समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलाकृती
आता का बघू नये?
१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन
>>> हा मुद्दा बघू नये पेक्षा का बघावा मध्ये टाका...

हे काही मुद्दाम बघायचे कारण झाले नाही च्रप्स
पण ज्यांना हे आवडत नाही, वा जे १८ वर्षाखालील आहे ते या कारणामुळे बघणार नाहीत म्हणून तसे नमूद करणे माझी जबाबदारी समजली.
असो. आपली आपली चॉईस
पण सर्वांनी जरूर बघा ... मी आता झोपतो.. शुभरात्री

अरे पण हि सिरीज आहे कुठे? नेफिवर अजुन नाहि, याचाच अर्थ स्वजो इज नॉट अ‍ॅज बिग अ‍ॅज नवाजुद्दिन, यट. काहि कळतंय का? तो अजुन मोठा झाला कि बघु... Wink

अरे लोकहो,
लंडनचा जाॅन म्हणजे तोच ओरिजिनल माणूस, ज्याचा "तु## अ#षे#" हा डू आयडी आहे.

माझ्या महितीतला लंडनचा जॉन म्हणजे जॉन डसली. काशीनाथ चा सासरा, जुडी चा बाप. जुडीच्या लग्नात वऱ्हाड लंडनला आले होते.

अरे पण हि सिरीज आहे कुठे? नेफिवर अजुन नाहि, याचाच अर्थ स्वजो इज नॉट अ‍ॅज बिग अ‍ॅज नवाजुद्दिन, यट. काहि कळतंय का? तो अजुन मोठा झाला कि बघु... Wink
>>>

नेफिवर नाही ... हे अगदी ऑस्कर मिळाला नाही या थाटात का म्हणत आहात?
ज्याने मराठीमध्ये माईलस्टोन दुनियादारी दिला जो मराठीचा सुपर्रस्टार शाहरूख म्हणून ओळखला जातो त्याला नेफिवगैरे सरटिफिकेटची काय गरज आहे? ऊलट नवाझुद्दीनशी त्याची तुलना पहिल्याच फटक्यात झाली यातच सारे आले. आणि सिरीज तर अगदी स्वप्निलचा वन मॅन शो आहे. त्याच्या अदाकारीची ताकद दिसून आलीय.

आपल्याकडे ऊगाचच स्वप्निल, सई, सचिन या गुणी आणि ग्लॅमरस कलावंतांना ट्रोल करायचे फॅड काही मराठी माणसांमध्येच आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसेही थोडी दबून जातात. पण मला वाटते आपल्या स्वप्निलप्रेमावर टाकलेले पांघरून आता बाजूला सारायची वेळ आली आहे. कारण काही नाही मिळाले तर त्याच्या शरीरयष्टीवर टिप्पणी करणारयांनाही यात काही मिळणार नाहीये. कसला स्मार्ट आणि फिट दिसलाय यात स्वप्निल.. डोळ्यात बदाम बदाम बदाम Happy

हा लंडनचा जॉन कोण? त्याचे रेकमंडेशन आम्ही का मानावे?
>>>>

ऐकावे जॉनचे करावे मनचे Happy

लंडनचा जाॅन म्हणजे तोच ओरिजिनल माणूस, ज्याचा "तु## अ#षे#" हा डू आयडी आहे.
>>>

तुमचा अभिषेक असे स्पष्ट लिहा आता पाफा !
असो, धागा समांतर मालिकेवर आहे. चर्चाही त्यालाच समांतर राहू दे अवांतर नको Happy

साउथ मध्ये समांतर आयुष्यवर एक सिनेमा बघितला,
Okka kshanam
शूरवीर 2
https://youtu.be/uDR6rbza8JU

>>>>

हिंदीत डब आहे. तुम्ही पाहिला आहे का? कसा आहे? चांगला असेल तर बघता येईल.

लंडनचा जॉन म्हणाला "खा". तर खाणार का?
>>>>
चव चाखा आणि स्वत: ठरवा. अभिप्राय जरूर कळवा. जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचू दे ही फिल्म... अमराठी लोकांनाही हिण्दीची लिंक द्या मग

मला जॉन काही बोलला नाही. तुम्हाला बोलला तुम्ही ऐकलं. खा बोलला तर तुम्ही नक्कीच खाल ही गॅरंटी आहे.

तुमचा अभिषेक असे स्पष्ट लिहा आता पाफा !
असो, धागा समांतर मालिकेवर आहे. चर्चाही त्यालाच समांतर राहू दे अवांतर नको Happy

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 15 March, 2020 - 11:49
>>>
अवांतर नकोच खरचं , तू रेकमेंड केले तरी बघू आम्ही. उगाच तो लंडनचा जाॅन कशाला?

