आज सकाळी रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण मालिका डी डी नॅशनल वर पाहिली. तशी ती नेटवर उपलब्ध आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर लोकांना बघायला मिळेल व टीव्हीवर अधिक चांगलं वाटतं बघताना. सुखद गोष्ट म्हणजे जाहिराती नव्हत्या. शिवाय पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे, तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे दूरचित्रवाणी संच नसल्याने त्यांच्यापैकी काहीजण आमच्याकडे येत मालिका बघायला. दर रविवारी सकाळी प्रसारण होई. आमच्याकडे रंगीत संच नसल्याने माझ्या मनात अजूनही कृष्णधवल रामायणाचीच स्मृती आहे. आता कदाचित बदल होईल त्यामधे.
यानिमित्ताने आणखी एक गंमतशीर आठवण झाली. माझ्या मामेभावाची मुंज नेमकी रविवारी होती. तेव्हा रामायण मालिका आमच्या नातलगांमध्ये एवढी आवडती होती, की माझ्या वडिलांनी मंगल कार्यालयात एका बाजूला घरातील दूरचित्रवाणी संच आणून ठेवला होता...
महाभारत मालिकादेखील प्रसारित होत आहे. जशी जुन्या
रामायणाचीच गोडी नंतरच्या काळात प्रसारित झालेल्या रामकथांहून अधिक वाटते, तशीच चोप्रांच्या महाभारताचीही कथा.. त्यामुळे, नेहमीच्या वेगवान जीवनमानाला सध्या जरा संथ असा जो घाट मिळू पाहत होता, त्यामध्ये वेळेची थोडी का होईना, तोशीस (urge ला शब्द सापडला नाही) निर्माण झाली आहे. आणि तत्कालीन व्यक्तिचित्रणामधील सहजता बघताना अजून गंमत वाटते आहे.
चाणक्य मालिका शाळकरी वयात तितकी समजली नव्हती, अर्थातच तेव्हा तेवढे आणि तत्संबंधी वाचनही झाले नव्हते. आता कदाचित जरा जाणून घेता येईल , असे वाटते.
चॅनल व वेळ -
रामायण : सकाळी ९.०० व रात्री ९.१५ - DD NATIONAL महाभारत : दुपारी १२.०० व रात्री ७.०० - DD BHARATI
चाणक्य :रात्री १०.०० - DD NATIONAL
लॉक डाऊन मध्ये जनतेकरिता पुनःप्रसारित करण्यात येणाऱ्या जुन्या गाजलेल्या मालिका - रामायण व महाभारत व चाणक्य
Submitted by प्राचीन on 28 March, 2020 - 01:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
DD भारती वर कठोपनिषद चा
DD भारती वर कठोपनिषद चा एपिसोड बघितला. खूप आवडला.
कधी असतो
@shraddha ,episode कधी असतो.
आज" देख भाई देख" पाहीले,निखळ
आज" देख भाई देख" पाहीले,निखळ मनोरंजन आहे,धन्यवाद सुनिल सर.
episode कधी असतो.>> 6pm (may
episode कधी असतो.>> 6pm (may b) मी उशीरा लावलं होतं.
आज" देख भाई देख" पाहीले,निखळ मनोरंजन आहे>> खरंच all time fav आहे माझी. Last month सगळे एपी. बघितले YouTube ला.
चाणक्य १० वाजता लिहिले असले
चाणक्य १० वाजता लिहिले असले तरी सध्या रामायण चे एपिसोड खूप लांबत आहेत . काल रामायण संपायला १०.२५ झाले होते . त्यानन्तर लागते चाणक्य .
भारत एक खोज सुरु आहे भारती वर
सर्कस पण छान आहे .
सर्कस पण छान आहे . डी डी नँशनलचे दुसऱ्या चँनलवर पाहीली आहे.
सह्याद्री वर कोणते कार्यक्रम
सह्याद्री वर कोणते कार्यक्रम पुन्हा दाखवत आहेत?
सह्याद्रीवर मुंबई दूरदर्शनचे
सह्याद्रीवर मुंबई दूरदर्शनचे जुने कार्यक्रम दाखवताहेत. संध्याकाळी 7.30 ला चिमणराव गुंड्याभाऊ असते. बाकी तेव्हाची 30 मिनिटांची नाटके, आरोही वगैरे कार्यक्रम. काल भीमसेन जोशींची भजने होती. त्यांना किती वर्षांनी पाहिले टीव्हीवर. पर्वा दिलराज कौर व अशोक खोसलाच्या गझला ऐकल्या. मी मोबाईलवर पाहते, त्यामुळे सलग पाहत नाही.
