थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.
मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"
मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"
तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"
मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"
"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"
"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"
मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"
मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,
"काय दादा काय झालं?"
मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"
त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,
"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला
आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.
"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"
असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,
"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."
"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.
"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"
"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.
मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."
"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो
अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.
कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.
१) कायद्याने घंटा काही होत ना
१) कायद्याने घंटा काही होत ना ही. कारण दखलपात्र गुन्हा असला तरच पोलीस थेट हस्तक्षेप करू शकतात.
२) सोसायटीच्या सभासदांतील वादविवाद कमिटी/ सभेत सोडवा असे पोलीसच सांगून पिटाळतात.
" मर्डरबिर्डर, घरफोडी यांचा तपास करायचा की असल्या गंजी चड्डीची भांडणं सोडवायची" हे उत्तर मिळेल. शिवाय आताच्या करोना काळात तर कुणीच लक्ष देणार नाही.
३) कित्येक तरुण मुली घरात हाफचड्डीवरच फिरतात ते चालतं का त्याला?
४) तक्रार करणारी बाई/बुवा लुंगिवाल्या उघड्या विक्रेत्याकडून नारळपाणी घेत नाही? किंवा तो आसतो म्हणून चौपाटीवर जातच नाही किंवा इटलीवडेवाला फिरतो त्या रस्त्यावरही जात नाही?
दारात काळे थोबाड घेऊन हा उभा.
दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. ....हे वाचूनच चीड आली.
बाकी मीराचा प्रतिसाद समर्पक आहे.
ह्या निरपयोगी प्रश्नाला इतके
ह्या निरपयोगी प्रश्नाला इतके entertain का केल जातंय? हे समजायला मार्ग नाही. असो!
चालुद्यात!
कार ही खासगी जागा आहे का
कार ही खासगी जागा आहे का
कारण तिथे चाळे केले तर पकडतात आणि गुन्हा पण दाखल केला जाऊ शकतो
टेरेस भले तुमची खासगी आहे पण तिकडे तुम्ही उद्या मी सूर्यस्नान घेतो म्हणलं तर चालेल का?
बघा आगामी धाग्यासाठी विषय सुचवले आहेत
कृपया अजून मनोरंजन करत राहावे
आपण आहात म्हणून जगात देव आहे
त्यालाही इतके प्रश्न कधी पडले नसतील खरे तर
थोडी लांब पॅन्ट/स्पोर्ट वेअर
थोडी लांब पॅन्ट/स्पोर्ट वेअर बनियान किंवा तुमच्या बाल्कनी रेलिंगावर चादर टाकणे असे काही करता येईल.
Submitted by mi_anu on 11 May, 2020 - 18:28
>>> मान्य आहे पण कुणाला घाबरलो म्हणून पडदा लावला असे करणे मनाला पटत नाही.
>>टेरेस हि सार्वजनिक जागा
>>टेरेस हि सार्वजनिक जागा नाही असा माझा मुद्दा आहे तर तो मनुष्य मला सार्वजनिक जागेचे कलम लाऊ पाहत होता/पाहतोय.<<
असु शकेल. सोसायटिच्या सेक्रेटरीला (किंवा एखाद्या वकिलाला) विचारुन खात्री करुन घ्या. भारतातल्या हाउसिंग सोसायट्या आणि इथल्या एचओएज यांच्या सूरस कथा वाचुन थक्क व्हाल. बेटर बी सेफ दॅन सॉरी...
तुम्ही ते कोल्हापुरात लॉज
तुम्ही ते कोल्हापुरात लॉज बुकिंग वाले का हो? तेच आहात. एक झकास सविस्तर उत्तर देतो तुम्हाला लवकरच.
दारात काळे थोबाड घेऊन हा उभा.
दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. ....हे वाचूनच चीड आली.
बाकी मीराचा प्रतिसाद समर्पक आहे.
