देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080
देणं सीझन २ – भाग ४
https://www.maayboli.com/node/74117
आता पुढे..
देणं सीझन २ – भाग ५
शिलथॉर्न हून निघून इंटरलाकनच्या हॉटेल मध्ये चेक इन करायला जवळजवळ मध्यरात्र झाली होती तरी थकावट अशी जाणवत नव्हती. आत्ता नुसत्याच पिझ्झ्या वर भागवायचं असं ठरलं. चान्स पे डांस करत यश ने पिझ्झा बरोबर बीयरचे कॅन्स् मागावलेच आणि जरा साशंकतेनेच दीप्ती कडे पहिले. पण तिचा काही आक्षेप नसावा. खरंतर तिचं लक्ष ही नव्हतं. ट्रेनमध्ये बसल्या पासून ती बऱ्यापैकी गप्पगप्प होती. गर्द अंधारात ही त्यांच्या रूमच्या बाल्कनीतून अाल्प्सची किनार दिसत होती. स्वच्छ थंडगार हवा, आणि सूचिपर्ण वृक्षराजीत घुमणारी घनघोर शांतता अनुभवून बाल्कनीतून पाय निघेना
“आय हॅव अन इंट्रेस्टिंग गेम.. वॉन्ट टु गिव इट ए शॉट?” गुपचुप घास घेत बाहेर बघणाऱ्या दीप्ती ला पाहून यशनेच संवादाला सुरुवात केली
“गेम? आत्ता? बरं बोल! नाहीतरी झोप येत नाहीये ..” पिझ्झा संपवत दीप्ती ने हात झटकले
“२० क्वेस्शन्स . एकमेकांना आपण दोघांनी १० – १० प्रश्न विचारायचे आणि त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची. ओके? करूया सुरू? “
“ ठीक आहे. यू स्टार्ट ! “ दीप्ती ने हलकेच हसत होकार दिला. ती आणि प्रीती रात्री झोपताना हां खेळ नेहमी खेळत.
“तुझं आत्ता पर्यन्तचं सगळ्यात बेस्ट बर्थडे गिफ्ट”
“स्वीट सिक्सटीन ... माझी स्कूटी ! “
“ओह दॅट अॅंटीक पीस पार्कड् इन द गराज? दॅट्स यॉर बेस्ट गिफ्ट ??“
“शट अप! नाऊ माय टर्न. तुझी सगळ्यात मोठी एमबॅरेसिंग मोमेंट? “
“लंडन बिसनेस स्कूल ग्रॅजुएशन बॉल. मी माझ्या मेंटर च्या मुलीबरोबर सालसा करत असताना माझी पॅन्ट एका सूपर रोमॅंटिक क्षणी फर्रर्र करून फाटली”
“ओह शिट! दॅट “इज” रीयलि एमबॅरेसिंग” आता दीप्ती ला हसू आवरेना
“ओह येस इट वॉज! अब मेरी बारी “
दीप्ती आता मांडीवर उशी घेत सावरून बसली
“तू केलेलं सगळ्यात मोठं कांड”
“उम्म तशी खूप आहेत पण एकंच निवडायचं तर .. हां ! आई बाबांना हैदराबादला टेक-शो ला जातो सांगून मी आणि माझी गँग आम्ही गोव्याला कार्निवलला गेलो होतो!”
“हाहा नाऊ दॅट्स समथिंग! गोव्याला केलं काय पण जाऊन ”
“काही नाही ...कार्निवल एटेंड केलं आणि परत आलो” ओशाळे होऊन दीप्ती ने मान्य केलं
“हाहा वाटलंच मला! “
“बंर बंर जास्त उड्या मारू नकोस! टेल मी ....तुझं सगळ्यात मोठं “यश” ? “ दीप्ती ने डोळे मिचकावत गहन प्रश्न टाकला
“अजून ते माझ्या हाती लागलं नाहीये..” सूचकपणे दीप्तीकडे बघत यश ने बाजी पलटवत
“ बॉयफ्रेंड? “ विचारून डायरेक्ट विषयालाच हात घातला
“.. “ दीप्ती क्षणभर गडबडली. पण दुसऱ्याच क्षणी तिने उत्तर दिले ...
