हो मला हा प्रश्न कधी पासून विचारायचा होता. म्हणजे जाणून घेण्याची उत्सुकता होती . तशी मी गेल्या दोन तीन वर्षांपासून जास्त प्रवास करतेय . किव्वा प्रवास करायला सुरवात केली . त्याच्या आधी खूप कमी प्रवास करत होते . त्यामुळे त्यावेळी सरधोपट ड्रेस च्या घड्या करून टॉप्स चा घड्या करून थोडक्यात सगळे कपडे घड्या करून एकावर एक ठेऊन सगळ्या बॅगा भरत होते. त्याव्यतिरिक्त ज्वेलरी ठेवण्याकरता , कॉस्मेटिक्स/ प्रसाधन साहित्य ठेवण्याकरता दोन वेगवेगळे ट्रान्सपरंट पाऊच वापरले कि झालं . त्यानंतर कॅमेरा जो चार एक वर्षांपूर्वी नेत होते ( आता नाही नेत ) आणि मोबाईल /चार्जर्स / अडाप्टर / आजकाल मोनो पॅड आणि बेसिक औषध भरली कि संपली बॅग भरण . सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात वरती टॉवेल ने सगळी बॅग झाकली आणि बॅगेचे पट्टे लावले कि सुफळ संपूर्ण . वरती बॅगेला कुलुप लावणं मस्ट होत माझ्याकरता अर्थात दोन वर्षांपूर्वी . आता ते पण लावत नाही . फक्त विश्वास ठेवते आणि अजून तरी विश्वासाला तडा गेलेला नाहीये.अर्थात बॅगेला कुलूप न लावणे हे सगळॆ लाड विमान प्रवासाकरता हे माहित आहेच
असो तर अशा पद्धतीने पूर्वी बॅग भरत होते पण एकदा माझे ते एकावर एक कपडे ठेवलेले मैत्रिणीने बघितले आणि म्हणाली "अशी काय बॅग भरतेस ? अग सगळ्या ड्रेसच्या / टॉपच्या आणि जीन्स च्या पण गुंडाळ्या करून ठेवल्यास ना तर खूप कपडे मावतात आणि इस्त्री पण मोडत नाही. तिने मला "प्रात्यक्षिक" पण करून दाखवलं म्हटलं "ठीक आहे पुढच्या वेळे पासून तस करून बघू "आणि तिने सांगितल्या प्रमाणे बॅग भरायला सुरवात केली आणि जाणवलं "हो अरे तिने म्हटल्याप्रमाणे बरेच ड्रेस / टॉप्स मावतात कि" . कुठेही थंड हवेच्या ठिकाणी जायच असल कि स्वेटर्स आणि स्वेट शर्ट/ जॅकेट्स ने खूप जागा अडते आणि बॅग पण जड होते . पण आता तास फारस जाणवत नाहीये . मग बॅगा कशा भरायच्या याच तंत्र च शिकून घेतलं . ट्रॅव्हल क्युब्स नावाचा प्रकार असतो हे तो पर्यंत माहितीच नव्हतं . त्या ऑनलाईन पर्चेस करता येतात याचा पत्ता लागला . सगळे रिव्ह्यू वाचले आणि मागवणार इतक्यात लक्षात आलं "अरे. माझ्या कडे एक्स्ट्रा साडी कव्हर्स आहेत कि . ती आपण क्युब्स सारखी वापरू शकतो . "मग तशी वापरायला सुरवात केली आणि बॅग भरणं सुटसुटीत झालं . प्लास्टिक किंवा इतर मटेरियल च मल्टी पर्पझ झिपलॉग छोटे पाऊच आणले आणि त्यात सगळी ज्वेलरी / औषध ठेवायला सुरवात केली . भारताबाहेर गेले तर पासपोर्ट -पैसे सगळं हॅन्ड बॅग मध्ये आणि एका पाऊच मध्ये . अडाप्टर आणि चार्जर ट्रान्सपरंट पाऊच मध्ये . प्रवासी बॅग मध्ये लाईट वेट छत्री मस्ट . माझ्या करता दोन चपलांचे जोड एक हॅन्डबॅग मध्ये एक कार्गो बॅग मध्ये एक हे पण कंपलसरी . काही विचारू नका . बऱ्याच नव्या नव्या गोष्टींची भर पडत गेली . थोडक्यात आता माझी प्रवासी बॅग वेगळ्या पद्धतीने भरली जाते.
आता तरी एकदाच आठवतंय नंतर जस जस आणखीन काही आठवलं तर लिहीनच
तर तुम्ही तुमची प्रवासी बॅग कशी भरता ? तुमच्या कडून जाणून घ्यायला आवडेल
मी पण साडी कवर वापरते बॅग
मी पण साडी कवर वापरते बॅग भरतान .
