निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी बरोबर अदीजो .
Spathodia campanulata
याला पिचकारीच झाड म्हणतात कारण याच्या कळ्या चिमटीत धरून दाबल्यास त्यातून पिच्कारीसारखे पाणी उडते

निळी अबोली. Proud
नाव ऋतुराज सांगतील, डरनेका नै.

Eranthemum roseum
रान अबोली, दशमुळी
सध्या बऱ्याच ठिकाणी फुललेली दिसते...

धाग्याने विक्रमी वेळेत एकहजारी गाठल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन>>>>>> खरच की, हजारी ओलांडली....सर्वांचे अभिनंदन

रानमोडी
सध्या भरभरून फुलणारी रानमोडी ही एक invasive वनस्पती आहे, घाणेरीसारखी ही देखील प्रचंड फोफावते
Chromolaena odorata

IMG_20191214_072824.jpg

ओहोहो टेसू के फूल!!! पलाश, पळस!!!
होळीची आठवण येते. मला ही फुलं फार आवडतात. भर दुपारी ज्या उन्मादात ही फुलतात, रंग विखुरतात ...!!!
>>>>>लो, डाल डाल से उठी लपट! लो डाल डाल फूले पलाश।
यह है बसंत की आग, लगा दे आग, जिसे छू ले पलाश॥
.
लग गयी आग; बन में पलाश, नभ में पलाश, भू पर पलाश।
लो, चली फाग; हो गयी हवा भी रंगभरी छू कर पलाश॥ >>>>>>>>>

- नरेन्द्र शर्मा

वरील पळसाची फुले पाहून उजूने दोन कविता पाठवल्या होत्या. मला आवडल्या म्हणून येथे देतोय.
हे ‘पलास के फुल’ या टिव्ही मालीकेचे शिर्षक गीत आहे.

जब जब मेरे घर आना तुम,
फूल पलाश के ले आना तुम...
जब जब याद मेरी आए तो,
फूल पलाश के ले आना तुम...

मेरा ख्याल है यह, हकीकत हो जाना तुम,
मेरी बाहों में आ कर सो जाना तुम.
अपनी खुशबू से घर को महकाना तुम,
फूल पलाश के ले आना तुम..

दुनिया के नजारे स्वीकार नही,
अपनी मुस्कराहट से मुझे बहलाना तुम.
सुर्ख हो जाये जब ज़िंदगी की फिजा,
फूल पलाश के ले आना तुम..

मौसम बसंत का जब भी आएगा,
अपने आँगन में खुशबू लाएगा,
जब भी हो जाये उदास मन मेरा,
मीठी सी बातों को होठों पे रख लाना तुम.
फूल पलाश के ले आना तुम..

मेरे सपनो को तोड़ कर न जाना तुम,
अपने अटूट रिश्ते का विश्वास,
मेरे बेताब दिल को दे जाना तुम,
फूल पलाश के यूँ ही हर बार,
ले आना तुम...

आणि ही एक कविता.

उतनी दूर मत ब्याहना बाबा !

बाबा!
मुझे उतनी दूर मत ब्याहना
जहाँ मुझसे मिलने जाने ख़ातिर
घर की बकरियाँ बेचनी पड़े तुम्हे

मत ब्याहना उस देश में
जहाँ आदमी से ज़्यादा
ईश्वर बसते हों

जंगल नदी पहाड़ नहीं हों जहाँ
वहाँ मत कर आना मेरा लगन

वहाँ तो कतई नही
जहाँ की सड़कों पर
मान से भी ज़्यादा तेज़ दौड़ती हों मोटर-गाडियाँ
ऊँचे-ऊँचे मकान
और दुकानें हों बड़ी-बड़ी

उस घर से मत जोड़ना मेरा रिश्ता
जिस घर में बड़ा-सा खुला आँगन न हो
मुर्गे की बाँग पर जहाँ होती ना हो सुबह
और शाम पिछवाडे से जहाँ
पहाडी पर डूबता सूरज ना दिखे ।

मत चुनना ऐसा वर
जो पोचाई और हंडिया में
डूबा रहता हो अक्सर

काहिल निकम्मा हो
माहिर हो मेले से लड़कियाँ उड़ा ले जाने में
ऐसा वर मत चुनना मेरी ख़ातिर

कोई थारी लोटा तो नहीं
कि बाद में जब चाहूँगी बदल लूँगी
अच्छा-ख़राब होने पर

जो बात-बात में
बात करे लाठी-डंडे की
निकाले तीर-धनुष कुल्हाडी
जब चाहे चला जाए बंगाल, आसाम, कश्मीर
ऐसा वर नहीं चाहिए मुझे
और उसके हाथ में मत देना मेरा हाथ
जिसके हाथों ने कभी कोई पेड़ नहीं लगाया
फसलें नहीं उगाई जिन हाथों ने
जिन हाथों ने नहीं दिया कभी किसी का साथ
किसी का बोझ नही उठाया

और तो और
जो हाथ लिखना नहीं जानता हो "ह" से हाथ
उसके हाथ में मत देना कभी मेरा हाथ

ब्याहना तो वहाँ ब्याहना
जहाँ सुबह जाकर
शाम को लौट सको पैदल

मैं कभी दुःख में रोऊँ इस घाट
तो उस घाट नदी में स्नान करते तुम
सुनकर आ सको मेरा करुण विलाप.....