“ नो! “ आता यशला धक्का बसला. आशुतोष बद्दल त्याला कुणकुण होती आणि दीप्ती खोटं बोलेल असं त्याला स्वप्नातही अपेक्षित नव्हतं
“नो? आर यू शुअर?”
“नॉट बॉयफ्रेंड .. सोलमेट! आशुतोष पाटणकर“
त्याच्या आत काहीतरी तटकन् तुटलं पण दीप्तीच्या प्रामाणिकपणाचा त्याला प्रचंड आदर वाटला
“लकी चॅप...” तो खेळकरपणे म्हणाला
“नॉट रियली. एनि वे. माय टर्न ! गर्लफ्रेंड?”
“ओह सो मेनी! बट नो सोलमेट.. येट” पुन्हा चान्स पे डान्स्. दीप्ती ने काहीही रिएक्शन दिली नाही.
“डू यू ड्रिंक? “ बीयर चा घोंट घेत त्याने पुढचा प्रश्न टाकला
“उम्म हम्म” मान हलवत दीप्ती ने नकार दर्शवला.
“कधीच प्यायली नाहीस तू?”
“कधी प्याविशी वाटलीच नाही”
“आई बाबा रागावतील म्हणून ?”
“नाही. आई बाबांनी तो निर्णय आमच्यावर सोपवला होता. इन फॅक्ट आम्ही गोव्या ला गेलो होतो तेव्हा मुद्दाम लोकल स्पेशलिटी म्हणून फेणीची चव पण घेऊन दिली. “
“व्हॉट आर यू सेइंग? महाराष्ट्रियन पेरेंट्स इतके कूल असू शकतात माला आयडिया नव्हती” यश ला खरंच अचंबा वाटला होता
“ हे हे . दे वेअर वेरी स्मार्ट. गोव्या हून परत आल्यावर मुद्दाम एका रीहॅबिलिटेशन सेंटर मध्ये घेऊन गेले होते आम्हा दोघींना. अॅडिक्शन तुम्हाला कुठून कुठे नेऊ शकते दाखवायला. काय टाप होती आमची पुढे कशाच्या नादाला लागायची ...दे वेअर टीचींग अस टु स्ट्राइक ए बॅलेन्स आय गेस ..”
रीहॅबिलिटेशन सेंटर चा उल्लेख ऐकून यश एकदम गंभीर झाला. आत्तापर्यन्त जी गोष्ट तो टाळत होता ती सांगण्याची आता वेळ आली आहे असं त्याला जाणवलं
“कॅन् आय टेल यू माय बिगगेस्ट फेलयूअर?”
“ईफ यू विश टु..” त्याचा बदललेला पवित्रा पाहून दीप्ती जरा चरकलीच
“मी ड्रग्स घ्यायचो दीप्ती. मुंबईत असताना सुद्धा आणि लंडन मध्ये गेल्यावर सुद्धा. एमबीएच्या पहिल्या वर्षांनंतर माझी अॅडिक्शन इतकी जास्त वाढली की मला वर्षभर रीहॅब मध्ये शिफ्ट करायला लागलं.”
दीप्ती आता काहीतरी रिएक्शन देईल ह्या अपेक्षेने यश ने दीप्तीकडे पहिलं पण ती शांत होती. विचारात गढलेली.
“मग?”
“मग म्हणजे?”
“म्हणजे तू बाहेर कधी आणि कसा आलास? “
“ओह दॅट. वेल तिथे मला खूप चांगले कौंसेलर्स आणि डॉक्टर्स भेटले माझ्या नशिबाने. त्यांनी मला बाहेर यायला खूप मदत केली. मी अजूनही त्या सगळ्यांच्या टच मध्ये आहे. प्रचंड अवघड होता तो काळ. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी त्यातून बाहेर आलोय“
“तू नक्की आला आहेस त्यातून बाहेर यश?” त्याच्या हातातल्या बीयर च्या कॅन् कडे बघत दीप्ती ने रोखठोक विचारले
“१०१ टक्के. मी आता हिच्या किंवा अजून कोणत्याही पदार्थाच्या ताब्यात नाही. गंमत म्हणून कधी कधी बीयर पितो येस. पण आत्ता सोडायची ठरवली तर ह्या क्षणी सोडली” असं म्हणत त्याने तो कॅन कचरा पेटीत फेकून दिला
“एक वचन हवंय तुझ्याकडून. ”
“दिलं!”