एकतर छोटे छोटे कपडे शोधायल बरे पडतात आणि दूसर म्हणजे कपड्यान्चे वर्गिकरण सोपे होते .
हे तुझे , हे माझे , हे देवळात घालायचे वगैरे वगैरे
१) गुंडाळ्या करून ठेवल्यास ना
१) गुंडाळ्या करून ठेवल्यास ना तर खूप कपडे मावतात आणि इस्त्री पण मोडत नाही.
- बरोबर. ही पद्धत ट्रेकिंगवाल्यांची.
२) एक कापडी कप्पा (जुन्या पर्समधून काढलेला, चेनवाला) आतमध्ये शिवलेला असतो. त्यात मोबाईल टाकल्यास तो वजनाने ब्यागेच्या तळाशी जात नाही. एक्सट्राचे पैसेही ठेवता येतात.
३) क्लोकरुममध्ये ब्याग ठेवायची झाल्यास चेनला पिटुकले कुलुप असावे लागते.
४) विआइपी टाइप चाकांची ब्याग मात्र फार अडचणीची आणि बोजड होते.
फोटो पोस्ट करा दोन, तीन
छान माहिती.
फोटो पोस्ट करा दोन, तीन स्टेजेसचा बॅग भरताना.
Amazon वर पॅकिंग cubes मिळतात
Amazon वर पॅकिंग cubes मिळतात. कपडे नीट गुंडाळी करायचे आणि त्या cubes मध्ये ठासून भरायचे. वेगवेगळ्या कपड्यांचे वेगवेगळे cubes. चेन लावली की आतला कपडा ढिम्म हलणार नाही इतके भरायचे.
यामुळे बॅगेत जरी cubes टाकले तरी इस्त्री मोडत नाही, कमी जागेत भरपूर कपडे मावतात आणि अंतर्वस्त्रे/बहिरवस्त्रे/वापरलेले/न वापरलेले असे वर्गीकरण सोप्पे होते.
Cubesला जाळी असते थोडी, त्यात आतले कपडे दिसतात, तयामुळे उगीच 1 का कपड्याची सगळे कपडे खालीवर करा असे होत नाही.
कपड्यांचे सेट करून गुंडाळी करायची. म्हणजे सलवार कमीज ओढणी, साडी ब्लाउज परकर, सोबतचे दागिने वगैरे एकत्रच गुंडाळी. कपडे कसे घालणार तसे ठेवायचे. सगळ्यात शेवटच्या दिवशी घालणार ते तळाला व त्यावर हळूहळू एकेक दिवस मागे येत असे.
प्रवासात भारी दागिने न नेलेले बरे. खोटे असले तर हरवले तरी दुःख नाही.
https://www.amazon.in/AmazonBasics-Packing-Cubes-Travel-Organizer/dp/B07...
मी हे घेतलेत. थोडे महाग होते पण भरपूर टिकले, अजूनही वापरतेय, जाळी फाटलेली नाही.
क्यूब हा प्रकार माहिती नव्हता
क्यूब हा प्रकार माहिती नव्हता. पण गुंडाळी करून भरण्याची पद्धत मीही वापरते गेली एकदोन वर्षे. कुठे चार दिवस फिरायला जाताना एकदोन मोठ्या (कापड दुकानात मिळतात तशा) रिकाम्या प्लास्टिक किंवा कापडी पिशव्या नेतो सोबत. परत येताना सगळ्यांचे धुवायचे कपडे एकत्र करून त्या दोन पिशव्यांंत कोंबतो. म्हणजे आल्यावर थेट त्या पिशव्या वॉशिंग मशीनमधे रिकाम्या करता येतात.
डोकं झाकायला वेगवेगळ्या हॅट (
डोकं झाकायला वेगवेगळ्या हॅट ( दोन तीन आहेत माझ्याकडे ) आणि गॉगल , सनस्क्रीन लोशन हे पण भरते . मध्ये एकदा बॅग ची चेन नीट लागत नव्हती म्हणजे जेन च्या आजूबाजूला तूस निघायला लागली कि बॅगची चेन पटकन लागत नाही . तेव्हा पासून एक छोटीशी मेणबत्ती कायम बॅगमध्ये ठेवतेच ठेवते. काही जण तेलाचे पाऊच नेतात पण मला त्यात लीक होण्याची भीती वाटते म्हणून मी बिलक्रीम नेते .
Amazon वर पॅकिंग cubes मिळतात
Amazon वर पॅकिंग cubes मिळतात. कपडे नीट गुंडाळी करायचे आणि त्या cubes मध्ये ठासून भरायचे. वेगवेगळ्या कपड्यांचे वेगवेगळे cubes. चेन लावली की आतला कपडा ढिम्म हलणार नाही इतके भरायचे.
