समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याला 'कमी बजेट, कमी वेळात शूटिंग' असे म्हणतात ☺️☺️
तसे तर मोबाईल व्हॉटसप च्या जमान्यात मुंबईत राहून पण कुमार महाजन ची बायको नेहमीच साड्या का नेसतेय हाही प्रश्न आहे(की दाखवलंय तिला पंजाबी ड्रेस/जीन्स कुर्ता मध्ये आणि मी मिस केलं?)अर्थात कुमार संतापी असल्याने तिने सोडलं पंजाबी ड्रेस वापरणं असाही निष्कर्ष काढता येईल.

आणि कम्पनी गाडी देते , नोकर देते त्याला 3 व्यक्तींचे कुटुंब चालवायला पगार मात्र कमी देते , हेही खटकले.

पण कथानक मात्र सशक्त आहे

कम्पनी गाडी देते , नोकर देते त्याला 3 व्यक्तींचे कुटुंब चालवायला पगार मात्र कमी देते , हेही खटकले.
>>>>>
मी गडचिरोलीला सहा आठ महिने काढले आहेत. गाडी आणि नोकर मिळतो. मानमरातब मिळतो. पगार मात्र माझ्या आधीच्या खाजगी कंपनीपेक्षा कमी होता.
आणि मुंबईत बरेपैकी मोठ्या घरात फ्रिज ओव्हन टीव्ही वगैरे सर्व सोयीसुविधायुक्त घर होते त्याचे. महिन्याचा खर्च कमी नसणार...

शिव्या - मुंबईकरांनी मित्रांबरोबर अशा शिव्या (गां#, भो###, भें##) देणं अगदि कॉमन आहे. इथे अमेरिकेतहि आम्हि देतो. पण घरच्यांसमोर्/बायकोसमोर शिव्या हे माझ्याकरता तरी नविन आहे. गेल्या २५ वर्षात चित्र पालटलं असेल कदाचित. ऋन्म्या, प्लिज क्न्फर्म... Wink
Submitted by राज on 17 March, 2020 - 06:54
>>>>>

पुरुषांनी घरात शिव्या देणे सोडा, आमच्या जुन्या चाळीत काही बायकाही शिव्या द्यायच्या. घरातही द्यायच्या. मराठी लोकांबद्दलच बोलतोय हे. अगदी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याचेही होते यात. पण त्याचवेळी आमच्यासारखेही होते जे कधी घरी असताना च्याईला वा साला हा शब्द तोंडात आला तरी लागलीच तोंडात मारली जायची. पण त्याचवेळी मित्रांमध्ये असताना मी शिव्या नसलेले एक वाक्य बोलायचो नाही. घरी येताच १८० डिग्रीने बदल. थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रकृती हे मुंबईला जरा जास्तच लागू होते. त्यामुळे यात शॉकिंग असे मला तरी काही वाटले नाही.

पण येस्स, चित्रण करताना शिव्या शक्य तितक्या टाळाव्यात किंवा बीप बीप करावे या मताचा मी सुद्धा आहे.

बघतेय. ६ वा एपि चाललाय. म्हणून प्रतिसाद वाचले नाहीत.
जॉन टोन च्या शिफारशीची काय गरज नाही.
स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय>> हे मात्र खरं. त्याचा अभिनय चांगला म्हणावा का नाही काही कळत नाहीये Lol

त्याचा अभिनय चांगला म्हणावा का नाही काही कळत नाहीये Lol ~~~ Lol Lol
नाही हो..चांगल केलय काम तसं.. हे बघून मला एक मात्र जाणवलं की खरा हिरो असतो दिग्दर्शक.. ही पूर्ण चित्र त्याच्या मनात/डोक्यात तयार असतात.. आणि अभिनेत्यांकडून कसं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे.. यातच त्याच खर skill असतं.. जे राजवाडे अगदी perfect जमवतो.. नेहमीच..

स रा इज गूड.
स्व जो चे डोळे जास्तच बटबटीत वाटतात काहीवेळेला.

