लॉक डाऊन मध्ये जनतेकरिता पुनःप्रसारित करण्यात येणाऱ्या जुन्या गाजलेल्या मालिका - रामायण व महाभारत व चाणक्य

Submitted by प्राचीन on 28 March, 2020 - 01:10

आज सकाळी रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण मालिका डी डी नॅशनल वर पाहिली. तशी ती नेटवर उपलब्ध आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर लोकांना बघायला मिळेल व टीव्हीवर अधिक चांगलं वाटतं बघताना. सुखद गोष्ट म्हणजे जाहिराती नव्हत्या. शिवाय पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे, तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे दूरचित्रवाणी संच नसल्याने त्यांच्यापैकी काहीजण आमच्याकडे येत मालिका बघायला. दर रविवारी सकाळी प्रसारण होई. आमच्याकडे रंगीत संच नसल्याने माझ्या मनात अजूनही कृष्णधवल रामायणाचीच स्मृती आहे. आता कदाचित बदल होईल त्यामधे.
यानिमित्ताने आणखी एक गंमतशीर आठवण झाली. माझ्या मामेभावाची मुंज नेमकी रविवारी होती. तेव्हा रामायण मालिका आमच्या नातलगांमध्ये एवढी आवडती होती, की माझ्या वडिलांनी मंगल कार्यालयात एका बाजूला घरातील दूरचित्रवाणी संच आणून ठेवला होता...
महाभारत मालिकादेखील प्रसारित होत आहे. जशी जुन्या
रामायणाचीच गोडी नंतरच्या काळात प्रसारित झालेल्या रामकथांहून अधिक वाटते, तशीच चोप्रांच्या महाभारताचीही कथा.. त्यामुळे, नेहमीच्या वेगवान जीवनमानाला सध्या जरा संथ असा जो घाट मिळू पाहत होता, त्यामध्ये वेळेची थोडी का होईना, तोशीस (urge ला शब्द सापडला नाही) निर्माण झाली आहे. आणि तत्कालीन व्यक्तिचित्रणामधील सहजता बघताना अजून गंमत वाटते आहे.
चाणक्य मालिका शाळकरी वयात तितकी समजली नव्हती, अर्थातच तेव्हा तेवढे आणि तत्संबंधी वाचनही झाले नव्हते. आता कदाचित जरा जाणून घेता येईल , असे वाटते.
चॅनल व वेळ -
रामायण : सकाळी ९.०० व रात्री ९.१५ - DD NATIONAL महाभारत : दुपारी १२.०० व रात्री ७.०० - DD BHARATI
चाणक्य :रात्री १०.०० - DD NATIONAL

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो छान झाला तो भाग जेव्हा श्रीराम अयोध्येत परत येतात.
महाभारत मध्ये आज युधिष्ठिर द्युत खेळणार आहे. आणि सर्व हरणार आहे.

चिमणराव बारा किंवा तेरा भाग असतील आणि तेही सगळे दाखवले की नाही माहित नाही. दोन, तीन भाग बघितले. प्रभावळकर अति तोंडं करत होते (ओवर अकटिंग) असे आता वाटते पण लॉकडाऊन पूर्वीपर्यंत फार अप्रूप होते.
रामायण काही भाग मी बघितले. सकाळी दहाशिवाय उठत नाही आणि ऑफिसचे काम रात्री साडेदहा किंवा साडेनऊ पर्यंत चालते त्यामुळे काही भाग अर्धेच बघितले. फार बोर वाटेल असे वाटले पण तसे काहीच न होता उलट कौतुक वाटले. तेहतीस वर्षांपूर्वी अशी मालिका काढायला किती मेहनत घ्यावी लागली असेल. प्रत्येक प्रसंगाला गाणं होतं पण कशाला आता परत असं वाटलं नाही. काही गाणी तर अतिशय सुमधुर आणि समयोचित होती. आम्ही घरात सहा माणसं एकत्र बघत होतो त्यामुळे बरीच चर्चा, कधी कधी हशे अशी मजा आली. एकटीने बघितले असते तर कदाचित एव्हडी मजा आली नसती. लवकर आटपून टाकली असे वाटले, रिपीट दाखवायला हवे होते.
भारतीवर तुंनू की टीना (हा खूप पूर्वी बघितला होता) आणि रुई का बोझ हे दोन चित्रपट बघितले, दोन्ही छान होते. इधर उधर नावाची मालिका दाखवत आहेत जी मी पूर्वी कधीच बघितली नव्हती. सुप्रिया पाठक, दीना पाठक आणि रत्ना शाह-पाठक अशा मायलेकी आहेत. मालिका खास नाही.
रेट्रो नावाचे चॅनेल नवीन आहे की जुने माहित नाही पण गाणी दाखवतात त्यावर.

टाटा स्काय कॉमेडीवर ये जो है जिंदगी पाहिलं. स्वरुप संपतचा अभिनय अगदीच शाळकरी वाटला.
सतीश शहा, राकेश बेदी क्लास. शफी इनामदार एफिशियंट.

