खरं तर घटना क्षुल्लक आहे पण डोक्यातून जात नाहीये पटकन . मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि गेल्या 12 - 14 वर्षात खरेदी केलेल्या पुस्तकांनी एक लहान कपाट भरलेलं आहे . मला माझी पुस्तकं शेअर करायला मनापासून आवडत नाही .. लोक हरवतात , नेलेल्यापैकी सगळी आणून देत नाहीत असे अनुभव आहेत . चांगली गोष्ट की सहसा कुणी आमच्या घरी पुस्तकांची मागणी घेऊन येत नाही .
4 दिवसांपूर्वी अगदी जवळच्या नात्यातील एक भाऊ आला आणि बास्केट भरून पुस्तकं घेऊन गेला . मुलांसाठी लायब्ररी सुरू करण्याचा उपक्रम सुरू करायचा आहे .
याबद्दल नेऊ का तुझी पुस्तकं वगैरे विचारलं सुद्धा नाही . तो पुस्तकं निवडत असताना मला वाटलं मला दाखवेल झाल्यानंतर आणि विचारेल यातली कुठली नेऊ , कधी नेऊ .. पण असं काहीही न करता तो डायरेक्ट भरून घेऊनच जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं ...
कोणीही दुसऱ्याची वस्तू " नेऊ का ? " म्हणून साधी विचारणाही न करता नेऊ शकेल हा अनुभव मला आतापर्यंतच्या आयुष्यात आलेला नव्हता , तो आता आला . .
मी तोंडाला कुलूप लावून बघत बसले , तोंड उघडून मला पुस्तकं द्यायची नाहीत असं स्पष्टपणे सांगू शकले नाही , ही माझी चूक आहे . मीच जबाबदार आहे .
तरीही संताप होतो आहे .
पुस्तकं मी परत परत वाचते , ती शोभेसाठी नाहीयेत . आणि वाचनालय चालवण्याचा उपक्रम करण्यात मला काडीचा रस नाहीये ... ज्यांना करायचा असेल त्यांनी तो पदरचे पैसे खर्च करून खुशाल करावा , दुसऱ्याने आयुष्यभर निवडून जमा केलेली पुस्तकं परस्पर घेऊन जाऊन नाही , असं मला वाटतं .
पुस्तकं आता गेल्यातच जमा आहेत ..
पुस्तकांसाठी तडफड होते आहे असंही नाही ... जरा नीट बोलून मागितली असती तर मी किंचित मनाविरुद्ध का होईना दिली असती ... थोडी थोडी करून .. पण माझ्या मताला काडीची किंमत न देता परस्पर माझी वस्तू उचलून नेल्यामुळे इगो दुखावला गेला आहे .
कौटुंबिक संबंध खूप जिव्हाळ्याचे आहेत .. क्षुल्लक घटनेमुळे मनात रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीबद्दल तिरस्कार जन्मू पाहत आहे .. ह्याच माणसाने मागे आमच्या घरातील आजारपणाच्या वेळी धावपळ केलेली आहे , ब्लड दिलेलं आहे .. देव न करो परत वेळ आली तर मदतीला उभा असणार आहे , वगैरे सगळं समजतं आणि आपणच पराचा कावळा करत आहोत असं वाटतं ... कळत आहे पण वळत नाहीये ...
पुस्तकं कधीही परत विकत घेता येतील , जर ही पुस्तकं परत आली नाहीत तर सगळी परत विकत घेऊ पण नेलेली परत आणून दे , असं सांगून त्याला दुखावू नये असं माझ्या वडिलांनी सांगितलं ... मलाही ते पटतं , पुस्तकं महत्वाची नाहीतच पण अशा प्रकारे गृहीत धरल्याने अन्याय झाल्याचा फील आला आहे त्याचा त्रास होतो आहे .
माफ करणं ही गोष्ट माझ्यासाठी नॅचरली येत नाही .. स्वभावातले दोष समजतात पण दूर कसे करू समजत नाही . मी अधिक मॅच्युअर का नाहीये ....
