माझ्या फेसबुक मैत्रीची थरारकथा

Submitted by Parichit on 13 May, 2020 - 12:39

डिस्क्लेमर: हा अनुभव "आपल्या आयुष्यातले थरार" अशा एका धाग्यावर पूर्वी मी प्रतिसाद म्हणून लिहिला होता. तोच इथे वेगळा धागा म्हणून चिकटवत आहे. त्यामुळे ज्यांनी आधी वाचलाय त्यांच्यासाठी पुनरुक्ती होईल. पण माझ्या लिखाणाच्या यादीत या अनुभवावर सुद्धा लेख असायला हवा असे वाटल्याने हा कॉपीपेस्टप्रपंच. शिवाय, मला लागलेल्या ठेचेमुळे योग्य तो बोध घेऊन पुढचे काहीजण व काहीजणी शहाणे होतील हा सुद्धा हेतू.
---

माझा हा अनुभव लिह्ण्यासारखा नाही. कुणालाही आजवर सांगितलेला नाही. कारण तो सांगण्यासारखा नाही. पण इथे विषय थरारचा आहे म्हणून त्या संदर्भात लिहितो. तरीही, विवाहबाह्य संबंध वगैरेची ज्यांना एलर्जी आहे त्यांनी माझा अनुभव वाचला नाही तरी चालेल. पाच सहा वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला. फेसबुकवर एक मैत्रीण झाली होती आणि सुरवातीला आमची फेसबुकवरच फ्रेन्डशिप होती बाकी काही नाही. काही दिवसांनी या मैत्रीचे जवळच्या मैत्रीत रुपांतर झाले पण ओनलाइनच. आत्मविश्वास निर्माण झाल्यावर व्यक्तिगत गोष्टी सुरु झाल्या. आम्ही आमचे फोन नंबर एकमेकाला दिले. फोनवर एकदोन वेळा बोललो. पुढे हळू हळू गप्पांच्या ओघात मी तिला फेसबुक चाटवर नाव पत्त्यासहित माझी सगळी माहिती सांगून टाकली. तिने पण ती कुठे राहती व तिच्या नवऱ्याचे दुकान आहे व ती हाउसवाईफ आहे हे सगळे तिने सांगितले. तिचे लग्न झाले आहे हे कळल्यावर मी तिला म्हणालो बाई गं तसे असेल तर तू जरा काळजी घे.आपले चाट वेळच्या वेळी डिलीट करत जा. नवऱ्याला कळले तर पंचाईत नको. तर म्हणाली नाही नाही माझा नवरा अजिबात तसा नाही. त्याला चालते मी फेसबुकवर मैत्री केलेली. नवीन लग्न केलेल्या बऱ्याच लेडीजना आपला नवरा - तसा नाही - ह्याचा फाजील आत्मविश्वास असतो. तिला पण तसाच खोटा आत्मविश्वास होता. पण हे मला कळायला उशीर झाला, त्याचीच हि थरार कथा. मी तेंव्हा तिच्यावर विश्वास ठेवला आणि परत तिला कधी आपले चाट व मेसेज डिलीट कर म्हणालो नाही. असेल तिच्या नवऱ्याला चालत तर आपण तरी कशाला काळजी करा, असे मला पण वाटले व आम्ही बिनधास्त वाटेल ते चाट करू लागलो. तिच्या कसल्या कसल्या भन्नाट कल्पना आहेत ते ती मला सांगायची. कसली कसली चित्रे ती मला पाठवायला सांगायची. मी पण ती इमानेइतबारे पाठवायचो. मैत्रीने सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. पण हे सगळे फेसबुकवरच. हे असे काही महिने चालले. पण आम्ही एकदाही भेटलो नव्हतो.

