Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@राजसी
@राजसी
.. marriage contract काल पाहून संपली...फारच सुंदर....फार आवडली...हिरोबद्दल अनुमोदन.....
अजून कोणती सीरियल रेकमेंड कराल?
Ashwini, मलाच तितकी कॅची
Ashwini, मलाच तितकी कॅची दुसरी अजून सापडली नाहीये! माझं दोन-चार सिरीयल धरसोड करुन झाल्या. एखाद भागानंतर पुढे बघावी असं वाटलं नाहीये. Meanwhile, माझं पूर्ण netflix पेज korean मय झालंय. दुसरी कोणती सापडली तर सांगीन
Small wonder नावाची एक सिरीयल
Small wonder नावाची एक सिरीयल होती. कुणाला माहित आहे का? माझ्या लहानपणी. हिंदीत डब केलेली.. कुठे बघता येईल? मला मुलांना दाखवायची आहे..
Trollhunters - नेटफ्लिक्स वर
Trollhunters - नेटफ्लिक्स वर . ऍनिमेटेड आहे. मला आवडली.
कालच ‘चेर्नोबिल ‘सिरीज
कालच ‘चेर्नोबिल ‘सिरीज बघीतली. युक्रेनमधे झालेल्या न्युक्लिअर डिझॅस्टर वर आहे.
जबरदस्त!
हेडफोन लावुन या सिरिजच्या बॅग्राउंड म्युझिकचा आस्वाद घ्या... कसला इफेक्ट येतो सिरीज बघताना.... नो वंडर या सिरीजला ९ एमी अॅवॉर्ड्स मिळाले...
५ भागाची सिरीज आहे. पहिल्याच पार्टपासुन ही सिरीज आपल्याला खिळवुन ठेवते.
नेट्फिल्स किवा प्राईम वर
नेट्फिल्स किवा प्राईम वर सस्पेन्स थ्रिलर असतील तर सुचवा...... प्लिज
चेर्नोबिल कुठे आहे. मला
चेर्नोबिल कुठे आहे. मला पहायची आहे. कृपया कुठली सिरीज कुठे पहिली हे पण नमूद करत जावे.
नेट्फिल्स किवा प्राईम वर
नेट्फिल्स किवा प्राईम वर सस्पेन्स थ्रिलर असतील तर सुचवा>>>>>>>
नेफ्लि - टाईपरायटर, घोस्ट स्टोरीज
@बी. एस. Small wonder बहुतेक
@बी. एस. Small wonder बहुतेक आहे यूट्यूबवर . मागच्या वर्षी मी पाहिली होती.
@अबोल अंजली_१२ नी सुचवलेल्या सोबत Locke and Key @netflix पण पहा. Locke and key and Typewriter मी बिन्ज watch केले.
Small wonder बहुतेक आहे
Small wonder बहुतेक आहे यूट्यूबवर . मागच्या वर्षी मी पाहिली होती. >>>>> हो यूट्यूबवर सगळे भाग आहेत. इंग्लिश मधले आहेत. हिंदी डब्ड नाहीयेत.
Yes , आता आठवले. Sorry.
Yes , आता आठवले. Sorry.
marriage contract काल पाहून
marriage contract काल पाहून संपली...फारच सुंदर....फार आवडली...हिरोबद्दल अनुमोदन.....
अजून कोणती सीरियल रेकमेंड कराल? <<< आज बघायला सुरुवात केलीये. मला जो वाटतो आहे तोच हिरो असेल तर जरा म्हातारा वाटला.
अजून कोणती सीरियल रेकमेंड कराल <<<< हाय बाय ममा बघितलीये. मला आवडली . थोडी स्लो पण वेगळीच गोष्ट आहे. भूत झालेली हिराॅईन्, तिचा आधीच्या जन्मातला नवरा, मुलगी, मैत्रीण्, आई वडिल वगैरे.
पाताल।लोक बघून संपवली.
पाताल।लोक बघून संपवली.
खूप खूप जबरदस्त आहे... नक्की बघा!
देसाई,
देसाई,
तुम्ही कुठल्या डान्स बद्दल लिहिलय ?
नेव्हर हॅव आय एव्हर गणेश पूजा डान्स बद्दल असेल तर त्याची लिड डान्सर कोरिओग्राफर माझी मैत्रीण ‘जोया काझी ‘आहे
https://www.instagram.com/p/B_f7HhXnIwG/?igshid=7n5h21d7c4np
इथे कोणी 'डार्क' (मूळ- जर्मन
इथे कोणी 'डार्क' (मूळ- जर्मन , इंग्लिश डब) फॅन नाही का? ट्रॅव्हल थ्रू टाइम कन्सेप्ट वर आहे. अफाट सिरीज आहे. केवळ अफलातून. 2 सिजन आहेत 3 रा येणार आहे . नक्कीच बघा. नेफ्लिवर आहे.
@अबोल अंजली_१२ नी सुचवलेल्या
@अबोल अंजली_१२ नी सुचवलेल्या सोबत Locke and Key @netflix पण पहा. Locke and key and Typewriter मी बिन्ज watch केले.
>>>>>>>>>>> धन्यवाद... कधी शोधुन शोधुन कटाळा येतो..... शोधण्यातच अर्धा वेळ जातो...
धनश्री....हिरो थोडा मोठाच
धनश्री....हिरो थोडा मोठाच दाखवलाय वयानी...पण त्याच हसणं आणि अभिनय किलर आहे....पाहत रहा...नक्की आवडेल.
