मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक धागा शोधून हवाय.

इथे मागे कोणीतरी एखाद्या इंग्लिश कथेचा अनुवाद वाटेल अशा भाषेत एक अत्यंत सुंदर आणि तरल कथा लिहीली होती. सरदार आणि त्याची मुलगी जिला एका गढीत बंद करून ठेवलेलं असतं वगैरे. आठवतेय का कोणाला ही कथा? पुन्हा वाचाविशी वाटतेय

अजून एक म्हणजे एका ट्रेकच्या अनुभवात कोणीतरी रात्री गडावर मुक्काम केल्यावर काही भयंकर अनुभव आल्याचे वर्णन केले आहे. ते कुठे वाचायला मिळेल?

अजून एक म्हणजे एका ट्रेकच्या अनुभवात कोणीतरी रात्री गडावर मुक्काम केल्यावर काही भयंकर अनुभव आल्याचे वर्णन केले आहे. ते कुठे वाचायला मिळेल?>>>>आवाज कोणाचा असं काहीतरी नाव होतं त्या कथेचं. रात्री सगळे गुहेत झोपले असताना बाहेर कोणीतरी वेगळ्याच भाषेत मंत्र पुटपुटल्याचा आवाज येतो.

अजून एक म्हणजे एका ट्रेकच्या अनुभवात कोणीतरी रात्री गडावर मुक्काम केल्यावर काही भयंकर अनुभव आल्याचे वर्णन केले आहे. ते कुठे वाचायला मिळेल? >>>
आशुचा हा धागा म्हणत्येस का मामी?
https://www.maayboli.com/node/12295

आशुचा हा धागा म्हणत्येस का मामी?
https://www.maayboli.com/node/12295 >> नाही. एक वेगळा धागा होता एका ट्रेकबद्द्लचा. मला वाटत होतं यो रॉक्सचा असेल पण त्याच्या लेखनात सापडला नाही.

मलाही एक कथा आठवत्ये पण सापडत नाहीये.
खेळाडू मुलगी, तिचं लग्न होतं आणि नवरा लैंगिक दृष्टीने विकृत प्रकारचा असतो. ती त्याला काठीने मारते (ठार नाही) आणि माहेरी परत येते अशी कथा होती. सहजच मागे एकदा आठवली पण अजिबात सापडत नाही. आठदहा वर्षे झाली असतील वाचून.

गडावरचे भूत म्हणजे - तोरणा गडावरचे कुणी दिवेकर. शोधल्यास सापडेल.
-----
मी गेलो होतो पण तेव्हा राहण्याचा उद्देश नव्हता. दुसऱ्या दिवशी कुठे पुढे जाणार होतो. भुताची कथा नंतर समजली. दुसरं एक म्हणजे राजगडावर जसे पाणीसाठे आहेत तसे इथे नाहीत या कारणाने कुणी राहात नाहीत.

मलाही एक कथा आठवत्ये पण सापडत नाहीये.
खेळाडू मुलगी, तिचं लग्न होतं आणि नवरा लैंगिक दृष्टीने विकृत प्रकारचा असतो. ती त्याला काठीने मारते (ठार नाही) आणि माहेरी परत येते अशी कथा होती. सहजच मागे एकदा आठवली पण अजिबात सापडत नाही. आठदहा वर्षे झाली असतील वाचून.>>
https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

अन्नपूर्णा, धन्यवाद, पण माझ्याकडे मायबोली app नाही. कथेचं किंवा लेखक/लेखिकेचं नाव सांगितलंत तर मी शोधते. धन्यवाद पुन्हा एकदा.

नीट की वर्ड्स माहीत असले तर सापडायला हवे.
संजीव कपूर उपासाचा प्रचार करतो असे काहीसे असणारी एक काहीतरीच मजेशीर कविता आहे.
कुणाला सापडते का बघा.

@मामी,
इथे हव्या त्या धाग्याच्या लिंक नक्कीच मिळतील. पण तुमचा हा धागा भविष्यात कसा शोधायचा?
काहीतरी किवर्ड / शब्दखुण द्या की.

एक फुटकळ नावाचा लेख होता, त्याचे चल फूट, कळ्ळं? असे मस्त विडंबन होते. ते खूप शोधले पण सापडले नाही. कोणाला सापडले तर द्या प्लीज Happy

Srd, नाही हे नाही. रात्री काहीतरी वेताळाची पालखी सदृश अनुभव आला होता. हे मला आता हलकंस आठवलं.

@मामी,
इथे हव्या त्या धाग्याच्या लिंक नक्कीच मिळतील. पण तुमचा हा धागा भविष्यात कसा शोधायचा?
काहीतरी किवर्ड / शब्दखुण द्या की. >> बरोबर. टाकते पाऊलखुणा

@वावे.....माझ्याकडे मायबोली app नाही. कथेचं किंवा लेखक/लेखिकेचं नाव सांगितलंत तर मी शोधते. >>ठिणगी-- दाद

ओहो! सापडली! दादच्या इतर बऱ्याच कथा मी परत परत वाचल्या आहेत. ही कशी काय माहिती, सुटली होती. थँक्स अ लॉट!!

नाही हे ही नाही. आता मलाच लाज वाटतेय. फारशा खुणा मी सांगू शकत नाहीये आणि त्यामुळे सर्वांना उगाच त्रास देतेय. पण ज्या कोणाला ती कथा आणि तो लेख नेमका आठवेल त्यांना कळेल.

आतापर्यंत धागे शोधून मदत करणार्‍यांना धन्यवाद पण अजून हवे ते गवसले नाहीये.

Pages