यामुळे बॅगेत जरी cubes टाकले तरी इस्त्री मोडत नाही, कमी जागेत भरपूर कपडे मावतात आणि अंतर्वस्त्रे/बहिरवस्त्रे/वापरलेले/न वापरलेले असे वर्गीकरण सोप्पे होते. >> बरोबर
हो धुवायचे कपडे ठेवण्याकरता
हो धुवायचे कपडे ठेवण्याकरता प्लास्टिक बॅग नेतेच नेते. चपलांचे जोड ठेव ण्याकरता अमेझॉन मधून वस्तू येतात ते एका काळ्या कापडी बॅग मधून येतात . त्या बऱ्याच आहेत माझ्या कडे . त्यात चपला ठेवते
विमान प्रवासात कपड्यांचा एक
विमान प्रवासात कपड्यांचा एक सेट कॅरी ऑन बॅग मध्ये ठेवणे गरज लागल्यास उपयोगी पडते. जसे लगेज उशिरा येणे.
माझ्या दृष्टीने माझी बॅग भरुन
माझ्या दृष्टीने माझी बॅग भरुन झाली की बायकोचा व मुलीचा त्यावर डोळा असतो. माझ्या दृष्टीने त्यांच्या ’ज्यादा व अनावश्यक”असलेल्या वस्तुंना त्यात भरपूर जागा मिळते.
माझ्या दृष्टीने माझी बॅग भरुन
माझ्या दृष्टीने माझी बॅग भरुन झाली की बायकोचा व मुलीचा त्यावर डोळा असतो.
अगदी अगदी +११११
"या चादरी,मफलर , तिकडे बसतील पाहा."
यावर मी उपाय काढलाय. तिन्ही ब्यागा मीच उचलून त्यांच्या पुढे चालतो. शेवटी रेल्वे मंत्रालयाला दया आली. त्यांनी ठिकठिकाणी लिफ्ट्स लावल्या.
मी वरील प्रमाणेच बॅग भरतो पण
मी वरील प्रमाणेच बॅग भरतो पण ती फक्त ८०% जागा भरतो. उरलेले २0% परत येताना बायको न पोरगी त्यांच्या खरेदी ने भरतात.
पाथफाईंडर लकी आहात. काहींच्या
पाथफाईंडर लकी आहात. काहींच्या बाबत हे प्रपोशन अगदी उलटे असते.
(No subject)
माझ्या दृष्टीने माझी बॅग भरुन
माझ्या दृष्टीने माझी बॅग भरुन झाली की बायकोचा व मुलीचा त्यावर डोळा असतो. माझ्या दृष्टीने त्यांच्या ’ज्यादा व अनावश्यक”असलेल्या वस्तुंना त्यात भरपूर जागा मिळते. >> कुणाचे काय तर कुणाचे काय
मी वरील प्रमाणेच बॅग भरतो पण ती फक्त ८०% जागा भरतो. उरलेले २0% परत येताना बायको न पोरगी त्यांच्या खरेदी ने भरतात. >> तो तर बायकांचा अधिकार आहे . मी पण खरेदीला जास्तीची कापडी बॅग घेऊन जातेच .
एकदा flight delay झाल्यामुळे
एकदा flight delay झाल्यामुळे पुढची हॉंगकाँगची connecting flight चुकणार होती. Airlines ने ५ स्टार मध्ये राहण्याची सोय केली होती पण कॅरीऑन बॅग मध्ये मी फक्त एक टॉप ठेवला होता. त्यामुळे कपडे बदलायला काहीच नव्हते. त्याच कपड्यात राहावे जेवावे लागले तेव्हापासून कानाला खडा..नेहमी आतील बाहेरील कपड्यांचा एक जोड कॅरी ऑन बॅगेत असतो. शक्यतो त्या बॅगेत कमीत कमी सामान पण लॅपटॉप व इतर गॅजेट्स मात्र त्यातच. तसेच एक पाउच मध्ये सर्व टॉयलेटरीज ज्यात अनुभवाने आता बरेच add झाले आहे
marie kondo चे विडिओ पाहिल्यानंतर आता कपडे तशाच घड्या करून ठेवते. सवयच लागली आहे. shoes पॅक करताना त्यामध्ये पण काही छोट्या वस्तू ठेवता येतात. चेक इन बॅग्स लॉक करत नाही. अजूनपर्यंत तरी कधीच काही गेले नाही पण दर वेळी बॅग चेक केल्याची पावती मिळते
क्युब्सची आयडिया आवडली. आता
क्युब्सची आयडिया आवडली. आता घेईन तशी. एक प्लास्टिक बॅग तशी असतेच म्हणा. specially बीच वर सुट्टी साठी गेले कि हमखास लागते , सॅण्ड लागलेले कपडे चपला ठेवायला
Travel fashion girl च्या
Travel fashion girl च्या वेबसाईटवर तिने खूप मस्त सल्ले दिलेत.
इतका प्रवास करणे माझ्या नशिबी लिहिले नाही घर ते ऑफिस प्रवासात आयुष्य संपले.