आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?

Submitted by Parichit on 11 May, 2020 - 04:52

थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.

मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"

मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"

तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"

मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"

"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"

"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"

मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"

मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,

"काय दादा काय झालं?"

मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"

त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,

"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला

आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.

"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"

असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,

"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."

"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.

"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"

"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.

मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."

"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो

अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.

कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय प्रत्येक धाग्यावर ड्यू आयडी चर्चा . अर्थात हरकत घेणारा मी कोण ? पण वाचून कंटाळा येतो .
एकच गोष्ट आहे जिचा सारखा उल्लेख कितीही असला तरी कंटाळा येत नाही . अर्थात आपला सर्वांचा लाडका शाहरुख .

> अजिंक्यराव, डेंजर माणूस आहे राव तुम्ही>> का?
Submitted by अजिंक्यराव पाटील on 11 May, 2020 - 23:38

>>> का ते सांगतो पुन्हा केंव्हातरी. पुढच्या एखाद्या धाग्यावर Happy

> पण मी.हे नाहीये
आता मी ठरवले आहे की लोकांना आलेली.शंका तात्काळ दूर करायची Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 11 May, 2020 - 23:46

>>> नाही अभिषेक किंवा ऋन्मेऽऽष भाऊ आणि मी एकच नाही आहोत.

सांगा की इथंच...,

अजून एक उत्सुकता, तुमच्याकडे पूर्वी लुना होती का?

सांगा की इथंच...,
अजून एक उत्सुकता, तुमच्याकडे पूर्वी लुना होती का?
नवीन Submitted by अजिंक्यराव पाटील on 12 May, 2020 - 00:19

>>> वेगळ्या धाग्याचा विषय आहेच तो तसा पण आणि बरेच दिवस मला त्यावर लिहायचे आहेच. पण तुम्ही आधीच कसे काय ओळखले म्हणून डेंजर म्हणालो Happy आता काय विषय नी नक्की काय लिहायचे एवढे मात्र विचारू नका.

नाही लुना वगैरे नाही. तुम्हाला मी लुनावाले ब्रह्मे वाटलो का?

निलिमा, लोल.
त्यानिमित्ताने. एवरीबडी लव्ह्स रेमन्ड्स परत बघायला पाहिजे वाटलं.

तुम्ही काय कपडॅ घालता तो फोटो नका टाकू निदान लिहा तरी.

खालील आयटेम मस्ट आहेत इतरांसमोर येताना १) अंडर पँट ज्यात सर्व सिक्युअरली झाकले जाईल. उकाड्या मुळे ही कॉटनची असावी
२) शोर्ट किंवा थ्री फोर्थ्स ह्या वरून ३) बनियान बाह्यांचे किंवा स्लीव्हलेस ४) टी शर्ट ५) ट्रॅक पँट्स / लुंगी/ ह्या पैकी काय नेसले होते जेव्हा कंप्लेंट आली?

परिचित तुमचा हा धागा वाचून मला सैराटमधल्या खोखो खेळतानाचा "मी कुठं म्हनलं मला नाय आवडत" हा डायलॉग आठवला. फारच साधर्म्य आहे.
https://www.youtube.com/watch?v=NSw_ldXGDXU
फार कमी वेळात शतकी वाटचाल पुर्ण झाली.

पण मी.हे नाहीये

ऋन्मेऽऽष....स्वतःला "हे" साबित करण्याच्या नादात "तेरे नाम" नका होवु देवु. काळजी घ्या.

Lol
@धागामालक,
धाग्याचा मुळ विषय भरकटुन धागा हहपुवा झालाय! लक्ष द्या.

कोतबो आणि व्यक्तिगत सल्ले हा माझा प्रांत नाही. पण यानिमित्ताने एक घटना सांगतो. बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यात एका सोसायटीमध्ये परराज्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सदनिकेतच पण खिडक्या उघड्या ठेवून अत्यंत आक्षेपार्ह असे वर्तन सुरु होते. खूप मोठा इश्श्यू होऊन अखेर सोसायटीने त्यांना सदनिका सोडायला भाग पाडले होते. आजही पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर सदनिका देण्यास मालकांना मनाई आहे.

तात्पर्य:
१. भाड्याने राहत असलात तर: टेरेसवरच नव्हे तर दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून सदनिकेत जरी आक्षेपार्ह वागलात तरी सोसायटी तुम्हाला सदनिका खाली करायला सांगू शकते.
२. ओनरशिप असेल तर: सोसायटी तुम्हाला हात लावू शकत नाही. आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना व कायद्याला ह्यासाठी अजिबात वेळ नाही.

