लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -
जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.
........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.
तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.
Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...
समांतर का बघावी -
१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी
२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी
३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन
४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती
आता का बघू नये?
१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन
२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का?
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष
जिओ स्वप्निल !!
त्या दोघात ४० वर्शाच अन्तर
त्या दोघात ४० वर्शाच अन्तर आहे ( स्वामींच्या म्हणण्यानुसार ) म्हणजे चक्रपाणी आता ७०+ असला पाहिजे .
वाटत नाही त्याच्याकडे बघून .
अर्थात त्याच कारण वेगळे असावं
मी ते पुस्तक वाचल्या पासून या
मी ते पुस्तक वाचल्या पासून या भूमिकेत मनोमन यतीन कार्येकर किंवा सुनील शेंडे कल्पत आहे.थोडा हँडसम पाहिजे असेल तर सोहुम शाह पण चालेल.☺️☺️
बहुतेक त्या डायर्या अनंत
बहुतेक त्या डायर्या अनंत काळापूर्वी लिहिल्या असतील,
नवा आला की जुना अंतर्धान पावत असेल
ब्लॅक कॅट, तुम्हाला खूप
ब्लॅक कॅट, तुम्हाला खूप स्पॉयलर दिल्यास या धाग्यावर क्वारंटाईन करावे लागेल हां.
अंदाज आहे , मी वाचले नाही
अंदाज आहे , मी वाचले नाही
पहिल्या सीझनचे ९ एपिसोड
पहिल्या सीझनचे ९ एपिसोड संपवले लगेच आजच. भारी काढलीये ही सिरीज आणि एकदम क्रिस्प आहे.
एक चूक आढळली ती ही की कर्जतला जाण्यासाठी कुमार अगदी सकाळी घरी येतो. ( कारण बायको म्हणते की मुलगा उठलाच नाही म्हणून मी ही अजून ऑफिसला गेले नाही तत्सम). मग मुलाला घेऊन ते जायंटव्हील वर बसायला जायचं ठरवतात - ते ही लगेच. तर जेव्हा ते अॅक्च्युअली जत्रेला जातात तेव्हा रात्र असते. सकाळी जत्रा सुरू नसतेच म्हणा. पण दिवसभर काय करतात देव जाणे!
सर्व ९ एपिसोड्स मध्ये सगळ्यात जास्त अंगावर काटा आणणारा प्रसंग म्हणजे तो चिपळूणहून घरी आल्यावर त्या बाहेर रस्त्यावर, स्टेशनवर ठेवलेल्या बॅगा पलंगावर ठेवतो. यक्क!
असो. अतिशय उत्तम दिग्दर्शन, लोकेशन्स आणि सगळ्यांचेच अकृत्रिम अभिनय. हणम्या लै भारी काम करतो. त्याचं कास्टिंग कसलं जबरी आहे. त्याची बोलायची स्टाईलही परफेक्ट आहे.
माझ्यासाठी तर समांतर हा शब्दच स्पॉइलर होता. >> मानव, बरोबर. मलाही तेच असणार असं वाटतंय.
त्या दोघात ४० वर्शाच अन्तर
त्या दोघात ४० वर्शाच अन्तर आहे ( स्वामींच्या म्हणण्यानुसार ) म्हणजे चक्रपाणी आता ७०+ असला पाहिजे .
>> हेच सूत्र धरून पुढे लिहिते की चक्रपाणी आता 70+ असेल तर त्याच्या लहानपणी (म्हणजे त्याकाळच्या भारतात) दिवाळीला लोक / मुलं एकमेकांना हॅपी दिवाली म्हणायचे? छोट्या मुली लिपस्टिक आणि नेलपॉलिश लावायच्या का? मला तो प्रसंग पहिल्यापासून फार खटकलं आहे ते.
तो चिपळूणहून घरी आल्यावर त्या
तो चिपळूणहून घरी आल्यावर त्या बाहेर रस्त्यावर, स्टेशनवर ठेवलेल्या बॅगा पलंगावर ठेवतो. यक्क!
>> यक्क आहे. पण प्रामाणिकपणे सांगते की माझ्या माहितीत अनेssक लोकांना ही सवय आहे हे बघितले आहे. विशेषतः ज्या लोकांना फिरायची (लांबच्या प्रवासाची / ट्रिप्स ची / हॉटेल मध्ये मुक्कामाची) सवय असते त्यांना रूम मध्ये खाली बसून किंवा वाकून काही काढायचे नसते. त्यामुळे ते बेडवर आपली बॅग ठेवून सामान काढतात / भरतात. ती सवय पुढे कन्टीनयू होते. असे नातेवाईक घरी आले की फार लक्ष ठेवावे लागते. आणि डोक्याला लय ताप होतो :यक्क:
अवांतराबद्दल क्षमस्व.
