माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, मी टाकली होती पण काहीतरी गडबड झाली आणि ते आलेच नाही. आता संपादन करता येत नाहीये.
अ‍ॅडमिन, प्लीज दुरुस्ती कराल का?

विक्रम यांच्या भाकरीच्या पोस्ट्साठि :
गावरान चव, युट्युब चॅनल वर व्हिडिओ आहे तो पहा विक्रम पारंपारिक पद्धतीने भाकरीचा.
पण पीठ उकडुन लाटुन भाकरी अगदी चांगली जमते. सोपी पण आहे करायला. व्हिडिओ मिळतो का बघते.

भाकरी जमल्या कि नाही विक्रमसिंह ना? रिझल्ट लिहा ना. >> काल फसल्यावर पोस्ट लिहिली होती. आता उद्या परत करणार आहे. मग फोटो टाकीन. (आज जरा चोरून वॉच अँड इम्प्रूव पण केले. Happy )

धन्यवाद मंडळींनो,
तुमच्या सूचनांचा वापर करून तीन भाकर्‍या केल्या. आज थापताना काहिही अडचण आली नाही. चिकटली नाही. वरील टीपा उपयोगी पडल्या. तीन थापल्या .सुंदर गोजिरवाण्या दिसत होत्या. Happy म्हणजे ही क्रिया सेट झाली. तज्ञ मंडळींनी माझी येथे वाचून केलेली एक चमचा कणीक मिसळायची सूचना धुडकाउन लावली.
१. पहिली भाकरी जरा कच्ची राहिली. किती वेळ ठेवायची यासाठी १५ आकडे मोजले. पण ते खूप फास्ट मोजले बहुतेक. नंतर गॅस वर भाजून थोडीफार सुधारणा झाली.
२. दुसरी भाकरी सर्वार्थाने मस्त झाली. फुगली वगैरे.. जळली नाही की तुटली नाही.
३. तिसरी तव्यावर टाकल्यावर लक्षात आले की पिठाची बाजू खाली गेली आहे. मग तशीच उलटी करताना तुटली. मी त्याचा परत गोळा करऊन नविन थापणार होतो पण तज्ञ मंडळींनी मधेच नाक खुपसून (जेवायला उशीर होत असल्याने) तव्यावरच जोडून दिली व तीही छान झाली.
फक्त एका वेळेस एकाच भाकरीची प्रक्रिया केल्याने थोडा उशीर झाला. ते टेक्निक आता जमवायला पाहिजे. म्हणजे एक भाजताना दुसरी थापणे , वगैरे
आता करू शकेन. धन्यवाद. Happy Happy

भाकरी बरोबरच बेसन टाकून अंडाकरी केली. (यु ट्युब वर बघुन.) पाणि कमी पडल्यामुळे घट्ट झाली. पण चांगली झाली.

खूप उशीर झाला, तसेच पसारा झाला, गॅस बराच वाया गेला, चिकट हात सगळीकडे लागले. त्यामुळे तज्ञ मंडळींचे टोमणे ऐकावे लागले. (सासू सुनेच्या संवादाची झलक मिळाली.) . माझ्या आईच्या हातची चव आली नाही हेही ऐकायला मिळाले. Happy (हा समस्त नवरे मंडळींना मारलेला होता. )

तिसरी तव्यावर टाकल्यावर लक्षात आले की पिठाची बाजू खाली गेली आहे. मग तशीच उलटी करताना तुटली. मी त्याचा परत गोळा करऊन नविन थापणार होतो पण >>> Lol डोळ्यासमोरच आली तुमची खटपट!
तरी पण फायनली भाकर्‍या जमल्याबद्दल अभिनंदन! Happy

दही संपलेले असल्याने नविन दही लावताना मी स्वतःच दूधात लिंबू पिळून विरजण लावले पण आता दही नीट बनत नाहीए. दह्यात पाणी खूप जमतं आणि दह्यात बुडबुडे पण आलेले असतात. काल श्रीखंड बनवण्यासाठी पाऊण लिटर दुधाला विरजण लावलं तर फक्त अर्धी वाटी श्रीखंड बनलं.
माकाचू???

विक्रमसिंह, Lol तज्ञ मंडळींना आयती भाकरी मिळाल्याचा आनंद नाही झाला का?
नेक्स्ट टाईम तुम्ही ती मंडळी यायच्या आधीच चमचाभर कणीक मिसळून ठेवा.

विक्रमसिंह, मस्त!
मानले तुम्हाला.बाकी सायो म्हणतात तसा आयती भाकरी मिळाल्याचा आनंद नाही का झाला?

विक्रम, मस्त.असंच 7 दिवस करा.एकदम सराईत भाकऱ्या थापाल.
(अवांतर: माझा 15 आकड्यांचा फंडा बरोबर आहे.तुमची चूल फॉरीन ची कुकिंग रेंज असणार.आमची गणितं गरीब भारतीय गॅस धारक घरांची ☺️☺️तुम्ही आकडे तुमच्या कुकिंग रेंज च्या उष्णतेनुसार कमी जास्त करून घ्या.)

