"वो 'अरे पिटल' का बोर्ड है ना उसके बाद अंदर लेफ्ट मारो और सौ मीटर आवो.ब्लु और सिल्व्हर कलर का पाटी है उधर से अंदर आव.गेट पर फोटो निकालके लो"
"अरे पिटल क्या है? पिटला भाकरी का नया हॉटेल खुला है क्या?"
"नही वो मॅक्सकेअर हॉस्पिटल है.लेकीन उसका बहुत सारा अक्षर बुझ गया है ना, पुरा नाम बोलूंगा तो आपको समझ मे नही आयेगा."
पलीकडे माझे हात शिवशिवत होते.या माणसाला फोनवर पत्ता सांगायला बसवायचा म्हणजे अवघड प्रसंग.खूप लांबच्या गोष्टी सांगतो पत्त्यात.दिड किलोमीटरवर असलेल्या हॉटेल च्या आपण नकाशात मागे असलो तरी तिथे मागे जायला रस्ता बराच फिरून आहे हे कोण सांगणार?ते माणसांना त्या हॉटेलच्या मागे जायला लागल्यावर रखवालदाराने हटकलं की कळणार.म्हणजे, 3 वर्षांपूर्वी होता हॉटेल च्या मागून रस्ता.पण मग हायवे च्या अर्धा किलोमीटर की काहितरी पर्यँत दारू प्यायची नाही असा नियम आल्यावर हॉटेल ने एकदम गोल गोल जंतर मंतर सारखा रस्ता बनवून त्याच्या मागच्या बाजूला हॉटेल ची एन्ट्री ठेवून लोकांना हायवेच्या अर्धा किलोमीटर लांब दारू पिता येईल अशी व्यवस्था केली.आणि आमच्या घरापर्यंत यायचा मार्ग लांबला.
त्यात हा शहाणा गेट वर ते नवं ऍप निघाल्या पासून बायका समारंभात एकमेकींना "जाताना हळदीकुंकू लावून घ्या हां ताई" सांगतात त्या उत्साहाने सगळ्यांना "आते टाईम गेट पर फोटो निकालके लो" सांगतो.
"मला दे बरं फोन"
"हां भैय्या, मै क्या बोलती हूँ, वो चाय की दुकान है ना, बहुत सारे लडका लडकी बैठके सिगारेट पी रहे दिखेंगे, वहा से मुडो. फिर एक बहुत बडा किराणा दुकान दिखेगा, उसपे बहुत सारे वेफर्स झाडू और पायपुसणे,सॉरी डोअर मॅट लटके होंगे, वहा से सीधा आव.फिर एक स्कुल लगेगा वहा पे बहुत सारा पीला गाडी पार्क किया दिखेगा वहा से आगे नीला सफेद पट्टा का गेट रहेगा वहा से अंदर आव."
"हा काय पत्ता आहे?सिगारेट पिणारी मुलं 24 तास असतात का?"
"अरे पिटल चा पत्ता सांगणं मला नाही पटत.त्याची वेगवेगळी अक्षरं बिघडतात.कार हॉस्पिटल, ऍक्स केअर हॉस्पिटल, मेयर ऑस्पिटल,मार ऑस्प,काई ऑस्प. ते खूप मिस गायडिंग ठरतं ना."
सगळ्या दुकानदारांनी ज्या उत्साहाने काही वर्षांपूर्वी चकचकीत पाट्या लावल्या, सगळ्यांच्या पाट्यातली अक्षरं विझायला लागलीत.एक "मूळव्याध क्लिनिक" मात्र एकही अक्षर न विझता ठसठशीत उभं आहे.पण ते काय आम्ही अजून तरी पत्त्यात सांगणार नाहीय.हायवे बनायच्या आधी आम्ही 'अँटिक वाइन शॉप च्या गल्लीत वळा' सांगितलं की कसं परफेक्ट कळायचं सगळ्यांना.
