओळखले तर काय या कायमच्या भितीसकट आयुष्य जगणार्या सॉल ला त्याचा भूतकाळ आठवतो.. ब्रेबॅ चे कथानक घडण्याच्या आधी काही वर्षांचा काळ.
सॉल गुडमन चं खरं नाव जिमी मॅकगिल. त्याचा मोठा भाऊ चक हा एक मोठा यशस्वी लॉयर आणि प्रसिद्ध लॉ फर्म चा पार्टनर. जिमी मात्र चलाख असला तरी लहानपणापासून शिक्षणात आपट्या खाल्लेला, राजमार्गाऐवजी कायम धोक्याचे किंवा गैर असे शॉर्टकट शोधणारा, कुठल्यातरी समोअन आयलंडवरच्या कॉलेज मधून कॉरस्पॉन्डन्स कोर्सेस करून लॉ ची डिग्री घेतलेला पण भावासारखा मोठा लॉयर होण्याची स्वप्नं बघणारा.
जिमीचा सॉल गुडमन होण्यापर्यन्त चा प्रवास म्हणाजे ही सीरीज. आतापर्यन्त ५ सीझन आले आहेत. पाचवा अॅक्चुअली नुकताच रिलीज झाला आहे. या सीरीज ची चर्चा इथे करता येईल.
माझ्यासाठी या सीरीज चे अजून एक आकर्षण म्हणजे ब्रेबॅ मधली पुन्हा भेटणारी कॅरेक्टर्स! माइक अर्मनट्रॉट चा पॅरलल लीड सारखाच रोल आहे. गस फ्रिन्ग चे पण महत्त्वाचे पात्र आहे, बाकी टुको, हेक्टर आणि सालामान्का फॅमिली, लिडिया, या सीझन ला हॅन्क ची पण एन्ट्री झाली आहे!! शिवाय ब्रेबॅ मधे नसलेली सॉल ची गर्लफ्रेन्ड किम, भाऊ चक, सालामान्कांचा उजवा हात नाचो, अशी बरीच इंटरेस्टिंग पात्रं आहेत. ब्रेबॅ पाहिलेली नसली तरी ही सीरीज स्वतंत्र पणे बघू शकता पण ब्रेबॅ बघितली असेल तर जास्त मजा येईल हे नक्की!
४ सीझन्स नेटफ्लिक्स वर आहेत. पाचवा AMC वर सध्या सुरू आहे.
imdb लिन्क - https://www.imdb.com/title/tt3032476/
https://en.wikipedia.org/wiki/Better_Call_Saul
*********** स्पॉयलर वार्निंग - खालील चर्चेत बरेच स्पॉयलर्स येऊ शकतील. जपून वाचा!!
बेटर कॉल सॉल!
Submitted by maitreyee on 11 April, 2020 - 14:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बेटर कॉल सॉल चा सहावा आणि
बेटर कॉल सॉल चा सहावा आणि बहुधा शेवटचा सीझन येत्या सोमवरी AMC वर येतो आहे!! या सीझन मधे ब्रे बॅ ची कोण कोण कॅरेक्टर्स दिसतील, वॉल्टर असेल का? किम चे काय झाले असेल ? सॉल चा शेवट काय होत असेल? अशा बर्याच गोष्टींची उत्सुकता आहे!! आयॅम एक्सायटेड!!
बेटर कॉल सॉल चा सहावा आणि
बेटर कॉल सॉल चा सहावा आणि बहुधा शेवटचा सीझन येत्या सोमवरी AMC वर येतो आहे!! >>>
Netflix वर येणार नाही का??
मी पणhttps://www.outkick.com
मी पण
https://www.outkick.com/walter-white-jesse-pinkman-better-call-saul-brya...
Netflix वर येणार नाही का??>>> तिथे उशीरा येईल.
आम्ही कालच परत चालू केली.