पण दिवसभर काय करतात देव जाणे!
पण दिवसभर काय करतात देव जाणे!
>> बहुतेक समुद्रावर पण जातात (असा काहीसा पुसट उल्लेख आहे).
दिवाळीला लोक / मुलं एकमेकांना
दिवाळीला लोक / मुलं एकमेकांना हॅपी दिवाली म्हणायचे? >> होय होय हे देखिल खटकले.
पण जाऊ देत माफ करून टाकू कारण बाकी सिरीज मस्तच आहे. आणि स्वजोचं काम खूपच आवडलं.
नितिश भारद्वज माझ्यासाठी
नितिश भारद्वज माझ्यासाठी spoilerच होता Wink
>>>
ट्रेलरमध्ये तो दाखवला नव्हता का?
मला ज्या मित्राकडून हे समजले त्याने सरळ मला स्वप्निल जो आणि नि भारद्वाजची नावे घेत एका ओळीत स्टोरीच सांगितली होती. ती ईंटरेस्टींग वाटल्यानेच मी बघायला घेतली. आणि बघतच राहिलो...
कथानक सुशीचे आहे, तेंव्हा तर
कथानक सुशीचे आहे, तेंव्हा तर मोबाईल पण नव्हते
कथानकात काळानुसार बदल केलेत, कथेत भाऊ दीड वर्षांपूर्वी पळाला असे आहे, पण ह्यात तर हा लहान असताना तो पळाला असे दाखवले आहे
हा परश्याही माझ्या मागे फार
हा परश्याही माझ्या मागे फार लागलाय , ह्याला माझ्या पुढच्या डायर्या देऊ का ?
त्या स्वजो ला पन्हाळ्याला
त्या स्वजो ला पन्हाळ्याला पाठवले ते शिक्षा म्हणून, पण तो गाड्या (४ व्हिलर उडवत ) नुसता ऊंडारतो. काही कामधंदा करतो का नही?
मग तीच तर मेख आहे.
मग तीच तर मेख आहे.
चित्रपटात दाखवतात की शिक्षा म्हणुन यवतमाळला/गढीचिरोलीला ट्रान्सफर केली.
पण प्रत्यक्ष यवतमाळला/गढीचिरोलीला अशी उंडारण्याची, जगण्याची काय मौज असते!
शिक्षा म्हणून गडचिरोली
शिक्षा म्हणून गडचिरोली
मला तर पीडब्ल्यूडीने एमपीएससी परीक्षेत त्या पोस्टसाठी पहिल्या क्रमांकाचा टॉपर असूनही गडचिरोली पोस्टींग दिलेली.
दिवाळीला लोक / मुलं एकमेकांना
दिवाळीला लोक / मुलं एकमेकांना हॅपी दिवाली म्हणायचे? >>> मी हेच म्हणाले नवऱ्याला की happy diwali वगैरे हल्ली वीस एक वर्षात जास्त म्हटलं जातं, हे पटले नाही. रात्री मुलं मुली एकत्र लांब जातात काजवे धरायला, त्यावेळी नसेल तसं. मुलं मुली एकत्र जातात ह्याला नाही नावं ठेवत, एकंदरीत पालक मुलांना पाठवत नसतील इतक्या उशिरा, लपून गेले तर कोणाच्या लक्षात येणार नाही असं होणार नाही किंवा मोठी एक दोन माणसे बरोबर येतील.
त्या वखारवाल्या कामगाराला
त्या वखारवाल्या कामगाराला कुठेतरी पाहिल्यासारख वाटत होतं .
मग लक्षात आलं , अरे ! हे तर तुपारे मधले सर्जेराव काका !
समांतर अमेरीकेत दिसत नाही असे
समांतर अमेरीकेत दिसत नाही असे का?
टॉपर म्हणजे जो पहिला आलाय तोच
टॉपर म्हणजे जो पहिला आलाय तोच ना.
