मूर्ख कावळा आणि त्याला ‘मामा’ बनविणारी कोकिळा
कावळ्याचा परिचय कुण्या भारतीयाला करून द्यायची आवश्यकता नाही. आपल्या बालपणी ‘एक होता काऊ, एक होती चिऊ’ असं आपल्याला शिकविलं जातं. कावळ्याचा धूर्तपणा आणि चिमणीची निरागसता आपल्या मनावर ठसवली जाते. पंचतंत्रातल्या गोष्टी आणि लोककथांचा आपल्या मनावर ठसा उमटतो. मग आपल्याला जग तसंच वाटतं.
खरे तर, कावळा तहानलेला असताना माठात खडे टाकून पाण्याची पातळी वर आणायचा प्रयत्न करील काय? त्याला एवढी बुद्धी आहे का? महिनो गणती पक्षी दररोज त्याच घरी त्यात आरशातल्या वा खिडकीच्या काचेतील स्वतःच्या प्रतिबिंबाला टोचण्या का मारतात? खरे तर, माकडापर्यंतच्या उत्क्रांती पावलेल्या कुठल्याही प्राण्याला आरशाचा अर्थच समजत नाही. तो फक्त चिंपांजी आणि त्यापेक्षा जास्त बुद्धिमान असलेल्या प्राण्यांनाच समजतो.
भारतात सर्वत्र आढळणारा कावळा वाळवंटापासून बर्फाळ प्रदेशापर्यंत स्वतःला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा पक्षी आहे. त्याला खायला काहीही चालते अगदी खरकट्या पासून तर मेलेल्या प्राण्याच्या मांसापर्यंत. तसेच पक्ष्यांची छोटी पिल्लं पळविण्यात ही तो तरबेज आहे. अगदी हॉटेल मालकाची नजर चुकवून भजी, इतर खाद्य पदार्थ सुद्धा तो पळवितो. गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे मृत जनावरांची कलेवरं संपवायची जबाबदारी काही अंशी घारींसोबतच कावळ्यांवर येऊन पडली आहे.
दुसऱ्या पक्ष्यांची पिल्ले पळविणारा कावळा स्वतःच्या घरट्याचे, पिल्लांचे संरक्षण मात्र खूप आक्रमक पद्धतीने करतो. घरटे बांधणीसाठी चिवट काड्या काटक्या सोबतच बारीक तारांचा उपयोग सुद्धा तो करतो. त्यामुळे त्याचे घरटे खूपच मजबूत असते. एप्रिल ते जून मध्ये कावळ्याची वीण होते. घरटी असलेल्या झाडावर चुकुनही चढणाऱ्या माणसाला ते टोचण्या मारून हैराण करून सोडतात. पण धूर्त कावळ्याची वीण होते त्या वेळेसच त्याला मूर्ख बनविण्यासाठी दुसरा पक्षी तयार असतो. तो म्हणजे कोकीळ!
कोकीळ नर चमकदार काळा रंगाचा असून त्याचे डोळे गूंजी सारखे लाल असतात. मादी मात्र तपकिरी रंगाची असून त्यावर पांढरे ठिपके आणि पट्टे असतात. आपल्याकडे कोकिळा सुंदर गाते गैरसमज आहे. खरेतर ‘कुहुss कुहुss’ गातो तो नर कोकीळ, मादी नव्हे!
मादी केवळ ठीक ‘पीक ‘पीक क्यू’ असा कर्कश आणि तुटक आवाज काढू शकते. सांगायचे असे की कोकिळेची विण सुद्धा एप्रिल ते जून ह्या काळातच असते. पण, कोकीळ कधीच स्वतःचे घरटे बांधीत नाही. तर कोकिळा स्वतःची अंडी कावळ्याला मूर्ख बनवून त्याच्या घरट्यात घालते आणि कावळ्याची स्वतःची अंडी घरट्याच्या बाहेर फेकून देते.