दोन एपिसोड पाहिले . अजिबात हसू आलं नाही.
काळ बदलला, आपण बदललो की तो विनोद शिळा झाला?, बाळबोध झाला?

तेच पु लंच्या वार्‍यावरची वरात मध्ये शेक्सपियरचं अमेरिकेतलं थडगं किंवा पुलंचं नाव इथल्या मातीत मिळून जावो ऐकताना हे पाठ असूनही अजुनही हसू येतं.

बुनियादचा सुरुवातीचा भाग थोडा बघितला. काहीच कळत नव्हतं. घाटगे आणि कवलजीतला बघून मात्र डोळ्यात बदाम.
वार्यावरची वरात सह्याद्रीवर दाखवतात. मोघे आणि पुलं काय बोलतात मला कळतच नाही. मोघे एवढे घट्ट कपडे घालतात की ते कधीही फाटतील असं वाटतं Proud

कवलजीतला जाहिरातीत बघितलं मी, आला नव्हता तो मालिकेत. साराभाई पण दाखवणार होते कुठेतरी. सिंधू दाखवणार आहेत आता झी मराठीवर. कॉमेडीची बुलेट ट्रेन दाखवत आहेत कलर्सवर.

ह्या लॉक डाउन मध्ये न चुकता रामायण महाभारत बघतेय, आधी घरचे बघतायेत म्हणून अन नंतर आवडायला लागले म्हणून. सध्या उत्तर रामायण चालू आहे, छान वाटले बघायला, आज तर अक्षरशः डोळ्यात पाणी आले शेवटाला, खूप छान वाटले.

फक्त एक गोष्ट खटकली स्व जो, लहानपणापासून ओव्हर आकटींग माणूस आहे हा, तो दुसरा मुलगा किती गोड वाटतो☺️

काल सह्याद्रीवर आशाच्या दहा गाण्यांचा एक कार्यक्रम होता. आधी दोन तीन वेळा पाहिलाय. सुधीर गाडगीळ आशाशी गप्पा मारताहेत. तिथे समोर एका सोफ्यावर एक मोठे कुटुंब बसले आहे. गप्पांमध्ये गाणी ( किंवा गाण्यांच्या मध्ये गप्पा) तर गाण्यांचं रेकॉर्डिंग आधी वेगळं करून ठेवलेलं कारण प्रत्येक रेकॉ र्डिंगला आशाची साडी वेगवेगळी. सेट ही वेगळा असावा.

मलमली तारुण्यच्या वेळी चं दृश्य विचित्र होतं.

गप्पाही स्क्रिप्टेड अ सतात (म्हणजे पूर्वतयारी केलेली असते) त्यातही आशा अनेकदा उत्स्फूर्त भर घालतेच. पण सुधीर गाडगीळ मात्र स्क्रिप्टला चिकटून.

आशाने एका दिवसात सात गाणी रेकॉर्ड केली होती त्याबद्दल विचारून झाल्यावर 'जिवलगा कधी रे येशिल पा?\ पाहायचं ठरलं. आशाने हे त्या सात गाण्यांतलं पाचवं होतं असं सांगितलं. सुधीरने ते न ऐकल्यासारखं करून हे गाणंही त्या सातांत होतं का? हो? मग कितव्या क्रमांकावर होतं? असं विचारलं.

सुधीर गाडगीळांचा 'आमची पंचविशी' आठवतोय का कुणाला?

फक्त एक गोष्ट खटकली स्व जो, लहानपणापासून ओव्हर आकटींग माणूस आहे हा,
>>>
तसे असते तर पुन्हा कृष्णाच्या भुमिकेत तो आपल्या भेटीला आला नसता Happy

बाकी कसला क्मालीचा गोड दिसत होता... डोळ्यात बदाम बदाम बदाम ..

काल सह्याद्रीवर आशाच्या दहा गाण्यांचा एक कार्यक्रम होता. आधी दोन तीन वेळा पाहिलाय. सुधीर गाडगीळ आशाशी गप्पा मारताहेत. तिथे समोर एका सोफ्यावर एक मोठे कुटुंब बसले आहे. गप्पांमध्ये गाणी ( किंवा गाण्यांच्या मध्ये गप्पा) तर गाण्यांचं रेकॉर्डिंग आधी वेगळं करून ठेवलेलं कारण प्रत्येक रेकॉ र्डिंगला आशाची साडी वेगवेगळी. सेट ही वेगळा असावा. >>>>>>>>> तो कार्यक्रम बघितल्याच अन्धुकस आठवतय. त्यात ' तरुण आहे रात्र अजूनही' गाण होत ना? त्या गाण्याच्या व्हिडिओत तरुणपणीची मृणाल कुलकर्णी होती.

फक्त एक गोष्ट खटकली स्व जो, लहानपणापासून ओव्हर आकटींग माणूस आहे हा, तो दुसरा मुलगा किती गोड वाटतो☺️

Submitted by VB +1111 अगदी अगदी

Pages