आम्ही प्राथमिक शाळेत आलो अन एक नवलाईची गोष्ट घडली. यापूर्वी अगदी बालवाडीत असेतोवर लोक आम्हाला आमच्या आईवडिलांच्या नावे ओळखत. आता आम्ही मोठे झालो. शाळेतली, वर्गातली मुले, शिक्षक, शेजारीपाजारी असे सर्वजण आम्हाला नावाने ओळखू लागले, बोलावू लागले आणि आईवडिलांना, 'अमक्याची आई', 'तमक्याचे बाबा' असे म्हणू लागले. याशिवाय शाळेत वर्तणुकीवरून, अभ्यासातील प्रगतीवरून अशी हळूहळू प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख बनली होती. कुणी खोडकर, व्रात्य, कुणी हुशार, कुणी ढ, कुणी चलाख तर कुणी मंद होते. त्यानुसार शाळेत बसण्याच्या जागादेखील आपसूकच ठरून गेल्या. आम्ही हुशार मुले पुढे, थोडी हुशारही नाही आणि ढ ही नाही अशी मुले मधे, तर अभ्यासात मागे, पण इतर खेळ वगैरे गोष्टीत अव्वल अशी मुले सर्वात मागे बसायची. या मुलांचा आवाज कायम सर्व वर्गात मोठा असायचा. शिक्षक वर्गात असले तरी मागे कायम गडबडगोंधळ ठरलेलाच. तर बड्या घरची ठराविक मंडळी कायम वेगळा गृप करून एकत्र असायची. ही मुले मागच्या मुलांशी जास्त बोलायचीच नाहीत. मात्र परिक्षा जवळ आली किंवा शाळेत इन्स्पेक्शनसाठी गटविकास अधिकारी किंवा इतर कोणी साहेब यायचे असले की, एक गंमत होई. आमचे शिक्षक लगेच पटापट आमच्या बसायच्या जागा बदलायचे. प्रत्येक ओळीत सर्वात पुढे, सर्वात मागे आणि बरोबर मधे अशा ठराविक जागी काही हुशार मुले बसवायचे. आणि साहेब आल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारला, गणित सोडवायला दिले तर हुशार मुलांनी आपल्या पाटीवरचे उत्तर मागील विद्यार्थ्यांना दाखवायचे आणि इतरांनी त्यांचे बघून लिहायचे, अशी कडक सूचना देऊन ठेवायचे. एकदा मात्र गंमत झाली. साहेबांनी आल्याआल्या आम्हा मुलांना सज्जड दम भरला, 'जर कुणी आपल्या पाटीवरचे उत्तर इतर मुलांना दाखवले तर त्याला शाळेतून काढण्यात येईल.' झाले! सर्व हुशार मुले घाबरली आणि त्यांनी आपापली पाटी घट्ट पोटाजवळ धरली. कुणी दुसर्याला उत्तर दाखवेनाच! मग गुरूजी घाबरले, आता काय करावे? त्यांना प्रश्न पडला. मग हळूच साहेबांची नजर चुकवून, त्यांनी शेवटच्या ओळीतील पहिल्या मुलाला डोळ्यांनी दटावले. तो बिचारा अजूनच घाबरला. पण गुरूजीच सांगतायत म्हटल्यावर हळूच त्याने पाटी तिरकी केली आणि लगेच मागील सर्व मुलांनी त्याचे बघून लिहीले. साहेबांनी सर्व मुलांच्या पाट्या गोळा करून उत्तरे तपासली आणि गुरूजींनी कपाळावर हात मारून घेतला! त्या पहिल्या हुशार मुलाचे उत्तर चुकले होते! पुढचे दोन दिवस आम्हा सर्व मुलांच्या घरची मंडळी नुसती हसत होती!!