राग आणि दु:ख यातील जास्त काय
राग आणि दु:ख यातील जास्त काय वाटतंय?
माझ्याबाबतीत अगदी अशीच गोष्ट झालेली आहे. आमच्या घरी एक अध्यात्मिक पुस्तकांचा संच होता. आमच्या गुरूंचीच पुस्तकं होती, आणि केव्हाही पुन्हा आश्रमात जाऊन आणता येण्यासारखी होती. हा संच माझ्या कपाटात होता. थोडी जुनी झालेली पुस्तकं जी मी १-२ दा वाचलेली होती, आणि अजूनही वाचत होते. माझ्यासाठी त्या पुस्तकांमधे लिहिलेलं जेवढं महत्त्वाचं होतं तेवढच त्या थोड्या जुन्या झालेल्या पुस्तकांशी तयार झालेलं अतिशय पर्सनल असं नातंही महत्त्वाचं होतं. एक दिवस मी घरी नसताना आईची एक मैत्रिण घरी आली, आणि आईनं तो सगळा संच तिला देऊन टाकला, कारण तेव्हा घरात दुसरा संच नव्हता. मी घरी आल्यावर मला हे कळलं तेव्हा आधी मला राग आणि दु:ख दोन्ही वाटलं. पण मग लक्षात आलं की आईला माझं त्या पुस्तकांशी असलेलं नातं माहितच नव्हतं. तिच्या दृष्टीने त्या पुस्तकांमधला मजकूर जास्त महत्त्वाचा होता, आणि तो इतरांनाही वाचायला मिळावा अशी प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे ह्यात राग येणं चुकीचं आहे हे माझ्या लक्षात आलं. पण दु:ख तर आहेच - ते अजूनही आहे, आता नवीन पुस्तकं हातात असूनही आहे.
तुमची पुस्तकं एका शब्दानंही न विचारता घेऊन जाणारी व्यक्ती तुमच्या इतर कुठल्याही पर्सनल वस्तूंबद्दल असंच वागेल का? याचं उत्तर हो असेल तर अश्या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला पाहिजे - त्यासाठी वाईटपणा घ्यावा लागतोच असं नाही, वर ऋ यांनी सुचवल्याप्रमाणे casually पण करता येऊ शकतं. पण जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल, तर मग याचा अर्थ असाच होतो की त्यांना जुनी पुस्तकं म्हणजे न लागणारी वस्तू वाटते आणि ती इतर कुणाला उपयोगी पडत असेल तर द्यावी असा चांगला हेतू आहे. असं असेल तर मग फार काळ राग धरणं योग्य नाही हे तुम्हालाच जाणवेल. दु:ख मात्र राहतंच.
मला वाट्ते रक्तदान करण्या
मला वाट्ते रक्तदान करण्या इतकी भावाची जवळीक असेल तर लाइक अॅडल्ट्स त्याला समोर बसवून बोलून शांतपणी सांगा तुम्हाला नक्की काय् वाट्टे ते. व ती पुस्तके परत मागा. परत आल्या शिवाय तुमचा जीव शांत होणार नाही. ज्या मुलांसा ठी वाचनालय उघडायचे आहे त्यांचे नशीब नाहीतर ती त्या पुस्तकांशीवाय मोठी होतील. काही कोणाचे अड णार नाही. तो भाउ पण एक धडा शिकेल. त्याने विचारून न्यायला हवे होते इतकेच ना. त्याचे रक्त मागताना काय सिचुएशन होती!! त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघा. उदार पणा, मोठे मन वगैरे असावे लागते ते कल्टिव्हेट करता येत नाही.
भावनीक गुंतवणूक असलेल्या वस्तूच काय पुढे माणसेही परवानगी न मागता निघून जातात .
उदार पणा, मोठे मन वगैरे असावे
उदार पणा, मोठे मन वगैरे असावे लागते ते कल्टिव्हेट करता येत नाही. >>> क्या बात है.
