मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी आणि अज्ञानी मला पण प्रेम कहाण्या जास्त आवडत नाही पण कधीतरी बदल म्हणून वाचते चांगली असेल तर..

एक कथा होती जुनी, त्यातलं मुख्य पात्र आपली सेक्स लाईफ रंगवून रंगवून सांगतो. लोकल रेल्वेचा पण एक प्रसंग असतो बहुतेक त्यात. नंतर असं समोर येत कि जात कि इतर कोणत्या तरी फॅक्टरमुळे एक मुलगी त्याला ऐनवेळी नाही म्हणते आणि त्यामुळे तो नपुंसक झालेला असतो.. सापडेल का कुणाला?

मामी, अमानवीय २ च्या ३६ व्या पानावर आहे एक बोकलतांची वेताळाची पालखी. तीच का
तुम्ही शोधत होता

मला ही एक कथा हवी आहे
लेखक /लेखिका माहीत नाही
कथा एका चाळी जवळ राहणाऱ्या बंगल्यातील जोडप्याची आहे,ते काका जपानी कंपनीत कामाला आणि काकू घरीच,अगदी प्रेमळ वगैरे
ट्विस्ट असा काहीच नाहीये अगदी सरळ साधी कथा आहे फक्त शेवटी ते जोडपं लग्न न करता एकत्र राहत असल्याचं कथा नायिकेला कळत,
आधी काका वारतात आणि कथानायिक काकूंना भेटायला त्यांच्या नव्या अपार्टमेंट मध्ये जाते तेव्हा तिला काकांच आणि काकुंच आडनाव वेगळं असल्याचं समजत आणी नंतर फोनवर वर्गमित्र कडून लिव्ह इन चं,
स्टोरी साधी आहे पण मस्त आहे पुन्हा वाचायची खूप इछा झाली आहे
कुणाला माहीत असेल तर plz लिंक द्या

मलाच मिळाली
https://www.maayboli.com/node/54584

अजून एक म्हणजे एका ट्रेकच्या अनुभवात कोणीतरी रात्री गडावर मुक्काम केल्यावर काही भयंकर अनुभव आल्याचे वर्णन केले आहे. ते कुठे वाचायला मिळेल?>>>>आवाज कोणाचा असं काहीतरी नाव होतं त्या कथेचं. रात्री सगळे गुहेत झोपले असताना बाहेर कोणीतरी वेगळ्याच भाषेत मंत्र पुटपुटल्याचा आवाज येतो.

>>>> बोकलत बरोबर होते. धागा सापडला एकदाचा! यो रॉक्सचाच आहे.
आवाज कुणाचा..!! : https://www.maayboli.com/node/31187

दोन गोष्टींच्या शोधात आहे...

एकात एका बाईची कथा दाखवली आहे. ती एका जीन्यावर पाय घसरून पडून गेलेली असते. शेवटी आपल्याला कळते की ती भुत असते ते. ..

दुसरी म्हणजे कोणीतरी अनुभव लिहीला होता की रेल्वे लाईन क्रॉस करताना त्यांना पोलिस पकडतात मग नंतर जेल मध्ये टाकतात. नंतर फार धमाल होती.

एक कथा होती. त्यात एक लहान मुलगा पाहिल्यांदाच कुण्या नातेवाईककांसोबत उपहारगृहात काही खायला जातो. त्यावेळी त्या मुलाला काय वाटते याचे फार छान वर्णन केले आहे. क्रमशः होती, पुढे मला वाचायचे होते पण नंतर जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तो धागा सापडला नाही.
कुणाला ही कथा आठवत असल्यास शोधण्यास मदत करा.

मला वैभव जोशी यांच माबो वरच लेखन पहायचय
त्यांच्या कविता, गझला हा शब्दसाठा डोळ्यांची आणि मनाची तहान भागवणारा आहे.
प्लीज कुणीतरी मदत करावी
आयुष्यभर ऋणी राहीन Happy

त्यांचा कालावधी 2009 ते 2010 च्या आतला आहे

@भरत आणि @वावे धन्यवाद. मला हव्या त्या लिंक दिल्यात.

@मानव तुमचा अनुभव ही छान आहे.

Pages