Submitted by देवकी on 11 May, 2020 - 19:08
>>> कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो कि इथे काळे हा शब्द वर्णवाचक नाही. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या भावांना उद्देश्यून आहे.
तुम्ही ते कोल्हापुरात लॉज
तुम्ही ते कोल्हापुरात लॉज बुकिंग वाले का हो? तेच आहात. एक झकास सविस्तर उत्तर देतो तुम्हाला लवकरच.
Submitted by अलहमदुलिल्लाह on 11 May, 2020 - 19:12
>>> अहो घाबरवू नका प्लीज आधीच मी तणावात आहे. सविस्तर उत्तर द्या ज्यात मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे असतील.
Submitted by Srd on 11 May,
Submitted by Srd on 11 May, 2020 - 19:08
>>> आपल्या प्रतिसादामुळे थोडासा दिलासा मिळालाय. धन्यवाद.
तुमचे कपडे खेळांच्या कमिटीने
तुमचे कपडे खेळांच्या कमिटीने घालून दिलेल्या मापदंडा प्रमाणे असतील तर ऑलिंपिक किंवा कॉमनवेल्थ खेळाचे विडिओज (जे पब्लिक समोरच होतात) त्यांना दाखवू शकता. शॉर्ट्स आणि बनियन/जर्सी जो साधारण कुठल्याही ट्रॅक अँड फील्डचा जनरल पोषाख असतो.
फारच घाबरट आहात बुवा तुम्ही.
फारच घाबरट आहात बुवा तुम्ही.
इतकी पुचाट चर्चा गेल्या दहा
इतकी पुचाट चर्चा गेल्या दहा हजार वर्षात कधी झाली नाही.
कोण अंगजोरावर मुजोरी करत असेल
कोण अंगजोरावर मुजोरी करत असेल तर आपण नाही घाबरत. पण कायद्याला मी जाम घाबरतो. कायद्यानुसार गुन्हा असेल तर तिथे काहीच करता येत नाही
बनियन आणि शाॅर्ट असेल तर हरकत
बनियन आणि शाॅर्ट असेल तर हरकत नसावी..
माझ्या अनुभवावरून सांगतो.. आमच्या हाॅलच्या बाल्कनीसमोर एक बिल्डींग आहे त्यांना पण आमच्यासारखीच बाल्कनी आहे.. सकाळी घरात छान उन्हे यावीत म्हणून स्लाईड उघडतो तर समोर उघडाबंब भैया बालो की दुकान लेके उभा असतो... बरं तो नुसता उभा असला असता तरी काहीच फरक पडला नसता पण तो माकडासारखा कुठेही खाजवत बसलेला असतो. आता सकाळ सकाळ असला सिन बघण्याची कुणाचीच इच्छा नसणार.. मला प्रचंड इरिटेड होतं...मी हाॅलची स्लाईडींगच उघडायची बंद केली आहे ..
तुमच्या केसमध्ये असं असेल तर मग त्या नेत्याचं बरोबर आहे ..