@अबोल, The stranger आणि
@अबोल, The stranger आणि Unbelievable पण पहा. दोन्ही बहुदा नेटफ्लिक्सवर आहेत.
Disney हॉट स्टारवर Sharp Objects पहाते आहे. आठपैकी 6 एपिसोड पाहून झाले आहेत. सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. डार्क आणि डिप्रेसिंग आहे पण सस्पेन्स चांगला आहे. अर्थात मला ती फारच संथ वाटते आहे. हिरोईन सतत दारू पिणे आणि म्युझिक लावून कारमधून फिरणे यातच खूप वेळ घालवला आहे, पण याचं डायरेक्शन जबरदस्त आहे. सतत वर्तमान आणि भूतकाळाचे सीन्स दिसत रहातात त्यामुळे लक्ष देऊनच पहावी लागते. ज्यांना सायकॉलॉजी बद्दल कुतूहल आहे, त्यांनी मात्र नक्की पहावी. इतक्या भावभावना आणि इतकी त्याची गुंतागुंत आहे.
चेर्नोबिल एच बी ओ वर आहे.
चेर्नोबिल एच बी ओ वर आहे.
चेर्नोबिल कुठे आहे. ---
चेर्नोबिल कुठे आहे. --- भारतात hotstar
हलक्या फुलक्या, डोक्याला फार
हलक्या फुलक्या, डोक्याला फार त्रास न देणाऱ्या वेबसिरीज सांगा प्लीज. पंचायत बघून झालीय.
Unbelievable >>>> ईथले रिव्हु
Unbelievable >>>> ईथले रिव्हु वाचुन ही पाहीली.... खुप आवडली... Broadchurch chi तर फँन झाली दोन्ही सिजन मस्त...
Disney हॉट स्टारवर Sharp
Disney हॉट स्टारवर Sharp Objects >>> गिलियन फ्लिनच्या कादंबरीवर आधारित आहे का?
हलक्या फुलक्या, डोक्याला फार त्रास न देणाऱ्या वेबसिरीज सांगा प्लीज >>> प्राइमवर मार्वलस मिसेस मेजल
कुणी प्राइमवरची 'द टेस्ट' नाही पाहिली का? क्रिकेट-फॅन्ससाठी मस्ट-वॉच.
ते राजा राणीची जोडी नंतर कसं
ते राजा राणीची जोडी नंतर कसं त्याच भाषेत बोलावंसं वाटत होतं तसं आता या युपी अॅक्सेंट मधे बोलावंसं वाटतं सारखं Happy >>>>>> अंजली_१२
व्हय काय? मग बघायलाच पायजेल पंचायत
त्या राजा राणीने पार येड लावलेलं, भाषाच बदलून गेली होती खरंच, आता इकडे सगळ्यांनी म्हंटलय तर बघतेच पंचायत
गिलियन फ्लिनच्या कादंबरीवर
गिलियन फ्लिनच्या कादंबरीवर आधारित आहे का? >>> हो त्याच कादंबरीवर आधारित आहे. मला नेहमी वाटत की पुस्तकात जेवढं जसं एक्सप्रेस करता येतं तेवढं सिनेमा किंवा सीरिजमध्ये व्यक्त करता येत नाही. मला पुस्तक वाचलं की त्यावर आधारित सिनेमा पहायला नको वाटतं. तुलना होते. तिथे लिमिटेशन्स असतात. वेळेत बसवण्याचंही बंधन असतं.
पण ही एक सीरिज पहाताना वाटलं की नाही इथे वाचण्यापेक्षा बघण्याचीच गरज आहे. छोट्या घटना, छोटछोटे शॉट्स बघून तो प्रसंग एवढा अंगावर येतो की वाचण्यापेक्षा इथे visual जास्त प्रभावी आहे.
कमिलीने अंगावर शार्प ऑब्जेक्ट्सने जखमा करून घेणं हे वाचण्यापेक्षा तिची काही सेकंदांसाठी दाखवलेली उघडी स्किन बघून सुन्न व्हायला होतं.
'पाताल लोक' बघायला सुरूवात
'पाताल लोक' बघायला सुरूवात केली. चांगली वाटते. संवाद एकदम दमदार आहेत. (अॅमेझॉन प्राइम)
प्राइमवर मार्वलस मिसेस मेजल >
प्राइमवर मार्वलस मिसेस मेजल >>> थँक यु सो मच.
हलक्या फुलक्या, डोक्याला फार
हलक्या फुलक्या, डोक्याला फार त्रास न देणाऱ्या वेबसिरीज सांगा प्लीज. पंचायत बघून झालीय. >> Little things ( Netflix) , आणि काय हवं ( hotstar)
ते वीपीन प्रकरण जमलं बाबा
ते वीपीन प्रकरण जमलं बाबा एकदाचं एका फ्रेंडच्या मदतीने.
आणी काय हवं २ बघून घेतलं आधी.
आता समांतर बघतेय. अजून एम्क्स प्लेअर वरचे काय काय चांगले आहे पटापटा सुचवा
सान्वी thank u so much. आणि
सान्वी thank u so much. आणि काय हवं दोन्ही भाग बघितले कधीच. नेटफ्लिक्स नाहीये.
आता समांतर बघतेय. अजून एम्क्स प्लेअर वरचे काय काय चांगले आहे पटापटा सुचवा >>> पांडू तिथेच असावी बहुतेक.
Pages