
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
अरे वा! भारी झालेत मलई मोदक.
अरे वा! भारी झालेत मलई मोदक. मी आजकाल पुर्वाच्या रेसिपीनं पिस्ता/मँगो बर्फी करते रिकोटा चीज आणि मावा पावडर वापरून त्यामुळे म.ब. केलेलीच नाही कित्येक दिवसांत.
(No subject)
Finally tried this recipe, thanks Sayo !
Just slight variation using 2 tbsp saffron milk , cardomom powder in mixture to make kesar pedhas , turned out really yum!
Used half stick of butter, not full.
मस्त दिसतायत डिजे. यावेळेला
मस्त दिसतायत डिजे. यावेळेला मी मब केली त्यात दुधात केशर मिक्स करुन सगळं मावेत घातलं. केशर पिस्त्याचा रंग मस्त आला आणि बटर स्टिक मी पण पूर्ण घालत नाही कधीच.
खरंतर १० दिवस गोड पदार्थ
खरंतर १० दिवस गोड पदार्थ केल्याने आता गोडाकडे बघवत नाहीये
पण पेढे अप्रतिम दिसताहेत. तुझ्याकडे साचा आहे का?
वाटलं नव्हतं की मी आयुष्यात
वाटलं नव्हतं की मी आयुष्यात कधी मलई बर्फी बनवण्याचं धाडस करेन. पण या रेसिपीमुळे मला चक्क सुगरण झाल्यासारखे वाटतयं. धन्यवाद!!
मी बटरऐवजी साजुक तुप वापरले आणि मिश्रण गॅसवर आटवलं. अतिशय सुंदर चव आलीय.
छान दिसतेय बर्फी यम्मी एकदम.,
छान दिसतेय बर्फी यम्मी एकदम., फोटो तल्या चारपैकी एक अंतर्धान पावलेली पण दिसतेय (हलके घ्या हां)
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय बर्फी. आता करणं
मस्त दिसतेय बर्फी. आता करणं आलं.
अरे मी विसरलेच होते. हा फक्त
अरे मी विसरलेच होते. हा फक्त फोटो मी काढला आहे बाकी सर्व घरातल्या प्रीटीनने केलंय. सगळे पदार्थ घेणे, मावे करणे आणि ढवळणे हे त्याने एकट्याने केलं. मी फक्त टेबलाशी बसून नीट आहे का ते पाहिलं. मग त्या पेढ्याच्या स्टेपला आल्यावर मी एक मोदकाचा छोटा साच्यामध्ये करून दाखवला.
मग मी सांगितलं काय करायचं आणि त्यानेच केले. आतापासून हा पदार्थ घरात मला करावा लागणार नाही असं वाटतंय. अर्थात मुलांच्या आवडी बदलत असतात. हा कोरोनामुळे आलेला टेंपरवारी इंट्रेस्ट पण असू शकतो. सो फार मला आवडलं की त्याने रेसिपी आवडल्याचं सांगितलं. सोपी असल्यामुळे त्याला करता आली शिवाय चव तर आवडतेच.
त्याला आम्ही भारतात गेल्यावर एके ठिकाणचे पेढे आवडतात ते गोल असतात ते आठवलं, म्हणून तो म्हणाला मला ते इंडियातले स्टिरियोटाइप पेढे करायचेत इतके फॅन्सी नको
फोटु

कन्डेस मिल्क ला पर्याय काय
कन्डेस मिल्क ला पर्याय काय दुसरं काही? करायची फार इच्छा होतेय पण निव्वळ कंडेन्स मिल्क साठी नाही जात दुकानात.
एका रेसिपी ला साडे पाचशे
एका रेसिपी ला साडे पाचशे प्रतिसाद म्हणून मोठ्या उत्साहाने धागा उघडला . अपेक्षाभंग झाला .
बर्फी खाऊन वजन वाढले तर माझ्या फिटनेस धाग्यावर या .
अंजली, काही नाही
अंजली, काही नाही अनफॉर्च्युनेटली. बटर नसेल तर तूप वगैरे रिप्लेस करता येतं पण कंडेन्स्ड मिल्क लागेलच.
कटप्पा, बरं झाला. पुन्हा
कटप्पा, बरं झालं. पुन्हा यायचा त्रास वाचला.