सुरभि नाही लागत का?
सुरभि नाही लागत का?
रामायणात कौसल्या भरतास सांगते
रामायणात कौसल्या भरतास सांगते ते आवडले. "जे न्यायनीतीला धरून असते ते आपल्याला आवडेलच असं नाही." रामाने अयोध्येत परत यावे यासाठी भरत कौसल्येला शब्द टाकायला विनवत होता. श्रेयस् व प्रेयस् आठवलं एकदम.
परवा सकाळी, काल सकाळी आणि
परवा सकाळी, काल सकाळी आणि रात्री रामायण पाहिले. आधीचे भाग you tube वर पुढे करत करत पाहिले. खरंच खूप अद्भूत आहे ही मालिका. आजच्या काळात अशा मालिका दुर्मिळ आहेत.
रामायणात कौसल्या भरतास सांगते ते आवडले. "जे न्यायनीतीला धरून असते ते आपल्याला आवडेलच असं नाही." रामाने अयोध्येत परत यावे यासाठी भरत कौसल्येला शब्द टाकायला विनवत होता. ++++१००० खूपच हृदयस्पर्शी प्रसंग होता तो.
खरेतर सगळेच प्रसंग. मला भावलेला प्रसंग :
श्रीराम आणि सीतामाई वनवासाला निघतात तेव्हा लक्ष्मणही त्यांच्या सोबत जायला निघतो.तेव्हा सुमित्रा म्हणते,लक्ष्मणा,आता तुझे अयोध्येत काही काम नाही. तुझ्यासाठी जेथे राम असेल तीच अयोध्या. आजपासून सीता तुझी माता आणि राम पिता आहेत. त्यांची सेवा कर.
तेव्हा कौसल्या म्हणते,सुमित्रे,तू धन्य आहेस. आणि रामाला म्हणते की रामा,मैंं लक्ष्मण को तुम्हे सौप रही हू।
सुनील, धन्यवाद वेळेबद्दल.
सुनील, धन्यवाद वेळेबद्दल.
चाणक्य खूप छान चालू आहे.
मला raamaayanaapeksha चाणक्य जास्त आवडली.
कालचा रामायणातील अनुसुया आणि सीतेचा संवाद अगदी डोक्यात जाणारा होता. जरी तेव्हाच्या काळातला मानला तरी अजून बरेचजण तसाच विचार करतात हे दुर्दैव.
राम आणि ऋषींचे संवाद चांगले आहेत.
कालचा रामायणातील अनुसुया आणि
कालचा रामायणातील अनुसुया आणि सीतेचा संवाद अगदी डोक्यात जाणारा होता. जरी तेव्हाच्या काळातला मानला तरी अजून बरेचजण तसाच विचार करतात हे दुर्दैव.++++हो मलाही एक प्रश्न पडला आहे. एकीकडे म्हणतात भारतीय संस्कृतीत स्त्रीच्या मातृरुपाचे महत्त्व सर्वाधिक आहे(ते क्षणाची पत्नी अनंतकाळाची माता इ.इ) आणि एकीकडे "पतीही परमेश्वर है।मेरा परमकर्तव्य है पतीचरणों की एकनिष्ठ सेवा।मैं पती की दासी।जो भी है जैसा भी है है तो मेरा पती।सारे कर्तव्य एक तरफ,पती की सेवा सबसे श्रेष्ठ।"अशाप्रकारे संवाद अनेक मालिका, चित्रपटात असतात. नक्की काय आहे?
आणि अजून एक. एकीकडे सून ही घरची लक्ष्मी असे म्हणतात आणि दुसरीकडे विवाहात वधुमातापित्यांनी वराचे पाय धुण्याच्या विधीचे समर्थन करताना "मुलगी लक्ष्मीस्वरूप म्हणून जावई विष्णुस्वरूप मानला आहे. म्हणून विष्णूचे समजून पाय धुवायचे"असे सांगितले जाते. हेच अधिक महिन्यात जावयाला विष्णु समजून दान द्यायला सांगतात. Confusing आहे हे.
सॉरी प्राचीन जी तुमच्या धाग्यावर अवांतर केले.
(No subject)
५ एप्रिल.
