हे करायला हवं!

Submitted by पराग र. लोणकर on 11 April, 2020 - 05:32

अथांग या आकाशात
आता मला उडायला हवं
बंदिस्त या पिंजऱ्याचं दार
आता मला तोडायला हवं

आयुष्यातील क्लिष्ट गणितं
सोडवणं थांबवायला हवं
संसारातील सुख दु:ख
यातील लक्ष काढायला हवं

करण्यासारख्या असंख्य गोष्टी
वाचन, लेखन, ज्ञानसंवर्धन
व्यर्थ मनोरंजनातील वेळेचा
अपव्यय आता टाळायला हवा

मर्यादित या आयुष्यातील
प्रत्येक क्षणच महत्वाचा
एक एक क्षण कामी आणणं
कटाक्षानं पाळायला हवं

आलो, जगलो आणि मेलो
असे जीवन का जगावे
काहीतरी करुन जाणं
हेच ध्येय ठेवायला हवं...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults