"वत्सला ताई, शांताला खूप त्रास दिलाय त्यांनी आन ती पूर्णपणे त्यांच्या हातातलं ख्येलन झाली हुती, आन मलाबी लै तरास दिला...ताई...ताई.."तो आवाज दूर गेला. वत्सल मागे वळली तशी एक झुळूक सूळकन बेडरूमच्या बाहेर गेली. ती गोदा, तिचा आत्मा होता. ती बरच काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला मर्यादा होत्या. हतबल होती...वत्सलने अंदाज लावला.पण आपला मोर्चा शांताकडे वळवला.
'शांता, तू अशी परत भाईर कशी आलीस? तू तर उद्या ईनार हुतीस न्हवं?"
"हो..वत्सला..…मावशी..पण आले...रहस्य जाणायचं आहे ना? मग तिकडे, त्या ठिकाणी यावं लागेल तुम्हाला..नविनला आन त्या देवकीचा म्हणजे देवकीचा प्राण वाचवायचा आहे ना? मग त्या ठिकाणी जावं लागेल...जिथे त्या शक्ती आणि बकुळा आहे."
शांता तिरकी हसत म्हणाली.
वत्सला विचारात पडली. ती शांताच्या या बोलण्याने आश्चर्य चकित झाली...कालपर्यंत ही मुलगी काही वेगळीच होती...आज वेगळीच आहे...हिच्या बोलण्यात एक जरब आहे...
"म मावशी, म्हणजे मला म्हणायचंय की आपण तिकडे जाऊन बोलूया का? ते तिथे नसताना...मी नीट सांगू शकेन"
"नग...जे काय बी हाय त्ये हितच सांग,तिकडे म्या येणं न्हाय व्हायाचं" वत्सलने स्पष्ट नकार दिला.
शांता थोडी वेगळी वाटली कदाचित. ती तर दुसऱ्या दिवशी येईन म्हणाली होती त्याला काही कारण होतं. मग दोनच तासात कशी काय आली? काहीतरी गडबड आहे हे वत्सल आत्याच्या लक्षात आले. पण त्या वेळे त्यांनी तसे दाखवले नाही. " असू दे शांता...उद्या रातच्याला बोलू आपन आताच्याला जाऊन आराम कर. रागाने कटाक्ष टाकत शांता तिच्या स्थानी परत गेली. वत्सल आत्या पण त्यांच्या मूळ देहात परत गेल्या. आता पहाटेचे चार वाजले. वत्सल आत्यानी ध्यान लावून काही तास लोटले होते. नवीन आणि देवकी तिथे हॉल मध्येच झोपले. बसल्या बसल्या. गंगा आणि डॉक्टरही बसल्या बसल्या डुलक्या काढत होते. सगळ्यांना शांता आल्यापासून मनस्ताप झाला होता. काही नवीन गोष्टी देखिल समजल्या होत्या. आणि आता काही तासांनी अव्या आणि विजय दोघेही मुंबईत लँड करणार होते....काही तासांचा अवधी होता.....शांतताही खायला उठली होती जणू ती पूर्ण घर खाणार होती. शांता निपचीत पडली होती. इतक्या वेळ लहान मोठ्या हादर्यानी हलणारे नवीनचे घर आता मात्र शांत होते.....वादळापुर्वी.........
पहाटेचे साडेपाच वाजले होते..
इकडे पारगावच्या आकाशातून एक हिरवा आणि एक लाल झोत आकाशातून जमिनीच्या दिशेने जाताना काही जणांनी पाहिला.एक जोरात हादरा बसला जमिनीला. काही ठिकाणी जमिनीला हलके तडे देखील गेले. मामुली पडझड झाली. विजेचा लोळ कोसळला असेल असा भास होता तो. काही सेकंदात परिस्थती पूर्ववत झाली. कुणाला माहित होत..जमिनीत नक्की काय झालाय ते...लवकरच गावात प्रचंड मोठा उत्पात व्हायचा होता कैक दिवस दडलेलं रहस्य उसळून विस्फोट व्हायचा होता. गावात हवा हलके हलकं बदलायला लागली होती. पण अजून कुणाच्या लक्षात आलं नव्हतं......येणारही नव्हतं....
त्या जंगलातल्या गुहेत बकुळा निपचित होती..पालथी पडलेली..शरीर अर्धवट जळलेल्या अवस्थेत. या आधीही त्यांनी तिला इज केली होती. पण लगेच बरं केलं होत. पण या वेळेस तिला तशाच अवस्थेत टाकलं होतं. खरंतर त्यांना तिची गरज होती.कारण त्या शक्तींनाच माहीत...