आज करोनाच्या कृपेने आणि
आज करोनाच्या कृपेने आणि ऋन्म्याच्या शिफारसीमुळे पाहिलि. माझी काहि निरिक्षणं:
१. ओवरऑल ठिक, भारतातल्या सामान्य ऑडियंस करता. पण डिटेलिंगबाबत, सतिश राजवाडे इज नो डेविड फिंचर ऑर क्रिस्तोफर नोलन. सो कर्ब योर एंथुझियाझ्म अँड लोअर योर एक्स्पेक्टेशन्स...
२. किसिंग सीन्स - टेरिबल. मराठी अॅक्टर्स्/डायरेक्टर्सना किसिंगचे धडे देण्याची गरज आहे असं वाटण्या इतपत बेक्कार...
३. नको तिथे गुढता दाखवली आहे. उदा: पन्हाळ्याच्या त्या घरात (ब्लु मून ऑर व्हॉटेवर) चक्रपाणी राहुन गेला हे महाजनला माहित होतं तरीहि ते पेंटिग पाहिल्यावर इतकं टेरिफाय्ड व्हायचं कारण काय?..
४. शिव्या - मुंबईकरांनी मित्रांबरोबर अशा शिव्या (गां#, भो###, भें##) देणं अगदि कॉमन आहे. इथे अमेरिकेतहि आम्हि देतो. पण घरच्यांसमोर्/बायकोसमोर शिव्या हे माझ्याकरता तरी नविन आहे. गेल्या २५ वर्षात चित्र पालटलं असेल कदाचित. ऋन्म्या, प्लिज क्न्फर्म...
मोर लेटर...
चांगली आहे मालिका... दुसरा
चांगली आहे मालिका... दुसरा सीझन आला की पाहणार. शाळा-कॉलेजमध्ये ही कादंबरी वाचली होती, पण मला कथानक फारसं आठवत नव्हतं, त्यामुळे बघायला मजा आली
स्वप्नील जोशीचं काम नेहमीप्रमाणे सफाईदार. कॅमेराचे अँगल्स, डुचमळत्या फ्रेम्स, सगळ्या थ्रिलर्ससाठीच्या गोष्टी जागच्या जागी. रात्रीचे म्हणून दाखवलेले आऊटडोअर सीन्स रात्रीचे वाटतात! लोकेशन्सही आवडली. पावसाळी वातावरण एकदम फिट्ट वाटलं.
ती घाटकोपरची सोसायटी ओळखीची वाटत होतीच. कुमार महाजन एका टेंडरवाल्याकडून पाकीट घेतो ते सीन्स बहुदा ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमधले वाटत होते. त्याची बायको त्याला आणखी एका स्वामींकडे घेऊन जाते, तिथे त्या स्वामींचा मृत्यू झालेला असतो, ती घरंही बहुदा ठाण्यातलीच आहेत. (टाइमपास सिनेमात ते लोकेशन त्याच अँगलने आलेलं आहे.)
किसींग सीन्सबद्दल राजला अनुमोदन. तरी पहिल्या किसिंग सीनचं टायमिंग आवडलं.
शिव्या खूप काही नाही वाटल्या. रस्त्यातून चालताना इतर लोकांच्या बोलण्यातही अशा शिव्या कानावर पडतात.
खरंच किसिंग सीन्स कळकट्ट आहेत
खरंच किसिंग सीन्स कळकट्ट आहेत. प्रत्यक्षात कसेही असोत पण पडद्यावर दाखवताना थोडे कलात्मक दाखवलेले चालले असते.
तरी पहिल्या किसिंग सीनचं टायमिंग आवडलं. >>> येस्स! आणि ती अधीरपणे येऊन त्याच्यावर आपटते आणि मग किस करते ते मस्त घेतलंय.
२. किसिंग सीन्स - टेरिबल.
२. किसिंग सीन्स - टेरिबल. मराठी अॅक्टर्स्/डायरेक्टर्सना किसिंगचे धडे देण्याची गरज आहे असं वाटण्या इतपत बेक्कार...
३. नको तिथे गुढता दाखवली आहे. उदा: पन्हाळ्याच्या त्या घरात (ब्लु मून ऑर व्हॉटेवर) चक्रपाणी राहुन गेला हे महाजनला माहित होतं तरीहि ते पेंटिग पाहिल्यावर इतकं टेरिफाय्ड व्हायचं कारण काय?>>> अगदी अगदी
उपदेश देत सगळा इतिहास सांगून हात बघेपर्यंत स्वामींना का आठवत नाही कि हा माणूस आधी आपल्याकडे आला होता?
