अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजोबा आसा आणि राजेला काल घराबाहेर हाकलत होते. राजे मला आसाला तुमच्यापासून तोडायच नाही, मला तुमच्याबरोबर राहायचय, मला तुमच कुटुम्ब हवय वै वै म्हणत होते. आसाने पहिल्यान्दाच आजोबाला मनातल सान्गितल, " तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या मनासारख करता. मी सगळयान्च करते. पण माझ अस्तित्व हरवून बसले. वै वै.

राजे जायल निघतात तेव्हा शुभ्रा रडारड करते. आजोबान्ना राजेला थाम्बावायला सान्गते. ते मात्र पटल नाही. शुभ्राकडून ही अपेक्षा नव्हती. रडारड करण्यापेक्षा तिने आसा आणि राजेला बरोबर घेऊन घर सोडून जाण्याच डिक्लेअर करायला हव होत. सोहमवर अवलम्बून राहून काही उपयोग नाही.

आज ' जा सिमरन जा, जी ले अपनी जिन्दगी.' सिच्युएशन दाखवणार आहे वाटत.

रडारड करण्यापेक्षा तिने आसा आणि राजेला बरोबर घेऊन घर सोडून जाण्याच डिक्लेअर करायला हव होत. >>>तिने लाख केलं असतं पण आसा ने तिला साथ दिली नसती.

आज ' जा सिमरन जा, जी ले अपनी जिन्दगी.' सिच्युएशन दाखवणार आहे वाटत.>> मी म्हटले होते शेवटी आजोबांना हेच म्हणावे लागणार आहे.
तिघांनी रडून रडून आजोबांच्या डोक्याची मंडई केली. त्यातही आसावरी घर सोडून जाणार नाही आणि आपल्या जेवणाचे हाल होणार नाही शिवाय आता राजे पण हवे तेव्हा आपल्याला जेवण करुन देईल याची आजोबांनी खात्री करून घेतली. आजोबा हुशारेत!!

हो ना, आसा, राजे आणि शुभ्रा गेले तर आजोबांना कोण विचारणार ? रच्याकने, सोहम काही नोकरी वगैरे करतो की नाही ? शुभ्रा पण बघावं तेव्हा ओढणी फलकारुन घरात बसलेली, नाहीतर अभिज किचन मधे पडीक.

तिने लाख केलं असतं पण आसा ने तिला साथ दिली नसती. >>>>>>>> अगदी अगदी

हो ना, आसा, राजे आणि शुभ्रा गेले तर आजोबांना कोण विचारणार ? >>>>>>>> आणि सोहमलाही.

सोहम काही नोकरी वगैरे करतो की नाही>>>>>>>>>>>>> आता बिन्नेस सुरू केलाय ना म्हणे बबड्याने. गुरकावत होता नाही का माडीला ? मी तुझा बॉस म्हणून

आसावरी आणि राजे दोघांचीही वय लक्षात घेता ह्या वयात एवढे थाटामाटात आणि धुमधडाक्यात लग्न कोणाचे लावलेले ऐकले /पहिले नाही. आमच्या नात्यात दोघांनी दुसरे लग्न केले (पहिली बायको गेल्याने ) दोघांनीही अत्यंत साधेपणाने लग्न केले.
एकानी कोर्ट मारेज केले.
इकडे अगदी हळदी पासून सगळे विधी थाटामाटात सुरु आहेत..
TRP खेचण्याचा सोस दुसरे काय..
प्रत्यक्षात असे नसते.
बादवे काल आसावरी शुभ्रापेक्षा छान दिसत होती.

आसवारीचे दुसरे लग्न आहे पण राजेंचे तर पहिले आहे ना, म्हणून थोडी चाललीय हौस मौज. बाकी काहीतरी ट्विस्ट आणायचे आहे सिरीयल मध्य, राजे बहिणीला आमंत्रण करताना दाखवलेत पण ती बिझी आहे बिझिनेस मध्ये.

पूर्ण कथा त्यांच्या लग्नावर बेतलेली असल्यामुळे थाटामाटात लग्न. JGP च्या सुनबाईने पाठ केलेले वाक्य सरळ म्हटले. दागिने असे घेत होते जसं काही भाजी घेतायेत. सोहमच्या चेहेऱ्यावर बद्धकोष्ठ झाल्यासारखे भाव असतात. आसावरी काल छान दिसत होती. मॅडी कालच महाराष्ट्रात आल्यासारखी का वागते. राजेंकडे स्वतःचे घर नाही का. हॉटेलातच झोपतात का ते. एका दिवसात एवढी तयारी केली म्हणजे फॉल न लावताच साड्या नेसल्या का :एभाप्र: राजे अभिनय छान करतात. आसावरी लोलकासारखी मान हलवते.

आता पर्यन्त राजे अनाथ आहेत असच वाटल होत. मोठ्या बहिणीचा उल्लेख पहिल्यान्दाच ऐकला.

बादवे काल आसावरी शुभ्रापेक्षा छान दिसत होती. राजे अभिनय छान करतात. >>>>>>>>> ++++++++११११११११ आज सुद्दा आसा छान दिसत होती पिवळया साडीत. निजोला पिवळा रन्ग खुलून दिसतो. हिरव्या बान्गडया घातल्यानन्तर ती आरश्यात पाहते त्यावेळचा अभिनय छान होता तिचा.