तुमच्या प्रतिसादात असे एक तरी खास काही असतेच...
पण अमा, रक्त देण्याइतकी जवळीक असे काही नसते. उलटप्रसंगी आपण यांच्या आणिबाणीच्या प्रसंगात धावपळ केली, हिच्या वडिलांचा जीव वाचवला (तशी केस नसेलच म्हणा) पण हिला पुस्तकांवरून इतकं वाईट वाटतंय असं त्याला वाटून तो दुखावण्याची शक्यता जास्तच.
( तसे नसते तर त्याला तसे त्याच वेळी सांगितले गेले असते. सांगताही येत नाही अशी परिस्थिती का झाली ?)
Bagz राग नाही विशेष आता ,
Bagz राग नाही विशेष आता , दुःख तर नाहीच ...
अमा , मला आता सांगण्यासारखं
अमा , मला आता सांगण्यासारखं काही वाटत नाहीये ... माझा जीव शांत झाला आहे ऑलरेडी ... मी मोठं मन कदाचित आणू शकणार नाही पण समजूतदार पणे वागू तर शकते ....
छज्जातील बंडी , तुम्हाला वाटतं तशी परिस्थिती त्यावेळी नव्हती ... असो , ते महत्वाचं नाही . आणि त्याने केलेली धावपळ वगैरे लक्षात घेऊन मला बोलता आलं नाही असंही काही नाही .... कोणीही असतं तरी मी स्पष्ट बोलू शकले नसते , की मला नाही द्यायची पुस्तकं असं .... कारण आजपर्यंत कोणाला एवढ्या स्पष्ट शब्दात सांगण्याची वेळच माझ्यावर आलेली नाही , समोरच्याचा मग तो कोणीही असो अपमान होऊ नये हीच नॉर्मल मनोभूमिका असते ..... आणि परवाच्या प्रसंगापर्यंत याआधी कुणी असं विचित्र वागलेलंही नाही , त्यामुळेही स्पष्ट बोलण्याची वेळ आली नाही .
जुन्या पुस्तकांचा लळा समजू
जुन्या पुस्तकांचा लळा समजू शकतो. तुम्ही ती पुस्तके नवीन आणली तरी जुन्या पुस्तकांची पिवळसर पाने वाचण्यात जी मजा आहे ती नवीन पुस्तकात नाही. जुनी पुस्तके मिळतील की नाही या आशेमध्ये राहण्याऐवजी सरळ तीच नवीन पुस्तके ऑर्डर करा आणि भावाला सांगा जुनी पुस्तके आणून दे आणि नवीन पुस्तके घेऊन जा कारण वाचनालयासाठी नवीन पुस्तके केंव्हाही चांगली. तुम्हाला तुमची जुनी पुस्तके मिळाल्याचा, आणि त्याला वाचनालयासाठी नवीन पुस्तके मिळाल्याचा आनंद होईल. त्याचबरोबर भावाच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल आणि वाचनालयासाठी पुस्तके दान केल्याचा तुम्हाला जो आनंद मिळेल तो वेगळाच.
भावाच्या मनात तुमच्याबद्दलचा
भावाच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल आणि वाचनालयासाठी पुस्तके दान केल्याचा तुम्हाला जो आनंद मिळेल तो वेगळाच.
अगदी योग्य
you said it
मला यातून आनंद मिळणार नाही ,
मला यातून आनंद मिळणार नाही , तेवढं माझं मन मोठं नाही . I know myself . आणि त्याचा आदरही नको आहे . आणि नेलीत ती परत मिळण्याचीही मी आशा मुळीच ठेवलेली नाही . I will be glad if he left me n rest of my books alone in future ...