> तुम्ही काय कपडॅ घालता तो फोटो नका टाकू निदान लिहा तरी

>>> बनियन आणि शोर्ट असते. उकाडा सकाळी सुद्धा खूप असतो. अनेकदा बनियान घामाने चिंब होते तेंव्हा ती काढावी लागते अखेरच्या दहा एक मिनिटासाठी. जिम मध्ये एसी असल्याने हि समस्या येत नाही.

> मुळ विषय भरकटुन धागा हहपुवा झालाय!

>>> असू द्या हो. तणाव खूप होता सकाळी. रात्री एकदम झकास वाटले सगळे प्रतिसाद वाचून. सर्वाना धन्यवाद. त्यातल्या त्यात अलहमदुलिल्लाह यांना विशेष धन्यवाद

> भाड्याने राहत असलात तर:

>>> नाही. माझा स्वत:चा फ्लाट आहे.

या धाग्याने गोची केलीय.
आज मी पुन्हा वर्क फ्रॉम होम करायला खिडकीजवळच्या नेहमीच्या जागेवर बसलोय
नेहमीप्रमाणे उघडाच बसलोय.
कालपर्य्ंत काही विशेष वाटत नव्हते
पण आज उगाच नजर समोरच्या दहा बारा खिडक्यांवर जातेय जिथून माझे दर्शन होऊ शकते.
उगाच एखाद्या ललनेशी नजरानजर झाली तर मीच फॉल्टमध्ये येईल अशी भिती वाटतेय
आणि तरीही नजर पुन्हा पुन्हा भिरभिरतेय...

आणि त्यातही गोची म्हणजे मी ईथला भाडेकरू आहे Sad

ऋन्मेष..
तुमचे स्वतःचे साऊथ बॉम्बे मध्ये 3-3 फ्लॅट असताना भाड्याच्या घरात काहून राहता?

मला काही वेळा शंका येते ऋन्मेष आणि परिचित एकच आहेत. कुठल्याही विषयात चर्चा घडवून आणण्यात हातखंडा आहे दोघांचा . बर धागा कायम पहिल्या पानावर आणण्याकरता ( थोडक्यात धगधगता ठेवण्यात ) सारखी उत्तर देत बसायची नाहीतर वेगळेच काही तरी पॉईंट लिहायचे हे पण कॉमन आहे. काही तरी स्वतःच्या बाबतीत घडलेल्या / न घडलेल्या घटना लिहायच्या आणि सतत प्रतिसाद देत बसायचं Happy

तुमचा प्रॉब्लेम रीड केला. केअर वाटली. मी एका लायरशी बोललो. त्याने तुमचा फोन नंबर मागितला आहे. तुम्हाला सल्ला मिळेल. पैशाची काळजी नको. माफक दर आहेत. मला तुमचा फोटो, फोन नंबर, पत्ता आणि सोसायटीचे डिटेल्स मेसेज करा.

तुमच्या टेरेसचे फोटो पण पाठवायला विसरू नका. गरज पडल्यास तुमचे बिल्डरशी किंवा सोसायटीशी झालेले अ‍ॅग्रीमेंट ची पोटोसटेट कॉपी पाठवावी लागेल. वकील साहेब तुम्हाला यातून बाहेर काढतील. ते म्हणाले की अशा सार्वजनिक ठिकाणी हा प्रॉब्लेम डिस्कस करू नका. चुकीचे सल्ले मिळाले तर ब्येकार काम होईल.

नवीन Submitted by सुजा on 12 May, 2020 - 12:46
>>>>>

एक फरक आहे
मी फोटो टाकतो
ते लाजत आहेत Happy

आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई तर कमी कपड्यात व्यायाम करते. कुणीच अजून ऑब्जेक्षण नाही घेतलेलं. आमची सोसायटी फॉर्वर्ड आहेय. मी पण तिच्या वेळेत व्यायाम सुरू केला आहे. बंडी न घालता.