मला आवडली सीरीज.
एक प्रश्न.पहिल्यांदा पन्हाळ्याला जातो,तेव्हा कंपनीच पाठवते ना? गाडी,नोकर ..
मग तो अचानक परत का येतो? परत आल्यावर ही २-३ दिवस (अंदाजे) तो आपली कामं करतो...
आणि पुन्हा साहेब त्याला बोलावून पन्हाळ्याचे जॉईंनिंग लेटर देतात?

मी वर विचारलेला प्रश्न कुणालाच नाही पडला का?
कुणाला माहीत असेल तर सांगा उत्तर प्लीज.

आता दुसरा सिझन कधी येणार, हा पहीला सीझन कमीतकमी तो startingला अ‍ॅक्सिडेंट होतो त्याचा तिथपर्यंत दाखवायला हवा होता.

>> मग त्याचं 'अग्निहोत्र 2' होण्याची शक्यता होती. त्यापेक्षा आहे ते बरं आहे. त्यांना डोकं चालवायला जरा अजून वेळ हाताशी मिळेल. आणि कथा अर्धवट टाकल्याने प्रेक्षकांना लागलेली हुरहूर त्यांच्या सिझन 2 ला बाहुबली 2 प्रमाणे जास्तीचा टीआरपी मिळवून देईन.

बी. एस. त्याच्या कंपनीत कुणीही अर्जाविना अचानक सुट्टी घेऊ शकतात आणि स्वामी, बाबा लोकांकडे ऑफिसच्या वेळेत जायला परवानगी घ्यायची गरज नसते.
बॉस त्याला प्रोमोशन साठी सांगावे म्हणून फोन करतो तेव्हा फोन उचलताच तो सांगतो की मी सुट्टीवर आहे आणि बॉस म्हणतो बरं, कधी वेळ मिळाला तर इकडे एक चक्कर टाक तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पण हा भाग एडिटिंग मध्ये कापल्या गेलाय म्हणुन एपिसोडमध्ये दिसत नाही.

स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय>> हे मात्र खरं. त्याचा अभिनय चांगला म्हणावा का नाही काही कळत नाहीये >>> +१ त्याने अभिनय करायचा चांगला प्रयत्न केलाय. पण पापणी मिटायची नाही अशी शिक्शा दिली असे वाटते.

कुमार महाजन आणि तुंबाड मधला विनायक या पात्रांच्या स्वभावात सिरीज मध्ये तरी साम्य आहे.कादंबरीतला कुमार थोडा जास्त उदास आणि हतबल आहे.

मला वाटलं की मी काही मिस केलं की काय..
तो पन्हाळा याला जातो काय, फिरतो काय, कुणालाही न सांगता परत येतो काय आणि चिपळूण हून आल्यावर परत पन्हाळ्याला जाण्यासाठी बॉस बोलवून घेतो आणि तेव्हा पहिल्यांदा सांगतो की तू फ्रॉड आहेस आणि तरी तुला इनचार्ज बनवतोय... उफ्फ कन्फ्युजन...!

इथले प्रतिसाद वाचायला पण मजा येतेय
त्या दोघात ४० वर्शाच अन्तर आहे ( स्वामींच्या म्हणण्यानुसार ) म्हणजे चक्रपाणी आता ७०+ असला पाहिजे .>> नाही तीस वर्षाचं अंतर . ३० वर्षांपूर्वी साधारण तुझ्याच वयाचा माणूस माझ्याकडे हात दाखवून गेला असं स्वामी म्हणतात ना ? म्हणजे चक्रपाणी ६० -६५ चा असायला हवा. जिथे स्वजो चक्रपाणी ला भेटायला येतो ते घर पण वजनदार सिनेमात सई ताम्हणकर च घर दाखवलं आहे अगदी त्या पांढऱ्या पडद्यांसकट . कुठल्यातरी स्टुडिओतलं तयार घर असावं नक्की . . त्या सिनेमात फक्त ते घर चकाचक होत. आणि पांढरे पडदे पण जरा मोठे होते. ते निर्मात्याने स्वतःच्या खर्चाने लावले असतील .