तुमच्यावर भाळलेल्या यच्चयावत
तुमच्यावर भाळलेल्या यच्चयावत मुलींनी मिळून तुमच्याविरुद्ध रचलेले हे कुभांड असण्याची शक्यता वाटते मला तरी. तास दोनतास "फ्ल्याट" जाऊनदेखील जिला तुम्ही काहीच केले नाही ती डेस्कटॉप प्रिंटर सेटअपवाली मुलगी आठवते का? तर गाऊनवाली मैत्रीण आणि ती डेस्कटॉप प्रिंटर एकमेकींच्या छुप्या मैत्रिणी होत्या. डेस्कटॉप प्रिंटरने गाऊनला चॅलेंज केलेलं, याला पटवून दाखव, पण अंघोळ करून गाऊन घातलेल्या मुलीला पाहून तुमच्या भावना चाळऊन जायला तुम्ही काय ते विबासंवाले आहात कि काय? अरे हाट, सिच्युएशन होती गंभीर, पण भाऊ पडले खंबीर. साहजिकच तुम्ही पटला नाहीत म्हणून ती गाऊन तुमच्यावर चिडून होतीच. तिच्याकडे तुमची एक जुनियर नोट्स मागायला गेली असता गाऊनने तुमचे वर्णन जुनियरला ऐकवले. जुनियर त्या वर्णनावरच भाळली, तिने तुमचा तपास केला आणि पासआउट झाल्याबरोबर जीवाचा आटापिटा करून तुमच्याच कंपनीत नोकरी धरली. जुनियरच्या रडार वर तुम्ही असलात तरी कोणता डाव टाकावा हे तिला काही कळत नव्हतं. पण इथं तुमचा भोळेपणा तिच्या कमी आला. मनात कोणताही वेगळा विचार न ठेवता तुम्ही तिला जेवायला आणि नंतरहुन लॉन्ग ड्राइव्हला विचारलत. लॉन्ग ड्राइव्ह वर असताना तुम्ही अगदी निरपेक्ष पद्धतीने एक जोक सांगितलं ज्यावर चावट कमेंट करून तिने तुम्हाला इशारा केला, पण तुम्ही थोडेच एवढ्याने ढळणार होतात? तुम्ही शिताफीने विषय बदलला खरा, पण ती जुनियर मात्र खट्टू झालीच, इतकी कि तुम्हाला बाय सुद्धा म्हणाली नाही. नंतर तुम्ही कंपनी बदलली, पण तुम्हाला स्टॉक करणाऱ्या त्या जुनियरने मात्र तुमच्या नव्या कंपनीत एक मैत्रीण शोधली, जी तुमची जुनीच कलीग होती. जुनियरने तुमची सुपारी जुनी कलीगला दिली. जुनी कलीग तर तुम्ही म्हटला तसे वरिष्ठांशी संबंध ठेवलेली असल्याने तुमच्याबद्दल ऐकताच तिच्याही तोंडाला पाणी सुटले.. इकडचं तिकडचं चाट करता करता तिने तुम्हाला एक दिवस लिफ्ट मध्ये चक्क जर्किन उतरून दाखवला, पण एवढ्याने तुमच्यात मद थोडाच शिरणार होता, तिच्याही सौंदर्याचा माज मात्र तुम्ही उतरवला. परिणामी जुनी कलीग देखील रागावली. (इथपर्यंतचा संदर्भ: https://www.maayboli.com/node/68373). क्रमशः
ज्यांना हा धागा व चर्चा गंभीर
ज्यांना हा धागा व चर्चा गंभीर वाटत नाही त्यांनी माझ्या ठिकाणी राहून एकदा विचार करावा. माझे फोटो चोरून काढून कोणीतरी ते माझ्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी वापरण्याची धमकी दिली आहे. हि टांगती तलवार कायमच राहणार आहे. हा गुन्हा नसेल तर उत्तमच. पण असेल तर तो ध्यानीमनी नसताना माझ्याकडून झाला आहे
मी त्रयस्थपणे या प्रकरणाचा
मी त्रयस्थपणे या प्रकरणाचा विचार केला. जसा तुमच्या टेरेसचा तुम्ही वाटेल तेंव्हा उपयोग करू शकता, असाच त्या स्त्रीच्या बाल्कनीचा तीही कधीही उपयोग करू शकते. तुम्ही व्यायाम करताना जसं तिनं तिथं येऊन पाहणं अपेक्षित नाही, तसं ती तिथं आली असताना / येण्याची शक्यता असताना तुम्हीही कमी कपड्यात तिच्यासमोर जाणं अपेक्षित नाही. तुमची बाजू खरी असली तरी अशा प्रकरणात स्त्रीला झुकतं माप मिळतं.
