" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
वाह वाह ऋतुराज!
वाह वाह ऋतुराज!
सर्व निगकरांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा.
नवीन वर्षात धागा जोरात पळू दे ही अपेक्षा.
ही फळे ओळखा.
ही फळे ओळखा.
फोटो आडवा कसा झाला कोण जाणे.
धन्यवाद किट्टू २१
धन्यवाद किट्टू २१
ती फोटोतील फळे Grewia microcos ची वाटतायेत
Kittu,Ashokachi ka?pan pane
Kittu,Ashokachi ka?pan pane vatat nahit.
Hasolichi fale aahet na?
Hasolichi fale aahet na?
हो अश्विनी हसोळीच आहेत.
हो अश्विनी हसोळीच आहेत.
http://epaper.lokprabha.com
http://epaper.lokprabha.com/2610804/Lokprabha/03-04-2020#dual/46/1
देवगड तालुक्यातील खुडी सड्यावरील जैवविविधता - लोकप्रभा लेख
मस्त बहरलेला कॅशिया
मस्त बहरलेला कॅशिया
जवसाच फूल
जवसाच फूल
माझ्याकडे ओल्या कचऱ्यातून बी
माझ्याकडे ओल्या कचऱ्यातून बी पडून करवंदाचं झाड आलं होतं
गेल्या वर्षी चांगली फुलं आली आणि करवंद आली
आणि विषेश म्हणजे एका छोट्याशा ट्रे मधे आलंय हे झाड , 5, 6 ओंजळी मातीत
जो एस,
जो एस,
कॅशिया काय सुंदर बहरलाय.
जवसाचे फूल पण मस्तच.....नाजूक.
करवंदाच रोप काय बहरलाय.... फुलं, फळं सुंदर
ह्याचा एक संपूर्ण फोटो टाका ना....
रच्याकने
कॅशिया बहरला ...हा वि द घाटे यांचा लेख आहे का कोणाकडे?
जवसाचं फूल पहिल्यांदाच पाहिलं
जवसाचं फूल पहिल्यांदाच पाहिलं , मस्तच.
सगळे फोटो सुरेख आहेत जो_एस.
(No subject)
जो एस, जवसाचा खूप सुंदर फोटो
जो एस, जवसाचा खूप सुंदर फोटो मिळाला तुम्हाला.
माझ्याकडेही खूप फुले आलीत/आलेली. पण फुल करंगळीच्या नखाएव्हढेही नाही, त्यामुळे मोबाईल कॅमेऱ्यात पकडणे मुश्किल झाले.
आमच्याकडे गायत्री बहरलीय....
आमच्याकडे गायत्री बहरलीय.... अगदी छोटे झाड आहे, 8-10 फुट उंच. पण पानापानामागे फुले येतात..
मोबाईल मधून फोटो काढलेत, जास्त स्पष्ट नाहीत.
गायत्रीखाली जो मोगरा आहे तोही
गायत्रीखाली जो मोगरा आहे तोही अफलातून आहे. 2 इंच रुंद फुल येते याला.
हजारी मोगरा असे एक झाड खूप
हजारी मोगरा असे एक झाड खूप पूर्वी आमच्याकडे होते. झुडूपच पण खूप फुलायचे गुच्छागुच्छानी. किंचित गुलबट गोलसर फुले असायची. कदाचित तो रानमोगरा होता असेल. ते घर सोडून दशके लोटली पण तो मोगरा मात्र डोळ्यांसमोर दिसतो.
यापूर्वीच्या धाग्यावर बहुतेक
यापूर्वीच्या धाग्यावर बहुतेक साधनाने हजारी मोगर्याचा फोटो डकवला होता.
साधनाताई फुललेल्या गायत्रीचा
साधनाताई फुललेल्या गायत्रीचा फोटो सुंदर
गायत्रीचं झाड पहिल्यांदाच
गायत्रीचं झाड पहिल्यांदाच ऐकते आहे. साधनाताई, फुलांचा क्लोजअप डकवा प्लिज
मोबाईलने काढला त्यामुळे अगदी
मोबाईलने काढला त्यामुळे अगदी क्लोज नाही पण बऱ्यापैकी क्लोज...
कळ्या व ताजी फुले निळी असतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पांढरी होतात. चौथ्या पाचव्या दिवशी झाडाखाली पाकळ्यांचा सडा...
ह्याचा खूप उंच वृक्ष होतो. हे खालचे झाड अजून लहान आहे. राणीबागेत 2-3, प्रचंड मोठे वृक्ष आहेत. ज्यांना झाडे चटकन ओळखता येत नाहीत त्यांना फुले नसताना हा रेनट्री वाटेल.
Guaiacum officinale
ओह् काय सुरेख फुले आहेत
ओह् काय सुरेख फुले आहेत
गायत्रीचं झाड पहिल्यांदाच
गायत्रीचं झाड पहिल्यांदाच ऐकलं. टॅबेबुयासारखीच फुले वाटली मला.
(No subject)
परवाच्या पौर्णिमेचा चंद्र
परवाच्या पौर्णिमेचा चंद्र
हाय लोक्स. कोरोनामुळे धागा
अनघा सुरेख फोटो. अगदी केशरी पेढा.
हाय लोक्स. कोरोनामुळे धागा शांत झालाय वाटतं. अरे घरच्या झाडापानंचे नाहीतर जुने फोटू टाका की.
नमस्कार निगकर्स. काही
नमस्कार निगकर्स. काही तांत्रिक अडचणींमुळे मी बरेच दिवस इथे फिरकू शकले नाही. पण आता ती अडचण दूर झाली आहे. लवकरच आपला निगचा नविन भाग काढेन.
यंदा मार्च महिन्यापासून
यंदा मार्च महिन्यापासून चंद्राची प्रत्येक कला अगदी स्वच्छ दिसली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी दिसलेला सुपर मून तर एखाद्या ताटाएव्हडा मोठा आणि लाल दिसत होता. अगदी षष्ठी सप्तमीपर्यंत चंद्र इतर वेळेच्या पौर्णिमेइतका मोठा आणि लालसर तेजस्वी दिसत आहे. हा नक्कीच प्रदूषणरहित शुद्ध वातावरणाचा परिणाम असावा.
नमस्कार निगकर्स. काही
नमस्कार निगकर्स. काही तांत्रिक अडचणींमुळे मी बरेच दिवस इथे फिरकू शकले नाही. पण आता ती अडचण दूर झाली आहे. लवकरच आपला निगचा नविन भाग काढेन.>>> खूपच वाट पहात आहे.
नमस्कार निगकर्स. काही
नमस्कार निगकर्स. काही तांत्रिक अडचणींमुळे मी बरेच दिवस इथे फिरकू शकले नाही. पण आता ती अडचण दूर झाली आहे. लवकरच आपला निगचा नविन भाग काढेन.>>>+१०००
Pages