माझ्या फेसबुक मैत्रीची थरारकथा

Submitted by Parichit on 13 May, 2020 - 12:39

डिस्क्लेमर: हा अनुभव "आपल्या आयुष्यातले थरार" अशा एका धाग्यावर पूर्वी मी प्रतिसाद म्हणून लिहिला होता. तोच इथे वेगळा धागा म्हणून चिकटवत आहे. त्यामुळे ज्यांनी आधी वाचलाय त्यांच्यासाठी पुनरुक्ती होईल. पण माझ्या लिखाणाच्या यादीत या अनुभवावर सुद्धा लेख असायला हवा असे वाटल्याने हा कॉपीपेस्टप्रपंच. शिवाय, मला लागलेल्या ठेचेमुळे योग्य तो बोध घेऊन पुढचे काहीजण व काहीजणी शहाणे होतील हा सुद्धा हेतू.
---

माझा हा अनुभव लिह्ण्यासारखा नाही. कुणालाही आजवर सांगितलेला नाही. कारण तो सांगण्यासारखा नाही. पण इथे विषय थरारचा आहे म्हणून त्या संदर्भात लिहितो. तरीही, विवाहबाह्य संबंध वगैरेची ज्यांना एलर्जी आहे त्यांनी माझा अनुभव वाचला नाही तरी चालेल. पाच सहा वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला. फेसबुकवर एक मैत्रीण झाली होती आणि सुरवातीला आमची फेसबुकवरच फ्रेन्डशिप होती बाकी काही नाही. काही दिवसांनी या मैत्रीचे जवळच्या मैत्रीत रुपांतर झाले पण ओनलाइनच. आत्मविश्वास निर्माण झाल्यावर व्यक्तिगत गोष्टी सुरु झाल्या. आम्ही आमचे फोन नंबर एकमेकाला दिले. फोनवर एकदोन वेळा बोललो. पुढे हळू हळू गप्पांच्या ओघात मी तिला फेसबुक चाटवर नाव पत्त्यासहित माझी सगळी माहिती सांगून टाकली. तिने पण ती कुठे राहती व तिच्या नवऱ्याचे दुकान आहे व ती हाउसवाईफ आहे हे सगळे तिने सांगितले. तिचे लग्न झाले आहे हे कळल्यावर मी तिला म्हणालो बाई गं तसे असेल तर तू जरा काळजी घे.आपले चाट वेळच्या वेळी डिलीट करत जा. नवऱ्याला कळले तर पंचाईत नको. तर म्हणाली नाही नाही माझा नवरा अजिबात तसा नाही. त्याला चालते मी फेसबुकवर मैत्री केलेली. नवीन लग्न केलेल्या बऱ्याच लेडीजना आपला नवरा - तसा नाही - ह्याचा फाजील आत्मविश्वास असतो. तिला पण तसाच खोटा आत्मविश्वास होता. पण हे मला कळायला उशीर झाला, त्याचीच हि थरार कथा. मी तेंव्हा तिच्यावर विश्वास ठेवला आणि परत तिला कधी आपले चाट व मेसेज डिलीट कर म्हणालो नाही. असेल तिच्या नवऱ्याला चालत तर आपण तरी कशाला काळजी करा, असे मला पण वाटले व आम्ही बिनधास्त वाटेल ते चाट करू लागलो. तिच्या कसल्या कसल्या भन्नाट कल्पना आहेत ते ती मला सांगायची. कसली कसली चित्रे ती मला पाठवायला सांगायची. मी पण ती इमानेइतबारे पाठवायचो. मैत्रीने सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. पण हे सगळे फेसबुकवरच. हे असे काही महिने चालले. पण आम्ही एकदाही भेटलो नव्हतो.