पण पुढे तो दिवस सुद्धा आला. तिची खरंतर प्रत्यक्ष भेटायची अजिबात इच्छा नव्हती. काय असेल ते मैत्री फक्त फेसबुकवरच असू दे म्हणायची. पण चाटवर मी तिला बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर पाच दहा मिनटे भेटायला ती तयार झाली. तिचे गाव माझ्या गावापासून पन्नास साठ किलोमीटरवर अंतरावर होते. मी तिथे बाईकवरून गेलो. आम्ही भेटलो पाच दहा मिनटे. व ते पण एका गर्दीच्या ठिकाणी त्या गावच्या बस स्थानकावर. कुणाला शंका येऊ नये म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतो असे न दाखवता बसची वाट पाहत उभे असलेले वेगवेगळे प्रवासी आहोत असे भासवून आम्ही बोललो. साडी नेसलेली एक अत्यंत सामान्य गृहिणी ह्यापलीकडे तिला व्यक्तिमत्व नव्हते. भेटून आम्ही जे काही जुजबी बोललो तेवढेच. एकमेकांना पाहण्यापलीकडे त्या भेटीत काहीच झाले नाही. पुढे कामाच्या वगैरे नादात आमचे चाटिंग कमी कमी होत गेले. पण मला कल्पनाही नव्हती कि ह्या फेसबुकवरच्या मैत्रीमुळे माझ्या पुढ्यात नजीकच्या भविष्यात काय थरार वाढून ठेवला आहे.

पुढे साधारणपणे दोन तीन महिन्यांनी एका संध्याकाळी मी घरीच होतो. तर एका अनोळखी नंबर वरून मला फोन आला. बोलणारा पुरुष होता व त्याने माझे नाव घेऊन तो तूच का असे विचारले. आवाजावरून रागरंग चांगला वाटला नाही. व माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला हो मी तोच असे म्हणून आपण कोण बोलताय असे विचारले. माझी शंका खरी ठरली. त्याने तिचे नाव घेतले व मी तिचा नवरा बोलतोय म्हणाला. व तिच्याशी तुझे काय संबंध आहेत असे त्याने मला थेटच विचारले. माझी गाळण उडाली. मला काय बोलावे सुचेना. कोण बोलताय आपण? रॉंग नंबर. असे काहीतरी बोललो. तर तो म्हणाला तिच्याशी बोल. आणि त्याने तिला फोन दिला. तर ती रडत म्हणाली अरे तू त्याला जे आहे ते सांग, खोटे काही सांगू नकोस कारण आपल्याविषयी त्याला सगळे कळले आहे आणि आपले सगळे चाटिंग त्याने वाचलेत. ते ऐकून माझे सगळे अवसान गळाले. मग त्याने पुन्हा फोन आपल्याकडे घेतला. आता मात्र माझा आवाज कापू लागला. त्याला मी चाचरत सांगायचा प्रयत्न केला कि अरे नुसते आम्ही ओनलाईन बोलत होतो आणि तू समजतोस तसे आमच्यात आमच्यात काहीही नाही. तर त्याने मला बोलूच दिले नाही. मला म्हणाला नाटक करू नको तुम्ही दोघे भेटला पण आहे. भेटून काय केलेस तेवढे सांग. तुमचे सगळे चाट मी वाचले आहे. तू काय करतोस कुठे राहतोस ते तुझी सगळे माहिती मी चाटिंग मधून मी घेतली आहे. हे सगळे केलेस तेंव्हा तुला अक्कल नव्हती का. तू आमचा संसार उधळलास. आता तू फक्त परिणामाला तयार हो. मी आता पोलिसांकडे जाणार आहे व पेपरला पण हे सगळे देणार आहे. शिवाय एका पक्षाच्या लोकल नेत्याचे नाव घेऊन म्हणाला त्याची माणसे आपले दोस्त आहेत, त्यांना तुज्याकडे बोलायला पाठवतोय. तेच तुझ्या घरी येऊन आता तुला समजावतील तू तयार राहा. असे म्हणून त्याने फोन ठेवला.