पण आपल्याला वाटते तितके हे सोपे नसते. कारण कोकीळ काही गडबड करेल असा संशय कावळ्याला असतोच. कावळीणीने अंडी घातल्यानंतर नर कोकीळ आपल्या एकसारख्या ‘कुहुss कुहुss’ कुंजनाने त्या अंडी उबविणार्या कावळीणीला आणि घरट्याचे संरक्षण करणाऱ्या कावळ्याला त्रासवून सोडतो. नर कावळा नर कोकिळेचा पाठलाग करून त्याला दूरपर्यंत हुसकावून परत येतो. पण नर कोकीळ पुन्हा पुन्हा ‘कुहुss कुहुss’ चा राग आळवत राहतो. सुरुवातीला मंजूळ वाटणाऱ्या ह्या ‘कुहुss कुहुss’ची पट्टी चढत जाऊन शेवटी कर्कश होत जाते. पुन्हा-पुन्हा कोकिळेचे घरट्याजवळ धडक मारणे त्या कावळ्याच्या जोडप्याला असह्य होते. त्यामुळे चिडून जाऊन कावळा-नर-मादी दोघेही मिळून नर कोकिळेचा पाठलाग करतात. ह्याच संधीची वाट बघत मादी कोकिळा जवळपास पानोर्यात दडून बसलेली असते. तिची अंडी घालायची वेळही येऊन ठेपलेली असते. ती लगेच कावळ्याच्या घरट्यात स्वतःचे अंडे घालून कावळ्याचे अंडे चोचीत धरून फेकून देते. तिकडे नर कोकीळ कावळ्यांना दूरपर्यंत घेऊन जातो. कावळे परत येईपर्यंत मादी कोकिळा आपला कार्यभाग साधून उडून गेलेली असते.
बरेचदा ती गडबडीत कावळ्याचे अंडे फेकायचे सोडून देते. कावळ्याची आणि कोकिळेची अंडी रंग आणि आकाराला हुबेहूब एकसारखीच दिसतात. निसर्ग कोकिळेचीच साथ देतो. परत आलेल्या कावळ्यांना घरट्याकडे बघून काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो. पण नेमके काय झाले असावे ते त्यांना कळत नाही. समजा घरट्यात एखादे अंडे जास्त असले तरीही कावळ्यांना मोजता थोडीच येते? (समजा एक अंडे जास्त असल्याचे त्यांना कळाले असते तरीही आपले ते कोणते आणि परके ते कुठले हे ओळखणे निश्चितच अशक्य ठरले असते). कधीकधी काही कावळ्याच्या घरट्यात पाच ते दहा अंडी सुद्धा आढळून आली आहेत. त्यात कोकिळेचे योगदान किती ते शोधणे मजेशीर असेल!
मूर्ख (की मामा?) बनलेले कावळे घरट्यातील सर्वच अंडी उबवतात. सर्व पिल्लांना स्वतःची समजून प्रेमाने भरवितातही. हळूहळू पिल्लं बाळसं धरतात. त्यांना पंख फुटायला लागतात. ते आवाज करायला लागतात. अनेकदा तर कोकिळेची पिल्लं कावळ्याच्या पिल्लांना घरट्यातून खाली ढकलून देतात.
तिकडे आपल्या घरट्यात मोठी होत असलेली पिल्लं आपल्यासारखी दिसतही नाहीत आणि आवाजही विचित्र करतात हे बघून कावळ्यांचे जोडपे साशंक होते. आपल्या सोबत धोका झाला आहे त्यांना हळूहळू उमजते.
आता ह्या पिल्लांना असं जिवंत सोडायचं नाही असं त्यांना वाटत असेल. पण तोपर्यंत कोकिळेची पिल्लं आपल्या बीनभाड्याच्या सावत्र आई वडिलांचे घरटे सोडून उडून गेलेली असतात. अर्थात कधी कधी अशी पिल्लं कावळ्याकडून मारली सुद्धा जातात.
अशाप्रकारे आळशी कोकीळेचा वंश अजूनही टिकून आहे आणि मूर्ख कावळे कोकिळेच्या पिलांना वाढवतच आहेत. आम्ही बालपणी ऐकलेल्या गोष्टीतील ‘चतुर कावळ्याला’ मामा बनविणारा पक्षी सुद्धा आहे तर!!
कावळे कोकिळेच्या पिल्लांना भरविताना : विडिओ
https://www.youtube.com/watch?v=GtCQAOStdFM
https://www.youtube.com/watch?v=J4WV7s16pSY
एक छायाचित्र: https://www.facebook.com/wildlifephotographyindia/photos/a.9203393947024...
डॉ. राजू कसंबे, मुंबई
(पूर्व प्रकाशित: दैनिक मातृभूमी 18 जुलै 2002).