मला पत्ते सांगायचा आजार आहे.म्हणजे, कोणीही काहीही पत्ता विचारला की तो मला किंवा कोणालाही विचारला असला तरी सगळी कामं सोडून मी पत्ता सांगते.हावभावासहित. यातली काही रत्नं आमच्या उपद्रवी कुटुंब सदस्यांनी बरीच वर्षं लक्षात ठेवली आहेत.
"आता रस्ता वळेल.85% लोक तिथे वळतील.पण तुम्ही वळू नका.तुम्ही न वळल्याबद्दल बरीच गर्दी शिव्या घालेल. पण तसेच पुढे जा.मग आलाच रक्षक चौक."
"मोठी पांडबा पाटील स्मशानभूमी दिसली की गाडी स्लो करा.डावीकडे घ्या.जरा पुढे गेलं की लगेच आयुर्वेदिक नर्सरी."
"हापूस आंब्याची गाडी उभी आहे त्याच्या पुढच्या गल्लीत वळा."(गाडी आंबे विकून घरी गेली की रस्त्यातच तबला पेटी वाजवत बसा.)
"तो असा वळणा वळणाचा दोन एस आकार वाला रस्ता आहे त्याने सरळ या."
"तो लांबचा उजवा घेऊ नका, असा जवळचा उजवा घ्या मग हे असे इकडे वळा आणि खाली या सरळ."(हे असे इकडे ची दिशा फोनवर बोलताना हाताने दाखवलीय त्यामुळे पत्ता विचारणारे 'हे' लवकर घरी येण्याची अजिबात शक्यता नाही.)
हे खाली या सरळ आणि वर जा सरळ वाले पत्ते सांगायला मी पण हल्लीच शिकतेय.म्हणजे, असे पत्ते ऐकून 'वर म्हणजे कुठे' आणि 'खाली म्हणजे कुठे' हे मला अजून कळत नाही.मी स्टेशनवर उभी असायचे तेव्हा 'अप' म्हणजे नकाशात वर, राजस्थान,यूपी,गुजरात,जम्मू काश्मीर कडे जाणारी गाडी आणि 'डाऊन' म्हणजे नकाशात खाली पुणे, बंगलोर,कोल्हापूर, केरळ ला जाणारी गाडी हे खूप अभ्यासाने शोधून काढलं होतं.पण दुसऱ्याला सांगताना 'हे असे अमुक तमुक वरून खाली या सरळ' म्हणून दडपून द्यायचं.कुठे ना कुठे पोहचतील.कोणी ना कोणी पत्ता सांगेलच.नियतीच्या मनात असेल तर पोहचतील.
सर्वात भयंकर पत्ते ती मॅप वाली बाई सांगते."गोल चक्कर पे तिसरा निकास ले" म्हटलं की किंचाळून तिला गदागदा हलवून "गोलावर एक दोन तीन कोणत्या बाजूने मोजू?"म्हणून विचारावं वाटतं.तिसरा एक वेळ ठीक आहे, कधी कधी पाचवा निकास घ्यायला सांगते.असा पाच सहा आरे असलेला सूर्या सारखा दिसणारा चौक आपल्या इथे कुठे आहे याचा फार विचार करावा लागतो.परवा लोणावळ्याला पत्ता शोधताना बाईने आम्हाला एका अरुंद रस्त्याने एक मातीचा ढीग आणि एक नाला असलेल्या डेड एन्ड ला नेऊन सोडलं.मग नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की बाईच्या सेटिंग मध्ये 'एक्सक्लुड नॉन पेव्हड रोडस' असा एक ऑप्शन होता तो ऑफ करायचा होता म्हणे.अशीच एकदा खरेदी करत घरी जायला उशीर झाला म्हणून मी पोळीभाजी केंद्र शोधत होते चालत.मग बाईने आधी मला रिलायन्स फ्रेश च्या गोडाऊन ला, मग पु ना गाडगीळ च्या दारात आणि मग कपड्याच्या दुकानात सोडलं.प्रत्येक वेळी ती गंतव्य 20 मीटर वर आहे सांगत होती.शेवटी पोळीभाजी केंद्राचा नाद सोडून कपडयाच्या दुकानाला ईश्वरी संकेत मानून 2 टॉप घेऊन टाकले.