महुआ का लट और
खजूर का गुड़ बनाकर भेज सकूँ सन्देश
तुम्हारी ख़ातिर
उधर से आते-जाते किसी के हाथ
भेज सकूँ कद्दू-कोहडा, खेखसा, बरबट्टी,
समय-समय पर गोगो के लिए भी

मेला हाट जाते-जाते
मिल सके कोई अपना जो
बता सके घर-गाँव का हाल-चाल
चितकबरी गैया के ब्याने की ख़बर
दे सके जो कोई उधर से गुजरते
ऐसी जगह में ब्याहना मुझे

उस देश ब्याहना
जहाँ ईश्वर कम आदमी ज़्यादा रहते हों
बकरी और शेर
एक घाट पर पानी पीते हों जहाँ
वहीं ब्याहना मुझे !

उसी के संग ब्याहना जो
कबूतर के जोड़ और पंडुक पक्षी की तरह
रहे हरदम साथ
घर-बाहर खेतों में काम करने से लेकर
रात सुख-दुःख बाँटने तक

चुनना वर ऐसा
जो बजाता हों बाँसुरी सुरीली
और ढोल-मांदर बजाने में हो पारंगत

बसंत के दिनों में ला सके जो रोज़
मेरे जूड़े की ख़ातिर पलाश के फूल

जिससे खाया नहीं जाए
मेरे भूखे रहने पर
उसी से ब्याहना मुझे ।

- निर्मला पुतुल

मला दुपारचे फार आकर्षण आहे. अनेक दुपारी स्मरणंआत आहेत मग ती रंगपंचमीतली भिजणारी गारेगार दुपार असो, की आंब्याच्या सीझनमधली घमघमती दुपार. कॅरम, पत्ते,व्यवहार खेळत मजेत घालवलेल्या दुपारी असोत की उशीरा ऑफिसला जातानाची मुंबईतली रेल्वेतली/बसमधली दुपार असो. अशा दुपारच माझा साथी पळस. त्या माझ्या सच्च्या मित्रावर लिहीलेला हा एक जुना लेख -
_________
अविस्मरणिय पळस
________________
लहानपणी मे च्या सुट्टीत, पेटलेल्या दुपारी
लाल ज्वाळांनी वेढलेला पळस
गॅलरीच्या कठड्यावर रेलून,
अंगावर थंड वार्‍याची झुळुक घेत,अनुभवलेला पळस
आईची मेमधील सुट्टी ,नाचर्‍या आनंदी घरदारात
अनुभवलेली निव्वळ शून्यातीत दुपार
मूड त्या दुपारसारखाच,निरभ्र, निवांत
माठातील वाळ्याचा उन्हाळी सुगंध
माझ्या बालपणाचा साथीदार- भारदस्त पळस
काळाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणणारी दुपार
तुझा जुलमी अंमल माझ्यावर चालणार नाही
मी अक्षय आहे,
गॅलरीत ऊभ्या असलेल्या त्या लहान मुलीच्या
मनात माझे स्थान चिरंतन,
अविनाशी, अढळ आहे,
मरतेवेळीही जे काही अमृतक्षण तिला आठवतील
त्यामध्ये माझा नंबर अव्वल असेल.

व्वा, मस्तच फोटो आहेत टॅबुबीया व पळसाचे....
पळस माझं आवडत झाड, ते भरभरून फुललं की नुसतं बघत राहावं

सामो आणि शालीदा कविता खूपच छान.....
पांढरा पळस पण असतो एक, पण फुललेला मी अजून नाही पहिला
पळसवेल मात्र छान फुलते

अमीर खुश्रुने पळसाच्या फुलांना सिंहाच्या रक्तरंजित पंज्याची उपमा दिली आहे

कीरमुखसदृक्षै राजते वसुधा पलाशकुसुमै: !
बुद्धस्य चरण्वन्दनपतितैरिव भिक्षुसंघै:!

पोपटांच्या लालभडक चोचीसारख्या पळसाच्या फुलांनी पृथ्वी अशी शोभते आहे जणू बुद्धाच्या चरणाशी दण्डवत घालणाऱ्या भिक्षुच्या संघासारखं हे दृष्य दिसत आहे. (गाथा सप्तशती)

युवजनहृदयविदारणमनसिजनखरुचिकिंशुकजाले॥

जयदेवाच्या गीतगोविंदामध्ये तो म्हणतो की, तमाल वृक्षांच्या कोवळ्या नाजूक पानांनी सुवासिक अशी कस्तुरी शोषून घेतली आहे व अरण्यातील पलाश फुलांच्या पाकळ्यांची प्रेमरुपी तळपती नखे तरुण हृदयावर घाव करत आहेत.

ऋतुसंहारत कालिदासाने विन्ध्य भूमीचे वर्णन असे केले आहे,
आदिप्तवन्हिसदृशैर्मरुतावधूतै:।
सर्वत्र किंशुकवनै: कुसुमावनम्रै:।
सद्यो वसंतसमये हि समचितेयं।
रक्तांशुका नववधूरिव भाति भूमी ।
सध्या वनामध्ये भडकलेल्या अग्नीसारख्या लाल पळसाच्या फुलांनी पळसाची झाडे झुकलेली आहेत. जणू काही धरित्री ही जणू लाल वस्त्र नेसलेल्या नवपरिणीत वधूप्रमाणे भासत आहे.

मुरारी (Rufous-tailed Lark)
(क्लोजप असल्याने आकार मोठा वाटेल पण हा मुरारी चिमणीएवढा असतो. १६ सेंमि.)

Pages