या प्राथमिक शाळेत आम्हाला ओळख मिळाली. आमच्या आवडीनिवडी तयार झाल्या. आमचे छंद आम्हाला मिळाले. माझी वाचनाची आवड इथेच निर्माण झाली. त्याकाळी घरोघरी टिव्ही नव्हते. एकच दुरदर्शन लागे. त्याची वेळही ठरलेली होती. त्यामुळे अभ्यास, खेळ आणि वाचन याशिवाय मनोरंजनाची दुसरी साधने नव्हती. शिवाय गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि साप्ताहिके यातून बाहेरच्या जगाशी ओळख व्हायची. त्यातून लहानपणी प्रत्येक गोष्टीत कुतूहल जास्त असते. त्यामुळे मी अधाशासारखी दिसेल ते आणि मिळेल ते वाचत सुटायची. आज इतकी साधने असतानाही, माझी पूर्वीची सवय अगदी तश्शीच कायम आहे अजूनही !!
आठवणीतील 'शाळा' :- 5
Submitted by Cuty on 24 February, 2020 - 05:43
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख! शाळा तपासणीचा किस्सा
सुरेख! शाळा तपासणीचा किस्सा भारीच.
खूप छान!
खूप छान!
देवकी, अज्ञातवासी खूप आभारी
देवकी, अज्ञातवासी खूप आभारी आहे.
छान!!
छान!!
खुप छान!
खुप छान!
वर्गात मुलांची बसायची पद्धत वर्षोनुवर्ष तीच होती. आहे. आणि कायम राहील.. हे खर!
@राजू धन्यवाद
@राजू धन्यवाद
@मन्या धन्यवाद. या बसायच्या पद्धतीमुळे शिक्षकांचेही पुढच्या ठराविक मुलांकडेच लक्ष असते. त्यांना समजले की, ते पुढचे शिकवतात. यामुळे मागील मुलांचे लक्ष अभ्यासावरून अजूनच उडते. मग ही विषमता वाढतच जाते.
मला आठवतंय त्यानुसार तरी
मला आठवतंय त्यानुसार तरी आमच्या शाळेत हुशार-ढ असं न करता उंचीप्रमाणे बसवायचे.
आमचा तिसरीतला फोटो
वा! फोटो अगदी क्लिअर आला आहे.
वा! फोटो अगदी क्लिअर आला आहे. तुम्हीही चांगला सांभाळून ठेवला आहे हे लक्षात येत आहे. फोटोत तुम्ही कुठे आहात?
आमच्या प्राथमिक शाळेत मुले जमिनीवरच बसत असल्याने उंचीनुसार बसण्याचा प्रश्नच नव्हता!
मी पहिल्या (बसलेल्या) रांगेत
मी पहिल्या (बसलेल्या) रांगेत डावीकडून पाचवी, बाईंच्या शेजारी. त्या दुसऱ्या बाई मुख्याध्यापक होत्या.
आमचे प्रायमरी-हायस्कुल चे वर्ग एकच होते. सकाळी आमची शाळा आणि दुपारी त्यांची.
फक्त आमच्या वर्गात पहिली ते चौथी मुलं होती, आधीच्या आणि नंतरच्या बॅच केवळ मुलींच्या. बहुतेक कोएड करायचा विचार होता म्हणून प्रयोगिक तत्वावर घेतलेली. पण पुढे परवानगी नाही मिळाली.
हाःहाः माझाही शाळेतला लूक
हाःहाः माझाही शाळेतला लूक सेम होता. मधे भांग आणि दोन रबर लावलेल्या शेंड्या ! पण आता फोटो नाहीये.
आमच्या प्राथमिक शाळेत
आमच्या प्राथमिक शाळेत मार्कांनुसार बसवायचे. प्रत्येकाला स्वतंत्र छोटीशी सतरंजी. कमी मार्क असतील तर पुढली रांग. पहिल्या पाचातली मुले शेवटच्या रांगेत.
हे प्रकरण आवडले.
हे प्रकरण आवडले.
>>>अन एक नवलाईची गोष्ट घडली. यापूर्वी ......'अमक्याची आई', 'तमक्याचे बाबा' असे म्हणू लागले. >>>> हाहाहा
अॅमी कसली क्युट दिसतेयस.
_/\_
_/\_