त्याच्या लहरीसाठी माझ्या बाबांना आर्थिक खड्ड्यात का घालू ? मी कमावती असते तर एकगठ्ठा पुस्तकं घेतली असती , सध्यातरी वडील घेऊन देतात तेव्हा मला पुस्तकं मिळतात . मला हवी तीच नवीन पुस्तकं बजेट बघून घ्यावी लागतात , महिन्याला हजारच्या आसपास फक्त .. आता जी आहेत ती गेल्या 10 - 12 वर्षात थोडी थोडी करून घेतलेली आहेत .... त्याला कमावता असून नवीन पुस्तकं खरेदी करावीशी वाटली नाहीत , मी देण्याचा काही संबंधच येत नाही ...
राग फार काळ उरत नाही पण
राग फार काळ उरत नाही पण जिव्हाळा , आदर , प्रेम या भावना सुकून जातात , लोकांच्या अशा वागण्याने .
भावनीक गुंतवणूक असलेल्या
भावनीक गुंतवणूक असलेल्या वस्तूच काय पुढे माणसेही परवानगी न मागता निघून जातात . >> अमा, बिग हग.... "आपली", "परवानगी", "जाणे" सगळ्या शब्दांभोवती असलेले भ्रम गळून पडणारे क्षण असतात...
भावनीक गुंतवणूक असलेल्या
भावनीक गुंतवणूक असलेल्या वस्तूच काय पुढे माणसेही परवानगी न मागता निघून जातात .>>>>अमा बिग हग++१११
>>>> I will be glad if he
>>>> I will be glad if he left me n rest of my books alone in future ...त्याच्या लहरीसाठी माझ्या बाबांना आर्थिक खड्ड्यात का घालू ?>>>
He should know better than to take you for granted. Period!!
अगदी बरोबर भावना आहेत तुमच्या. आय सपोर्ट यु.
त्याच्या लहरीसाठी माझ्या
त्याच्या लहरीसाठी माझ्या बाबांना आर्थिक खड्ड्यात का घालू ? मी कमावती असते तर एकगठ्ठा पुस्तकं घेतली असती , सध्यातरी वडील घेऊन देतात तेव्हा मला पुस्तकं मिळतात .
>>> म्हणजे टेक्निकली पुस्तके वडिलांची आहेत... तुमची परवानगी कशाला हवी...
खरे तर मला वाटतंय तुम्ही ओव्हर रियाक्ट करताय....
तुमचा भाई आला आणि काहीच न बोलता घेऊन गेला का ?
त्याने त्याचा उपक्रम सांगितला... वाचनालयाचा... पुस्तके हवी म्हणाला... तुमच्या समोर घेतली पुस्तके.... न सांगता तुमच्या मागाहून तर घेऊन नाही गेला... तुमच्या वडिलांना सांगून घेऊन गेला असता तर ? त्यांनी नकार दिला असता का ?
माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी
माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू ?>>> हे धाग्याचे शीर्षक आहे. म्हणजे तुम्ही mature होण्यासाठी सल्ले मागत आहात. आणि तुमच्या कमेंट बरोबर याच्या उलट आहेत. तुम्ही सिरीयसली विचारत असाल तर एक सांगतो,
असं समजा की भावाने मुद्दाम तुम्हाला न विचारता पुस्तके नेली. कारण त्याला माहीत होते. विचारल्यावर स्वभावाला अनुसरून तुम्ही ती देणारच नाही आहात. त्याची strategy यशस्वी झाली.
आता तुम्हीही समजून उमजून strategy आखा. त्याला फोन वगैरे करून विचारा, अजून काही पुस्तके हवी असतील तर सांग म्हणावे. तुम्ही गोळा करून देऊ शकता. त्याने मागितली तर खरेच द्या. किंवा मनापासून प्रयत्न करा.
याने भावाच्या मनात तुमच्या विषयी आदर वाढेल. आणि तुमचा मनस्ताप कमी होईल. असे प्रत्येक गोष्टीत करत चला स्वार्थी पणा जाऊन maturity वाढेल.
पण हे एवढं सहज सोपं नसेल . आणि फार वेळ घेणारे असेल.
