मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०.
काही मोजकी प्रदर्शने आणि जागा पाहा.
लोकप्रिय प्रदर्शनांचा प्राईम टाईम हा फेब्रुवारी महिना असतो. मुलांच्या परीक्षेच्या अभ्यासाला जोर पकडलेला नसतो, वातावरण गार असते. मुख्य कार्यक्रम जानेवारीत महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होत असतात.
१) पंचविसावे फळे फुले प्रदर्शन, मुंबई महापालिका यांचे.
वीरमाता जिजाबाई उद्यान(राणीबाग),मुंबई (भायखळा स्टेशनपाशी) - ३१ जाने, १,२ फेब्रुवारी.
मागच्या वर्षी लहान मुले खूप आली होती. विविध सेल्फी पॉइंटस फुलांचे देखावे होते. बच्चेकंपनी खुश.
यावर्षी मुंबईतील गेटवे, म्हातारीचा बूट वगैरे फुलांचे आकार असणार आहेत. रोपे, कुंड्या,विक्रीचे अनेक स्टॉल्स.
(शुल्क नाही.)
शिवाय राणीबागेत नवीन आणलेले प्राणी. २६ जानेवारीला उदघाटन झालेली दालने पाहता येतील. ज्येष्ठांना नि:शुल्क. इतरांना ५०.
● दरवर्षी बागकामाचा तीन दिवसांचा कोर्स पहिल्या दिवशी दहाला सुरू होतो. दहा ते पाच. शुल्क पाचशे रु, सर्टिफिकेट मिळते.( विनाशुल्क विना प्रमाणपत्र तीनही दिवस बसता येते.)
----------------------------
२) पर्यटन प्रदर्शन
३,४,५ फेब्रुवारी २०२०
३ फे - फक्त बिझनेस एजंटसाठी
४ फे दु दोन ते सात, सर्वांसाठी
५ फे दु अकरा ते सात.सर्वांसाठी
TTF ,Fairest Media. Site - ttfotm dot com.
Bombay exhibition center. Goregaon east.
बान्द्रा बोरिवली हायवेवर आहे.
हेच प्रदर्शन पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असते. साईट पाहा. माझ्या नातेवाइकाला सायकल टुअर हवी होती. एकाने सायकलच टांगलेली. अपेक्षेप्रमाणे तो सायकल टुअरवालाच होता. मालाडचे (परांजपे बहुतेक. नाव विसरलो.) टुअरवाले होते. पण नंतर दिसले नाहीत.
OTM हे परदेशातील सहलींसाठी आहे. ते अगोदर TTF बरोबर होते पण आता त्यांचे प्रदर्शन साधारण त्याच वेळी दुसरीकडे भरते.
----------------------------
३)झाडांचे प्रदर्शन
फ्रेंडस ओफ ट्रिज यांचे - ८,९ फेब्रुवारी, रुपारेल कॉलेज आवार. माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ( पश्चिम रेल्वेचे) समोर). गुलाब, इतर फुलझाडे, निवडुंग, अनेक बोनसाई.
---------------------------
४) काला घोडा आर्ट फेस्टीवल २०२०
शनिवार १ फेब्रुवारी ते रविवार ९ फेब्रु २०२०.
रोज सकाळी दहा ते दहा. पहिल्या दिवशीच ब्रोचर मिळवा. Official site kala ghoda art festival
दमून जाल एवढे भरगच्च कार्यक्रम असतात.
अधिक माहिती बातमी holidayfi
चारही ठिकाणी हौशी फोटोग्राफरांना भरपूर संधी.
---------------------------
धाग्याचे शीर्षक अधिक व्यापक केलं आहे. तुम्हाला माहिती झालेल्या चांगल्या कार्यक्रमांची, प्रदर्शनांची नोंद करा.
नवीन मुंबई, ठाणे फार दूर नाही. तिथलेही कार्यक्रम असावेत.
उत्तम कल्पना निरुदा...
उत्तम कल्पना निरुदा...
राणी बागेतील प्रदर्शनात हेच मनात आलेलं
रविवारी मुंबई सेंट्रल
रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वेचा मेगाब्लॉक नावाचा प्रकार, हारबर सेवा नेहमीप्रमाणे अकरा ते तीन किंवा दहा ते चार ठप्प असते आणि त्यात शाळेला सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला कुठेतरी न्यायचं हे सर्व एकाच दिवशी येतं. म्हणजे गर्दी उसळते. (यावर कुणी माबोकर ललित ठोकू शकतो.)
