Submitted by पराग र. लोणकर on 8 April, 2020 - 02:18
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर
आस माझी फळास आली
आज अचानक कुठुन तरी ती
हलकेच माझ्या दारी आली
भेट तिची स्वप्न माझे
असे अचानक पुरे झाले
कोणत्या जन्मीचे पुण्य माझे
या जन्मी कामास आले
शोधात होतो सदैव तिच्या मी
गवसत नव्हती कुठे कधी ती
कसे तिला मी कुठे भेटावे
सांगत नव्हते कुणी मित्रही
आज अचानक भेट जाहली
जाणिव आहे ओळख नवी ही
तरी अडखळत हा चालू केला
संवाद त्या माझ्या कवितेशी...
***
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता
सुंदर कविता
माझी ह्याच नावाची कविता आहे, अर्थात संपूर्ण वेगळा context आहे
ही रिक्षा
https://www.maayboli.com/node/73964
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
छान कविता
छान कविता
अभिप्रायांसाठी मन:पूर्वक
अभिप्रायांसाठी मन:पूर्वक धन्यवाद!