मनाचा पोटमाळा
आता पोटमाळा म्हटलं की मला ते दोन खोल्यांचं घर आठवतं संडास बाथरूम च्या वरती असलेला तो पोटमाळा. त्यातील वस्तूंचे दोन भाग. एक कधीच न लागणाऱ्या परंतु जीव असणाऱ्या वस्तू जसं जातं मुसळ,
पाटा-वरवंटा, खुरपणी,घमेली फावडे तलवार, लाकडी बाहुल्या आणि दुसर्या भागात तांब्या पितळ्याची भांडी. जळमटं काढायची काठी पंखे घरामध्ये जास्तीचे असणारे डबे मोठी ताटवाटी जे फारतर वर्षा-दोन वर्षातून एखाद्या लागतात तसेच काही पुस्तकेही असा वेगळा संसार वरती असतो. त्यातील प्रत्येक भांडण हे जुन्या चादरी मध्ये गुंडाळून ठेवलेलं त्या चादरीवरती जरी प्रचंड धूळ असली तरी आत मधील भांड लखलखीत स्वच्छ. प्रत्येक भांड्यावर एक नाव असायचं अमुक-अमुक यांस कडून वास्तुशांती निमित्त, लग्नानिमित्त. मग ती भांडी काढताना आपसूकच त्यावरचे नावे वाचली जायची. आणि मग त्या माणसाची आठवण होई, त्या एखाद्या लग्नात कार्यांमध्ये घडलेली एखादी गोष्ट आवर्जून सांगितली जाई. विशेष करून दिवाळीच्या साफसफाईच्या वेळेस हा पोटमाळा साफ करण्याचं एक काम असायचं. मग छोट्या भावाला वरती चढवून एकेक वस्तू खाली दययला सांगायची आणि अजून काय आहे वरती अजून काय आहे वरती असं सतत विचारलं जात असे. वरती ढीगभर जळमटं धूळ हे सर्व साफ करत करत पुन्हा वस्तू जागच्या जागी तशाच्या तशा ठेवल्या जात होत्या. आता माझ्या घराला पोटमाळा नाही.जास्तीच्या वस्तू यांचा मोह मी कमी केलेला आहे. आता मनाच्या पोट माळ्याचं म्हटलं तर तसंच. मनाच्या पोट मळ्यातील प्रत्येक आठवणींच्या मागे ही एखादा विचार एखादा प्रसंग एखादी व्यक्ती यांचे संदर्भ आहेत. याची साफसफाई मात्र वारंवार होत नाही. परंतु त्या भांड्यांच सांगितलं त्याप्रमाणेच वरची चादर काढली तर आतील वस्तू अगदी स्वच्छ लखलखीत आहे. गेल्या महिन्यात आत्याचं निधन झाल्याची बातमी आली आणि आपसूकच पोट माळ्याचं दार उघडलं गेलं. अगदी लहानपणापासून तिच्या आठवणी कधी गोड कधी कडू ही अश्रू तून वाहू लागल्या. अगदी थोडीशी धूळ झटकली तर आत मध्ये स्वच्छ लखलखीत नातं होतं. तसेच अनेक आठवणी दाटीवाटीने या पोटमाळ्यावर जमा आहेत. आजकाल तसही फार विचार करायला वेळच नाही आणि संवेदना बोथट होत चालले आहेत त्यामुळे या पोट मळ्या वरच्या आठवणी त्यांची साफसफाई फार वेळा होत नाही. पुढे पुढे तर हे पोटमाळे सुद्धा संकुचित होऊन जातील असं वाटायला लागलंय इतकं यांत्रिक आयुष्य होत चालले आहे. आज-काल आत्या काका मामा मावशी यांच्याकडे चार चार दिवस जाऊन राहण नाही त्यामुळे तो लळा ही लागत नाही.
पेज थ्री सिनेमातील पात्रांत प्रमाणे दो पल मिलते है साथ साथ चलते है जब
मोड आये तो हसके निकलते है अशी
मैत्री असते. आमचं मात्र तसं नाही अगदी गावाकडचं घराला घर लागून अनेक पिढ्या शेजारी असलेल्या लोकांशी एक वेगळं नातं आहे.
बाल मैत्रिणी आहेत. नातेवाईकांचे भावंडांचं एक वेगळे स्थान आहे. आत्ताच्या पिढीला कार्यप्रसंगी नाती माहिती होतात भेट होते मैत्री होते पुन्हा भेटलं की व्यवस्थित बोलणं होतं पण तो लळा काही लागत नाही .पोटमाळ्यावर चा झोपाळा पाहिला की सुद्धा अनेक आठवणी ताज्या होतात तो लाकडी झोपाळा त्यावर झोके घेत पाठ केलेले पाढे कविता-गाणी. शेजारी किती मुले या झोपाळ्यावर खेळली आहेत आणि मग पाढे पाठ झाले म्हणून काकूंनी दिलेला साखर फुटण्याचा खाऊ, हा सुद्धा मनाच्या पोटमाळ्यावर ती विराजमान आहे. याशिवाय शाळा शाळेतील मित्र मैत्रिणी शिक्षक गावाकडच्या टेकडीवरील देऊळ त्यामध्ये भरणारी जत्रा सारं सारं जणू पोटमाळ्यावर टाकलं गेलं आहे.
आनंद दुःख आश्चर्य मनातील सल छोटे-मोठे अपमान कधी डावललं गेल्याची भावना कधीतरीच तरीच मिळालेली कौतुकाची थाप ,
कधीतरीच मिळालेलं पहिल्या-दुसऱ्या नंबरचं बक्षीस आणि त्यामुळे वाटलेला अभिमान , शाळेमध्ये अगदी चार-चौघात केली गेलेली शिक्ष काही मिळवण्याची जिद्द काही मिळाल्याचं समाधान काही हळव्या भावना सारं काही आता पोटमाळ्यावर ती जमा आहे असं काही वाटायला लागलं आहे. कधीतरी त्यांची कविता होतेही. पण मग ती सुद्धा यांत्रिक पणे सुधारली जाते. आता सगळ्याच गोष्टींमध्ये मॅनेजमेंट हा भाग येतो तसंच या मनाच्या पोट मळ्याचे ही मॅनेजमेंट करायला शिकायला हव.
म्हणजे मग नीट कमी वेळात जास्तीत जास्त आणि काय घ्यायचं काय टाकायचं याचंही मॅनेजमेंट. पण मग हे मॅनेजमेंट समजलं तर पोट मळ्याची तरी गरज काय असंही वाटून जातं. कारण आखीव आणि रेखीव वरवर दिसतं तेवढेच नसतच ना?
किती सुंदर लिहीलंय.. वाह!
किती सुंदर लिहीलंय.. वाह! खुपसार्या नव्याजुन्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
पुलेशु!
चांगलं लिहलंय.
चांगलं लिहलंय.
चाछान लिहलंय!
छान लिहलंय!
Dhanyavad
Dhanyavad