तर सांगायचं म्हणजे काल रुपारेलच्या प्रदर्शनास गेलो होतो. शनिवारी भटकणे काम चांगलं होतं. गाड्यांनाही गर्दी कमी असते, वेळेवर असतात.
प्रदर्शन नेहमीप्रमाणेच छान होतं फोटो काढले बरेच. काल चार वाजता बोनसाई करण्याचे प्रात्यक्षिक होतं.ते आजही चारलाच आहे हे कळलं. यावेळेस गुलाब आणि इतर फुले वरच्या ओडिटोरिअमला ठेवली आहेत आणि उजेड छान आहे.
------
मिनी गटग करण्याची कल्पना आज करता येईल. रुपारेल आवार मोठे आहे आणि मध्यवर्ती आहे.
----------------
झेविअर कॅालेजने ठेवलेले लिनोसचे पुस्तक
Photo 2
दुसरं एक
Photo 3
Photo 4
Photo 5
चंदन
Photo 6
Srd , रुपारेलच प्रदर्शन आज
Srd , रुपारेलच प्रदर्शन आज आहे का ?
होय. ८ ते ८. पण लववकर जा.
होय. ८ ते ८.
पण लववकर जा.
Srd, सुंदर फोटो..
Srd, सुंदर फोटो..
Ok .
Ok .
Srd सुंदर फोटो धन्यवाद
Srd सुंदर फोटो
धन्यवाद
(No subject)
इथे कोण जाणार आहे का?
इथे कोण जाणार आहे का?
छान.
छान.
यासारखेच मुलुंडचे महाराष्ट्र सेवा संघ, ठाण्याचे सहयोग कलामंदिर इथे चांगले कार्यक्रम होत असतात. तीनचार वर्षांपूर्वी एकदा १ मे महाराष्ट्र दिनाला किरण पुरंदरे यांचा पक्षीदर्शन कार्यक्रम पाहायला मिळाला होता सहयोगमध्ये.
.
.
वृक्ष प्राधिकरण आणि
वृक्ष प्राधिकरण आणि महापालिकेचे उद्यान खाते यांच्या संयुक्त विद्यमाने फळे,फुले आणि भाज्यांचे प्रदर्शन १५ आणि १६ फेब्रुवारीला मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुल येथे सकाळी ८ पासून सुरू आहे - मुंबई वृत्तांत, लोकसत्ता
Cbd बेलापूर इथल्या अर्बन
Cbd बेलापूर इथल्या अर्बन हाटमध्ये पावसाळ्यातले एक दोन महिने सोडता वर्षभर वेगवेगळे मेळे असतात. चैत्र मेळा, वसंत मेळा, श्रावण मेळा, हस्त व चित्र प्रदर्शन, कला मेळा, गांधी शिल्प प्रदर्शन वगैरे वेगवेगळ्या नावाखाली मध्ये 2 -2 दिवसांची गॅप घेऊन ही प्रदर्शने वर्षभर भरतात. बहुतेक सगळ्या मेळ्यांत इतर गोष्टींबरोबरच वेगवेगळ्या राज्यातील हातमागी किंवा यंत्रमागी साड्या, चादरी वगैरे वाजवी भावात व अजिबात न फसवता विकणारे विक्रेते असतात, बहुतेक सगळेच विक्रेते, स्वतःच उत्पादकही आहेत. मी खूप वेळा खरेदी केलेली आहे. तिथल्या साड्या इतरत्र दुकानात मिळत नाहीत
सोबत खादाडी असते. तिथे छोटेसे amphi थेटर आहे. शनिवार रविवारी तिथे कार्यक्रम असतात. तिकीट नसते.
सिडको याची अजिबात जाहिरात करत नाही. चुकून कधीतरी नेरुळ स्टेशनवर बोर्ड असतो.
यंदा महालक्ष्मी सरसच्या जाहिराती व मार्गफलक पनवेलपासून हायवेवर सर्वत्र होते, प्रत्यक्ष प्रदर्शन बांदऱ्यात होते तरीही. ह्या पार्श्वभूमीवर सिडकोचा उत्साह उठून दिसतो
फेसबुक पेज आहे पण तेही थंड असते.
वा!
वा!