अंजली घरी कंडेन्स्ड मिल्क
अंजली घरी कंडेन्स्ड मिल्क बनवू शकता . दूध भरपूर उकळवून . बिंग करा मिळेल .
अंजली, तू मला अनसॉल्टेड बटर
अंजली, तू मला अनसॉल्टेड बटर दे, मी तुला कंडेन्स्ड मिल्क देते.
माझ्याकडे अनसाॅल्ट्ेड बटर बाय
माझ्याकडे अनसाॅल्ट्ेड बटर बाय काॅस्टको आणि कंडेन्स्ड मिल्क दोन्ही आहे. (मी देणार का ते माहित नाही पण घरातली लोकं त्या कामधेनू खरवस पावडरच्या बदल्यात द्यायला तयार होतील
)
अंजली, तू मला अनसॉल्टेड बटर
अंजली, तू मला अनसॉल्टेड बटर दे, मी तुला कंडेन्स्ड मिल्क देते. >>>>>>>>>>>> हा हा कर्बसाईड पिकप का
चालेल सौदा वाईट नाहीये 
मी ही बर्फी करायला घेतली. एका
मी ही बर्फी करायला घेतली. एका मोठ्या बोलमध्ये क्रिम (रेसीपीत नाही चुकून घेतले), बटर, मिल्क पावडर एकत्र केले. आणि मग
कंडेन्स्ड मिल्कचा can आणायला गराज मध्ये गेले तर तो कोकोनट मिल्क चा होता ) मग हेच मिश्रण कढईत ओतून परतून त्याच्या खव्याची बर्फी केली. ती मिल्क केक सारखी लागत आहे. हिट झाली आहे.


कंडेन्स्ड मिल्क नसेल तर क्रिम घालून करू शकतो
तो मिल्क केक होईल.
धन्यवाद सायो
Adishri... khup chan rang
Adishri... khup chan rang aalay burfi cha.. mango pulp ghatala hota ka? sorry... marathi type karana kathin hotay thoda
नाही गं, पण परतून परतून खरपूस
नाही गं, पण परतून परतून खरपूस आणि रवाळ झाले. धन्यवाद
अमेरिकेत बटर किंचित पिवळसर असते, कदाचित त्यामुळे !!
measurement liha na, if
measurement liha na, if possible
2 वाट्या क्रिम , अर्ध्या
2 वाट्या क्रिम , अर्ध्या पेक्षा कमी स्टिक बटर, दिड वाटी मिल्क पावडर, सहा चमचे साखर शेवटी. परतून घ्यायचे आणि सतत हलवायचे. साखर आधी टाकली तर ते brown होऊन जाईल. म्हणून होत आल्यावर टाकली.
इकडे तिकडे होईल हं तू बघून घे.
धन्यवाद
सही दिसतेय गं..
सही दिसतेय गं..
Mast.
Mast.
धन्यवाद अंजली आणि देवकी
धन्यवाद अंजली आणि देवकी
thanks Aadishri
thanks Aadishri
मस्त आहे ग color . हा धागा
मस्त आहे ग color . हा धागा धावतोय .
Lockdown मध्ये dalgona , bread , cake वरून आता लोक मलई बर्फीवर आली
क्रुपया दिवे घ्या .
मस्त दिसतेय आदिश्री.
मस्त दिसतेय आदिश्री.
सायो धन्यवाद! मस्त झाली एकदम
सायो धन्यवाद! मस्त झाली एकदम बर्फी! वर सजावटीसाठी काही नाही सध्या. हापूस आंबा पल्प घातला आहे घरचा. मस्त चव आली.
आदिश्री.. खरच मस्त कलर आलाय.
आदिश्री.. खरच मस्त कलर आलाय.
मी मागच्या आठवड्यात उघडलेला धागा पण वाचून लक्षात आले की मी वेगळ्या पद्धतीने केली आहे बर्फी. म्हणून फोटो आणि कृती वेगळी कडे टाकले. (खाऊगल्ली - आजचा मेनू) .
आदिश्री हेब्बर किचन च्या रेसिपी मधे क्रीम आहे.
https://hebbarskitchen.com/malai-barfi-recipe-malai-burfi-sweet/
Pages