थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.
मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"
मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"
तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"
मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"
"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"
"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"
मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"
मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,
"काय दादा काय झालं?"
मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"
त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,
"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला
आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.
"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"
असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,
"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."
"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.
"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"
"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.
मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."
"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो
अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.
कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.
अलहमदुलिल्लाह, दंडवत घ्या _/\
अलहमदुलिल्लाह, दंडवत घ्या _/\_
कोणाला काही बोलुद्या पण आपले परिचित मात्र एकदम "प्लेयर" आहेत
नाही हो... ते आईने अकबरी वाले
नाही हो... ते आईने अकबरी वाले अमेरिकेत आहेत ना...
धन्यवाद! हे सर्व प्रतिसाद
धन्यवाद! हे सर्व प्रतिसाद एकत्र गुंफून, "परिचित यांचे हसीन सपने" किंवा, "परिचित यांचे रंगीत आयुष्य" नावाचा धागा काढायची इच्छा आहे. पोल घेऊयात. नेहमी सारखे +१ ने करा
उदा: हसीन सपने +१ किंवा रंगीत आयुष्य+१, पुरेशी मते पडली कि निकाल जाहीर करूयात!
इथल्या काही लोकांनी (त्यात मी
इथल्या काही लोकांनी (त्यात मी पण आहे, खरं बोलायला कशाला लाजा) त्यांना खूप 'हर्ट' केलं त्यामुळे ते गेले मायबोली सोडून
काश असेच अनेक आयडी असते तर
परिचित की हसीन दुनिया
परिचित की हसीन दुनिया
कसं वाटेल?
बघा आगामी धाग्यासाठी विषय
बघा आगामी धाग्यासाठी विषय सुचवले आहेत
आशुचँप, तुम्ही काय नव्नवीन विषय पुरवायचे "गांडीव" उचलले आहे काय सध्या ? :))
तुम्ही कोणाला घाबरु नका, पण ती बाई तुम्हाला दिसू नये म्हणून पडदा लावा.
अरिष्टनेमी, त्या बाईने नंतर तक्रार नको करायला की समोरचा माणुस "हिरवट" दिसतोय.
कोणाच्या परवानगीवीना असे
कोणाच्या परवानगीवीना असे कुठल्याही व्यक्ति/प्रॉपर्टीचे फोटो काढणे हाच मुळी कायद्याचा भंग आहे त्यमुळे अर्धी केस तर ऑलरेडी परिचित ह्यांच्याच पक्षात आहे ह्याचीही नोंद घ्यायला हवीय
अहो हे भले लोकं आपल्या
अहो हे भले लोकं आपल्या मनोरंजनासाठी इतके कष्ट करतात
तर आपण त्यांच्या टोपलीला हात का लावू नये
नुकताच श्यामची आई बघितल्याचा परिणाम
नुकताच श्यामची आई बघितल्याचा
नुकताच श्यामची आई बघितल्याचा परिणाम Happy
देवा... काय हे !!! असो प्रत्यंचा जोडायला मदत हवी असल्यास सांगा :))
प्रत्यंचा म्हणजे काय ??
प्रत्यंचा म्हणजे काय ??
प्रत्यंचा म्हणजे काय ??
प्रत्यंचा म्हणजे काय ??
काय बहारदार आयुष्य आहे हो या
काय बहारदार आयुष्य आहे हो या परिचित माणसाचे. रच्याकने, अलहमदुलिल्लाह यांचे प्रतिसाद वाचून एक शंका येतेय, तुमच्या प्रश्नाइतकीच जेन्युईन आहे, आशा आहे गैरसमज करून घेणार नाही तुम्ही.
तर, इतक्या मुलींनी इशारे देऊनही तुम्ह तटस्थ कसे राहू शकलात? मनाचा निग्रह कि अजून काही प्रॉब्लेम आहे?
याना मी उपमा देईन ओल्ड मॉंक
याना मी उपमा देईन ओल्ड मॉंक ची>> कृपया परिचित सरांच्या समस्येबद्दलच बोला. धागा भरकटु देऊ नका.
ओल्ड मॉंकचा उल्लेख नका हो करू
ओल्ड मॉंकचा उल्लेख नका हो करू.. कोरी पिऊन जळणार नाही इतका जीव जळतोय सध्या!
त्यांची समस्या नक्की काय आहे
त्यांची समस्या नक्की काय आहे ते आधी समजू द्या
(टेरेस, कपडे या फिर सामने वाली खिडकी )
बाबुराव आपटे च्या आवाजात वाचावे ही नम्र धमकी
देवा रे मायबोलीवर मराठी
देवा रे मायबोलीवर मराठी शब्दांचे अर्थ सांगावे लागतील असे कधी वाटले नव्हते
अक्षय भाऊ प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला जी दोरी लावलेली असते, जी ताणून बाण मारतात ती प्रत्यंचा
अलहमदुलिल्लाहजी तुमचा अभ्यास
अलहमदुलिल्लाहजी तुमचा अभ्यास कमी पडला. वकीलीण बाई राहिल्या की.