“माझी बाल्कनी या माणसाच्या टेरेससमोर आहे. मी समोर आहे हे दिसत असूनसुद्धा हा माणूस अर्धनग्नावस्थेत बाल्कनीत येतो.” ही बाईची तक्रार साहजिकच कोणालाही पटेल अशी आहे. तुम्ही सात्विक असाल, पण जग तसं पाहिजे ना! अशा परिस्थितीत तुम्ही तुमची बाजू योग्य आहे म्हणून लावून धरलीत तरी लोकांना पटणार नाही. समजा त्या बाईनं पोलीस स्टेशन गाठलं, तर शक्यतो पोलीस तक्रार लगेच घेणार नाहीत, पण तिनं लावून धरलं, तर २९४ नाही लागणार. पण पोलीस ५०९ अंतर्गत तक्रार दाखल करुन घेऊ शकतात. अर्थात दोन्ही गुन्हे जामीनपात्र असले तरी दखलपात्रसुद्धा आहेत. पोलीसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. तुम्ही भले केस जिंकाल, पण तोपर्यंत पोलीस स्टेशनला हेलपाटे, कोर्टाच्या फे-या यामुळं आपल्यासारख्या साधारण माणसाला अतिशय मानसिक त्रास होतो. शिवाय तुमच्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळाच होईल.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो माणूस गुंड प्रवृत्तीचा आहे. तो तुम्हाला या ना त्या कारणानं त्रास देत राहील. त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. अशा वेळी तुमच्यासोबत सा-या प्रसंगी उभं राहून सडेतोड उत्तर द्यायला किती लोक उभे राहतील?
मला वाटतं यात माध्यम मार्ग स्वीकारणं उत्तम.
एकतर तुम्ही पहाटेच व्यायाम करून टाका, उजाडायच्या आधी. किंवा टेरेसला समोर ग्रीन नेट वगैरे लावून घ्या, जेणेकरून समोर कोणाला तुम्ही दिसणार नाही.
>>>>मान्य आहे पण कुणाला घाबरलो म्हणून पडदा लावला असे करणे मनाला पटत नाही>>>>
तुम्ही कोणाला घाबरु नका, पण ती बाई तुम्हाला दिसू नये म्हणून पडदा लावा.
सगळ्यात महत्वाचं, कोणताही कायदेशीर सल्ला जालावर शोधू नका.
Submitted by अलहमदुलिल्लाह on
Submitted by अलहमदुलिल्लाह on 11 May, 2020 - 19:43
>>> अरे देवा... आता त्या जुन्या आठवणी इथे का काढत आहात? ह्या विषयाशी काय संबंध त्याचा?
होतोय त्यांचा टाईमपास तर होऊ
होतोय त्यांचा टाईमपास तर होऊ दे की हो
मला काय कळेनाच झालंय मायबोली करांचं
कुठले विषय गंभीरपणे घ्यावेत हेही लॉक डाऊन मध्ये लक्षात येणार नसेल तर सखोल चिंतनाची गरज आहे
अभिषेक तुझे सुदैव की हे फार
अभिषेक तुझे सुदैव की हे फार ऍक्टिव्ह नसतात इथे
यांच्या अद्भुत प्रश्नांच्या पूढे तुझे हातरुमाल कुठला घ्यावा आणि बड्डे कसा साजरा करावा अगदीच मामुली वाटू लागलेत
नवाजुद्दीन च्या समोर शाहरुख वाटतो तसा
@ आशुचँप - लेखनशैली आणि उलट
@ आशुचँप - लेखनशैली आणि उलट सुलट कसेही विषय फिरवायची हातोटी बघूनतरी तुम्हाला कळायला हवं होतं, गंगाधरही शक्तिमान है!
मला तर लै डेजा वू फिलिंग येतेय.
परिचित तुम्ही मायबोलीवरचे
परिचित तुम्ही मायबोलीवरचे सलमान आहात... जिथे बाकीचे लोक मेहनत करून धागे फुलवत असतात.. प्रतिसादासाठी धागे वर आणत असतात... तुम्ही येता एक ब्लॉकबस्टर देऊन जाता...
तुफान गर्दी होते... प्रतिसादांचा सुळसुळाट असतो तुमच्या धाग्यावर....