आम्ही सोलापूर ला चाललो होतो.तेव्हा मराठी मॅपबाई ला सोलापूर चा पत्ता सांगितला.आणि ऐन वेळी जवळ पुढे दुसरीकडे जायचं ठरलं. बाईला बिचारीला माहितीच नाही.ती आपली 'आता वळा' 'आता यु टर्न घ्या आणि मग वळा' 'आता डावीकडे चक्राकार मार्ग घ्या मग यूटर्न घ्या' म्हणून गयावया करायला लागली.आम्ही बरेच पुढे आल्याचं तिला कळल्यावर 'शक्य असेल तर वळसा घेऊन मागे वळा' असं दोन तीन वेळा म्हणाली आणि मग गप्प बसली. 'मी माझं सांगायचं काम केलं, तुम्ही ऐकत नाही.आता जायचं तिथे जा,रस्ता चुका आणि मरा मेल्यानो' असं मनात म्हणाली असेल शेवटी.
परवाचीच गोष्ट.आम्हाला खेड शिवापूर पुढे जाऊन एक चिमुकलं वळण घेऊन गराडे ला जायचं होतं.आणि मॅप बाई ते वळण जवळ आलंय सांगत होत्या.पण जवळ आल्यावर तिथे काही वळण बिळण दिसलंच नाही.मॅट्रिक्स सारखं कोणत्या तरी वेगळ्या समांतर विश्वात ते वळण असेल.परत यु टर्न घेऊन परत वळण शोध असं करत आम्ही 3 वेळा खेड शिवापूर टोल नाक्यातून गेलो आणि टोल भरला.शेवटी तिसऱ्या वेळा एका माणसाने विरुद्ध बाजूला विरुद्ध दिशेला वळायचा एक वेगळाच रस्ता सांगितला आणि त्याने आम्ही गराडे ला पोहचलो.हा मला अजूनही दैवी चमत्कार वाटतो.
"इतकं कठीण नसतंय पत्ते शोधणं.आपण एका हेलिकॉप्टर मध्ये आहे असं समजून सगळ्या परिसराचा एरियल व्ह्यू मनात डोळ्यासमोर आणायचा.पत्ता लगेच सापडतो." अशी एक बहुमूल्य टीप आमच्या एका फॅमिली मेम्बराने दिली आहे.आता मी एकटीने पत्ता शोधण्याची वेळ यायची वाट बघतेय.म्हणजे मग लगेच मनाच्या हेलिकॉप्टर मध्ये बसणार.मग पुढे गाडीचं काय व्हायचं ते होऊदे.
मस्त लेख!
मस्त लेख!
असे पत्ते देणारे आणि ते ग्राह्य मानून शोधणारे दोन्ही लोक धन्य होत>>>> आंब्याचे झाड,पाण्याची टाकी आणि डी.एन. नगर इतक्या पत्त्यावर,मातोश्रीबरोबर अंधेरीमध्ये माझी वरात निघाली होती.बरेच मोठे आहे ते नगर.शेवटी सगळ्या खुणा मिळून तिच्या मैत्रिणीचे घर सापडले.
भारी ग !! मस्त लिहिलंय !
भारी ग !! मस्त लिहिलंय !
अगदी माझ्या घरी याय्चं असेल तर कसं येऊ असं कुणी विचारलं तरी जरा कंफ्युजनच होतं. आणि मला कुठे जायचं असेल तरी आधी रस्ता मनात विचार करुन बघते>> सस्मित सेम आणि जोरदार पिंच !! माझा पण अल्मोस्ट सेम लोच्या आहे .. मी एकदा ठरवून स्वतःच्या घराकडे जाण्याच्या खुणा लिहून काढल्या होत्या लोकांना सांगता याव्यात म्हणून.