कपडे ही स्वतःची चॉईस असावी
कपडे ही स्वतःची चॉईस असावी त्या बद्द्ल बाकी कोणी मत व्यक्त करू नये किंवा बंधन घालू नये हे योग्य जरी असलं तरी.
मुळात कपडे परिधान का करावीत ह्या उध्येशाच्या विरूद्ध आहे.
नागडे फिरणे का वाईट किंवा असंस्कृत आहे.
कशाला हवी कपडे.
तर त्याची उत्तरं काय असतील .
आणि त्या उत्तरचे समर्थन कपडे हा स्वतः चा चॉईस आहे असे म्हणणारे कसे करतील.
का कोलांटी उडी मारून निती मत्ता शिकावतील
तो गुंड मायबोलीवरती असला
तो गुंड मायबोलीवरती असला म्हणजे???कवि बिवी असला म्हणजे??? त्याला कळेल ना.
तो गुंड मायबोलीवरती असला
तो गुंड मायबोलीवरती असला म्हणजे???कवि बिवी असला म्हणजे??
>>
अहो नका हो घाबरवु त्यांना.
मुझे नौलखा मंगा दे रे गाणे
मुझे नौलखा मंगा दे रे गाणे ऑडिओ रिपीट मोड वर ....>> मैफिलीतलं ठरलेलं गाणं.. लोग कहते है पासून तर सगळेच मोठ्या आवाजात सामील व्हायचो! वकिलीण बाई कोणत्या धाग्यात आहेत? माझं पण सुटलंय बहुतेक
हॉटेल्मध्ये राडा,
हॉटेल्मध्ये राडा,
डीडी ची केस, आता हे उपद्व्याप , पोलिस तुम्हाला आता ओळखु लागले असतिल.
वकिलीण बाई कोणत्या धाग्यात
वकिलीण बाई कोणत्या धाग्यात आहेत? माझं पण सुटलंय बहुतेक
Submitted by अलहमदुलिल्लाह >>
सरांचा "ड्रींक ड्राइव्ह" धागा वाचा.
सर तुम्ही अंतरवासना वेबसाईटवर
सर तुम्ही अंतरवासना वेबसाईटवर लिहिता का? लिहीत नसल्यास लिहायला लागा. खुप स्कोप आहे.
मेरा नाम परिचित है, मैं पुणे का रहनेवाला हूं. मेरा कद 6 फूट 4 इंच वगैरे वगैरे...
इतक्या सगळ्या भूतकाळाची एकदम
इतक्या सगळ्या भूतकाळाची एकदम एकाच ठिकाणी आठवण निघाली. मन भूतकाळात गेले आहे माझे. वो भी क्या दिन थे भाई. एक शेर अर्ज है...
खुदा किसीको किसीपर फ़िदा ना करे
फ़िदा करे तो कयामत तक जुदा ना करे
माना के जुदाई में मर नहीं जाते लोग
पर तनहाई में जी भी नहीं पाते लोग
ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ चली आयी.
अजिंक्यराव, डेंजर माणूस आहे राव तुम्ही
परिचित तुम्ही एक सच्चे इंसान
परिचित तुम्ही एक सच्चे इंसान वाटता.
का?
अजिंक्यराव, डेंजर माणूस आहे राव तुम्ही>> का?
अभिषेक तुझे सुदैव की हे फार
अभिषेक तुझे सुदैव की हे फार ऍक्टिव्ह नसतात इथे
यांच्या अद्भुत प्रश्नांच्या पूढे तुझे हातरुमाल कुठला घ्यावा आणि बड्डे कसा साजरा करावा अगदीच मामुली वाटू लागलेत
नवाजुद्दीन च्या समोर शाहरुख वाटतो तसा Happy
Submitted by आशुचँप on 11 May, 2020 - 19:57
>>>>>>
पण हे मीच कश्यावरून नाही?
@ आशुचँप - लेखनशैली आणि उलट
@ आशुचँप - लेखनशैली आणि उलट सुलट कसेही विषय फिरवायची हातोटी बघूनतरी तुम्हाला कळायला हवं होतं, गंगाधरही शक्तिमान है! Happy
मला तर लै डेजा वू फिलिंग येतेय.
Submitted by अज्ञातवासी on 11 May, 2020 - 19:58
>>>
घ्या यनी तर ओळखले
आजकाल मी तर इतका अभिषेक मय
असूही शकतो तो किंवा नसुही शकतो
आजकाल मी तर इतका अभिषेक मय झालोय की खांबा खांबात
(कृपया नीट वाचावे Happy खांब्यात आहे खंब्यात नाही)
मला तोच दिसू लागला आहे
कधी कधी वाटतं अभिषेक ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे
चराचरात पसरलेली
>>>.
धम्यवाद
पण मी.हे नाहीये
आता मी ठरवले आहे की लोकांना आलेली.शंका तात्काळ दूर करायची
Pages