सर्कस थोडी बघितली. दुसरीकडे
सर्कस थोडी बघितली. दुसरीकडे रजनी लागली होती तर त्यातही शाखा होता नंतर रवींद्र नाथांच्या कथेवर आधारित मालिका सुरु झाली, त्यात रूपा गांगुली होती. नंतर थोडी श्रीमान श्रीमती बघितली.त्यातले कृत्रिम हशे रसभंग करतात पण तरीही छान आहे. एकंदरीत मज्जा वाटतेय. खूप कलाकार आता नाहीत. ते असायला हवे होते असे वाटते. पूर्वी सगळे कसे दिसायचे आणि कसे कपडे घालायचे त्याची गंम्मत वाटते.
विक्रम वेताळ मालिका पण
विक्रम वेताळ मालिका पण दाखवावी. एपिसोडच्या शेवटी वेताळचे प्रश्न आणि राजा विक्रमची उत्तरे छान असायची.
व्योमकेश बक्शी सोबत तहकीकात
व्योमकेश बक्शी सोबत तहकीकात मालिका पण दाखवायला पाहिजे. मस्त डिटेक्टिव मालिका होत्या दोन्ही
विक्रम वेताळ मालिका पण
विक्रम वेताळ मालिका पण दाखवावी+111
"एक शून्य शून्य" ही मालिका
"एक शून्य शून्य" ही मालिका दुरदर्शनने पुन्हा प्रसारित करावी, एकेकाळी फार आवडती मालिका होती ही.
मला तितकी मजा येत नाहीये
मला तितकी मजा येत नाहीये जुन्या मालिका बघायला जितकी तेव्हा बघताना आली होती. ह्या सगळ्या मालिका must not miss होत्या.
शक्तिमान चे संवाद नीट ऐकू च
शक्तिमान चे संवाद नीट ऐकू च येत नाहीत ..मागे ते फिशफिष ठ्याश ठ्यास चालू असतात आवाज
आज रामायणात शबरी च काम केलेल्या आजी च काम केवळ अप्रतिम..... गाणं पण मस्त होतं मागे लागलेलं...अरुण गोविल काय मस्त सात्त्विक दिसला आहे...अभिनय सगळ्यांचाच उत्तम...
खरंच आजचा भाग विशेषतः शबरीची
खरंच आजचा भाग विशेषतः शबरीची कथा फारच सुंदर... काय अप्रतिम अभिनय केला शबरीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने. कुठेही कृत्रिमता नव्हती. डोळे पाणावले तिची आर्त भक्ती पाहून.
खरंच आजचा भाग विशेषतः शबरीची
खरंच आजचा भाग विशेषतः शबरीची कथा फारच सुंदर.>> यावरून ही गोष्ट आठवली.
https://youtu.be/4zC1hThn9A0
Cigna the space city
Cigma the space city
Hi juni malika सुद्धा खूप छान होती ती सुद्धा परत दाखवावी
सह्याद्रीवर मुंबई दूरदर्शनचे
सह्याद्रीवर मुंबई दूरदर्शनचे जुने कार्यक्रम दाखवताहेत. संध्याकाळी 7.30 ला चिमणराव गुंड्याभाऊ असते. बाकी तेव्हाची 30 मिनिटांची नाटके, आरोही वगैरे कार्यक्रम. काल भीमसेन जोशींची भजने होती. त्यांना किती वर्षांनी पाहिले टीव्हीवर. पर्वा दिलराज कौर व अशोक खोसलाच्या गझला ऐकल्या. मी मोबाईलवर पाहते, त्यामुळे सलग पाहत नाही>>>>
धन्यवाद साधना.
चिमणराव गुंड्याभाऊ मस्त! ☺️
दुसरीकडे रजनी लागली होती तर
दुसरीकडे रजनी लागली होती तर त्यातही शाखा होता Happy
>>>
https://youtu.be/d-0fOYL9brM
हाच ना एपिसोड...
युट्यूबवर पाहिलेला मागे.. मजा येते तेव्हाच्या शाहरूखला बघायला. आणि यात शाहरूख हा शाहरुखचीच भुमिका करत होता हे विशेष
सह्याद्रीवर श्वेतांबरा दाखवत
सह्याद्रीवर श्वेतांबरा दाखवत आहेत.
ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की बघा.
एक नंबर भयाण मालिका.
श्वेतांबरा कोणत्या वेळी असते?
श्वेतांबरा कोणत्या वेळी असते?
आता सुरू होती.
आता सुरू होती.
उत्तर रामायण आजपासून रात्री
उत्तर रामायण आजपासून रात्री नऊ वाजता नवीन व सकाळी नऊ वाजता पुनःप्रसारित होणार आहे.
श्रीराम अयोध्येत परतले आहेत.
Pages