आणि हमखास मलाच सग्गळे रिक्षावाले नवीन भेटतात किंवा ते चॅप्टर असतात .. ताई , इकडून घेऊ का तिकडून घेऊ ? असं विचारतात .. म्हणजे झालं.. लुटायला सोप्पी आहे मी .. त्यामुळे मला ओला/उबेर आवडते. इकडून नाही तिकडून .. कुठून का न्या ..ठरलेले पैसे द्या आणि विषय मिटवा
"अमक्या चौकात थोडे पुढे आलं
"अमक्या चौकात थोडे पुढे आलं की शिव लॉन्ड्री आहे [ ज्याचं रस्त्याकडचं दार तीन फुट फक्त असतं] त्याच्याकडे विचारा. आम्चे कपडे त्याच्याकडेच कसतात." असा पत्ता सांगणारेही आहेत.
ह्या सगळ्या गदारोळात मला,
ह्या सगळ्या गदारोळात मला, 'महात्मा गांधी, की नेहरू रोड ... श्रद्धानंद रोड .... मालवीय रोड ..... खुणेचा वडाचा पार .... मद्रासी / कवडेबुवाचा राम ... सुरूची वाडी' आठवलं.
माझा एक मित्र जबरी पत्ता सांगतो. मी सहसा त्याच्यावर अवलंबून असतो. मला अजूनही 'ड्राईव्ह २०० फीट साऊथवेस्ट', किंवा 'क्वार्टर माईल ऑन द नॉर्थ' असल्या दिशा कळत नाहीत. एखाद्याने, 'यू विल सी अ बिग साईन ऑन द लेफ्ट. यू कॅनॉट मिस इट' म्हटलं, की मी हमखास ती साईन मिस करतो. एक्झिट्स चुकत चुकत तर मी निम्मा देश पालथा घातलाय.
हे झालं परदेशातलं पण भारतात सुद्धा 'इथून असे सरळ गेलात ना की उजवीकडे एक निळी बिल्डींग लागेल, त्याच्या अलिकडे डावीकडे वळा' असं कुणी सांगितलं की हात जोडून विचारावसं वाटतं, 'काका, अलिकडे वळा, म्हणजे त्या बिल्डींगपर्यंत जाऊन उलटं वळावं लागेल ना. त्यापेक्षा वळणाच्या 'अलिकडची' एखादी खूण सांगा ना!'
अतिशय मस्त लिहीले आहे. हहपुवा
अतिशय मस्त लिहीले आहे. हहपुवा. सुपर्ब!!! कमेंटसही विनोदी आहेत.
सस्मित सेम आणि जोरदार पिंच !!
सस्मित सेम आणि जोरदार पिंच !! माझा पण अल्मोस्ट सेम लोच्या आहे .. >>>>> किती आनंद झाला मला हे वाचुन
Mast! khup majja aali
Mast! khup majja aali wachtana!
पण पत्ता गूगलवर शोधायचाच
पण पत्ता गूगलवर शोधायचाच कशाला पुण्यात? तुम्हाला विनोदी उत्तरं ऐकायची नसतात का?
मस्त लेख!
मस्त लेख!
सगळ्यात बेश्ट म्हणजे जवळ पास
सगळ्यात बेश्ट म्हणजे जवळ पास आले की पानपट्टी च्या टपरीवर विचार्णे.
बायकोची मावशी प्रथमच आमच्या
बायकोची मावशी प्रथमच आमच्या घरी येणार होती. तिला पत्ता सांगताना मी सांगीतले होते "अमुक ठिकाणी डावीकडे वळा, समोरच अमुक अमुक मोठे सुपरमार्केट दिसेल. तेथे एक लिटर दुध, अमुक बिस्किटे व तुझ्या मुलाला जे चॉकलेट आवडते ते घ्या. काऊंटरवरील माणसाला सोसायटीचे नाव सांगा म्हणजे त्याचा पोरगा तुम्हाला अगदी घरी आणून सोडील." दुर्दैवाने मावशीने माझा हा खोडकरपणा अतिशय खेळकरपणे घेतला.
