Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना टोअर्स काय, दर वेळी तोच
हो ना टोअर्स काय, दर वेळी तोच उच्चार आणि
टोअर्स काय. काय झालं आजच्या
टोअर्स काय. काय झालं आजच्या भागात.
काय झालं आजच्या भागात.>>>>
काय झालं आजच्या भागात.>>>> आठवतंय तेवढं सांगते.गोंधळ सुरू असताना प्रज्ञा सोम्याला भडकवते आणि तो ठसका लागल्याचे नाटक करतो. तेव्हा आसा पूजेतून बबड्या बबड्या करत उठते आणि त्याला खोलीत घेऊन जाते. तिथे ती त्याला राजेंनी दिलेले atm card दाखवते.ते कार्ड पिन बदलण्याच्या बहाण्याने कोंबडीच्याने ताब्यात घेतले आहे. मग ते बाहेर जातात.मग दुसऱ्या दिवशी सकाळी आसाने नाष्ट्याला गाजर हलवा, पराठे,कॉफी केले आहे.शुभ्रा केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये जाऊन टोर टोअर्स असे उच्चार करून माहिती घेते आणि राजस्थानचे booking करते.तिकीटे घेऊन ती राजेंच्या बंगल्यात जाते आणि आसा तिला नाष्ट्याला बसवते.तिथे डबड्या पण येतो आणि ते दोघे आमच्या कडून लग्नाची भेट म्हणून ती तिकीटे त्या दोघांना देतात. आसा जेव्हा उघडून बघते तेव्हा सोहम म्हणतो की शुभ्रा हे मला का नाही सांगितले. तर ती म्हणते बघ तुला पण सरप्राईज मिळाले की नाही
धन्यवाद कनिका. रिटर्न गिफ्ट
धन्यवाद कनिका. रिटर्न गिफ्ट म्हणून राजे आता त्यांचे पण बुकिंग करणार वाटते. आसावरी सोहमला आल्याबरोबर मोबाईल दाखवते, आता कार्ड. आसावरी मंद असल्यासारखी का वागते, तो कसा आहे हे माहिती असून त्याला वाईट वागायला एका अर्थाने प्रवृत्त करते. आता शुभ्राही तेच करते. माठ बायका आहेत दोघी
झी परंपरेला जागून दोघीही
.
झी परंपरेला जागून दोघीही
.
झी परंपरेला जागून दोघीही
झी परंपरेला जागून दोघीही दिवसेंदिवस माठपणाचा कळस करत आहेत. मानबा मध्ये राधिका आणि तिची सासू सरिता. इकडे शुभ्रा आणि आसा.शुभ्रा प्रज्ञाला बरोबर हँडल करते मग सोम्या फ्रॉड आहे हे तिला कळू नये?
नेटकोपामुळे एकच प्रतिसाद तीनवेळा पोस्ट झाला होता. क्षमस्व
हो ना टोअर्स काय, दर वेळी तोच
हो ना टोअर्स काय, दर वेळी तोच उच्चार आणि >>>>>>> अगदी अगदी.
शुभ्रा आणि राधिकाची सासू सरिता सुरुवातीला स्ट्रॉन्ग दाखवल्या होत्या. अचानक ह्यान्चे स्वभाव का बदलले झीमवाल्यान्नी काय माहीत.
त्या सरिताचा नागपूरी टोन तर डोक्यातच जातो.
मॅडी त्या कपिल शर्मा शोमधल्या
मॅडी त्या कपिल शर्मा शोमधल्या कृष्णा सारखी दिसते.
बघितला आता टोअर्सचा भाग.
बघितला आता टोअर्सचा भाग. एकंदरीत शुभ्रा खूप जास्त शायनिंग मारत होती. टोअर्स पण त्या शायनिंगचाच भाग होता. वेड्या नवऱ्याबरोबर राहून शुभ्रालाही वेड लागलंय. केसरीच्या मुलीसुद्धा व्यवस्थित टूर म्हणत होत्या. हिलाच काय वारं भरलेलं काय माहित. असावारीच्या घरीसुद्धा मध्येच वेड्यासारखी हसत काय होती. ती बॅग अशी बुकिंग केल्यावर लगेच देतात का, आणि एकच बॅग दिली. दोघांचे कपडे एकच बॅगेत ठेवायचे का.
असावारीच्या घरीसुद्धा मध्येच
असावारीच्या घरीसुद्धा मध्येच वेड्यासारखी हसत काय होती. >>> हो ना, बळचं चिडवण्याचा प्रयत्न.