ता.क.:
कोकिळेची परभुत विण (Brood Parasitism) यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी उत्क्रांत पावल्या आहेत. त्यापैकी काही म्हणजे:
१. नर कोकीळ रंग – आकाराला कावळ्यासारखा दिसतो. त्यामुळे संधीप्रकाशात त्याच्याकडे दुर्लक्ष होते.
२. मादी कोकीळ चुट्ट्या बुट्ट्यांची असल्यामुळे संधीप्रकाशात सहजी दिसून पडत नाही.
३. कोकिळेच्या अंड्यांचा ऊबवणीचा कालावधी कावळ्यांच्या उबवणीच्या कालावधी पेक्षा कमी असतो. जेणेकरून कोकिळेची पिल्लं आधी जन्माला येतात. ह्या पिल्लांना जन्मताच घरट्यातील इतर पिल्लांना किंवा अंड्यांना घरट्याबाहेर ढकलून द्यायची उपजत प्रवृत्ती असते.
४. कोकिळेची पिल्लं आधी जन्माला आल्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसात भरपूर खाऊन बऱ्यापैकी सुदृढ बनतात व त्यांच्या जगण्याची संभावना वाढते.
छानच आहेत कावळेदादा.
छानच आहेत कावळेदादा.
कोतवाल पक्षी उंच काळाकुट्ट
कोतवाल पक्षी उंच काळाकुट्ट लांब शेपटीचा असतो असं वाटतं.>>>>
चिमणी किंवा तिच्यापेक्षा अर्धा एक इंच इकडे तिकडे इतकाच उंच असतो.
आपल्याला आजूबाजूला शहरात दिसतो तो वर फोटोत आहे तसा Y आकाराच्या शेपटीचा. याचे अजून बरेच चुलत भाऊ आहेत जे सहसा शहरात येत नाहीत.
वरचे कावळ्याचे फोटो बघून
वरचे कावळ्याचे फोटो बघून मुक्तपिठमधला 'लाडू कावळा' हा लेख आणि खालच्या जगज्जेत्या प्रतिक्रिया आठवल्या. कुणाला आठवतोय का तो?
कावळा दिवसभर येऊन पाणी पितोय
कावळा दिवसभर येऊन पाणी पितोय
इतकी तहान लागतेय की भुकेपोटी???
वो शातिर कौआ पानी पिनेका नाटक
वो शातिर कौआ पानी पिनेका नाटक कर रहा होगा. न जाने मालकिनकू दया आये आवूर रोटी दे दे खानेकू.
हेहे
हेहे
रोज देते त्याला.
सकाळी तांदूळ दिलेले. ते संपले, आता गहू ठेवलेत.
काल वाडी ठेवायची होती म्हणून. नाहीतर मी शक्यतो शिजवलेले अन्न देत नाही प्राणी/पक्ष्यांना.
एकच कावळा परत येतोय हे कसे
एकच कावळा परत येतोय हे कसे समजते ? पाणी उपलब्ध आहे हे त्यांच्या भावकीत सर्वाना माहीत असु शकेल तर मग एकावेळी एक असे अनेक कावळे हजेरी लावत असतील का ? आणि खरेच असे असेल तर मग ही शिस्तबद्धता फक्त पाणी पिताना का दाखवत असतील ? कारण एखादा पोळीचा टुक़डा फेकला तर पटकन चार कावळे जमा होतात आणि प्रसंगी भांडतातसुद्धा !!
मग एकावेळी एक असे अनेक कावळे
मग एकावेळी एक असे अनेक कावळे हजेरी लावत असतील का ? आणि खरेच असे असेल तर मग ही शिस्तबद्धता फक्त पाणी पिताना का दाखवत असतील ?
नवीन Submitted by अज्ञानी on 26 March, 2020 - 14:51
कोरोना मुळे
कोरोना मुळे Rofl
कोरोना मुळे Rofl
नवीन Submitted by पाथफाईंडर on 26 March, 2020 - 15:01
>>>> ओह्ह !! १ मीटर अंतरचा फंडा का _/\_ ओके
--------------
मला हे प्रश्न कावळ्या बाबत खरेच पडलेले आहेत. कारण बुलबुल पक्ष्याना मी आमच्या खिड़कीत खाऊ ठेवतो तेव्हा किमान ५ ते ६ बुलबुल पक्षी एकत्र येत असतात आणि खाताना मात्र ते एकटा किंवा फार तर जोडीने खाऊ खातात. बाकीचे तेव्हा खिड़कीच्या ग्रिलमध्ये वेटिंग करतात.