पण पुढे तो दिवस सुद्धा आला. तिची खरंतर प्रत्यक्ष भेटायची अजिबात इच्छा नव्हती. काय असेल ते मैत्री फक्त फेसबुकवरच असू दे म्हणायची. पण चाटवर मी तिला बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर पाच दहा मिनटे भेटायला ती तयार झाली. तिचे गाव माझ्या गावापासून पन्नास साठ किलोमीटरवर अंतरावर होते. मी तिथे बाईकवरून गेलो. आम्ही भेटलो पाच दहा मिनटे. व ते पण एका गर्दीच्या ठिकाणी त्या गावच्या बस स्थानकावर. कुणाला शंका येऊ नये म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतो असे न दाखवता बसची वाट पाहत उभे असलेले वेगवेगळे प्रवासी आहोत असे भासवून आम्ही बोललो. साडी नेसलेली एक अत्यंत सामान्य गृहिणी ह्यापलीकडे तिला व्यक्तिमत्व नव्हते. भेटून आम्ही जे काही जुजबी बोललो तेवढेच. एकमेकांना पाहण्यापलीकडे त्या भेटीत काहीच झाले नाही. पुढे कामाच्या वगैरे नादात आमचे चाटिंग कमी कमी होत गेले. पण मला कल्पनाही नव्हती कि ह्या फेसबुकवरच्या मैत्रीमुळे माझ्या पुढ्यात नजीकच्या भविष्यात काय थरार वाढून ठेवला आहे.

पुढे साधारणपणे दोन तीन महिन्यांनी एका संध्याकाळी मी घरीच होतो. तर एका अनोळखी नंबर वरून मला फोन आला. बोलणारा पुरुष होता व त्याने माझे नाव घेऊन तो तूच का असे विचारले. आवाजावरून रागरंग चांगला वाटला नाही. व माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला हो मी तोच असे म्हणून आपण कोण बोलताय असे विचारले. माझी शंका खरी ठरली. त्याने तिचे नाव घेतले व मी तिचा नवरा बोलतोय म्हणाला. व तिच्याशी तुझे काय संबंध आहेत असे त्याने मला थेटच विचारले. माझी गाळण उडाली. मला काय बोलावे सुचेना. कोण बोलताय आपण? रॉंग नंबर. असे काहीतरी बोललो. तर तो म्हणाला तिच्याशी बोल. आणि त्याने तिला फोन दिला. तर ती रडत म्हणाली अरे तू त्याला जे आहे ते सांग, खोटे काही सांगू नकोस कारण आपल्याविषयी त्याला सगळे कळले आहे आणि आपले सगळे चाटिंग त्याने वाचलेत. ते ऐकून माझे सगळे अवसान गळाले. मग त्याने पुन्हा फोन आपल्याकडे घेतला. आता मात्र माझा आवाज कापू लागला. त्याला मी चाचरत सांगायचा प्रयत्न केला कि अरे नुसते आम्ही ओनलाईन बोलत होतो आणि तू समजतोस तसे आमच्यात आमच्यात काहीही नाही. तर त्याने मला बोलूच दिले नाही. मला म्हणाला नाटक करू नको तुम्ही दोघे भेटला पण आहे. भेटून काय केलेस तेवढे सांग. तुमचे सगळे चाट मी वाचले आहे. तू काय करतोस कुठे राहतोस ते तुझी सगळे माहिती मी चाटिंग मधून मी घेतली आहे. हे सगळे केलेस तेंव्हा तुला अक्कल नव्हती का. तू आमचा संसार उधळलास. आता तू फक्त परिणामाला तयार हो. मी आता पोलिसांकडे जाणार आहे व पेपरला पण हे सगळे देणार आहे. शिवाय एका पक्षाच्या लोकल नेत्याचे नाव घेऊन म्हणाला त्याची माणसे आपले दोस्त आहेत, त्यांना तुज्याकडे बोलायला पाठवतोय. तेच तुझ्या घरी येऊन आता तुला समजावतील तू तयार राहा. असे म्हणून त्याने फोन ठेवला.