मला सुद्धा रस्ते अजिबात
मला सुद्धा रस्ते अजिबात लक्षात राहत नाही.. माझा लहान भाऊ भेटायला आला आणि कुठे जेवायला किंवा फिरायला जायचं असेल की मी त्याला इथल्या प्रत्येक गल्ली मधे चार चार वेळा फिरवते मग तो वैतागतो एकतर छोटे रस्ते त्यात भयानक ट्रॅफिक आणि वरून माझं 'हा बस इथून पुढे गेलं की आलच ते ' हे ऐकुन त्याने इकडे यायचं बंदच केलंय आता..
आणि गाडीवर मागे बसून पत्ता सांगताना मी त्याला हातवारे करून म्हणते आता इकडे टर्न घे मग तर भयानक चिडतो तो..इकडे म्हणजे कुठे..उजवीकडे की डावीकडे..मला काय पाठीमागे डोळे आहेत का तुझे हातवारे दिसायला वगैरे वगैरे...
मला कुणी पत्ता विचारत च नाही आता..सुटले एकदाचे..
मी त्याला हातवारे करून म्हणते
मी त्याला हातवारे करून म्हणते आता इकडे टर्न घे मग तर भयानक चिडतो तो..इकडे म्हणजे कुठे..उजवीकडे की डावीकडे..मला काय पाठीमागे डोळे आहेत का तुझे हातवारे दिसायला>>>>>.
(No subject)
> अशीच एकदा खरेदी करत घरी
> अशीच एकदा खरेदी करत घरी जायला उशीर झाला म्हणून मी पोळीभाजी केंद्र शोधत होते चालत.मग बाईने आधी मला रिलायन्स फ्रेश च्या गोडाऊन ला, मग पु ना गाडगीळ च्या दारात आणि मग कपड्याच्या दुकानात सोडलं.प्रत्येक वेळी ती गंतव्य 20 मीटर वर आहे सांगत होती.शेवटी पोळीभाजी केंद्राचा नाद सोडून कपडयाच्या दुकानाला ईश्वरी संकेत मानून 2 टॉप घेऊन टाकले. > पु ना गाडगीळच्या थोडंसच पुढे आहे पोभा व बिर्याणी केंद्र. त्याच लायनीत. द्वारकाधीशमधे. Operi Curry Point 9888898888. मी कधी ट्राय केलं नाही.
औंध मध्ये होते, पिसौ मध्ये नै
औंध मध्ये होते, पिसौ मध्ये नै.
ओपेरी ला जाऊन बघायचं आहे एकदा
हे खाली या सरळ आणि वर जा सरळ
हे खाली या सरळ आणि वर जा सरळ वाले पत्ते सांगायला मी पण हल्लीच शिकतेय.म्हणजे, असे पत्ते ऐकून 'वर म्हणजे कुठे' आणि 'खाली म्हणजे कुठे' हे मला अजून कळत नाही.!!!
मी त्याला हातवारे करून म्हणते
मी त्याला हातवारे करून म्हणते आता इकडे टर्न घे मग तर भयानक चिडतो तो..इकडे म्हणजे कुठे..उजवीकडे की डावीकडे..मला काय पाठीमागे डोळे आहेत का तुझे हातवारे दिसायला>>>>>. Lol
मला सुद्धा रस्ते अजिबात
मला सुद्धा रस्ते अजिबात लक्षात राहत नाही
बायकांना मेंदूत रस्ते लक्षात ठेवत नाही खुणा लक्षात ठेवतात अस वाचाल होत
खालच्या अंगाला, वरच्या अंगाला
खालच्या अंगाला, वरच्या अंगाला या दिशा आमच्याकडे सर्रास वापरतात. स्थळानुसार त्या दिशांचे अर्थ बदलतात. दशदिशांपैकी कोणतीही दिशा वरची असु शकते. उगवतीला, खात्या-धुत्या हाताला वगैरे दिशाही आहेतच.
माझे काका पत्ता सांगतात तेंव्हा ऐकणाऱ्याचा चेहरा पहाण्यासारखा असतो. नैऋत्येला दहा बारा कासरे गेलास की मावळतीचे माळवद असलेले घर तुझ्या मावळनीचेच.