आम्ही कालच परत चालू केली. पूर्वी तीन-चार भाग बघुन राहुन गेलेली. पुढचा सीझन येणार म्हणूनच बहुतेक नेफ्लि सहज दिसेल अशी प्लेसमेंट करत असेल, त्यामुळे परत वर दिसली.
नेफ्लि वर ५ सीझन्स आहेत. ५ वा
नेफ्लि वर ५ सीझन्स आहेत. ५ वा बराच्ग उशीरा आला होता. आम्ही तो आला तेव्हा ए एम सी वर पाहिला होता रेकॉर्ड करून.
नेफ्लि वर ५ सीझन्स आहेत. ५ वा
नेफ्लि वर ५ सीझन्स आहेत. ५ वा बराच उशीरा आला होता. आम्ही तो आला तेव्हा ए एम सी वर पाहिला होता रेकॉर्ड करून.
When the Breaking Bad prequel/spin-off series Better Call Saul debuted in 2015, fans had one question: “Will Walter White and Jesse Pinkman appear toward the end of the series?”
As the show enters its sixth and final season this month, we can finally answer that question: Yes.
BCS co-creator Peter Gould announced over the weekend that Bryan Cranston and Aaron Paul would reprise their roles as Walter and Jesse, respectively, in some form during the upcoming season. >>>> येस्स्स!
मी मला वाटतं पहिले काही
मी मला वाटतं पहिले काही एपिसोड्स पाहून सोडून दिली होती. नेटाने बघायला हवी.
बघा बघा. ब्रे बॅ सुद्धा स्लो
बघा बघा. ब्रे बॅ सुद्धा स्लो आहे सुरुवातीला, तशी ही सीरीजही जरा स्लो डेवलप होत असली तरी याची मजा वेगळी आहे. खूप विचारपूर्वक घेतलेले सीक्वेन्सेस, कॅरेक्टर डेवलपमेन्ट, पुढे घडणार्या गोष्टींचे आधी येणारे छोटे छोटे क्लू, सगळे गिलिगन/ब्रे बॅ मॅजिक .
ह्म्म. काल नेफ्लिच्या लक्षात
ह्म्म. काल नेफ्लिच्या लक्षात होतं तिकडून त्याने चालू केली. सॉलला कोणी हाफ मिलिअन देतो, सॉल नखं रंगवतोय... मला वाटतं मला पहिल्यापासून चालू केलं पाहिजे तो फील यायला.
AMC भारतात दिसत नाही. Netflix
AMC भारतात दिसत नाही. Netflix वर यायची वाट बघायला लागणार....
अरे सॉल च ५ वा सीझन आत्ताच
अरे सॉल च ५ वा सीझन आत्ताच पाहिला नेफ्लि वर. मग ब्रे बॅ चे शेवटचे ३-४ एपिसोड परत चालू केले बघायला.
ही पाहिली नाहीये व ब्रेबॅड पण
ही पाहिली नाहीये व ब्रेबॅड पण. कोणती आधी पहावी सांगा बरे.
ब्रेबॅ!
ब्रेबॅ!
काल सॉल चालू केली आणि मला परत अल्बुकर्कीला जायचे वेध लागले.
मी पाहिली नाहीये. आता फोमो
मी पाहिली नाहीये. आता फोमो व्हायला लागला.
सुनिधी आधी ब्रेबॅ पाहा.
सुनिधी आधी ब्रेबॅ पाहा.
मलाही नेफिवर बेटर कॉल ची प्लेसमेण्ट दिसत आहे. क्यू मधे आहे सध्या माझ्या.
धन्यवाद अमितव, फारेन्ड.
धन्यवाद अमितव, फारेन्ड.
अमितव, वेगळाच प्रश्न. अल्बुकर्कीची माहिती आहे का? म्हणजे तिथे पहायलाच हव्या अशा गोष्टी? माहिती असेल तर प्लीज विपुत लिहाल का? आम्ही सँटाफे ला जातोय तेव्हा वाटेत लागेल.