माझे पाय लटलट कापू लागले. हा सगळा प्रकार घरच्यांसमोरच झाल्याने त्यांनी मला विचारले काय झाले व कुणाचा फोन होता. तर मी त्यांना सगळे सांगितले व म्हणालो फक्त नेटवर मैत्री केली होती व फक्त एकदाच भेटलो आहे. तर घरच्यांनी सुद्धा मला सुनावले. नसते उद्योग करायला तुला कुणी सांगितले होते वगैरे वगैरे मला बोलले. त्या रात्री एक सेकंद सुध्धा झोप लागली नाही. ती रात्र भयंकर नी प्रचंड म्हणजे प्रचंड तणावाची होती. रात्रभर तळमळत होतो. माझ्या घरी कोणत्याही क्षणी पोलीस येतील इथपासून मला मारायला त्याचे मित्र येतील इथपर्यंत काय काय विचारांनी माझी झोप उडाली. दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन मी त्याला त्या नंबर वर फोन केला. व माफी मागितली. तर तो आवाज चढवून बोलला. म्हणाला कि काल आमच्यात तुझ्यावरून जोरात भांडण झालंय आणि तिने रात्री औषध खावून जीव द्यायचा प्रयत्न केलाय व ती आता दवाखान्यात एडमिट आहे. जर तिला काय झालेबिले तर तू मेलासच म्हणून समज, मी तुला सोडणार नाही एवढे लक्षात ठेव. असे म्हणून त्याने फोन ठेवला. मला अक्षरशः घाम फुटला घशाला कोरड पडली व भीतीने कापरे भरले. कुठल्या कुठे ह्या फंदात पडलो असे झाले. चेहरा पांढराफट्ट झाला. दोन दिवसांनी कसेबसे अवसान आणून मी त्याला घाबरत घाबरत पुन्हा फोन केला व माझे सगळे कौशल्य पणाला लावून त्याची समजूत घातली माफी मागितली व जे जे काय शक्य आहे ते बोललो. यावेळी त्याने ऐकून घेतले व मी आता टेन्शनमध्ये आहे मला पुन्हा फोन करून त्रास देऊ नकोस म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर कित्येक दिवस मला घशाखाली अन्न जात नव्हते. भीतीने व तणावाने मी आजारीच पडलो. माझ्या सुदैवाने त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. ते प्रकरण तिथेच संपले. पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले होते. व्हॉट्सअ‍ॅप वर आले होते.
ते बरं तुमच्या मित्राने गर्दीला पटवून दिलं तुमच्या आजाराबद्दल.... नाहीतर !!

hqdefault.jpgDelhi 7.jpg

परिचित सर हे प्रकार सर्रास विवाहित स्त्रिया करतात पण आपण त्यांच्या जाळ्यात अडकायचे नसते . कधी शिकणार तुम्ही .
तिला तुमच्याबरोबर मजा करायची होती ; तुम्ही तिला भीक घातली नाहीत फक्त हाय हॅलो करून आलात .
तिला वाटले असणार खाया पिया कुछ नाही ग्लास तोडो बारा आना . नवऱ्याला भांडताना तुमचे नाव घेतले असणार .
बाई दवे तुमचा लेख वाचून तुम्ही सेफ आहात म्हणून प्रचंड संख्येने मायबोलीवरील स्त्रिया तुम्हाला संपर्क करण्याची भीती आहे .

"पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही." <<

मला नाही वाटत!

पुढील थरारकथेला शुभेच्छा!

त्यांचं लग्न पाळण्यात झालेलं असू शकते, येईलच ती कथा पण
या माणसाच्या बाबतीत काहीही घडू शकते
अद्याप मानव प्रकारातील महिलाच फिदा आहेत हे काय कमी आहे का?
Happy

हो पण टेक्निकली जर लग्न झालेले नसेल तर तुम्ही कमिटेड नाही आहात. तुम्ही कोणाशीही बिनधास्त अफेअर करू शकता. फक्त आपल्या ईमेजचे काय वगैरे खुळचट कल्पना मनातून काढाव्या लागतात.

हो पण टेक्निकली जर लग्न झालेले नसेल तर तुम्ही कमिटेड नाही आहात. तुम्ही कोणाशीही बिनधास्त अफेअर करू शकता.
>>> विवाहित स्त्री शी देखील?

घरातील मुलीचे/महिलेचे अफेअर आहे असे कळले तर बऱ्याचदा घरातले इतर सदस्य त्या पुरुषावर बलात्काराचा खोटा आरोप टाकायची जबरदस्ती त्या महिलेवर करतात हे कितीजणांना माहित आहे? असे कितीतरी प्रकार घडलेले आहेत. अनेकदा महिला असे संबंध उघडकीस येताच बदनामी टाळण्यासाठी स्वत: हे आरोप करतात. त्याने मला पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली होती तेंव्हाच हे भविष्य ठरलेले होते. तो काय बायकोची लवस्टोरी पोलिसांना ऐकवायला जाणार नव्हता. अनेक तरुणांची आयुष्ये अशी होरपळलेली आहेत. त्यातून ती महिला जर विवाहित असेल तर संपलेच. इथे तर माझ्याविरोधात भक्कम पुरावेसुद्धा होते. माझी पण एखादी बातमी आली असती "फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणाने महिले...." वगैरे वगैरे. मग एकतर चक्की पिसायला पाठवले असते किंवा पार धुवूनच - शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या - पोलिसांनी मला सोडले असते. आणि तसे झाले असते तर आज मी आयुष्यातून उठलो असतो. बिनधास्त अफेअर वगैरे म्हणयला सोपे आहे. "सविता भाभी" वगैरे वाचून ते सोपे वाटते. प्रत्यक्षात काय ठेचा खाव्या लागतात हेच तर सांगायचे आहे ना मला धाग्यातून.

