समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात अशी किस घेतली जाते या वाक्याला सप्रमाण सिद्ध करण्यात यावे
Submitted by आशुचँप on 28 March, 2020 - 18:55

>>>>

मराठी मध्यमवर्गीय कुटुंब उघड्यावर चारचौघांसमोर किस करत नसल्याने त्याचा विडिओ बनवून हे सिद्ध करता येणार नाही.
पण तुम्ही मात्र यापेक्षा काही भारी आणून हे खोडून दाखवू शकता. अट फक्त एकच - कुटुंब मराठी मध्यमवर्गीय हवे. राधिका आपटेचे काही आणू नका..

सनी लिओनी ही सई ताम्हणकर पेक्षा लाख पटीने चांगला अभिनय करते
>>>>
प्रत्येकाची अभिनयाची व्याख्या वेगळी असते. यावरून आपली माझ्यापेक्षा वेगळी आहे हे कळते. त्यामुळे विषय वाढवण्यात अर्थ नाही Happy

सनीला पुरेसा वाव मिळाला नाही म्हणून नाहीतर ती लोकप्रियतेच्या बाबतीत शाहरुख वगैरे फोलकटाना केव्हाच मागे टाकेल
>>>>

एका पॉर्नस्टारला मेनस्ट्रीम बॉलीवूड चित्रपटात गरजेपेक्षा जास्त वाव दिला आहे असे माझे मत आहे.
आपण त्याऊलट म्हणत आहात की पुरेसा वाव मिळाला नाही.
असो. पुन्हा आपले मत आपली आवड. मला सनी बघावीशी वाटते तेव्हा मी थेट पॉर्नच बघतो.

स्वप्नील सारखा दुधी।भोपळा
>>>
नवाझुद्दीन सिद्दीकी हा शाहरूख, सलमान वा आमीरसारखा दिसत नाही म्हणून तो कधीही सुपर्रस्टार होणार नाही. कारण आपल्यायेथील प्रेक्षकांची हिच मानसिकता. आधी ते हिरोचे रुप बघणार. बाकीचे त्यानंतर...

पूर्ण बघितली ही मालिका! स्वप्निलचे डोळे बटबटीत वाटतात. पूर्ण माला लिकाभर तसे च डोळे घेवून वावरलाय. दुखत कसे नाहीत?
>>>>>>

दुखलेही असतील.
याला भुमिकेसाठी मेहनत घेणे बोलतात.

एवढीच मेहनत त्याला झेपते वाटतं?
साहजिकच आहे
आणि याचं ही कौतुक करणारे भक्त आहेत त्यामुळे भोपळ्याचे चालून जातंय
केविलवाणी जमात दुसरं काही नाही
भूमिकेसाठी करावा लागणारा अभ्यास, मेहनत ना या भोपळ्याच्या गावी आणि त्याच्या चाहत्यांच्या तर मुळीच नाही
त्यामुळे हाच कसला भारी अभिनय असल्या आरत्या ओवाळत बसण्याशिवाय पर्यायच नाहीये

आता तुषार कपूर बद्दल काय प्रॉब्लेम झालाय
निदान तो प्रयत्न तरी करतो प्रामाणिकपणे
अभिनय जमत नाही तर मुक्याचा रोल पण करतो बिचारा
आणि त्याचे चाहते सुद्धा उगाच कसाही कौतुक करत नाही
तुमचं म्हणजे अस झालाय की त्या शाखा आणि स्वप्नील ने क्सक्सक्स केलं तरी वाह वाह काय सुगंध, काय अदाकारी अस म्हणत आरत्या ओवाळा

तुषार कपूर गोड मुलगा आहे.मला तो मुझे कुछ कहना है आणि सर्व गोलमाल सिरीज मध्ये आवडतो.
तुषार कपूर, अर्षद,रितीश देशमुख हे सर्व चांगले कलाकार आहेत.फक्त त्यांना सोबत लागते.सोलो पिक्चर्स निभावून नेत नाहीत.

या धाग्याचा पण गुलाबजाम धागा होणार असं दिसतंय.☺️☺️सुरुवातीला एकदम स्तुती आणि मग टोमॅटो.
मी अजून तरी स्तुतीच करणार आहे.

नितीश आणि स्वप्नील एकमेकांसमोर उभे राहून बोलत असतात, तेव्हा वेगळंच वाटलं कारण दोघांनी कृष्णाचे रोल केलेत.

पुढची कथा अजून रोमांचक आहे.राजवाडे कशी फुलवतात त्यावर आहे.
शिवाय करोना लॉक डाऊन मुळे प्रोडक्शन बजेट ला काही नुकसान झालंय का हाही मुद्दा आहे.