बाय द वे बॉब ओडेनकर्कच्या
बाय द वे बॉब ओडेनकर्कच्या फॅन्सनी "नोबडी" पाहा. कोणत्यातरी स्ट्रीमिंगवर आहे. बघणेबल आहे.
माळरान आणि उडणारी वाळू, जेसी
माळरान आणि उडणारी वाळू, जेसी आणि हायझेनबर्गची आर्व्ही, मग सगळ्या लॉनड्र्या आणि त्यांची बेसेमेंट, लॉस पोलोस मधलं फ्राईड चिकन आणि मुख्य म्हणजे टॉमेटो प्युरे.. आणि ब्लू क्रिस्टल!!! बरंच काही आहे. जमलं तर बॉर्डर क्रॉस करून आणखी बरंच आहे बघायला.
नाही हो, काही माहीत नाही मला.
माळरान आणि उडणारी वाळू, >>
माळरान आणि उडणारी वाळू, >> येस्स, ब्रे बॅ आणि सॉल मधे दाखवलेली लँडस्केप्स भारी आहेत. लांबपर्यन्त दिसणारा रस्ता, दगडाची स्ट्रक्चर्स, खुरटे कॅक्टस वगैरे. मधे अरिझोनामधे ड्राइव्ह करताना तशी लँडस्केप्स बघून फार ओळखीचे वाटले होते.
वालुकामय प्रदेश पाहिलाय. फार
वालुकामय प्रदेश पाहिलाय. फार मस्त आहे. बलून फेस्टिवल ऑक्टोबरमधे असतं. इतकंच माहिती. आणि गुगल चालु आहेच. अरिझोनाचे लँड्स्केप पाहूनपाहून हिरवा रंग विसरायला झालंय.
आमच्याकडे पण AMC नाही,
आमच्याकडे पण AMC नाही, Netflix वर येइपर्यंत थांबावं लागणार
अल्बुकर्कीची माहिती आहे का? म्हणजे तिथे पहायलाच हव्या अशा गोष्टी? >>>
Sandia Peak Tramway घेणार असालंच, मस्त आहे.
अल्बुकर्कीमधे Chile Relleno नावाची फार भारी डिश मिळते, जवळपास सर्वच रेस्टॉरंट्समधे. ट्रेन स्टेशनच्या बाहेरच एक रेस्टॉरंट आहे (नाव विसरलो) तिथे फारच भारी मिळते
सँटा फे ला जाताना वाटेत अल्बुकर्की लागेल म्हणजे तुम्ही साउथकडून जात असणार. थोडा detour घेउन White Sands National Park ला जाता आलं तर जरुर जा, अफलातून जागा आहे. तिथे जाताना Carlsbad जवळून जात असाल तर Carlsbad Caverns लाही जरुर जा, अजून एक अफलातून जागा आहे.
तिकडून अल्बुकर्कीला जाताना वाटेत एक गाव लागतं, पहाण्यासारखं विशेष काही नाही पण गावाचं नाव आहे Truth or Consequences
लास्टली - सँटा फे जवळ Taos गाव आहे तिथे आश्रम आणी हनुमानाचं मंदीर आहे. चारच्या सुमारास गेलात तर तिथे चहा मिळेल
भारतात नेफी वर सिझन ६ चे दोन
भारतात नेफी वर सिझन ६ चे दोन भाग आलेत.
हो, आता पाहीलं तर दोन भाग
हो, आता पाहीलं तर दोन भाग दिसत आहेत. तिसरा मंगळवारी येईल असं लिहीलंय. गुड, मग फार थांबावं लागणार नाही
मंदार खूप धन्यवाद. व्हाईट सँड
मंदार खूप धन्यवाद. व्हाईट सँड आणि गुहा पाहिली आहे. व्हाईट सँड जबरदस्त आहे. इतर लिहून ठेवते.
>>अरिझोनाचे लँड्स्केप
>>अरिझोनाचे लँड्स्केप पाहूनपाहून हिरवा रंग विसरायला झालंय.<<
शक्य आहे. मागे आमचा एक अॅरिझोनातला कस्टमर अॅटलाटांत आला होता. इथली वूडेड नेबरहुड्स, गच्च झाडी बघुन त्याला कोंदटल्यासारखं (ऑल्मोस्ट क्लॉस्टरफोबिक) झालं...