एखाद्या व्यक्तीला दुखावून
एखाद्या व्यक्तीला दुखावून आपल्याला हवी ती गोष्ट मिळवणे ही जर स्ट्रॅटेजी असेल तर वैयक्तिक आयुष्यात , इतर नातेसंबंधांत ती फारशी फायद्याची ठरणारी नाही असं मला वाटतं ... पुस्तकांची घटना मी विसरेनही पण मोठा भाऊ म्हणून काय विश्वास , काय रिस्पेक्ट शिल्लक राहिला ? Is that a good trade ? I can buy books again , he can't win my respect and trust again . आज मी घरातली कर्ती नाहीये , लहान समजली जाते ; रिलेशन्स टिकवून ठेवण्यासाठी मला काही करावं लागतं नाही .. फ्युचर मध्ये जेव्हा मी कर्ती असेन तेव्हा , पुढच्या पिढीत रिलेशन्स टिकवून ठेवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होतील असं वाटत नाही .... हे पुस्तकांसाठी नाही , तर वागणुकीमुळे .
जाऊ दे ... माझ्यापुरता विषय संपला आहे .. त्याच्या उपक्रमात कोणत्याही प्रकारे सहभागी होण्यात मला रस नाही .
तुमच्यापुरता विषय संपला हे
तुमच्यापुरता विषय संपला हे छान झाले. पण इतरांना वाचताना या धाग्याचा उपयोग होईल.
कौटुंबिक संबंध खूप
कौटुंबिक संबंध खूप जिव्हाळ्याचे आहेत .. क्षुल्लक घटनेमुळे मनात रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीबद्दल तिरस्कार जन्मू पाहत आहे .. ह्याच माणसाने मागे आमच्या घरातील आजारपणाच्या वेळी धावपळ केलेली आहे , ब्लड दिलेलं आहे .. देव न करो परत वेळ आली तर मदतीला उभा असणार आहे , वगैरे सगळं समजतं आणि आपणच पराचा कावळा करत आहोत असं वाटतं ... कळत आहे पण वळत नाहीये ...
पुस्तकं कधीही परत विकत घेता येतील , जर ही पुस्तकं परत आली नाहीत तर सगळी परत विकत घेऊ पण नेलेली परत आणून दे , असं सांगून त्याला दुखावू नये असं माझ्या वडिलांनी सांगितलं ... मलाही ते पटतं , पुस्तकं महत्वाची नाहीतच पण अशा प्रकारे गृहीत धरल्याने अन्याय झाल्याचा फील आला आहे त्याचा त्रास होतो आहे . >>>> हा पॅरा बदला. सोयीचा टाका. त्यामुळे लोक मिसगाईड होऊन विरोधात प्रतिसाद देत आहेत. ते येऊ नये असे वाटत असेल तर त्याचा चांगुलपणा काढून टाका यातून.
नाही , आहे असाच ठीक आहे .
नाही , आहे असाच ठीक आहे .
गैरसोयीचे प्रतिसाद आले तर येऊ
गैरसोयीचे प्रतिसाद आले तर येऊ देत का ?
मला वाटते इथे तुमच्या भावाचे
मला वाटते इथे तुमच्या भावाचे वागणे चुकले. त्याने असा असा उपक्रम आहे तर त्यासाठी काही पुस्तके देशील का असे विचारायला हवे होते. कुठली पुस्तके द्यायची याचा निर्णय तुमच्या हातातून काढून घ्यायला नको होता. तुमची चूक एवढीच की तुम्ही भावाला 'थांब मी बघते यातली कुठली पुस्तके देता येतील ते' असे म्हणाला नाहीत. तुमची चिडचिड होणे समजू शकते. मात्र आता वेळ निघून गेल्यावर चिडचिड करुन स्वतःलाच त्रास होणार तेव्हा यातुन धडा घ्या. परत कधी अशी वेळ आलीच, आणि नाही म्हणावेसे वाटले तर तर भीड न बाळगता नाही म्हणा. शेवटी समोरची व्यक्ती तुम्हाला गृहित धरत आहे तर त्याची जाणीव त्या व्यक्तीला करुन देणे ही आपली जबाबदारी.