सोहमने गिफ्ट दिलं आणि मग म्हणे माहीत नव्हतं, त्याला काय कॅडबरी सेलिब्रेशन्स आणलयं बायकोने असं वाटत होतं का ? एडिटर मधे मधे डुलक्या घेत असावा, आधीच्या संवादांचा पुढच्या प्रसंगाशी संबंध असेल असं नाही असा डिसक्लेमर लावायला हवा झीने
एडिटर मधे मधे डुलक्या घेत
एडिटर मधे मधे डुलक्या घेत असावा, आधीच्या संवादांचा पुढच्या प्रसंगाशी संबंध असेल असं नाही असा डिसक्लेमर लावायला हवा झीने>>>>प्रचंड सहमत
कॅडबरी सेलेब्रेशन त्या पहाटे
कॅडबरी सेलेब्रेशन आसावरी आणि राजे मिळून त्या कॅडबरी एकामागे एक खाताहेत असं दृश्य आलं डोळ्यासमोर. त्या पहाटे पहाटे माहेरी जाण्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न म्हणून आजोबांना संवाद दिला होता, आज सकाळीच येऊन गेलीस ना.
आधीच्या संवादांचा पुढच्या
आधीच्या संवादांचा पुढच्या प्रसंगाशी संबंध असेल असं नाही असा डिसक्लेमर लावायला हवा झीने- हे बरेच वेळा होतं त्यामुळे खरंच द्यायला हवा.
आसावरी साधी दाखवायच्या नादात
आसावरी साधी दाखवायच्या नादात मंद दाखवतात आहेत. कंटाळा आला आता.
मला आता लक्षात आलं आहे. ही अ
मला आता लक्षात आलं आहे. ही अॅड्ल्ट लोकांची एक परिकथा किंवा अॅनिमेशन पट आहे त्या टाइप आहे. सर्व व्यक्तिरेखा एकेक शेड. अगदी सिंपल कथानक व हिरॉइन एकद्म सिंड्रेला टाइप. फार काही नुआन्सेस दिस णार नाहीत. घर छान आहे अभिजीतचे. तिथे वी वर्क ची पा टी होती. वी वर्क ची प्रॉपटी आहे का ती रेंट केलेली?!
तो पण म्हातारा नवरा अति उत्साही टाईप. कपाट भर चपला, नवा फोन अर्धे पैसे प्रॉफिट शेअरिन्ग मध्ये, ते ही लगेच अकाउंट मध्ये. काही वही खाता एंट्री पण नाही. बिचारा प्रेम ज्वर उतरला की नुकसान होते आहे हे लक्षात येइल काय त्याच्या?!
घरचाच बाप्या व्हिलन ही ट्रेंड सर्वत्र आहे. आणा नाईक, गुरुनाथ सोहम
दोघे ब्रेफा करत होते ते छान वाट ले.
आधीच हनिमून पॅके ज बुक करायची पण ट्रेंड. मानबा मध्ये पण. युरोप टोर. इथे राजस्थान टोर. काय टोर ड फोर्से पर्फॉरमन्स आहेत सर्वांचे.
टोअर्स टोअर्स >> ???
टोअर्स टोअर्स >> ???
टूर..
टूर..
ओह..
ओह..
वी वर्क ची प्रॉपटी आहे का ती
वी वर्क ची प्रॉपटी आहे का ती रेंट केलेली?! >>>>>>> ह्याआधी त्यान्नी सरन्जाम्यान्ना हे घर रेंट केले होते.
घर छान आहे अभिजीतचे.दोघे ब्रेफा करत होते ते छान वाट ले.>>>>>>>>> ++++++++११११११११
कालची निजोची हिरवी साडी छान होती. गोन्धळाच्या वेळची लाल नऊवारीही मस्त होती
' हनिमूनला जात आहात' म्हणण ऑकवर्ड वाटल असेल , म्हणून राजस्थानला फिरायला जात आहात अस म्हणत आहेत.
राजस्थान ला गेल्यावरही आ. सा
राजस्थान ला गेल्यावरही आ. सा. आणि राजे एकाच खोलीत राहून 2 टोकाला झोपणार का. खिक्क
बबड्या जाईल ना त्यांच्या मागे
बबड्या जाईल ना त्यांच्या मागे मागे, त्याला मध्ये घेऊन झोपतील.
आता कहर कडेलोट झालाय.