मी पण नवा सीजन बघायच्या आधी
मी पण नवा सीजन बघायच्या आधी परत पहिल्या पासून सुरु केली. अफलातून जमलीये स्पिन ऑफ असून सुद्धा. ब्रे बॅ मध्ये मेन कॅरॅक्टर सोडून ज्या इतरांनी पण छाप पाडली त्यांना घेऊन त्यांचे स्वतंत्र आर्क डेवलप केले आणि माय गॉड सगळेच छान जमले आहेत! खरं तर लिहिण्यासारखं इतकं काही आहे पण इतका वेळ नाही. मी सीजन ४ वर आहे.
कोणी बघितलं नसेल तर पुढे स्पॉयलर आहेत हे आधी सांगतो!
नुकताच चक गेला आणि त्या नंतरचे २ सीन. एका मध्ये हाऊर्ड, किम आणि जिमी भेटतात त्यात हाउर्ड विजिबली दुखी, गिल्टी असतो कारण त्याला वाटतं की त्यानी चकला एच एच एम सोडायला सांगतली म्हणून त्यानी आत्महत्या केली. आणि त्या मालप्रॅक्टिस इन्श्युरन्सच्या घोळाबद्दल हौवर्डनी जिमीला सांगितलेलं असतं आणि तेव्हा खरं जिमीच्या लक्षात येतं की हे आपल्यामुळे झालय. हौवर्डनी गिल्टची कबूली देताच जिमी जस्ट अगदी लगेचच त्याच्यावर ब्लेम टाकतो आणि म्हणतो वेल.. दॅट्स युअर क्रॉस टु बेअर!
इथे जिमी किती मेस्ड अप आहे ह्याची प्रचिती येते आणि हेच चक नेहमीच सांगत अस्तो आणि सांगता सांगता शेवटी मरुन पण जातो...
आता पुढचा सीन म्हणजे किम शेवटी हिंमत करुन जिमीला चकनी लिहुन ठेवलेलं पत्र देते तो. पत्र दिल्यावर ती म्हणते मी इथून जाते तर जिमी म्हणतो की काही गरज नाही, थांब इथेच. तो पुर्ण पत्र वाचतो आणि ते वाचत असताना किमला हुंद्का फुटतो....
आता इथे बर्याच गोष्टी आहेत आणि त्यातच रायटिंगची कमाल दिसून येते. किमला जिमीनी केलेल्या मालप्रॅक्टिस इन्श्युरन्सच्या लोच्याबद्द्ल माहित नसतं पण हे तर नक्की माहित असतं की जिमीनी १२१६ चे १२६१ केले आणि त्याचा चकला प्रचंड त्रास झाला हेही तिला माहित असतं, सो थोडा ब्लेम तिला पण लागतो पण ती जिमीच्या बाजूनी असते कारण तिला जिमीचा स्वभाव आवडतो आणि मोठ्या भावानी नेहमी त्याला कमी लेखून त्याचे मोराल डाऊन केले हे तिला पटतं. खरं तर चक आणि जिमी ची बॅकस्टोरी बघितली (किम त्यात यायच्या आधी) तर दिसून येतं की जिमी म्हणजे शेवटी "स्लिपिन जिमी" असतो. His moral compass is completely xxcked! And that is evident so many times. In fact, he gets Kim in trouble a couple of times too but eventually salvages the situation and she doesn't get hurt. Chuck has seen through all of this and knows Jimmy will never change.
When Jimmy reads the letter, she is also shocked as inspite of calling out Jimmy so many times, Chuck does not blame Jimmy and only says good things about him, that along with the fact that Jimmy is plainly reading this letter with no emotions (thinking Jimmy feels his brother cast him out), all of that culminates into that spontaneous cry...