> पण पोलीस ५०९ अंतर्गत तक्रार
> पण पोलीस ५०९ अंतर्गत तक्रार दाखल करुन घेऊ शकतात. अर्थात दोन्ही गुन्हे जामीनपात्र असले तरी दखलपात्रसुद्धा आहेत. पोलीसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
>>> तो काय मला ५०९ लावतोय. त्याचेच बाईशी बेकायदा संबंध उघडकीस येतील. पोलीस त्याला विचारतील ती तुमची कोण. आणि तसेही ५०९ लागू शकत नाही. मी तिला उद्देशून कोणतेही हातवारे अथवा इशारे केले नाहीयेत. तसेही, मी बाल्कनीत कमी कपड्यात व्यायाम करण्याची समस्या तिला नाहीच आहे. ह्याला आहे. म्हणून तो मला २९४ ची धमकी देऊन गेलाय. हुशार आहे तो तसा.
आता हि जी जुनी कलीग होती,
आता हि जी जुनी कलीग होती, तिने एकदोनदा तुमच्या डेस्कटॉपवर नजर मारली असता तुम्ही मायबोलीवर लिहिता असे तिला समजले. मग तिनेही मायबोलीवर अकाउंट सुरु केले. चाट वगैरे केल्यावर तिच्याशी बोलणे तुम्हाला आवडले आणि परिणामी तुम्ही तिला रेस्टोरंट ला भेटायचे ठरवले खरे, पण आता जुनी कलीग तुमच्यासमोर येईल कशी? मग तिने तिच्या एका मैत्रिणीला तुम्हाला भेटायला पाठवले. तुम्हाला मायबोलीकर म्हणून भेटलेली व्यक्ती मात्र तुम्हाला आवडली असावी, आणि तसे इशारे तुमच्याकडून गेल्याने यावेळी तिने तुम्हाला खट्टू केले, अगदी नंबर इमेल वगैरे बंद करून टाकले तिने. पण तुम्हाला तर तिच्याशी बोलायचे होते म्हणून मायबोलीवर परिचित आयडीचा जन्म झाला. (संदर्भ: https://www.maayboli.com/node/66387), आणि इथेच पणवती लागली बघा. तर झालं असं कि पुढं तुम्ही तुमच्या एका मित्रांसोबत कसल्याशा कामाने एका शिक्षण संस्थेत गेलात, तिथे गबाळ्या अवतारात असूनदेखील तिथली रिसेप्शनिस्ट मात्र तुमच्यावर फुल्ल फिदा झाली, तिच्या गळ्यातल्या मंगळसुत्रचा देखील तिला विसर पडला. ती तुमच्यावर इतकी फिदा झाली कि तुमचा त्या कामाशी काहीही संबंध नसताना ती तुमच्यात उतरत गेली. तुमच्याच डोळ्यात पाहून तुम्हालाच बाय बाय म्हटली. एव्हाना इतक्या सुंदर मुलींच्या इशाऱ्यांना फाट्यावर मारून तुम्ही वैतागला होतात, पण हिने मात्र बाजी मारली. (संदर्भ: https://www.maayboli.com/node/69843). सावकाश काही दिवस तुम्ही झुरलात खरे पण काही दिवसांनी ते घडलंच. काहीतरी कारणाने तुम्ही कोल्हापूर सॉरी, आपलं लांडगापूरात ऑफिसच्या कामाने असताना, तीच रिसेप्शनिस्ट तुम्हाला तिथं भेटली. आंखोहि आँखमे इशारा हुआ आणि तुम्ही लॉजचा रस्ता धरला तिथे काय घडलं ते तुम्ही धाग्यात लिहिलंयच कि. (https://www.maayboli.com/node/67847). एव्हाना हॉटेल बाहेरच्या गर्दीत ५०० रुपयांसाठी तुम्ही चालवलेला राडा पाहून रिसेप्शनिस्ट पळून तर