आश्चर्यचकीत होत दीप्ती म्हणाली “ आरे आधी विचार तर कोणतं वचन ते? मी भलतं सलतं मागितलं तर?”
“ट्राय मी! दिलं! बोल“
“आदित्यला तुझ्या अॅडिक्शन चा कधीही आणि कोणत्याही स्वरूपात त्रास होता कामा नये. आणि त्याच्या वर कोणताही चुकीचा परिणाम सुद्धा. झीरो टोलेरन्स् टु दॅट. क्लियर?”
“क्रॉस माय हार्ट अँड होप टु डाय” यशच्या डोळ्यांतला निर्धार त्यांच्यातला पाण्याइतकाच पारदर्शक होता
“हे तुझं सगळ्यात मोठं यश असेल यशम्हात्रे...अँड यू हॅव अचिव्ड इट ऑलरेडी“ छानसं हसत दीप्ती ने वातावरणातला ताण कमी केला आणि ती पुन्हा बाल्कनी बाहेर पाहू लागली. यशच्या अपयशाला किती सहज त्यांच्या यशात बदलून दीप्तीने त्याला एव्हाना पुरतं जिंकलं होतं
काही वेळ एका सुंदर शांततेत गेला.
“नाऊ माय लास्ट क्वेस्चन” आणि अचानक यशने काळजाला हात घालणारा प्रश्न टाकला
“डू यू थिंक यू कॅन् एवर लव एनिबडी लाइक यू लव आशुतोष पाटणकर? “
“नो! “ पुन्हा तसंच खरंखुरं उत्तर. कोणतीही शंका नाही. कोणतीही लपवाछपवी नाही
सगळं संपल्या सारखं मान स्वतःशीच हालवत यश हळूच खुर्चीतून उठून रूम मध्ये जायला निघाला
“बट आय थिंक आय कॅन् लव यू अॅस यशम्हात्रे...”
क्षणभर अर्थ न कळून थबकून त्याने दीप्ती कडे वळून बघितले
आणि ती आता बाल्कनी बाहेर न पाहता त्याच्या कडेच पहात होती...
…. तिथे सुषमा ताईंच्या बागेतल्या जुन्या निवडुंगाला पहिल्यांदाच फुलं आली होती
*******************************************************************************************************************
जेवणाचं ताट तयार करून सुषमाताई आत जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली
दार उघडून पहातात तो त्यांना धक्काच बसला
“आशू! तू इथे ? “
“मी आत येऊ शकतो काकू? “ त्याची वाढलेली दाढी, तारवटलेले डोळे, विस्कटलेले केस बघून सुषमा ताईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
“ ये तू .. पण दीप्ती घरी नाहीये. तिच्या कडे काही काम होतं का?
“होतं ना. पण तुमच्या कडे सुद्धा होतं..”
“माझ्याकडे...? ”
“ तुम्हा सगळ्यांकडे..
“ आमच्याकडे काय काम असणारे तुझं? “ बावचळून सुषमाताई म्हणाल्या
“माफी मागायची आहे. दीप्ती ला आणि तुम्हाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी निर्लज्यासारखा पाठ फिरवून निघून गेलो... आय अॅम सो... सो अशेम्ड ऑफ मायसेल्फ काकू....”
