वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपांजली.. .तोच तो गणेशोत्सवातला नाच.. त्यात मागे नाचलेल्या मुलींपैकी एक शरयू महाले (बॉस्टन) आहे, ती माझ्या दुसर्‍या लघुपटाची लीड होती...

ओके नोटेड
पांडू
एक थी बेगम

धन्यवाद!

आदिश्री मी अ‍ॅप स्टोअर मधून व्हीपीएन अनलिमिटेड सुपर प्रॉक्सी हे अ‍ॅप डालो केलं.
त्यात लोकेशन लिस्ट दिसते, त्यातून इंडीया सिलेक्ट करा. कनेक्टेड स्टेटस दिसले की एमक्स प्लेअर ओपन करा (हे मी आधीच डालो केलेलं होतं). त्यात या सिरीज दिसल्या.

मी अजिबात टेक savvy नाही. बघते आता फार पथेटीक झाले आहे Lol मुलाला सांगते तेवढाच उद्योग त्याला .
धन्यवाद अंजली_१२.

मी पण पहायला सुरवात केली आहे पाताल लोक, चांगली वाटतेय !
अनुराग कश्यप टाइप ट्रिटमेन्ट आहे, त्यामुळे ज्यांना व्हॉयलेन्स, रक्तपात, डिस्टर्बिंग सीन्स बघवत नाहीत त्यांनी पाहु नका Happy

इथेच वाचून पाताल लोक पाहायला घेतली. जबरदस्त कॅची आहे. एका बैठकीत 5एपिसोड पाहिले. व्हॉइलेन्स आहे पण कथेच्या flow मध्ये येते त्यामुळे अगदी अंगावर नाही येत. आपण खोल गुंतलो जातो पाहताना, आता पुढची उत्सुकता वाटतेय.

पाताललोक पाहिली.

खूप भारी नाही वाटली. पण मागील काही दिवसात अशा विषयांवर बघितलेल्या मालिकांमधे बरी आहे.

एमएक्स प्लेअर वरची पांडू आवडली. मला आधी वाटलं खूप शिव्या किंवा काहितरी लाऊड असेल पण सरप्राईज. मस्त निघाली एकदम.
दिपक शिर्केला खूप दिवसांनी बघून लक्षाचे पिक्चर आठवले.

Never have I ever पहिली. ठीक होती. खूप वर्षांपूर्वी how opal mehta got kissed, got wild and got a life पुस्तक वाचलेलं, ते आठवलं.

पाताल लोक पाहून संपवली, आवडली. सगळ्यांची कामे खूप छान आहेत. वेगवान आहे आणि मुख्य म्हणजे कथा संपवली आहे ताटकळत न ठेवता. मला तर खूप आवडली.

भारताबाहेरच्यांसाठी एक indianwebseries.me नावाची site आहे जिथे सर्व चॅनेलचे शोज, वेब सिरीज सिनेमे पाहू शकतो. थोडी quality कमी आहे पण..

पाताललोक बघितली 2 दिवसात संपूर्ण!! फारच आवडली.. खरी वाटते सिरीयल. गुन्हेगारांची बँकग्राऊंड बघताना खूप वाईट वाटलं.. परिस्थिती माणसाला काय बनवून टाकते!
मोठ्या लोकांचे लागेबांधे, त्यांच्ंं सगळीकडे पसरलेल नेटवर्क, काही लोक सिस्टीम ला कसे मँनिप्युलेट करतात, खिशात ठेवतात, हे सगळ माहिती असून कोणीही थांबवू शकत नाही की फार काही करू शकत नाही ..हे दाखवलय ते खर वाटतं.

पत्रकारांमधे मेहरा हा रवीशकुमारला डोळ्ञासमोर ठेवूनउन्भा केला आहे. त्याचा सहकारी एक गुणी नट आहे. पत्रकार आणि मीडीया हाऊस च्या जगावर चांगलं भाष्य केलं आहे. त्याचं खासगी जीवन नको इतकं तपशीलवार दाखवलं आहे.

@ piku अगदी अगदी, मी पण 2 दिवसांत संपवली, झपाटल्यासारखी पाहिली. गुन्हेगारांची पार्श्वभूमी अत्यंत दारुण दाखवली, खूप वाईट वाटतं. अन्सारी ची acting पण एकदम मस्त.

खरं तर गुन्हेगारांची पार्श्वभूमी अँगल जास्त खिळवून ठेवतो .... नुसतीच मारधाड न दाखवता ही बाजू पण दाखवली म्हणून जास्त आवडली पाताललोक.… acting पण मस्तच सगळ्यांची.गुल पनाग चा थप्पड का बदला थप्पडसे खासच.

गुल पनाग चा थप्पड का बदला थप्पडसे खासच. >>> हो तो आख्खा सीन अत्यंत वेगवान आणि जबरदस्त आहे. घरातून हाथीराम पिस्तुल घेउन निघतो तेव्हापासून पुन्हा रिक्षातून उतरेपर्यंत Happy

मी वेबसिरीज बघण्यात फार्फार मागे आहे बहुतेक सगळ्यांच्या.

तर..

'She' बघितली नेटफ्लिक्स वर. ठीकठीक वाटली. शेवट पटला नाही. त्याक्षणी तिला जीवाच्या भीतीने (आणि डोक्यात गेलेल्या रागामुळे) ते सगळं (सगळ्यात शेवटचे संवाद) बोलावं लागलं असेल हे मान्य. पण मग तिच्या पोलिसी स्पिरिटचं काय? एवढ्या ट्रेनिंगचं काय? तिला लोखंडेला मात देताना (शाब्दिक किंवा हाणामारी) बघायचं होतं. पुढे आई, रूपा, ती खोली, पैसे, तिची बॅग वगैरेचं काय हे प्रश्न मलाच पडले. असो.. जास्त लिहिले तर स्पॉयलर होईल.

'नेव्हर हॅव आय एव्हर' बघितली. अगेन ओके. तिची आणि बेन ची लव्हस्टोरी थोडी जास्त दाखवायला हवी होती. शिवाय देवी हिरोईन असली तरी तिचं मैत्रिणींशी वागणं मला पटलं नाही अजिबात. तिच्या आत्याचा जबडा.. आय मीन पूर्ण चेहराच जरा विचित्र होता. सगळे भारतीय आईबाप एवढे कंट्रोल फ्रीक का असतात ते एक कळत नाही. तिच्या आईचं तिच्यावर प्रेम असेल.. पण देवीच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तर खरंच प्रेम आहे असं अजिबात दिसत नाही. असो..

पियु..अगदी सहमत
'नेव्हर हॅव आय एव्हर मी पण काल दोन एपिसोड पाहिले. Binge watching not worth!!
मला तर संवाद पण ऐकू येत नव्हते क्लिअर, शेवटी सबटायटल लावले. खास करून देवीचे. मावस बहीन खरच विचित्र वाटली. मोठे मोठे दात. सगळ्यांंचा मेक अप उग्र आहे. उगाच बावळट इंडियन लोक दाखवले आहेत. All Devi cares about is having Sex to fit in at 15. She is not even interested in relationships.
धक्का बसला. सुसूत्रता पण नाही. पुढे काही चांगले असेल तर माहिती नाही. पण मी तरी बघणार नाही.

हंड्रेडचा एक भाग बघितला. अगदीच निराशा झाली. रिंकूला काहीच जमलं नाहीये. सैराट केलेली हीच का असा प्रश्न पडतो. पुढचे भाग नाही बघणार.

Pages