गेलीच, पण तुमच्यावर भयंकर रागावली सुद्धा. त्या रिसेप्शनिस्टचीच मैत्रीण तुमच्या बाल्कनीसमोरच्या फ्लॅट मध्ये राहते. तुमचे आकर्षक पिळदार शरीर पाहून तिचा तोल चालायला लागला तसा तिच्यावर लाईन मारणारा संस्कृतीरक्षक जागा झाला. त्याला तुम्ही फाट्यावर मारलेल्या यच्चयावत मुली येऊन भेटल्या. तुमच्यावरची असूया अधिकच वाढून तुम्हाला हि धमकी मिळाली आहे. म्हणून, निवांत राहा
Submitted by अलहमदुलिल्लाह on
Submitted by अलहमदुलिल्लाह on 11 May, 2020 - 20:10
>>> मी आपला आजपासून चाहता झालो आहे. थोडे टेन्शन हलके झाले आपले प्रतिसाद वाचून. जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या. अगदी खरे सांगायचे तर मायबोलीवरील भेटलेल्या "त्या व्यक्तीच्या" प्रतीक्षेत मी अजूनही आहे. मला नक्की खात्री आहे कि ती हे सगळे धागे वाचत असणार आहे. फक्त एकच सांगणे आहे कि त्यांनी मला पुन्हा भेटावे फक्त एकदाच.
नवीन Submitted by
नवीन Submitted by अलहमदुलिल्लाह on 11 May, 2020 - 20:10
तुम्ही पुरातत्व खात्यात असता काय हो
खतरनाक उत्खनन केलंय पार यांचं
धमाल आली
अद्यातवासी
खांब्यात आहे खंब्यात नाही)
- असूही शकतो तो किंवा नसुही शकतो
आजकाल मी तर इतका अभिषेक मय झालोय की खांबा खांबात
(कृपया नीट वाचावे
मला तोच दिसू लागला आहे
कधी कधी वाटतं अभिषेक ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे
चराचरात पसरलेली
तरल अशी, तगडा स्टॉक मिळवून त्याचा कश मारल्यावर कसे वाटते तसे मला आजकाल त्याचे धागे वाचताना फिल येतो
हे गृहस्थ पण अदभूत आहेत
याना मी उपमा देईन ओल्ड मॉंक ची
अस्सल माल, भेसळ नाही
मनोरंजन होण्याची एकशे एक टक्के खात्री
कधीच निराशा नाही:)
> पण तुमच्यावर भयंकर रागावली
> पण तुमच्यावर भयंकर रागावली सुद्धा. त्या रिसेप्शनिस्टचीच मैत्रीण तुमच्या बाल्कनीसमोरच्या फ्लॅट मध्ये राहते.
>>> मला शंका होतीच कि तुम्ही हि लिंक जोडणार
ओल्ड मॉंक .... आह आशुचॅम्प ..
ओल्ड मॉंक .... आह आशुचॅम्प ... हॉस्टेल जीवनाची आठवण करून दिलीत...
ती ओल्ड मॉंक ... मॅग्गी... आणि मुझे नौलखा मंगा दे रे गाणे ऑडिओ रिपीट मोड वर ....
प्रतिसाद वाचणाऱ्या ज्यांना कळेल हे गाणे का इतके महत्वाचे आहे... उसने जी है जिंदगी.... माहोल बनवलात...
>>हे गृहस्थ पण अदभूत आहेत<<
>>हे गृहस्थ पण अदभूत आहेत<<
आणि सच्चे आहेत. यांचे प्रश्न बाळबोध असले तरीहि जेन्युइन असतात. (
इथे माझा अभ्यास कदाचित कमी पडत असेल)यांच्या समस्या आणि प्रतिसाद वाचुन माबोवरचेच एक इनसंट व्यक्तिमत्व आठवते. हो तेच, ज्यांनी अकबराला पुनःप्रसिद्धी प्राप्त करुन दिली होती...
Pages