सर, तुमचा जो पट्ट्यापट्ट्यांचा टी शर्ट दुस-या छायाचित्रात दिसतोय तो कुठून घेतलेला ? ती महिला छाताडावर चढून का बसली होती ? अशा गप्पा मारणे हए भलतेच अफेअर वाटते मला तर.

ढेरपोट्या बाबा, तुम्ही खोटे फोटो टाकल्याने माझ्या आयुष्यातला प्रसंग खोटा होणार नाही. निदान दुसरा फोटो तरी बघून टाकायचा ना. तोंडाला मास्क बांधून लोकं आहेत. म्हणजे फोटो ह्या काही दिवसांतला आहे हे उघड आहे.

परिचित -
या धाग्याचा फायदा सर्व पुरुष जनतेला होणार आहे .
अखिल पुरुष जात आपले आभारी आहे .

इतका अविश्वास, इतका धोका असलेले आणि त्यातून (धागाकर्त्यास) अपेक्षित लाभ न मिळणारे नाते बनवण्या वाढवण्या पेक्षा व्यवस्थित जेन्यूईन प्रेम करून गर्लफ्रेंड च्या संमतीने (संमती असल्यास) हे सर्व का करू नये असा प्रश्न पडला.
म्हणजे 130 मिलियन लोकसंख्येत लोकांना अविवाहित/सिंगल/विधवा विधुर पुरुष स्त्रिया न मिळता कोणीतरी लग्न केलेले, कोणाशीतरी चांगल्या रिलेशनशिप मध्ये असलेलेच पुरुष स्त्रीच फेसबुक नातं जोडायला का दिसावे असा नेहमीचाच प्रश्न पडला.

फोटो खोटे असतील तर खरे फोटो टाकावेत असे नम्रपणे मी आपणास सुचवत आहे. मी आपणास ओळखत असल्यानेच हे फोटो इथे दिले आहेत. तुम्ही पोलिसांना सांगितलेली हकीकतच इथे दिलेली आहे. पण त्यावर पोलिसांनी का बरे विश्वास ठेवला नसेल ?
तुम्ही एस एसटी स्टॅण्डवर ती महिला एकटी असताना तिच्याशी काही संवाद साधलात. नंतर मग तुम्ही जमिनीवर उताणे आणि ती तुमच्या छाताडावर या पोझमधे आपण ज्या गप्पा मारल्या त्यामुळे लोकांनी तुमचे संभाषण त्यांच्या पद्धतीने पुढे नेले.
मस्क कदाचित तुमच्या फुटाणे खाण्याच्या सवयीने लावले असावेत.

अनु, परिचित हे थोडे किंकी आहेत हे त्यांचे सर्व धागे वाचून जाणवते. त्यांचे किस्से खरे कीं खोटे त्यांनाच ठाऊक पण सगळ्या धाग्यांचे करमणुक मुल्य जबरदस्त आहे. लॉजिक गो बॉंकर्स इन हिज केस.

होय.मला वाटते हा कोरा.कॉम साईट वर 'माय स्ट्रेंज एक्सपिरियन्स' अश्या पोस्ट आणि त्यात अश्याच गोष्टी असतात तसे काल्पनिक प्रसंग (हो काल्पनीक) लिहून त्यावर जनमानसाच्या प्रतिक्रिया तपासणे असा उदात्त उपक्रम आहे.

>>> विवाहित स्त्री शी देखील?
नवीन Submitted by च्रप्स on 14 May, 2020 - 05:34

>>>>>>

तो तिचा प्रॉब्लेम आहे. जी काही भिती असेल ती बाळगेल. अविवाहीत पुरुषाला कसली भिती?