तुमचे स्वतःचे साऊथ बॉम्बे मध्ये 3-3 फ्लॅट असताना भाड्याच्या घरात काहून राहता?
Submitted by पियू on 12 May, 2020 - 12:38
>>>>

त्यातला एक विकला
एक नवी मुंबईला घेतला
त्याचा ताबा मिळेपर्यण्त नवी मुंबईलाच भाड्याच्या घरात आहे. किंबहुना आता ताबा मिळणारच होता.
लॉकडाऊन २० दिवस पुढे गेला असता तर मी तिथे असतो.
आता अडकलोय थोडक्यासाठी.. उगाचच घरभाडे जातेय.
असो लॉकडाऊन नंतर शिफ्टिण्गसाठी नवा धागा काढायचा विचार आहे. तेव्हा बोलूया सविस्तर.. अन्यथा नवीन घरावर काहीतरी धागा काढेनच. जर मी रुमालखरेदीवर धागा काढू शकतो तर. एवढे पैसे खर्च करतो आपण घरावर त्यावर धागा हवाच.

नवीन Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 13:24
>>>

स्त्रियांना कमी कपडे माफ असतात.
यावर मागे माझा एक धाग होता
व्हाई शूल्ड गर्ल्स हॅव ऑल द फन
मलाही एकदा कॉलेजमध्ये हाल्फ चड्डीत फिरताना वॉचमनने हटकलेले. तेच मुली मोकाट फिरत होत्या.

ऋन्मेषजी
आपले भाडे उगीच जात असेल तर जुन्या घराचे डिटेल्स, तुमचा फोन नंबर, पत्ता हे सगळे पाठवा. ओळखपत्राची एक झेरॉक्स पाठवा. माझा एक मित्र आहे तो तुमचे पैसे वाचवून द्यायचा मार्ग सांगेल.
अभिषेक नाईक नाव आहे त्याचे. एमएनसी मधे आहे कामाला. सध्या चाळीत राहतो. तिथूनच रिअल इस्टेटची कमिशन बेसिस वर कामेही करतो. त्यालाही थोडा आधार होईल. पुण्याचे काम होईल.

हा आयडीसुद्धा माझा नाही
संबंधितांनी दखल घ्यावी >> असे कुणी म्हटले ? मी तरी तसा दावा नाही केला. तसे असते तर तुमचे डिटेल्स कशाला मागितले असते ?
नसतील द्यायचे तर राहू द्यात. मला आपली माणुसकीला जागून मदत कराविशी वाटली.

अहो पस्तीस मिनिटाचे ढेरपोटे आयडी, माझा पत्ता, फोटो, आधार, पासपोर्ट आणि बाकी सगळी कुंडली मागण्याआधी तुमच्या वकील साहेबाना फक्त एकच प्रश्न विचारा ना कि दोनशे चौऱ्याण्णव टेरेसला लागू पडते का म्हणून. येस ऑर नो Happy

> छज्जातील बंडीहीन ढेरपोट्या
>>>

हा आयडीसुद्धा माझा नाही
संबंधितांनी दखल घ्यावी

+७८६ .... हा आयडी माझासुद्धा नाही याचीसुद्धा संबंधितांनी दखल घ्यावी

परिचित साहेब, मी माझा आयडी ढेरपोटा असा ठेवला आहे. तुम्ही का स्वतःवर ओढवून घेतला समजत नाही.
अहो तुमच्यासारख्या फेमस आयडीला पैसे घालवून कायदेशीर सल्ला मिळतो हे माहीत नाही का ? मान्य आहे तुमचे पोस्टर्स जागोजाग लागलेत, सगळे तुम्हाला चेह-याने ओळखतात म्हणून काय वकीलाने तुम्हाला सल्ला फ्री मधे पाठवावा का ?
मला काय, तुमची समस्या खरी असेल तर जेलमधे पाठ तिंबून मिळेल फुकटात. चांगला व्यायाम करा. शरीर शेप मधे आणा.

एक फरक आहे
मी फोटो टाकतो
ते लाजत आहेत >> नाही रे बाबा आता तू तोच असल्याने ते टाकत नाहीयेत. नाहीतर लोंकाना कळेल कि अरे हा तर ऋन्मेष किव्वा चेहरा ब्लर करून टाकतील सुद्धा . आता सुद्धा या परिचितच्या धाग्यावर ऋन्मेष चेच प्रतिसाद जास्त आहेत . किव्वा याला उत्तर दे. त्याला उत्तर दे असं चाललंय . त्यामुळे माझी शंका जास्तच दृढ (कन्फर्म ) होत आहे . स्वताच्याच वेगळ्या आयडीचा धागा वाहता ठेवायचा दुसरं काय ?

Pages