आता कहर कडेलोट झालाय. बबड्याने मारलेले आसावरीचे हॉटेलं मधल्या प्रॉफिट चे पैसे सगळेच विसरून गेलेत.
गेले २ दिवस बघताना आसावरी बै पण राजेंकडे ATM म्हणून बघतेय असं वाटतंय. अजून काही दिवसात "मी तुमच्याकडे तशा नजरेने बघितलं नव्हतंच" म्हणत आईसाहेब दागिने, atm कार्ड, पैसे घेऊन बबड्याचे लाड करायला निघून जातील बहुतेक.
एकच प्याला मधले सुधाकर आणि सिंधू बघतोय इथे. फक्त यात सुधाकर सिंधूचा बबड्या आहे. वैताग नुसता! शु भ्रा आणि आजोबाची पात्र पण लाईन सोडून वागत आहेत. बस झालं आता.
आसावरीने बबड्याला जरा म्हणून
आसावरीने बबड्याला जरा म्हणून शिस्तीत/परिस्थितीची जाणीव असलेला असा मुलगा म्हणून नाही वाढवला। तर नुसताच कुलकर्णी खानदानाचा चशमोचिराग अगदीच लाडाकोडात वाढवला आहे।
त्याने राजेंकडून ७ लाख, आजोबांकडून (दागिन्यांचे) २ लाख, ते प्रॉफिट चे पैसे , शुभ्राचा डायमंड नेकलेस, आसाचे मंगळसूत्र आणि आसाचे ATM असं सगळ भलंमोठं घबाड लंपास केले आहे . लाज तर वाटत नाही त्याला पुन्हा आईचे लग्न मोडायला निघालाय।
घरचाच बाप्या व्हिलन ही ट्रेंड
घरचाच बाप्या व्हिलन ही ट्रेंड सर्वत्र आहे. आणा नाईक, गुरुनाथ सोहम >>>> भन्नाट!
शुभ्राचा नेकलेस बबड्याच्या
शुभ्राचा नेकलेस बबड्याच्या मित्राने परत केलाय, नकली आहे म्हणे. बबडयाने तो नेकलेस शुभ्राने बघू नये म्हणून केसरी टुर्सच्या बॅगेत लपवला ट्रिपला जाण्याआधी.
हि
शेवटच गाण छान होत. कुठल्या चित्रपटातल होत?
Submitted by सूलू_८२ on 20 January, 2020 - 07:27
आला तो रंग पुन्हा आला अन् गंध पुन्हा आला या अल्लड चाफ्याला..
हे संपूर्ण प्रेमगीत खास तुमच्यासाठी.
गीतकार - अभिषेक खणकर
संगीतकार - समीहन
गायन - स्वप्नील बांदोडकर आणि आर्या आंबेकर Swapnil Bandodkar Aarya आंबेकर
#AggabaiSasubai #ZeeMarathi Tejashri Pradhan Nivedita Ashok Saraf Dr. Girish Oak Ashutosh Patki
बबड्याने ग्रुप टूरमध्ये
बबड्याने ग्रुप टूरमध्ये बुकिंग केलं होतं आणि आता राजेंबरोबर फिरत आहेत. राजेंना काहीही अशक्य नाही, तिथे राजस्थानातही लोक त्यांना ओळखतात आणि फोटो काढतात. उद्या प्रदर्शनात ठेवलेली लाल गाडी बाहेर काढणार आहेत. बबड्या रडणार बहुतेक गाडीत बसायचं म्हणून. बबड्या भोकाड पसरत नाही एवढंच, नाहीतर पाच वर्षाचा मुलगाच आहे तो शरीराने वाढलेला.
धन्स अजनबी, पण लिन्क कुठेय?
धन्स अजनबी, पण लिन्क कुठेय?
बबड्या भोकाड पसरत नाही एवढंच, नाहीतर पाच वर्षाचा मुलगाच आहे तो शरीराने वाढलेला. >>>>>>>>> अगदी अगदी बाकी केसरीची ट्रीप छान झाली. डिनर डेट, कॅमल राईड इ. इ. छान दाखवला राजस्थान. बबडया आला बिब्बा घालायला ट्रीपमध्ये. आल्या आल्या नखरे सुरु केले. राजेन्ची खोली घेतली, ताप आल्याच नाटक करुन पडून राहिला.
तो फिरत्या खुर्चीचा सिन आवडला.
तिथे राजस्थानातही लोक त्यांना
तिथे राजस्थानातही लोक त्यांना ओळखतात आणि फोटो काढतात.
Pages