Submitted by मुग्धमानसी on 22 April, 2020 - 06:18
तरी मी काही सगळंच सांगत नाही तुला.
कितीही बोललो आपण तरी...
काही थोडं उरतंच!
काही मुद्दाम राखलेलं,
काही नकळत राहिलेलं,
काही 'यात काय सांगायचंय'
अन काही 'हे नकोच!'
.....असं चाललेलं.
या न बोललेल्याचं कोवळं धुकं
तू नसतानाच्या लांबलचक संध्याकाळी
सावळे ओले बाष्प होऊन
नजरेवर बसतं
थोड्याची अल्लाद वाफ होते.
थोड्याचे टपटप थेंब
तळाशी साठून
एक गढूळलंसं तळं होतं!
मग कुठल्याश्या उन्हाळ्यात
त्याचीही वाफ होऊन
तुझ्या- माझ्या आकाशात ते निरर्थ तरंगत राहतं.
तळ्याच्या काठाशी बसलेल्या...
तुला कळतं. मला कळतं.
पाऊस मात्र पडत नाही!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह.. अप्रतिम कविता..
वाह.. अप्रतिम कविता..
मुक्तक आवडलं.
मुक्तक आवडलं.
सुरेख
सुरेख
Sundar..
Sundar..
सुंदर...
सुंदर...
Sundar
Sundar
अप्रतिम
अप्रतिम
वाह!! काय सुंदर टिपल्यात
वाह!! काय सुंदर टिपल्यात भावना.
सुंदर
सुंदर
मुग्धमानसी, खरंच मुग्ध केलंत.
मुग्धमानसी, खरंच मुग्ध केलंत..
तुला कळतं. मला कळतं. पाऊस
तुला कळतं. मला कळतं. पाऊस मात्र पडत नाही!
वाह!
छान!
छान!
अप्रतिम
अप्रतिम
खरचं अप्रतिम !
खरचं अप्रतिम !
अप्रतिम.
अप्रतिम.
खूप दिवसांनी...
खूप दिवसांनी...
सुंदर रचना...
अल्लाद ऐवजी अलगद हवे का?
धन्यवाद!
धन्यवाद!
शेवट फार छान केलाय.
शेवट फार छान केलाय.
सुंदर.
सुंदर.
परत एकदा वाचली. खूप सुंदर
परत एकदा वाचली. खूप सुंदर लिहीता तुम्ही.
स्पर्शुन गेली! मस्तच!
स्पर्शुन गेली! मस्तच!
मस्त
मस्त
खुप सुंदर
खुप सुंदर
बर्याच वर्षांनी ही कविता वर
बर्याच वर्षांनी ही कविता वर आली. धन्यवाद सगळ्याच प्रतिसादांसाठी.
खूप छान कविता
खूप छान कविता