उपदेश देत सगळा इतिहास सांगून
उपदेश देत सगळा इतिहास सांगून हात बघेपर्यंत स्वामींना का आठवत नाही कि हा माणूस आधी आपल्याकडे आला होता? >> कारण ते दिसायला वेगळे असतात. एक सुदर्शन चक्रपाणी आणि दुसरा कुमार महाजन. त्यामुळे हात बघेपर्यंत स्वामींना कळत नाही हा हात आधी पाहिला होता. दोघांचे चेहरे वेगळे, काळ वेगळा पण हातावरच्या रेषा आणि म्हणून भविष्य सारखं.
भारताबाहेर कशी बघायची म्हणे
भारताबाहेर कशी बघायची म्हणे हि सिरीयल? इस्कटुन सांगा कोनी !
खरंच चांगली जमून आलीये serial
खरंच चांगली जमून आलीये serial. आणि next season ची ऊत्सूकता वाटत राहावी..असा शेवट पण झालाय..
अतिशय उत्तम दिग्दर्शन, लोकेशन्स आणि सगळ्यांचेच अकृत्रिम अभिनय. हणम्या लै भारी काम करतो. त्याचं कास्टिंग कसलं जबरी आहे. त्याची बोलायची स्टाईलही परफेक्ट आहे. ~~~ +१२३४५६७
खरंच किसिंग सीन्स कळकट्ट आहेत. प्रत्यक्षात कसेही असोत पण पडद्यावर दाखवताना थोडे कलात्मक दाखवलेले चालले असते.
तरी पहिल्या किसिंग सीनचं टायमिंग आवडलं. >>> येस्स!. +१२३४५६७८
शिव्या पण जास्त प्रमाणात नाहीत आणि आहेत त्या खटकत नाहीत फारशा..
नको तिथे गुढता दाखवली आहे.
नको तिथे गुढता दाखवली आहे. उदा: पन्हाळ्याच्या त्या घरात (ब्लु मून ऑर व्हॉटेवर) चक्रपाणी राहुन गेला हे महाजनला माहित होतं तरीहि ते पेंटिग पाहिल्यावर इतकं टेरिफाय्ड व्हायचं कारण काय?>>> सहमत
शिव्या पण जास्त प्रमाणात नाहीत आणि आहेत त्या खटकत नाहीत फारशा..
>> +१ लोकांना खटकायचं कारण कळलं नाही. त्या खरोखरच ओघात आलेल्या वाटतात. मुद्दाम पेरलेल्या वगैरे नाहीयेत अजिबात.
आता दुसरा सिझन कधी येणार,
आता दुसरा सिझन कधी येणार, हा पहीला सीझन कमीतकमी तो startingला अॅक्सिडेंट होतो त्याचा तिथपर्यंत दाखवायला हवा होता.
जरी आपल्याला कर्जतला अॅक्सिडेंट होतो चक्रपाणीचा मग तो हॉस्पिटलमधून बरा होऊन चिपळूणला जातो हे माहिती असलं तरी महाजनच्या आयुष्यातला तिथपर्यंतचा प्रवास बघायला आवडला असता.
दुसरा सिझन त्याच्यापुढचा हवा होता.
मला शिव्या खटकल्या, मला अशा शिव्या ऐकवत नाहीत, जवळच्या कोणाच्या तोंडात असल्या तर मी वाद घालते त्यांच्याशी. जे सीन्स आवडले नाहीत ते पुढे करता आले, शिव्या नाईलाजाने ऐकाव्या लागल्या.
@ पियू
@ पियू
त्या दोघात ४० वर्शाच अन्तर आहे ( स्वामींच्या म्हणण्यानुसार ) म्हणजे चक्रपाणी आता ७०+ असला पाहिजे .
>> हेच सूत्र धरून पुढे लिहिते की चक्रपाणी आता 70+ असेल तर त्याच्या लहानपणी (म्हणजे त्याकाळच्या भारतात) दिवाळीला लोक / मुलं एकमेकांना हॅपी दिवाली म्हणायचे? छोट्या मुली लिपस्टिक आणि नेलपॉलिश लावायच्या का? मला तो प्रसंग पहिल्यापासून फार खटकलं आहे ते.
मलाही खटकलं ते सगळं .. विशेषतः आकाशकंदील का पणती लावणाऱ्या बाईची साडी.. अशी जॉर्जेटची झिरझिरीत साडी तेव्हाच्या बायका घालत असतील म्हणजे साधारण ६० वर्षांपूर्वी?
Pages