दुसऱ्या दिवशीचे सकाळी आठ वाजले. नवीन उठला. त्यापाठोपाठ देवकीलाही जाग आली. तिने काही आवश्यक सामान आणायला सांगितले. पण नविनने जाण्यासाठी नकार दिला. त्याला त्या शक्तींची भीती वाटत होती. देवकी वैतागली.पण तिने संयम ठेवला.आणि स्वतः बाहेर पडली.लिफ्ट मधून बाहेर येऊन थांबली आणि परत चालायला लागली.जाता जाता खालच्या मजल्यावर काही बायका बिल्डिंग भोवती घडणाऱ्या विक्षिप्त घटना, दहाव्या मजल्यावरून वेळीअवेळी येणारे आवाज या विषयी चर्चा करत असल्याचे ऐकले.देवकी समोरून जाताना पाहिल्यावर त्या गप्प बसलया. देवकी त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात त्या बायका तिथून निघून गेल्या. देवकी एकदम हिरमुसली. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण कशीबशी भावनांना आवर घालून सामान आणण्यासाठी पुढे गेली.आज नेहमीच्या दुकानात न जाता थोडी पुढेच गेली. तीही इकडे तिकडे चोरट्या नजरेने बघत होती. न जाणो कुठल्या बाजूने काय घडेल..! आणि सगळे लोक आपल्याकडे बघतात की काय असे वाटत होते तिला.मनाची अशी अवघड अवस्था. दूध, ब्रेड अस काही जुजबी सामान घेऊन ती परत निघाली. जरा जास्तच लांब आलोय याची जाणीव तिला झाली. जरासं गरगरायला होतय असं वाटत होतं...इतक्यात काहीतरी जमिनीतून आवाज यायला लागले. आणि जमिनीत कम्पने जाणवायला लागली.देवकीला तिच्याभोवती काही जाणवायला लागलं. आजूबाजूची लोकं बघायला लागली. कारण बाकी कुठेच कम्पने जाणवत नव्हती. मात्र देवकीचा तोल जायला लागला. अचानक जमिनीला एक मोठी भेग पडली. आणि ती रुंदावली. ढगांचे आवरण बाजूला सारल्यावर जसा सूर्यप्रकाशाची तिरीप येते तसा जमिनीतून लाल प्रकाश बाहेर आला. लोक बघून थक्क झाले. आणि पहाता पहाता देवकी गायब झाली. आणि जमिनीला पडलेली भेग छोटी झाली मात्र अवस्था आधी होती तशी नव्हती.
इकडे घरात फक्त गंगा , डॉक्टर आणि नवीन असे तिघेच होते. जवळ जवळ एक तास लोटला. सकाळचे दहा वाजले तरीही देवकी परत आली नाही म्हणून नवीनचा जीव खालीवर होत होता. इतक्यात माळ्यावर अस्वस्थ खुडबुड ऐकू आली. गोदाई कदाचित काही सांगण्याचा प्रयत्न करत असावी. आता मात्र काळजी वाढली. आणखी एक तास लोटला. तरीही देवकी आली नाही म्हणून नवीन आणखीनच बिथरला. त्याला पुन्हा त्रास व्हायला लागला. डॉक्टर होतेच, ते नविनला चांगलंच ओळखत होते. आता नवीन अधिसरखा।राहिला नव्हता. त्याला परत फिट्स चा त्रास होणे शक्य नव्हते. ते नवीन जवळ आले आणि त्यांनी त्याला सरळ उभे केले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. त्यांना काही वेगळी झाक जाणवली. ती म्हणजे स्वतःला भीतीची सवय करून दिल्याची, भीतीच्या स्वाधीन होऊन निद्रिस्त अशा नविनला खरोखर जाग होण्याची गरज होती. डॉक्टर टंडन आता नुसते त्याच्या डोळ्यात रोखुन बघत होते. नवीन काही मिनिटांनी सावध झाला. त्याने डॉक्टरना डोळ्यानेच आपण शांत झाल्याचे पापणी लवून सांगितले. नवीन गंगा जवळ गेला. तिला म्हणाला,"गंगा, आपल्याला देवकीचा शोध घ्यायला हवा. माझ्याबरोबर येतेस का? आपण आसपास जाऊन येवुया."
गंगा नविनकडे पाहून विषण्ण हसली. " चल जाऊ"
जणू तिला अघटीताची कल्पना असावी. देवकीचे परत न येणे घातकीच होते. याचा निश्चितच नवीनवर परिणाम होणार होता. वत्सल आत्या ध्यानात असल्याचा हा गैरफायदा उचलला होता. त्या तिथे असत्या तर त्यांनी नक्कीच देवकीला थांबवले असते.
पण डॉक्टर टंडन यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी नवीनला आणि गंगाला थांबवले. गंगाला आश्च्र्य वाटले," डॉट काय झालं? का थांबावलत ?.....वहिनीला शोधायला नको का?"
