समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच बघून संपवली.स्व आणि नि दोघेही आवडले.
मुळात सगळी पात्रे त्यांच्या त्यांच्या जागी एकदम फिट्ट.

पावसातले चित्रण सुंदर.पन्हाळ्याचे रस्ते , बंगला सुंदर.
शिव्या अस्थानी वाटल्या नाहीत. त्या त्रस्त माणसाच्या तोंडी आहेत.
खरतर, चुंबनद्रुष्येपण कथेच्या ओघात आहेत. मराठी सिरिजमध्ये बोल्ड वाटतात हे खरं.

आता 'हे पार्थ' म्हणतो की काय असंच वाटलं एक क्षण Happy >>> अगदी अगदी.
पुभाप्र

>>नेफिवर नाही ... हे अगदी ऑस्कर मिळाला नाही या थाटात का म्हणत आहात?<<
अरे बाबा स्ट्रिमिंगच्या जमान्यात नेफि हि मोजपट्टि आहे, तिच्या वर्ल्ड्वाइड रीच मुळे. आता तु म्हणतोच आहेस कि जबरदस्त सिरिज आहे तर येईल आज ना उद्या नेफिवर. चिडतोस कशाला. बाकि तुझ्याशी एका वाक्याबाबत सहमत. स्वजो मराठिचा शारुख आहे - कारण दोघेहि अभिनयाच्या बाबतीत "एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा" या कॅटेगोरीतले आहेत... Wink

जबरदस्त सिरिज आहे तर येईल आज ना उद्या नेफिवर
>>>>

पण हा नेफिचा हट्ट का तेच तर विचारतोय मी..
समजा नाही आली तिथे तर याचा अर्थ असा होतो का की नेफिवर असणारया एकूण एक वेबसिरीज यापेक्षा दर्जेदारच असणार?

..

बाकि तुझ्याशी एका वाक्याबाबत सहमत. स्वजो मराठिचा शारुख आहे - कारण दोघेहि अभिनयाच्या बाबतीत "एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा" या कॅटेगोरीतले आहेत... Wink
>>>>

+७८६
दोघांचा अभिनय ईक्वली स्टाईलिश आहे !

खरतर, चुंबनद्रुष्येपण कथेच्या ओघात आहेत. मराठी सिरिजमध्ये बोल्ड वाटतात हे खरं.
>>>>

कॉम्पिटीशनमध्येही राहायचे असते. जमाने के साथ चलो. नेफीवर यायचे टारगेट असेल Happy

फुल शिनेम काढला असता तरी 100 कोटि घेऊन जाईल

महेश भट्ट किंवा अब्बास मस्तान ला द्यायला हवे
विजय आनंद मेला

सर्व एपिसोड्स बघितले, नवीन सिझन कधी येणार. हा फार अर्धवट ठेवलाय. तो आत्ताचा नितीश भारद्वाज भूत आहे का.

पहिला starting ला accident झालाय, त्यातून वाचेलना स्व जो, कारण नितीश वाचलेला असतो कर्जतला. फार प्रश्न ठेऊन हा सिझन संपवला.

स्वप्नील जबरदस्त काम, खूप आवडलं. हा फार आवडत नाही पण कधी कधी छान करतो, जिवलगा मध्ये व्हिलन झाला ते छान केलेलं. चॉकलेट बॉयपेक्षा असेच रोल चांगले करतो, असेच करावे, फार गोड गोड रोलमधे मला तो कृत्रिम वाटतो. नितीशने पण छान काम केलंय. सतीश राजवाडे याचं डायरेक्शन मस्त. मला तो पन्हाळ्याचा बंगला जाम आवडला आणि रंकाळा कित्ती सुरेख टिपलाय.

मुंबईच्या घराची सेपरेट जरा लांबलचक galary आवडली, आणि रेतीबंदरहून चिपळूण स्टेशनवर येतानाचा मधला परिसर खूप आवडला.

हो.लोकेशन फारच सुंदर आणि छान ॲंगलने टिपले आहेत.. अगदी ते स्वामींच्या घरी यायचा जायचा रस्ता का असेना.. Happy

मुंबईच्या घराला सेपरेट बाल्कनी कुठे आहे, कॉमन आहे ना ती. सुदर्शन भूत असेल आणि येताना ते कुमारला कळेल असे मला वाटले होते पण तसे काहीच दाखवले नाही. दुसरा सीजन लवकर आला पाहिजे.