आमच्या कावळ्यांनी आम्ही ओळखतो
आमच्या कावळ्यांनी आम्ही ओळखतो
जोक्स अपार्ट, गेल्या वर्षी 1 कावळा इतरांबरोबर यायचा. पिल्लू नव्हते, व्यवस्थित वाढलेला होता. तो कधीच चोचीने अन्न उचलून खायचा नाही. इतर खात असायचे त्यांच्या मागे फिरायचा चोच उघडून... कधी ह्याच्या तर कधी त्याच्या. त्यांच्यातला कोणी चोचीत काहीतरी ढकलायचा, तेवढेच हा खायचा. माझी मुलगी म्हणायची की त्याला कसलीतरी disorder असणार म्हणून तो असे करतोय. नंतर कधीतरी यायचा बंद झाला.
मग एकावेळी एक असे अनेक कावळे
मग एकावेळी एक असे अनेक कावळे हजेरी लावत असतील का ? आणि खरेच असे असेल तर मग ही शिस्तबद्धता फक्त पाणी पिताना का दाखवत असतील ?
ह्याला pecking order म्हणतात. छोटे पक्षी मोठ्या पक्ष्याला प्रथम पाणी पिऊ देतात. तसेच कमजोर पक्षी बलदंड पक्ष्याला आधी पाणी पिऊ देतात. शिकारी पक्षी असेल तर मग बाकी सगळे पळूनच जातात.
धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद डॉक्टर
त्यांच्यातला कोणी चोचीत
त्यांच्यातला कोणी चोचीत काहीतरी ढकलायचा, तेवढेच हा खायचा.>>>>>ऐतेन.
माझ्या एका नातलगाकडे ठराविक वेळेला एक कावळा येऊन खिडकीवर शांत बसायचा.ती वेळ, हिच्या चपात्या करण्याची असायची.माग गरम गरम चपती घेऊन की खाऊन तो जायचा.विश्वास बसला नव्हता त्यावेळी.
माझा बोका एस दुधात ताजी पोळी
माझा बोका एस दुधात ताजी पोळी कुस्करून दिली तरच खायचा... शिळी पोळी दिली तर वास घेऊन वाटी पुढे ढकलायचा. मी खूप शिव्या द्यायचे त्याला. मी मांदेली माशांची डोकी त्याला द्यायचे, एकदा अख्खया मांदेल्या दिल्या तर त्याने सगळ्यांची डोकी व्यवस्थित बाजूला ठेऊन उरलेले मासे खाल्ले आणि माझयाकडे प्रेमाने बघायला लागला. माझे डोळे भरून आले त्याचे प्रेम बघून. नंतर एकदा त्याचा पाय मोडुन बरा झाल्यावरही मला बघताच तो लंगडायचा आणि मीही लगेच माझे बाळ का लंगडतेय म्हणून उचलून घ्यायचे. मुलगी शिव्या द्यायची, साला नौटंकी
हा हा हा! आमचा मोती भाऊ
हा हा हा! आमचा मोती भाऊ सुध्दा ताजी पोळीच खातो. वर रोज ब्रिटानिया मारीचा दहा रुपयांचा बिस्कीट पुडा लागतो. शिळी पोळी टाकली तर स्वत:ही खात नाही आणि चिमण्यांना सुध्दा खाऊ देत नाही. साजूक तुपाचा शिरा दिला वाटीभर की खाऊन झाल्यावर इतकं प्रेमानं डोळ्यात पाहतो की असे वाटते कुणी ऋणानुबंध असलेला जीव आला आहे आपल्या घरी.
हा हा हा! चालूद्या
हा हा हा!
चालूद्या
हीहीही. चालूच ह्ये.
हीहीही. चालूच ह्ये. करीना मावशी बरी आहे ना?
>>माझा बोका एस दुधात ताजी
>>माझा बोका एस दुधात ताजी पोळी कुस्करून दिली तरच खायचा... शिळी पोळी दिली तर वास घेऊन वाटी पुढे ढकलायचा.
स्वीट. यावरुन मध्ये बघितलेला कॅट व्हिडिओ आठवला. दोन मांजरांपैकी एकाने आधी खाऊची वाटी स्वतःकडे ओढली आणि खास न वाटल्याने उदार मनाने समोरच्या मांजराकडे पंजाने ढकलली. अर्थात त्यानेही ती ढकलून साभार परत केली. ही ढकलाढकली बराच वेळ चालली.
Pages