सिरीज मस्त बनवली आहे.सुरुवातीला गाडी अपघात व्हि एफ एक्स असेल का?
सर्वांची कामं आवडली.नितीश भारद्वाज गूढ भूमिकेत शोभतो.मध्ये मध्ये भविष्य वाली वाक्ये बोलताना एकदम कृष्णाची आठवण येतेच.
वाबगावकर चं काम पण छान.
शिव्या आणि 3 मिनिट रेकॉर्ड चुंबन दृश्ये ' अरे वेब सिरीज ला सेन्सर नसल्याने हे असतंच, आपल्यात नसेल तर लोक नाराज होतील' म्हणून टाकली असावी.
सिनेमॅटोग्राफी मस्त.चिपळूण, पन्हाळा वाली दृश्यं डोळ्यांना आनंड देतात.चित्रातली पाठमोरी बाई एकदम काटा आहे.काही लोकांना विद्या सिन्हा ची आठवण नक्की येईल.
नितीश भारद्वाज च्या लेन्सेस मुळे जास्त ग्लॅम आला आहे गूढतेला
आमच्या अमराठी क्लीग्स ना हिंदी आणि तेलगू वाल्या लिंक दिल्या.स्वजो चं हिंदी डबिंग एकदम मराठाळलेलं आहे.
जयंत सावरकर एकदम चेरी ऑन द केक.अजून रोल पाहिजे पुढच्या भागांत.(मूळ कादंबरीत नाही हे मला माहितीय.)
भविष्य, विधिलिखित बदलता येत नसूनही ते जाणून घेण्याचा माणसाचा ध्यास जुना आहे.यावर आत्माराम भेंडे यांचं नाटक पण छान होतं.कोणाला त्याचं नाव आठवतं का?

चुंबन दृश्ये खूप जास्त आहेत का? प्रत्येक एपिसोडमध्ये आहेत का? ज्ये ना सोबत बघताना ओकवर्ड होईल म्हणून विचारत आहे. Anyway to skip that?

शिव्या आणि 3 मिनिट रेकॉर्ड चुंबन दृश्ये ' अरे वेब सिरीज ला सेन्सर नसल्याने हे असतंच, आपल्यात नसेल तर लोक नाराज होतील' म्हणून टाकली असावी.>>>>>>> वेबसिरीजमध्ये अशी दृष्य टाकावीच लागतात , शास्त्र असतं ते.
पहातेय ही सिरीज. छायाचित्रण मस्त आहे. सगळ्यांची कामेही आवडली.

ज्याने 9 एपिसोड नीट लक्ष देऊन पाहिले आहेत त्याला शेवट फार धक्कादायक नाही.पण वाईट नक्की वाटेल
शेवटापेक्षा घटना टाळू न शकूनही त्या जाणण्याचा अट्टाहास असणाऱ्या माणसाचा प्रवास जास्त बघण्या सारखा आहे
समांतर पॉप्युलर कादंबरी आहेच.पण या सिरीज नंतर पुस्तकाला अजून डिमांड येईल
कधीकधी अचाट, अतर्क्य,याक्क लिहिले असले तरी सुशि इज सुशि.लेखन क्षेत्रातील किशोरकुमार म्हणते मी त्यांना.

ऋन्मेष, तू दिलेल्या लिंकवर समांतरचा S1E1 पाहिला. इंटरेस्टिंग वाटतेय. स्वप्नील जोशीचं कामही चांगलं वाटलं. जयंत सावरकरांना खूप दिवसांनी पाहिलं.

मी ज्या वेळेस शिरवळकरांच्या कांदबऱ्या वाचल्या तेव्हा मी आणि माझा भाऊ कायम त्यावर सिनेमा काढला तर कोणाचं कास्टिंग करायचं ह्यावर चर्चा करायचो. समांतर च कास्टिंग नाही पण ह्या कथेवर सिनेमा यावा असं वाटलेले . वेब सेरीस चा तो जमाना नव्हता . समांतर व्यतिरिक्त सु.शी. ची प्राक्तन आणि 'तो ' नावाची कादंबरी आहे. त्यावर पण सेरीझ यायला हवी. mxplayer भारताबाहेर दिसत नाही म्हणून मी मिस करेन ही . Sad

मी ही पाहीली सिरीज. स्वप्नील जोशी बराच स्लीम दिसतोय ह्या मालिकेत. अगदी थालीपीठ्या वाटत नाही. मूळ कादंबरीत सुदर्शन चक्रपाणि हे पात्राचे नाव नसावे. )मालिकेत चक्रपाणि हा शब्द चक्रपाणी असा चुकीचा लिहिला आहे)बहुदा स्वप्नीलचा व नितीश भारद्वाजाचा कृष्ण ह्या भूमिकांचा इतिहास पाहुन हे नाव ठेवले असावे. बाकी ज्यांनी सॅक्रेड गेम्स व मिर्झापूर ह्या शिवराळ व कामक्रिडेसंबंधित दृष्ये असणार्या मालिका पाहिल्या असतील त्यांना ह्या सिरिज मध्ये तसे आक्षेपार्ह वाटण्याचे काहीच कारण नसावे व तसेही वेबसिरिज हा प्रकार प्रायवसी जपुन पाहण्याचा आहे. अगदी त्रागा करण्याच्या प्रसंगात स्वप्नीलचय तोंडातुन येणारे भकार युक्त शब्द नैसर्गिक वाटले. आणि चुंबनदृश्येही बरीच बोल्ड आहेत.

नितीश भारद्वाज गूढ भूमिकेत शोभतो.मध्ये मध्ये भविष्य वाली वाक्ये बोलताना एकदम कृष्णाची आठवण येतेच+१११
आता 'हे पार्थ' म्हणतो की काय असंच वाटलं एक क्षण Happy

Pages