या धाग्याचा उद्देश कौन्सिलिंग
छज्जातील बंडी , या धाग्याचा उद्देश कौन्सिलिंग मागणं होता . एखादी व्यक्ती अनोळखी लोकांशी बोलून आपली समस्या सोडवू इच्छिते ( तिचा प्रॉब्लेम जेन्यूईन आहे असं गृहीत धरलं तर ) तेव्हा तिला जज न करता आणि तिची समस्या सुटायला मदतही होईल अशा प्रतिसादांची अपेक्षा असते ... अदरवाइज ती अनोळखी लोकांशी बोलण्याएवढी डेस्परेट झाली नसती ..
कोतबो सदराचा उद्देश ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना ती मिळावी हा आहे .. तुमच्या सल्ल्यांनी अनफॉर्च्युनेटली मला काही मदत होत नाहीये ...
त्रास झालेली गोष्ट मनात दडपून टाकण्यापेक्षा योग्य कौन्सिलर कडे बोलली तर तो त्या गोष्टीने होणारा मनस्ताप कमी करू शकतो , अनेक प्रतिसाद मला शांत व्हायला मदत करणारे ठरले , yours weren't one of them .. जेव्हा त्रासात असलेल्या व्यक्तीला आपल्या सल्ल्याने फायदा होण्याची खात्री नसेल तर सल्ला न दिलेला उत्तम ... तरीही तुम्हाला अनवॉन्टेड सल्ले द्यायचेच असतील तर ठीक आहे . Its a good thing you aren't a professional counselor .. तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या क्लाएंटसची फार वाईट अवस्था झाली असती .
स्वाती , मी आता चिडचिड करत
स्वाती , मी आता चिडचिड करत नाहीये सुरुवातीचे 2 दिवस झाली फक्त .. पण माझी मनःशांती लाखमोलाची आहे आणि दुसऱ्या कुणाच्यातरी चुकीमुळे माझ्या घरातलं वातावरण बिघडवण्यात अर्थ नाही ना ... तेव्हा चिडचिड मुळीच करून घेत नाही ..
तुमच्या भावाच्या बाजूनेही
तुमच्या भावाच्या बाजूनेही लोक बोलतीलच की. तसा सल्ला आला की तुम्ही आक्रस्ताळा प्रतिसाद देत आहात. हे योग्य आहे का ? कोतबो म्हणजे मआ हवा तसाच सल्ला द्या असे आहे का ?
कोतबो म्हणजे आपल्या मनाला बरं वाटेल असे सल्ले मागण्याचे सदर कधीपासून झाले ? कुणी चुकत असेल तर ती दाखवून सुद्धा देतात इथे. जे मॅच्युअर्ड आहेत ते स्विकारतात. आपली चूक समजणे हा सुद्धा कोतबोचा उद्देश असतो. तुमची झालेलीच नाही असे तुम्हाला वाटू शकते. पण म्हणून सल्ला देणा-याला लगेच माझे मन मोठे नाही, मॉ स्वार्थी आहे असे टोमणे कशाला मारताय ?
ते टोमणे नव्हते ऍक्चुली .. मी
ते टोमणे नव्हते ऍक्चुली .. मी खरंच सांगत होते ... मी स्वार्थी आहे आणि मनही मोठं नाहीये . बाकीच्या सगळ्यांचे सल्ले वेलकम आहेत .. you are just one of the people who can't make anyone feel better or help them with your advice ... Ever ..
बापरे.....केवढा गदारोळ.