ते urban haat मधून मी सुद्धा
ते urban haat मधून मी सुद्धा बरीच खरेदी केलीय. काही काही विक्रेते नेहमी असतात तर काही प्रदर्शन पुरते येतात. मला सर्वात जास्त आवडते तिथे खरेदी करताना कारण बिलकुल गर्दी नसते. किंमत ही वाजवी असते. मी बांधणी साडी घेतली मागील वर्षी दुकानातल्या 3/4 (किंवा त्याहून कमी) किंमतीत.
पूर्वी आमच्याकडे कलकत्ता वरून बेंगाली साड्या विकायला घेऊन एक माणूस येत असे. तशा प्रकारच्या साड्या मला urban haat मध्ये सापडल्या. (शिवाजी पार्क मधल्या Bengal club च्या प्रदर्शन मध्ये त्या अवाजवी महाग असत)
मुलुंड येथील प्रियदर्शनी
मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुल
फळे,फुले आणि भाज्यांचे प्रदर्शन १५ आणि १६ फेब्रुवारीला
येथे संध्याकाळी गेलो होतो. भाज्या आणि फळे नाहीत. ( ती रुपारेलच्या प्रदर्शनाला होती. ) विक्रीचे स्टॉल्स कमी आहेत।
प्रदर्शन.छोटेसे छान. स्वच्छ मोठे आवार.
फोटो १)
फोटो २) मेहेंदळे आजींच्या क्रेपच्या फुलांचे गुच्छ आवडले.
फोटो ३)
.
.
(No subject)
जे जे कला महाविद्यालयात
जे जे कला महाविद्यालयात भरणारे कला प्रदर्शन एक दोनदा पाहिले आहे. शिल्पं छान असतात.
ज्यांना किंवा ज्यांच्या
ज्यांना किंवा ज्यांच्या मुलांना व्हिंटेज कार्स पहाण्यामधे स्वारस्य असेल त्यांच्यासाठी..
(No subject)
.
(No subject)
.
(No subject)
उपवन आर्ट फेस्टीवल (ठाणे) -
उपवन आर्ट फेस्टीवल (ठाणे) - २१ ते २४ फेब.
(कुणाला कार्यक्रमांचे schedule माहीत आहे का?)
(No subject)
(No subject)
https://facebook.com/groups
https://facebook.com/groups/TAWMumbai/permalink/5211903198905926/?m_ents...
कमला नेहरू पार्क, मुंबई,
बागेतल्या झाडाची ओळख करून देणारा ग्रूप.
कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी नि:शुल्क.
( माध्यम इंग्रजी.)
ठाणे महानगरपालिका आणि वृक्ष
ठाणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण आयोजित "वृक्षवल्ली" हे अत्यंत देखणे पुष्प प्रदर्शन शुक्रवार 9 ते रविवार 11 फेब्रुवारी दरम्यान आहे. ठाणे शहर आणि आसपासच्या वृक्षप्रेमी आणि निसर्ग प्रेमी मंडळींसाठी हे प्रदर्शन महत्वाचे असणार आहे.
स्थळ: रेमंड रेस ट्रॅक, जे के ग्राम, पोखरण रोड नं १, ठाणे पश्चिम.
हे दुसरे एक प्रदर्शन
हे दुसरे एक प्रदर्शन माटुंग्यात होणार आहे
Friends of THE trees यांचे
Friends of THE trees यांचे माटुंग्यात रुपारेल कॉलेज आवारात भरणारे प्रदर्शन बऱ्याचदा पाहिलं असल्याने तिकडे गेलो नाही. पण ठाण्याच्या रेमंड कंपनीच्या आवारातलं ( कॅडबरी बस स्टॉप/ फ्लआईओवर/जंक्शन जवळ आहे) प्रदर्शन काल पाहिलं. सजावट, गुलाब, इनडोर्स , आर्किड खूप आहेत. बरीच झाडं लोढा ग्रूपने मांडली होती.
दुपारी गेलो होतो , ऊन फार कडक होतं. इनडोर्स प्लांट्ससाठी शेड लावून त्यात स्प्रिंकलर लावले आहेत. काहींसाठी पाण्याच्या पाईपने पाणी देण्याची सोय दिली होती पण ठाणे महापालिकेच्या झाडांसाठी पंधरा महिला कर्मचारी लांबून उन्हातून झारीने पाणी आणून घालत होत्या.
Pages