मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०.
काही मोजकी प्रदर्शने आणि जागा पाहा.
लोकप्रिय प्रदर्शनांचा प्राईम टाईम हा फेब्रुवारी महिना असतो. मुलांच्या परीक्षेच्या अभ्यासाला जोर पकडलेला नसतो, वातावरण गार असते. मुख्य कार्यक्रम जानेवारीत महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होत असतात.
१) पंचविसावे फळे फुले प्रदर्शन, मुंबई महापालिका यांचे.
वीरमाता जिजाबाई उद्यान(राणीबाग),मुंबई (भायखळा स्टेशनपाशी) - ३१ जाने, १,२ फेब्रुवारी.
मागच्या वर्षी लहान मुले खूप आली होती. विविध सेल्फी पॉइंटस फुलांचे देखावे होते. बच्चेकंपनी खुश.
यावर्षी मुंबईतील गेटवे, म्हातारीचा बूट वगैरे फुलांचे आकार असणार आहेत. रोपे, कुंड्या,विक्रीचे अनेक स्टॉल्स.
(शुल्क नाही.)
शिवाय राणीबागेत नवीन आणलेले प्राणी. २६ जानेवारीला उदघाटन झालेली दालने पाहता येतील. ज्येष्ठांना नि:शुल्क. इतरांना ५०.
● दरवर्षी बागकामाचा तीन दिवसांचा कोर्स पहिल्या दिवशी दहाला सुरू होतो. दहा ते पाच. शुल्क पाचशे रु, सर्टिफिकेट मिळते.( विनाशुल्क विना प्रमाणपत्र तीनही दिवस बसता येते.)
----------------------------
२) पर्यटन प्रदर्शन
३,४,५ फेब्रुवारी २०२०
३ फे - फक्त बिझनेस एजंटसाठी
४ फे दु दोन ते सात, सर्वांसाठी
५ फे दु अकरा ते सात.सर्वांसाठी
TTF ,Fairest Media. Site - ttfotm dot com.
Bombay exhibition center. Goregaon east.
बान्द्रा बोरिवली हायवेवर आहे.
हेच प्रदर्शन पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असते. साईट पाहा. माझ्या नातेवाइकाला सायकल टुअर हवी होती. एकाने सायकलच टांगलेली. अपेक्षेप्रमाणे तो सायकल टुअरवालाच होता. मालाडचे (परांजपे बहुतेक. नाव विसरलो.) टुअरवाले होते. पण नंतर दिसले नाहीत.
OTM हे परदेशातील सहलींसाठी आहे. ते अगोदर TTF बरोबर होते पण आता त्यांचे प्रदर्शन साधारण त्याच वेळी दुसरीकडे भरते.
----------------------------
३)झाडांचे प्रदर्शन
फ्रेंडस ओफ ट्रिज यांचे - ८,९ फेब्रुवारी, रुपारेल कॉलेज आवार. माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ( पश्चिम रेल्वेचे) समोर). गुलाब, इतर फुलझाडे, निवडुंग, अनेक बोनसाई.
---------------------------
४) काला घोडा आर्ट फेस्टीवल २०२०
शनिवार १ फेब्रुवारी ते रविवार ९ फेब्रु २०२०.
रोज सकाळी दहा ते दहा. पहिल्या दिवशीच ब्रोचर मिळवा. Official site kala ghoda art festival
दमून जाल एवढे भरगच्च कार्यक्रम असतात.
अधिक माहिती बातमी holidayfi
चारही ठिकाणी हौशी फोटोग्राफरांना भरपूर संधी.
---------------------------
धाग्याचे शीर्षक अधिक व्यापक केलं आहे. तुम्हाला माहिती झालेल्या चांगल्या कार्यक्रमांची, प्रदर्शनांची नोंद करा.
नवीन मुंबई, ठाणे फार दूर नाही. तिथलेही कार्यक्रम असावेत.
पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे
पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे डोंबिवलीत २१ एप्रिल ला (जागतिक पुस्तक दिन) पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत मुख्य रस्ता फडके रोड वर रस्त्यावर पुस्तकांचे प्रदर्शन
वाचकांना भेट देऊन स्वतः निवडलेले एक पुस्तक विनामूल्य घेवून जाता येणार आहे.
जायला जमायला हवं, दरवर्षी
धन्यवाद.
जायला जमायला हवं, दरवर्षी करतात पै हा उपक्रम बहुतेक, मागेही जमलं नव्हतं.
धन्यवाद.
धन्यवाद.
१) पुस्तक आदान प्रदान २०२५
१) पुस्तक आदान प्रदान २०२५
१७ ते २६ जानेवारी
डोंबिवली पूर्व
दहा ते आठ
सावळाराम क्रीडा संकूल ( एमआइडिसी ग्राऊंडवर)
एक जुने पुस्तक ( पाठ्यपुस्तक नाही) अधिक दहा रुपये यांच्या बदल्यात तिथे ठेवेलेल्या पुस्तकांतील कोणतेही घेणे.
२) काला घोडा फेस्टिवल
मुंबई, म्युझियमजवळ
January 25–February 2, 2025.
The next Kala Ghoda Arts Festival (KGAF) will take place from January 25–February 2, 2025. The festival will be held in the Kala Ghoda Art District of Mumbai and will celebrate its 25th anniversary. The theme for the 2025 festival is "Silver".
३)मुंबई महापालिका फुले झाडे प्रदर्शन.
जिजामाता उद्यान
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी
सकाळी आठ ते संध्याकाळी आठ.
४) ठाणे महापालिका फुले झाडे प्रदर्शन.
रेमंड रेस ट्रॅक, जे.के.ग्राम.
१४ ते १६ फेब्रुवारी
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण आयोजित फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन
कुठे: वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग)
कधी: ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ ट्रीज आयोजित फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन
कुठे: डी जी रुपारेल महाविद्यालय, माटुंगा
कधी:
८ फेब्रुवारी २०२५, दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
९ फेब्रुवारी २०२५, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
आज उपवन आर्ट फेस्टिव्हलचा
आज उपवन आर्ट फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे, मिका सिंगचा कार्यक्रम आहे संध्याकाळी ६:३० ला. यावेळी चांगले कलाकार बोलवले होते, अंजली टिकेकर, अभिजित भट्टाचार्य, शुभा मुदगल यांचे कार्यक्रम होते पहिले २ दिवस. संजू राठोड आणि केतकी माटेगावकरचा पण कार्यक्रम होता. भाडीपा चा स्टॅन्ड अप पण होता रविवारी १२.०१ ला.
राणीची बाग
राणीची बाग
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी
जर त्या वीकेंडला माहेरी असलो तर हे जमवता येईल.
सकाळी ८ ते ९.३० वाजता हे प्रदर्शन आणि त्यानंतर राणीची बाग हा प्लान मुलांसोबत बेस्ट राहील. त्यांचीही आवड समजेल.
Pages