विक्रम सिंह् अनेक अभिनंदन. आखिर पुणे का आदमी है हार कभी नही मानेगा. फिर भाकरी क्या चीज है.

मला करुन बघावे असे सुधा वाटत नाही कारण घरी ग्यासच नाही. आई बाकी मस्त करायची.

अरे वा वा विक्रमसिंह, नावाला जागलात की, सराइतपणे भाकरी करण्याचा विक्रम केलात तज्ञ मंडळींच्या जाचाला न घाबरता Lol मै म्हणतेय तशी डोळ्यासमोर आली तुमची खटपट.

@विक्रमसिंह, भाकऱ्यांच्या यशस्वी प्रयोगासाठी अभिनंदन!
@किट्टू२१, लिंबू वापरून दूध विरजतात हे माहीत नव्हतं.
साधारणतः दुधात पाण्याचा अंश जास्त असल्यावर दह्यात जास्त पाणी असतं. तरीही पाऊण लिटर दुधाचे अर्धा वाटी श्रीखंड म्हणजे खूपच कमी झालं. दूध गाईचं नाही ना?

जबरदस्त प्रयत्न विक्रमसिंह. अभिनंदन एकदाची भाकरी जमली. Happy
किट्टू२१, लिंबु लावून विरजण पहिल्यांदाच ऐकल. लाल मिरची वापरून लावता येत पण लिंबु पिळुन पनीर नाही का होणार?

धन्यवाद मंडळींनो. सराव करीनच. पण खूप ब्रॅगिंग राईटस मिळाले.
तज्ञ मंडळींना आनंद झालाच असेल. पण व्यवस्थित आवरल्यावर चेहर्‍यावर दिसेल अस वाटतय. पण कौतुक आहे.
आमच्या भगिनीमंडळाने मात्र तुम्ही ठेवला तसा विश्वास ठेवला नाही. पण तज्ञ लोकांनी माझ्या बाजूने साक्ष दिली.
अनु आमचा गॅस भारतीयच आहे. पण तव्याच्या टेंपरेचरचा काहितरी घोळ झाला असावा.
पण एकंदरीत भाकरी चुकायची दहा तरी कारण असावीत अस लक्षात आले. Happy पुन्हा एकदा तुम्हा सर्व सुगरणींना व भरतला धन्यवाद. Happy

लिंबू पिळून विरजण लावत नाहीत का? Uhoh
हायला बेसिकमध्येच लोचा होता तर.
पण काल मी त्याच carry forwarded दह्याचं विरजण लावून चार दिवसाच्या जमा झालेल्या साईचं दही जमवलं आणि आज त्यातून भरपूर लोणी पण काढलं.
दुध गाईचं नाही फुल क्रिम मिल्क असतं.

मी स्वतःच दूधात लिंबू पिळून विरजण लावले
<<
अरे देवा!! :कपाळावर मारणारा बाहुला:

लिंबू पिळून दूध 'फाटते'. पनीर बनवतात तसं.

अभिनंदन भाकरी जमल्याबद्दल. पुढच्यावेळेस फोटो टाकावा.
Mi_anu गॅस आणि गरीब भारतीय काय त्यात!
कूकिंग रेंज induction ची असेल तर त्यावर जाळावर होते तशी भाकरी नाहीच होत.

@किट्टू२१, बेसिकमध्ये लोचा नाही! Happy
लिंबू पिळून विरजण करण्यावरून आठवले. जेव्हा घरोघरी फ्रीज नव्हते आणि दही सर्रास विकत घेतले जात नसे त्या काळात Happy गरज पडल्यास वाटीभर कोमट दुधात लिंबाचे काही थेंब पिळून माझी आई विरजण तयार करत असे. पण असे विरजण लगेच वापरात आणता येत नाही. तसे केले तर तयार होणाऱ्या दह्याला तार येते. एक -दोन वेळा ते वाटीत थोड्या थोड्या दुधाला लावून season केले कि मग २-३ दिवसात ते नेहेमीसारखे, जास्त दही लावण्यासाठी वापरता येते.

हो, अगदीच काही नसेल तर लिंबू वापरतात असं ऐकलंय मीपण. पण वर चंद्राने लिहिलंय तसंच, दोन तीन इटरेशन्सनंतर ते वापरण्यायोग्य होतं.

अभिनंदन, विक्रमकाका. मी_अनुची पोस्ट वाचून मला एकदम आठ दिवस रोज भाकरी करून एक्सपर्ट होऊन जावं असं वाटलं. पण आत्ताशी दुपारचे ४ वाजलेत. स्वयंपाकाची वेळ होइपर्यंत खुमखुमी मरेल(च).

Pages