आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?

Submitted by Parichit on 11 May, 2020 - 04:52

थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.

मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"

मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"

तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"

मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"

"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"

"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"

मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"

मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,

"काय दादा काय झालं?"

मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"

त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,

"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला

आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.

"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"

असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,

"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."

"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.

"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"

"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.

मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."

"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो

अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.

कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर बहुतेक तिसरा किंवा चौथा प्रतिसाद....

आधी खूप चांगलं वाटायचं मायबोली वाचायला... प्रतिसाद पण हलके फुलके पण विषयाला धरून... आतापर्यंत मायबोलीवरचे बरेच वाचनीय लिंक्स माझ्या मित्रांना आणि घरातीलच young members ना forward केलेत...

पण काहीही म्हणा... अलीकडे मायबोलीचा दर्जा खूप घसरत चाललाय... सगळीकडे du-ID वाले भरलेत... कोणाचाही कुठेही कंट्रोल नाही...

आता ह्या धाग्यामध्येच... जर समझा कोणाचा same genuine प्रॉब्लेम असला तर त्याला योग्य सल्ला मिळणे दूरच... काही ID चे लिखाण, प्रतिसाद आधी आवडायचे.. आता IRRITATE होतात...

बहुतेक मायबोली BOARDला पण असंच काहीतरी अपेक्षित असेल... त्यामुळे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असं वाटतं...

(मला वादविवाद करता येत नाहीत... पण एक PRINCIPLE मी मानतो... सगळे आपआपल्या जागी बरोबरच असतात)

वाटशोधे तुम्ही क्विक आहात हे मान्य करावेच लागेल पण विचार करा मी इतका वेळ प्रतिसाद संपादित का केला नसावा 
चाल आपकी थी पर प्लॅन मेरा था .

Submitted by कटप्पा on 13 May, 2020 - 20:26

>>>>>

मला कल्पना नव्हती तो तुमचा प्लॅन होता. सांगितल्या बद्दल शतशः धन्यवाद. आणी माझी चाल वगैरे काही नव्हती हो, उगाचच वेगळा रंग देऊ नका. स्वतः स्वतःचा डू आयडी तेही एकाच लॉगीन ने कसा होऊ शकतो ही उत्सुकता होती. जमल्यास उत्तर द्या.

टेरेस जरी तुमचं असलं तरी वापरायला सार्वजनिक नियम असतात.
उदा. अमेरिकेत तुम्ही स्वतःच्या टेरेसवर कपडे वाळू घालू शकत नाही.

असला युक्तीवाद वापरून तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. नाही झाली तरी प्रचंड मनःस्ताप नक्की.

इथे एका सकाळने तुमची इतकी चरफड होतेय Biggrin

Pages