" सुनो बेटा...जस्ट थिंक, कल से नही चार पांच दिन से बकुळा या उस्के साठी इस घरमे आनेकी कोशिश कर रहें हैं. काफी बार उन्होने कोशिश की भी है....लेकिन कामयाबी नहीं mमिलपायीं . मला वाटत त्यांनीच देवकीला अग्वा केलाय. आणि तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हालाही ते सोडणार नाहीत. अगर वत्सलाचाची ध्यान मी नाही रहती तो येह अन्होनी होनसे रोक जरूर लेती. मुझे लगता है नवीन वो तुम्हे बाहर लानेके लिये यह सब कर रहें हैं. माहित नाही पण मला वाटतं तुम्ही जाऊ नका. विजयजी आणि अविनाश आल्यावर आपण पुढचं काय ते ठरवू.सब्र राखूया थोडासा...अन काही नसेल तर देवकी येईलच परत."
नवीन घेरी आल्यासारखा खाली पडला. डॉक्टरनी त्याला सावरलं आणि उचलून काऊच वर ठेवलं. इकडे बेडरूम मध्ये वत्सला आत्यांना हे नकारार्थी तरंग जाणवले. पण आ]ता त्या इतक्या अंतर्गत अवस्थेत पोचल्या होत्या कि त्यांना काही लगेच तिथून हलता येणार नव्हते. त्यांनी स्वतःला नियंत्रित केले. आणि आपल्या लक्ष्यावर पुन्हा केंद्रित झाल्या.
बाहेरच्या खोलीत आता मात्र गंगाची अवस्था पार बिकट झाली होती. तिला खूप रडायला येत होत. काही तासात होत्याच नव्हतं झालं होतं. पण काही इलाज नव्हता. तिला ते बाटल्यातले सॅम्पल्स घेऊन बंगलोरला पोचणं आवश्यक होत. तेहीं तातडीने. पण आता रस्ता बॅन झाल्यासारखं वाटत होत. झालाच होता.त्या शक्ती आता अनियंत्रित अवस्थेत आणि चेकाळल्या होत्या. या घडीला त्यांना रोखणार कुणीच नव्हता.
पारगावात जंगलाच्या दिशेने पुन्हा भूकंप आल्यासारखे जाणवले. सर्रर्रर्रर्रर्र करून काही जंगलाच्या दिशेने गेले. काही घरात काहीवेळ टी व्ही संच बंद पडले. काही ठिकाणी भांडी पडली. काही घरातली कोंबडी आणि जित्राप बिथरले. अर्थात त्या हिरवया आणि लाल शक्ती होत्या त्या. रात्री आकाशात भिरभिरणार्या शक्ती आता जमिनीखालून जात होत्या....आता तर दिवस आणि रात्र कशाचंच भय नव्हतं त्यांना. बकुळेला जीवे मारले होते कि काय....
क्रमश:
पुभालटा..
पुभालटा..
नलटा: नक्कीच लवकर टाकते
नलटा: नक्कीच लवकर टाकते
Fabulous
Fabulous
मस्त आहे.. link तुटू देऊ naka
मस्त आहे.. link तुटू देऊ नका. खुप दिवस gap पडला कि आधीचा इम्पॅक्ट कमी होतो वाचताना
आ वो मुक्ता ताई, माणसाने एक
आ वो मुक्ता ताई, माणसाने एक तर मुळात इतकं चांगलं लिहु नये, बरं लिहिलं तर मग असं वाचकांना ताटकळत ठेवु नये, आणि ठेवलं च तर मोट्ठा भाग टाकावा नं भन्नाट !!!!!!!!!!!!
आ वो मुक्ता ताई, माणसाने एक
आ वो मुक्ता ताई, माणसाने एक तर मुळात इतकं चांगलं लिहु नये, बरं लिहिलं तर मग असं वाचकांना ताटकळत ठेवु नये, आणि ठेवलं च तर मोट्ठा भाग टाकावा नं Wink भन्नाट !!!!!!!!!!!!
>>>>>> बरोब्बर
लवकर येउ दे ..विसरतजतोइय कथ
लवकर येउ दे ..विसरतजतोइय कथ
Happyanand, shitalkrishna,
Happyanand, shitalkrishna, प्रसन्न हरणखेडकर मनापासून धन्यवाद
Riya, मनापासून आभार
Riya, मनापासून आभार
मन्या s मनापासून आभार
मन्या s मनापासून आभार
कृपया पुढील भाग लवकर टाका
कृपया पुढील भाग लवकर टाका
सुजहरि, होय....:)
सुजहरि, होय....:)
कधी टाकणार पुढचा भाग?
कधी टाकणार पुढचा भाग?
मास्टरमाईंड ,पुढचा भाग आज
मास्टरमाईंड ,पुढचा भाग आज पोस्ट करीत आहे
धन्यवाद! वाट पाहतोय.
धन्यवाद!
वाट पाहतोय.
पुढ्चा भाग कधी ?
पुढ्चा भाग कधी ?
आज रात्री पोस्ट करिन पुढचा
आज रात्री पोस्ट करिन पुढचा भाग
पुढील भागाची वाट पहतोय.
पुढील भागाची वाट पहतोय.
पुढचा भाग पोस्टलाय
पुढचा भाग पोस्टलाय