घरातील मुलीचे/महिलेचे अफेअर आहे असे कळले तर बऱ्याचदा घरातले इतर सदस्य त्या पुरुषावर बलात्काराचा खोटा आरोप टाकायची जबरदस्ती त्या महिलेवर करतात हे कितीजणांना माहित आहे?

>>>>>>

कच्चे खिलाडीच असा विचार करतात.
तुमच्याकडेही तिची चॅट सेव्ह होती ना.
मग अश्या केसमध्ये समोरची पार्टी खोटे आरोप न करता प्रकरण दाबायला बघतात . तुमच्या केसमध्ये तेच झाले. फक्त तुम्हाला घाबरवण्याचा आव आणला म्हणजे तुम्ही उलटे त्यांना ब्लॅकमेल करू नये.

आणि आता ते एफबी सोडा. टिंडर वापरा.
फेसबूकमध्येच रमत असाल तर फक्त एक काळजी घ्या. मुलगी सद्यान असू द्या. ते कायद्यानेही योग्य आहे आणि नैतिकतेलाही धरून आहे.
बाकी फ्लर्टींग एक कला आहे असे समजून त्याकडे बघा आणि आपल्या कलेशी प्रामाणिक राहा. म्हणजे घाबरावे असे काही वंगाळ आपल्याकडून होत नाही.

बाकी सगळं पटतंय.. खरंच घडले असेही वाटतेय. फक्त एक गोष्ट खटकली. भेटून फक्त बोललात? खरंच? ये कुछ हजम नही हुआ. नक्कीच काहितरी झोल झाला असणार..
पण जाऊद्या. प्रकरण मिटले हे महत्त्वाचे. तसेही ते मिटणारंच होते असे एकंदरीत वाटतेय.

काय्ये कि इष्कबाजी करायला हिम्मत लागते जी तुमच्यात नाहीये. एक तर सरळ हिम्मत करा व पुढच्या परिणामांनाही सामोरे जा. उगाच या शौकाला गोंडस नाव न देता एकतर भिडा नाहीतर पैसे देऊन हे सुख मिळते तो मार्ग धरा.

तुमचे एकूण अनुभव वाचता एक समजले कि हे खरे असले तरी तुम्हाला उपचारांची आवश्यकता आहे, व खोटे असले तरी तुम्हाला बरे व्हायची नितांत गरज आहे.
लवकर बरे व्हा.

अहो हि लग्न झालेली सज्ञानच होती. सज्ञान असण्या नसण्याचा विषयच नाही इथे. हो माझ्याकडेही तिची चॅट सेव्ह होती. तिची भेटायची इच्छा नसताना बऱ्याच मिनतवाऱ्या करून मी तिला भेटण्यासाठी तयार केले होते हे त्यात स्पष्ट होत होते. त्यामुळे नवऱ्याच्या दबावाखाली येऊन जर भेटून जबरदस्ती केल्याचा आरोप तिने केला असता तर ते सगळे चॅट माझ्या विरोधातच जाणार होते. भेटल्यानंतर नक्की काय झाले याचा त्यात उल्लेख नव्हता. जबरदस्ती बाबत स्त्रीने आरोप करणे एवढे पुरेसे असते. आरोप खोटा सिद्ध होईपर्यंत एकाची झालेली होरपळ माझ्या पाहण्यात आहे. पोलीसनी त्याला पिळून काढलेले.

माझी हि घटना सहा एक वर्षांपूर्वीची आहे. टिंडर आता पोपुलर झाले आहे. ऐकून आहे खूप. ट्राय करतो.

बाकी ज्यांना हा अनुभव खरा वाटत नाही त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. अफेअर हे ठरवून केले जात नाही, ते होत असते.
इतकेच म्हणेन -- एक चुटकी सिंदूर च्या चालीवर -- "एक 'चाट'की अफेअर कि नशा क्या होती है तुम क्या जानो जनाब"........ फक्त दोन्ही पार्ट्या जबाबदारीने वागल्या पाहिजेत!

टिंडर आता पोपुलर झाले आहे. ऐकून आहे खूप. ट्राय करतो.>> वा! वा!! करा ट्राय लवकर. आणि काही गरज लागली तर इथे सल्ला पण विचारा.

Pages