पन्हाळ्याच्या त्या घरात (ब्लु मून ऑर व्हॉटेवर) चक्रपाणी राहुन गेला हे महाजनला माहित होतं तरीहि ते पेंटिग पाहिल्यावर इतकं टेरिफाय्ड व्हायचं कारण काय?..>> हो ना . आणि म्हणे मी माझ्या भूतकाळ शोधून काढणारे . यावं नि त्याव. इतकं घाबरुन गेलेलं दाखवायला नको होत. बाकी सगळ्यांचीच काम आवडली
किसींग सीन्सबद्दल राजला अनुमोदन >> हो. किसिंग सिन बद्दल राज ने लिहिलं म्हणून डिटेल मध्ये पहिला बघितला . नाहीतर बघितला नसता Lol

स्पॉईलर अलर्ट:

तो पेंटींगवर नाव बघुन घाबरलेला नसतो.
त्याला धुळीची ऍलर्जी असते!

>>उफ्फ कन्फ्युजन...!<<
मी कादंबरी वाचलेली नाहि. पण असे लॉजिकल प्रश्न जेंव्हा समोर येतात तेंव्हा ओनस इज ऑन दि डायरेक्टर. असे फुटकळ लुझ एंड्स त्या सिझनमध्येच टाइट करायची जबाबदारी डायरेक्टवर असते. तर ते असो.

हि वेब सिरिज बहुतेक ३० मिनिटांच्या स्लॉटकरता बनवली गेली असावी. ३० मिनिटांच्या एपिसोडमधे रियल कांटेंट २० मिनिटांचाच आहे, म्हणुन संपुर्ण सिझन साधारण ३ तासांत (२० * ९) बिंज करुन संपवता येतो. (स्पिंकिंग ऑफ बिंज, महाजनने त्या डायरीचे सगळी पानं बिंज रीड का करु नये, हा प्रश्न पडतो. ते करु नये याकरता चक्रपाणीने दिलेली ट्रॅफिक कंडिशनची अ‍नॅलजी इज टोटली अ‍ॅब्सर्ड. अरे मग तु ३० वर्षांची डायरी लिहिलिसंच का? Lol )

तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महाजन स्वत:ची डायरी लिहायला सुरुवात करेल? आफ्टरॉल हि इज डेस्टिन्ड टु लिव चक्रपाणीज लाइफ... Proud

Actually blue moon cottage वर रहायला जायच्या आधी कुमारला माहीत नसतं की सुदर्शन पण तिथेच राहून गेलाय पण तिथे गेल्यावर त्याला काही related गोष्टी दिसतात आणि तो तर्क लावतो.. आणि त्यानंतर लगेच त्याला पेंटिंग वर तेच नाव दिसतं... म्हणुन तो खूप घाबरतो.. अभिनय छान केलाय स्व जो ने...

बहुतेक सगळे सीन्स पावसाळ्यातले दाखवले आहेत, मुलाला फन-फेअरमध्ये घेऊन जातात तिथे मात्र पावसाचा मागमूस नसतो. इन फॅक्ट, पावसाळ्याच्या दिवसांत असले फन-फेअर्स लागतच नाहीत कुठे Proud
ती तजवीज कदाचित वजनाच्या काट्यावर लिहून मिळणार्‍या भविष्यासाठी असावी.

तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महाजन स्वत:ची डायरी लिहायला सुरुवात करेल? आफ्टरॉल हि इज डेस्टिन्ड टु लिव चक्रपाणीज लाइफ... >>>

हे आवडलं Biggrin

डायरीत कोणी लिहिलं, काय लिहिलं,कधी लिहिलं हा मुद्दा नाहीच आहे.
मुद्दा हा आहे की विधिलिखित बदलत नसतं, ते तसंच राहील अश्या पूरक चुका आपण करत राहतो आणि तरीही उद्या काय होईल हे आज जाणून घेण्याचा ध्यास प्रत्येकाला असतो.
असं जाणून घेण्याची एक संधी माणसाला मिळाली, कारण त्याच्या सारखंच विधिलिखित एकाचं होतं.या संधीचा त्याला उपयोग किती होतो हे पुढच्या एपिसोडस मध्ये कळेल.

Pages