काल बघून संपवली. मजा आली बघायला. पावसाळ्यातला निसर्ग तुफ्फान आवडला. चित्रिकरण ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
बाकी स्वप्निलची अ‍ॅक्टींग त्याच्या इतर मुव्ही आणि सिरीज पेक्षा बरी वाटली. काही काही ठिकाणी फार संथ आहे.

सगळ्यांनी सगळं वर लिहिलेलं आहेच. त्यात माझे चार आणे. त्या रंकाळ्याला भेटलेल्या माणसाने उगीच सस्पेन्स क्रिएट केलाय. वाट पहावी लागेल म्हणतो आणि लगेच तो कुठे काम करतो एवढं सांगण्यासाठी मध्यरात्री येतो. चक्रपाणीचं कॅरेक्टर बघून वाटलं नाही तो त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे असेल.

मी घाबरले फक्त एकाच गोष्टीला : ते हिरवे/निळे डोळेवाले आजोबा Uhoh

का बघू नये याचेयाचेणे वाचली. आता मी ही मालिका नाही पाहणार.
लोकांना सावध करण्यासाठी बिचा-या धागाकर्त्याच्या डोळ्यांना काय नको नको ते पहावं लागलं असेल या कल्पनेनेचं रडू आलं.
धागाकर्त्याचा असा सत्कार करा कि कधीच कुणाचा कुठं झाला नसंल.

पुढचा सीजन कधी?
लॉकडाऊनने आणखी लांबणीवर गेला आता Sad

मला लॉकडाऊनमुळे 'पंचायत'चा पुढचा सिझन लांबणीवर गेला याचं दुःख जास्त आहे. पण तो या धाग्याचा विषय नाही. त्यामुळे असो.

अहो पियु हे मायबोली आहे इथे धाग्याला धरून प्रतिसाद नाही दिला तरी चालतो... पुन्हा त्यात हा ऋन्मेषचा धागा...
त्याला फार आवडते विषयांतर केलेले....

त्याला फार आवडते विषयांतर केलेले.... >>> खरंय च्र्प्स, मला आवडतात नको त्या पंचाईती Happy

बाई दवे,
कोणीतरी सुचवले म्हणून पहिला एपिसोड बघितलेला पंचाईतीचा. पण बोअर झालो. पुढे नाही बघितले. पण कधीतरी बघायला हवे पुढचे एपिसोड कदाचित बरे असावेत. दुसरे बघायचे कारण म्हणजे म्हणजे त्यातला तो हिरो स्वदेसच्या शाहरुखची नक्कल मारत होता.

चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी याची पहिलीच वेब सीरिज असलेल्या 'समांतर'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'समांतर २' येण्याची चर्चा सुरू झाली होती. तर, 'समांतर-२'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं कळतंय.

सहीहीईई न्यूज... ये आ रैला है अपना चॉकलेट बॉय Happy

स्पॉयलर अलर्ट..
नुकतेच समांतर पुस्तक वाचायला मिळाले. १९६ पानांचे पुस्तक आहे. पहिल्या सिझनमध्ये साधारण ११० पानांपर्यंत जेवढे लिखाण आहे तेवढे दाखवले आहे. बाकीच्या ८६ पानांमध्ये हिरोचे नव्या बाई बरोबर प्रेम प्रकरण यावरच बराचशी पाने खर्च झालेली आहेत. शेवट तर अगदीच गुंडाळला आहे. त्यामुळे जर मुळ पुस्तकाप्रमाणे बनवणार असतील तर सिझन २ अगदीच सपक होणार आहे. गंमत अशी वाटली की ज्या मेन थीमवर हे पुस्तक लिहीले आहे, म्हणजे हिरोला आपले भविष्य काय आहे त्याची माहीती असणे वगैरे, त्यावर पुस्तकात नंतर काहीच उल्लेख नाही. म्हणजे हिरो त्याला मिळालेल्या डायर्‍या वाचायचे विसरतो असे लिहीले आहे. त्यामुळे मुळ थीम पासून भरकटवत नेले आहे. खरं म्हणजे रोज एक पान वाचून, उद्या काय होणार आहे त्याची माहिती घेऊन, मस्त काहीतरी उत्कंंठता वाढवणारे लिहीता आले असते पण त्याऐवजी इतर बाबींवरच जास्त पाने खर्च केली आहेत.

मी तर आधी लिहीलेय तसे मला कळतच नाही की तो ज्योतिषी भविष्य सांगायला एवढे नाटक का करतो? असे काय खास किंवा विशेष आहे त्याच्या भविष्यात Uhoh

Pages