What she doesn't know is, Jimmy is not showing emotion as he knows he caused it but he is so xxcked up that he will just bury all that and always deliver himself as innocent. She thinks he is hiding his pain and that's why proceeds to give him a shrink's number.
Later on when Jimmy meets Howard at the courthouse and he confesses that he is suffering from insomnia (obviously over guilt of Chuck's death) he does not offer a word of consolation and offers to give him the shrink's number!
From Jimmy's point of view (as Chuck rightly mentions it), he means well. But his methods are very questionable and more importantly he routinely crosses that line when it comes to making things work. He doesn't care if people get in trouble or shit.. even die!
To be able to establish characters that display such a complicated dynamic and take it all the way to the end with no missteps is no joke! Amazing writing, acting and direction!
सगळे रिलीज झालेले एपिसोड्स
सगळे रिलीज झालेले एपिसोड्स पाहून झाले! 'ना ना करते' चटक लागलीच! गिलिगन ड्याम्बिस आहे!
किमबद्दल अनुमोदन! भयंकर आवडलंय तिचं कॅरेक्टर! ट्रू फेमिनिस्ट!
फक्त हॉवर्डचा डाउनफॉल हे तिच्यासाठी इतकं पर्सनल का आहे ते कळलेलं नाही मला अजून. जिमीसाठी तसं असतं आणि तिने सपोर्ट / अॅक्टिव्ह मदतही केली असती तरी समजू शकलं असतं. पण ही आयडियासुद्धा तिचीच होती. का?
लालोचं काम केलेला अॅक्टर हे एक भारीच फाइंड आहे! त्याच्या एन्ट्रीला मला वाटलं इतकं ब्रॉड स्माईल आधी कुणाचं बघित्ल्याचं आठवततरी नाही. आता तेच स्माइल कसलं स्केअरी डेडली वाटतं!
५ व्या सीझन च्या शेवटी (ते
५ व्या सीझन च्या शेवटी (ते बोलिंग बॉल प्रकरण झाल्यानंतर) हावर्ड किम ला कोर्टात एकटीला गाठून जिमी कसा तिच्यासाठी निगेटिव इन्लुएन्स आहे वगैरे सांगतो. त्याच्या नंतर काहीतरी फ्लिप झालेला आहे किम मधे. तरी पण मलाही तिच्यातला बदल नीट समजला नाही फारसा. तिच्या कॅरेक्टर शी कन्सिस्टन्ट नाही ते.
लालोबद्दल सहमत! एरव्ही अगदी सामान्य लुक्स आहेत त्याचे.पण कसलं क्रीपी वाटते ते स्माइल!
स्पॉयलर
स्पॉयलर
तो जेव्हा त्याची प्रॅक्टीस पुन्हा सुरू व्हावी म्हणून ठरल्याप्रमाणे चकने लिहिलेले पत्र वाचायला लागतो अन ते सोडून जे काही आतून वाटते ते सांगतो तेव्हा किमला सुखद धक्का बसतो. पण बाहेर आल्यावर त्याने तिथेही ॲक्टींग केल्याचे कळल्यावर तिचा चेहरा पडतो. याच्यात जरासातरी चांगुलपणा आहे हे वाटत असताना तिचा भ्रमनिरास होतो. असे काहीवेळा होताना दाखविले आहे.
पण बाहेर आल्यावर त्याने
पण बाहेर आल्यावर त्याने तिथेही ॲक्टींग केल्याचे कळल्यावर तिचा चेहरा पडतो. याच्यात जरासातरी चांगुलपणा आहे हे वाटत असताना तिचा भ्रमनिरास होतो >>> +१
फक्त हॉवर्डचा डाउनफॉल हे तिच्यासाठी इतकं पर्सनल का आहे ते कळलेलं नाही मला अजून >>> मलाही ते झेपले नाही पहिल्यांदा बघताना. इव्हन जिमीचाही इतका राग का आहे माहीत नाही. हॉवर्ड ने जनरली मदतच केली आहे दोघांनाही.
Pages