बघता बघता त्याचा आवाज घोगरा झाला आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं
हाताच्या तळव्यात चेहरा लपवून आशुतोषचा बांध फुटला आणि आणि सुषमा ताईंना राहावलं नाही
“इट्स ओके बाळा ... थिंग्ज हॅपन..शांत हो शांत हो..” म्हणत त्या त्याच्या पाठीवर थोपटू लागल्या
थोड्या वेळात आशुतोषने स्वतःला सावरलं. डोळे आणि चेहरा पुसला. सुषमाताईंनी पुढे ठेवलेलं पाणी प्यायलं आणि अत्यंत आशाळभूतपणे सुषमाताईंकडे पहात तो म्हणाला
“आय वॉन्ट टु मेक इट अप टु यू ऑल ..आय अॅम कमिंग बॅक टु इंडिया”
.. सुषमाताईंनी मोठा आवंढा गिळला..
|| क्रमशः ||
Mast bhag. Utsukata lagaliye
Mast bhag. Utsukata lagaliye pudhachya bhagachi.
मस्त !
मस्त !
Awesome!
Awesome!
मस्त!
मस्त!
का आला हा आशुतोष... मला यश
का आला हा आशुतोष... मला यश म्हात्रे आवडलाय
मंडळी धन्यवाद _/\_ @अनिश्का
मंडळी धन्यवाद _/\_
@अनिश्का
मला भीती वाटायला लागली आहे की
मला भीती वाटायला लागली आहे की मी यश चोपडां सारखा विचार करायला लागले आहे
आता पुढच्या भागात रोमॅंटिक सॉन्ग नाही लिहिलं म्हणजे मिळवली
मला भीती वाटायला लागली आहे की
मला भीती वाटायला लागली आहे की मी यश चोपडां सारखा विचार करायला लागले आहे
आता पुढच्या भागात रोमॅंटिक सॉन्ग नाही लिहिलं म्हणजे मिळवली
>>>>
माणसाने मनात येईन ते लिहिलं ना, तर कथा लोकांच्या मनात घर करून बसते.
-अनुराग ज्ञानेश्वर तवासी...
वो प्रज्ञातै, गुगल्या वर
वो प्रज्ञातै, गुगल्या वर गुगल्या नका टाकू. एका ट्विस्ट मधून बाहेर येईतो तुम्ही नवा ट्विस्ट आणलाय.
बाय द वे, कथा छान रंगली आहे. पटापट येऊ दे पुढील भाग. शुभेच्छा.
लिहा लिहा गाणे, डर च्या शाखा
लिहा लिहा गाणे, डर च्या शाखा सारखे, जादू तेरी नजर
@पाफा - धागा शंभरी गाठण्याची
@पाफा - धागा शंभरी गाठण्याची सोय करताय का
(No subject)
मस्त. पण ती यश म्हात्रेलाच
मस्त. पण ती यश म्हात्रेलाच निवडणार.
तोबा तोबा ! मी कितीही उड्या
तोबा तोबा ! मी कितीही उड्या मारल्या तरी सायो माझा पचका करतात!
आता अजून किती ट्विस्ट आणू :प
मस्त ... मला पण वाटतं की
मस्त ... मला पण वाटतं की दीप्ती यशलाच निवडणार
Very nice.. waiting for next
Very nice.. waiting for next part
Oops...
Oops...
आला का ट्विस्ट. !
पण दिप्ती यशलाच निवडेल असं वाटतंय.
मस्त झालाय भाग, पुलेशु!!
>> तोबा तोबा ! मी कितीही
>> तोबा तोबा ! मी कितीही उड्या मारल्या तरी सायो माझा पचका करतात!
आता अजून किती ट्विस्ट आणू :प>> नको, ट्विस्ट नका आणू. पण ती आशुतोष आणि यश पैकी कुणाची निवड कशी करते हे खुलवून लिहा.
तुम्ही इतकी व्यवस्थित
तुम्ही इतकी व्यवस्थित व्यक्तिरेखा उभी केली आहे त्यामुळे कोण कसं वागेल हे कळतं. पण तुम्ही मस्त खुलवून लिहिता त्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे --कसं?
पण दिप्ती यशलाच निवडेल असं
पण दिप्ती यशलाच निवडेल असं वाटतंय. >>> >>> हा यश कोण आहे? मी तरी ओळखत नाय राव त्याला!!
@धागामालकीण, आता कथा वाचते आधी..