कॉमन मोठी लांबलचक आहे ती वेगळी. सेपरेट पण असतेना, स्वप्नील आणि तेजस्विनी उभे असतात गप्पा मारत, तो फुकत असतो बहुतेक. पहिल्याच भागात दाखवली आहे किंवा दुसऱ्या भागात. ट्रेन पण जाते का समोरून, परत बघायला हवं नीट.

तो सुदर्शन भूतच आहे असं नक्की वाटतंय, तो त्याला जाणीवहि करून देतो पण त्याच्या लक्षात येत नाही.

सर्व एपिसोड्स बघितले, नवीन सिझन कधी येणार. हा फार अर्धवट ठेवलाय.>>>> हो , ह्या सिझन चे सगळे एपिसोड संपले का? मला वाटलं अजून एक असणार. स्वजो आवडतो मला. पण शिव्या कुणाच्याच झेपत नाहीत. पण तो हल्ली चा ट्रेंड झालाय त्यामुळे चालवून घेतलं. स्वजोने एकदम सराईतासारख्या दिल्या आहेत शिव्या.

गम्मत आहे ना, एकीकडे सर्व चॅनल वूमन एम्पॉवरमेंट वाल्या सिरीज बनवतात.आणि दुसरीकडे 'सगळे देतात वेब सीरिज मध्ये शिव्या असल्याचं पाहिजेत' म्हंणून 'आईxxx' आणि 'भेंxx' सारख्या शिव्या लाडूत बेदाणे घालावे तश्या सढळपणे पेरतात ☺️☺️☺️

बघाना इकडं शिव्यांचं किती कौतुक उतू जात आहे आणि माबोवर चुकून एखादी शिवी कोणी टैपली तर आकाशपाताळ एक करतात मंडळी!

पण शिव्या कुणाच्याच झेपत नाहीत. >>> अगदी अगदी. म्हणूनच मी वेबसिरीज धाग्यात विचारलं शिव्या दाखवतात का वेबसिरीजमधे, बीप बीप येत नाही आणि smoking, ड्रिंकिंग करताना पण बोर्ड जात नाही.

आत्ताच दोन एपिसोड बघितले . आता उरलेले नंतर . पण अतिशय इंटरेस्टिंग आहे मालिका या. एक मात्र कळलं नाही तो कुमार चा मित्र वाबगावकर ला काही स्वतःच ऑफिस च काम नसत का ? कुमार कुठंही निघाला कि हा धावत धावत त्याच्या पाठी . कुमार ला कामावरून काढून टाकलं हा आला धावत धावत त्याच्या पाठी "चल मी पण येतो तुझ्याबरोबर स्वामींकडे". हाहाहा. अरे याला स्वतःच काही काम नाही का ? ऑफिस मधून त्याला सोडणार का ? हे म्हणजे जेठया आणि तारक मेहता सारखं झालं. जेठया ला काही प्रॉब्लेम आला कि तारक सगळॆ काम धंदे सोडून ऑफिस मधून लवकर निघून आला जेठयाच्या सेवेसी . असो

त्या चक्रपाणी च घाटकोपर च घर किव्वा जी सोसायटी घेतली आहे ती पण पार्ल्याची रामानंद सोसायटी आहे . राजवाडेंची रामानंद सोसायटी लाडकी आहे . ते स्वतः त्या सोसायटीत राहत होते म्हणे. ती सध्या काय करते सिनेमात पण रामानंद सोसोयटी च होती आणि ते म्हातारे गृहस्थ पण रामानंद मधलेच आहेत असं वाटत बहुतेक Happy

ते सध्या बारीक आणि निळ्या डोळ्याने दिसायला डेंजर आहेत.तरुणपणी एकदम हँडसम डुड असतील.
तुंबाड मध्ये हेच होते ना?

ऋ , title मध्ये spoiler सकट , असं टाकणार का ??
नितिश भारद्वज माझ्यासाठी spoilerच होता Wink

शेवट काय आहे ? >>
सुदर्शन चक्रपाणी सांगतो त्याप्रमाणे,
आता पर्यंत जेवढे एपिसोड झालेत तेवढे एकदम बिंज/जम्प करून पाहिलेत तरी हरकत नाही. पण पुढे एक एक एपीसोड बघतच शेवटाला पोहोचा. सरळ शेवट विचारू नका.

Pages