सोहम काही नोकरी वगैरे करतो की नाही>>>>>>>>>>>>> आता बिन्नेस सुरू केलाय ना म्हणे बबड्याने. गुरकावत होता नाही का माडीला ? मी तुझा बॉस म्हणून >>>>>>>> राजेन्नी अचानक त्याच्याकडे दिलेल्या पैश्याचा हिशेब मागितला , सो त्याचा हॉटेल विकत घेण्याचा बेत बारगळला असेल कदाचित. आता तो गॅम्बलिन्ग करुन पैसे मिळवत आहे.

कालचा लग्नसोहळा फार आवडला. कंटिन्यू रिपीट टेलिकास्ट होते. आसा च्या साड्या छानच आणि दागिन्यांची रेलचेल होती नुसती. त्या बबड्याने सॉलिड गोंधळ घालून ठेवला होता, खूप खूप राग आला त्याचा. बिचार्या आजोबांना काल त्याच्यामुळे खूप वाईट अनुभव आला. पण शेवटी सगळे गोड गोड.

त्या बबड्याने सॉलिड गोंधळ घालून ठेवला होता, >>> म्हणूनच कंटाळा आला आणि पुर्ण भाग बघितलाच नाही.

शेवटी लग्न लागलं का?

नताशा..लागलं ना लग्न! चक्क सुबोध आला सेरीयलमधे! हाउ स्वीट!
कसला गोड दिसत होता! Happy
विक्रांत सरच अगदी!
शेवटी सगळं गोड गोड झालं....दोन चार सेलेब्रिटीज हे आलेले..... असेच फ्लॉप......मला आत्ता आठवतही नाहीयेत कोण होते ते!

त्या बबड्याने सॉलिड गोंधळ घालून ठेवला होता, >>> म्हणूनच कंटाळा आला आणि पुर्ण भाग बघितलाच नाही.>>>>>+१
मी पण बबड्याचा फालतुपणा सुरु झाल्यावर बघायचं बंद केलं.
काय वाट्टेल ते चाललं होतं. बबड्याला आधी बोलायला काय धाड भरली होती की लग्नात फालतुपणा करत होता.
सोकु नवी, सुभा बघितले. अजुन कोण आलेले?

सिद्धार्थ जाधव आणि एक कुणी डायरेक्टर......

सिद्धार्थ उगीचच भाव खात होता...बिझी असल्याचा आव आणून.....सिरीयल मधे कसला बिझीपणा दाखवतो !
सोनाली कुलकर्णी यथातथाच दिसत होती.....दुसरीकडेच शूट केलं बहुतेक.....
आणि तेच ते शॉट्स रिपीट झालेले.
निवेदिता मात्र मस्त गोड दिसली...... सुंदर मेकअप.
अशोक सराफ पहत असेल का ही सिरीयल?

अचाट आणि अतर्क्य चालू होतं सगळं, झी च्या प्रथेप्रमाणे कोणीही कोणाशीही डायरेक्ट बोलत नाही का कोणाचं नाव घेत नाही. इतके पैसे घेऊन सोम्या करतो काय , सगळी लाखाचीच भाषा.

आणि त्या दिवशी लग्न मोडलं तरी नंतर होऊच शकलं असतं की, सोहमला नको होतं हे लग्न तर तो क्लीअर बोलेल का असले खेळ करेल ?

सिद्धार्थ अजून सिम्बा (इफेक्ट) मधून बाहेर नाही पडलाय त्याच्यावर रणवीरची खूपच छाप पडलीय, जणूकाही मराठीतील रणवीर. बाकी त्याला एका अवार्ड शो मध्ये प्रत्यक्ष बघितला होता (सिम्बाच्या खूप खूप आधी) पर्सनॅलिटी छान आहे त्याची.

सोहम,अभिजीत राजेंकडून पैसे उकळण्यासाठी सुरुवातीलाच त्यांना म्हणाला की मी तुमच्या सोबत आहे.म्हणून नंतर थेट विरोध करता आला नाही

बाकी आसानी आणि आजोबांनी (सोम्याची गोष्ट) झाकली मूठ लाखाची करून ठेवली आहे, बहुदा आजोबा लग्नकार्य संपल्यावर झापतील त्याला आणि आसा उगीचच बबड्याला पदराखाली घेईल.

कालचा एपी बघितला. सुबोध, सुभा कमी विक्रांत सरंजामे जास्त वाटत होता. तेच कपडे दिले होते त्याला.
शुभ्रापेक्षा आसा गोड दिसत होती.. तर माडी गरबा आता खेळेल कि काय अस वाटल..

सोहमला 2 कानाखाली द्याव्याश्या वाटत होत्या.. सगळं क्रेडीट आजोबांना जातं.. त्यांचा एकदम टच्ची अभिनय झाला काल

सिद्दार्थ खरंच स्वतःला मराठीतला रणवीर समजायला लागलाय. दातांचं काहीतरी केलंय आणि फिटनेसवर लक्ष आहे म्हणून आता पूर्वीपेक्षा चांगला दिसतो. आधी फारच वाईट दिसायचा, पडद्यावर आणि बाहेरही. दादरला बस स्टॉपवर बघितलेलं त्याला नवीन होता तेव्हा. सोकुचा चेहेरा कधी कधी फार सुजलेला वाटतो. संजय जाधव आला होता शेवटी. पाठवणी आज आहे बहुतेक.
आसावरी मध्येच साधी साडी काय नेसून येते. त्याच्या आधी तिने गुलाबी शालू घेतला होता आणि फार छान दिसत होती. राजेंचा स्टाफही सगळा आला नव्हता. मालिका संपणार का आता.

Pages