माझे पाय लटलट कापू लागले. हा सगळा प्रकार घरच्यांसमोरच झाल्याने त्यांनी मला विचारले काय झाले व कुणाचा फोन होता. तर मी त्यांना सगळे सांगितले व म्हणालो फक्त नेटवर मैत्री केली होती व फक्त एकदाच भेटलो आहे. तर घरच्यांनी सुद्धा मला सुनावले. नसते उद्योग करायला तुला कुणी सांगितले होते वगैरे वगैरे मला बोलले. त्या रात्री एक सेकंद सुध्धा झोप लागली नाही. ती रात्र भयंकर नी प्रचंड म्हणजे प्रचंड तणावाची होती. रात्रभर तळमळत होतो. माझ्या घरी कोणत्याही क्षणी पोलीस येतील इथपासून मला मारायला त्याचे मित्र येतील इथपर्यंत काय काय विचारांनी माझी झोप उडाली. दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन मी त्याला त्या नंबर वर फोन केला. व माफी मागितली. तर तो आवाज चढवून बोलला. म्हणाला कि काल आमच्यात तुझ्यावरून जोरात भांडण झालंय आणि तिने रात्री औषध खावून जीव द्यायचा प्रयत्न केलाय व ती आता दवाखान्यात एडमिट आहे. जर तिला काय झालेबिले तर तू मेलासच म्हणून समज, मी तुला सोडणार नाही एवढे लक्षात ठेव. असे म्हणून त्याने फोन ठेवला. मला अक्षरशः घाम फुटला घशाला कोरड पडली व भीतीने कापरे भरले. कुठल्या कुठे ह्या फंदात पडलो असे झाले. चेहरा पांढराफट्ट झाला. दोन दिवसांनी कसेबसे अवसान आणून मी त्याला घाबरत घाबरत पुन्हा फोन केला व माझे सगळे कौशल्य पणाला लावून त्याची समजूत घातली माफी मागितली व जे जे काय शक्य आहे ते बोललो. यावेळी त्याने ऐकून घेतले व मी आता टेन्शनमध्ये आहे मला पुन्हा फोन करून त्रास देऊ नकोस म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर कित्येक दिवस मला घशाखाली अन्न जात नव्हते. भीतीने व तणावाने मी आजारीच पडलो. माझ्या सुदैवाने त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. ते प्रकरण तिथेच संपले. पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण अलीकडे झालेल्या संशोधनातून असे लक्षात आले आहे कि हे ढेरपोट्या बाबा म्हणजे बोकलत असण्याची दाट शक्यता आहे>>>शेअर मार्केट ट्रेडिंग सोडून मी इथे लांबलचक प्रदिसाद देत बसतो असं वाटतंय का तुम्हाला खास करून ९ ते १० या वेळेत.

> न चिडता उत्तर देणे हे ऋन्मेष या आयडीकडून घडते. परिचित चिडले.

>>> चला या निमित्ताने तरी सिद्ध झाले कि तो मी नव्हेच

> शेअर मार्केट ट्रेडिंग सोडून मी इथे लांबलचक प्रदिसाद देत बसतो असं वाटतंय का तुम्हाला खास करून ९ ते १० या वेळेत.

>>> युक्तिवाद मान्य आहे. पण तुम्हाला इतक्या लगेच कसे कळले कि तुमचा उल्लेख या धाग्यावर झालाय? आधी तुमचा एकही प्रतिसाद नाही आणि सरसकट सगळे धागे तर कोणी वाचत नसते. माबोवर नोटिफिकेशन वगैरेची सोय आहे का?

<< आपले कल्चरच बेकार आहे. सत्तरेक वर्षाचे आयुष्य त्यातील तीसेक वर्षाचे तारुण्य एकाच पार्टनरसोबत रोमान्स करायचे किंवा एकटेच उसासे टाकत राहायचे हे निसर्गनियमानुसार अवघड आहे. पण आपण ते जमवायला जातो आणि या नादात जिथे कमी पडतो त्याला व्यभिचाराचे लेबल लावत सुटतो.>>

आपले? निसर्गनियमानुसार जगात अगणित गोष्टी चुकीच्या आहेत. मुद्दा काय आहे? हवे तेव्हा हवे त्याच्या किंवा तिच्याबरोबर संभोग करता येत नाही म्हणून आपले कल्चर बेकार आहे?

हा आयडी एक सातत्याने लैंगिक विचारांनी ग्रस्त असलेला रोगट आयडी आहे. प्रशासकांनी याचे विविध आयड्यांवरून झालेले लिखाण लक्षात घेऊन भविष्यात ही घाण मायबोलीवर फिरकणार नाही याची दक्षता घ्यावी.

एक गंमत सापडली. अहमहदुया या नावाने दिलेले प्रतिसाद आता भैय्या पाटील झाले आहेत. हा आयडी तर अजिंक्य आहे. लोकांना अज्ञात असून कथा, कादंब-या , कविता पाडण्यासाठी अपरिचित वासी राहून अनेक स्त्री आयड्यांकडून याच्या लिखाणाला लाईक मिळत असतात. विशेष म्हणजे त्या स्त्री आयड्यांना पण याचेच लाईक्स असतात. या स्त्री आयड्या या अननोनवासी ला विपू केली म्हणून धन्यवाद देतात. सगळीच मजा असते. पाटील आडनावाची भरमार आहे मात्र या परिवारात. Lol

Pages