बापरे.....केवढा गदारोळ. कुणाचीही वस्तू न मागता घेऊन जाणं चुकीचंच आहे....no doubt. पण भावाला तसं करताना अडवता न येणं आणि नंतर त्याबाबतीत चिडचिड करत राहणं हे immature असण्याचं लक्षण नाहीये. त्याला भिडस्त स्वभाव म्हणतात. मुळात तुम्हाला mature वगैरे व्हायचं नाहीये. तुम्हाला फक्त तुमची चिडचिड justify करायची आहे. आणि इथे तसं करणारेच प्रतिसाद तुम्हाला बरे वाटतायत. इथे प्रतिसाद देणारे लोक वेगवेगळ्या वयाचे आणि विचारांचे आहेत. त्यामुळे मतं वेगळी असणारंच. फक्त तुम्हाला ती पटत नाहीत आणि तुम्हाला तुमचे विचार बदलायचे नाहीत म्हणून इतरांना फाट्यावर मारण्यात काही राम नाही. यात immaturity नाही तर हेकेखोरपणा आणि तुसडेपणा दिसतो. आपल्याला बदलायचंच नाही तर सल्ले मागावेतच कशाला. पुस्तकांवर प्रेम असावंच. पण तुमचं तुमच्या 'अहं' वर जास्त प्रेम दिसतंय.
ती पुस्तकं दुसर्या लहान मुलांना वाचायला मिळणार आहेत याचा वास्तविकत: आनंद असायला हवा. आणि तुम्हाला हवं तेव्हा जाऊन तुम्हीही ती पुस्तकं चाळू शकता की. अजून वय लहान आहे तुमचं. भविष्यात अजून कितीतरी पुस्तकं संग्रही ठेेवाल तुम्ही. स्वकमाईने. so chill.
चिन्मयी , हो तसंही असण्याची
चिन्मयी , हो तसंही असण्याची शक्यता आहे ... आय होप फ्युचर मध्ये माझ्या स्वभावात पॉजिटिव्ह बदल घडून येतील .
that's the spirit...best
that's the spirit...best wishes for u...
प्रश्न माझ्यात maturity कशी
प्रश्न माझ्यात maturity कशी येईल असा असल्याने लोकांनी त्या दृष्टीने सल्ले दिले आहेत पण आपल्या प्रतिसादांवरून आपण आपल्या भावाची तक्रारच जास्त करत आहात अस वाटतंय आणि तुमच्या विचारांचे validation करणारे प्रतिसादच तुम्हाला अपेक्षित आहेत का?
"तुम्हाला गृहीत धरले गेले आहे
"तुम्हाला गृहीत धरले गेले आहे" ह्याचा तुम्हाला राग आला आहे असे वाटते. बर्याच वेळेला आपण एखाद्या गोष्टीबद्दल तसे न्युट्रल असतो पण आपल्याला डावलुन जर ती केली गेली तर त्याच्याबद्दल राग येतो. रेल्वेप्रवासात बर्थ च्याबाबतीत हा प्रकार माझ्याबाबतीत बर्याच वेळेला झाला आहे. आपल्या सीटवर दुसरीच व्यक्ती बसलेली असते कारण काय तर एकत्र ग्रुपने जात असतात आणि ह्याला एकट्याला दुसर्या कंपार्ट्मेंटमध्ये सीट मिळालेली असते तर आपल्या अपरोक्ष ही मंडळी परस्पर निर्णय घेऊन टाकतात. तुम्हाला तसा काही फरक पडणार नसतो.(एकटेच प्रवास करत असाल तर) पण मला नेहेमीच माझी परवानगी न घेता असे केले गेले ह्याचा राग येतो. आजकाल रेल्वेप्रवास कमी झाला आहे व कुटुंब ही बरोबर असते पण असा प्रकार जर पुन्हा घड्ला तर मी नक्कीच अॅडजेस्टमेंट इतक्या सहजगत्या तरी करणार नाही.
आणि तुमच्या डोळ्यादेखत हे होत आहे आणि तुम्ही एका शब्दानेही विरोधच असा नाही तर नाराजीही प्रकट करु शकला नाही ह्यामुळे तुमचा कोंडमारा होतो आहे. एकदा तुमच्या भावाबद्दल तुम्ही ह्याबद्दल बोलुन घ्यायला हवे.
ढेरपोटे, मिशीवाले..
ढेरपोटे, मिशीवाले..
मस्त आयडी आहेत मायबोली वर.
Pages