कसलं भारी लिहीलंय
कसलं भारी लिहीलंय
पोट दुखलं हसून बाई माझं तर
काल मुंबईत बेलापूर, खारघर,
काल मुंबईत बेलापूर, खारघर, वाशी भागात फिरताना गुगल मॅप नं तंतोतंत अचूक मार्गदर्शन केले. सखाराम पाटील रस्त्याच्या उल्लेख बाई सॅकॅरॅम पॅटिल असा करत होती, इतर ठिकाणांचेही विचित्र उच्चार करत होती. कुणाला काही विचारायची गरज पडली नाही.
हॉटेलऐवजी बर्फाच्या नदीत पडला
हॉटेलऐवजी बर्फाच्या नदीत पडला ‘तो’, Google Maps वरील विश्वास पडला महागात
पण त्या बाबाजीला कळलं नाही का
पण त्या बाबाजीला कळलं नाही का आपण बर्फ़ावरून चालतोय ते ?☺️
हो ना पण ती बातमी वाचल्या
हो ना पण ती बातमी वाचल्या वाचल्या हा धागा आठवला.
हे रत्न मिसले होते खूप हसलो.
हे रत्न मिसले होते खूप हसलो.
ओला चालक (म्हणजे कोरडाच असतो तो, पण whatever ! ) होण्यासाठी गूगल मॅप, रस्ते आणि खाणाखुणा अजिबात न समजणे, फोनवरच्या व्यक्तीचे अजिबात न ऐकणे हेच क्वालिफिकेशन असते बहुतेक.
एक जण सांगितल्या पत्त्यावर नीट येईल तर शपथ
वेगवेगळ्या शहरात पत्ते
वेगवेगळ्या शहरात पत्ते सांगण्याविचारण्याची पद्धत कधी हसायला कधी रडायला भाग पाडते.
- पुण्यात सपाट रस्त्यावर वर या - खाली या.
- हैदराबादेत 'सिधा जाको एक्कीच रोड है' नाही तर 'दो लेफ्टां आते, फिर दो राईटां आते' !
- कोल्हापुरात वरल्या-खालच्या अंगाला इ.
- बडोद्यात कुठूनही कुठेही 'सिद्धू' जावानूं. अरे एकदा तरी विराट किंवा तेंडुलकर जावानूं म्हणा रे !
- चेन्नईत गूगल नसेल तर तमिळ शिका किंवा मग हातवारेच. काय समजायचे ते समजा, कधीतरी कुठेतरी पोहचालच
ह्यात अजून भर म्हणजे
ह्यात अजून भर म्हणजे घड्याळाचे काटे दिशा सांगण्यासाठी वापरणे.
10'o clock, 6'o clock
लोचाच होतो सगळा
मित्रमंडळ चौकात Take third
मित्रमंडळ चौकात Take third exit at round about म्हणजे सारस बागेकडे वळायचे हे घोकून ठेवले आहे
चेन्नईत गूगल नसेल तर तमिळ
चेन्नईत गूगल नसेल तर तमिळ शिका किंवा मग हातवारेच. काय समजायचे ते समजा, कधीतरी कुठेतरी पोहचालच
सखाराम पाटील रस्त्याच्या उल्लेख बाई सॅकॅरॅम पॅटिल असा करत होती
>>सॅकॅरॅम जरा तरी सिमिलर आहे सेइंट गेज्जे महाराज वरून संत गाडगे महाराज कसे ओळखून दाखवाल?
त्यामुळे बिल्डिंग च्या खिडकीत बसून ओला बुक केल्यास ती लोकेशन प्रमाणे येऊन मागच्या गल्लीतल्या बिल्डिंग च्या तोंडाला उभी राहणे, आपला ड्रायव्हर रामशास्त्री प्रभुणे वंशज असल्याने तत्वांपासून रेसभरही न ढळणे असे प्रकार होतात.
>>> पिसौला हे अगदी नियमित होते
Pages