अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या सोहम झालेल्या नटाला एक किंवा दोनच भाव दाखवता येतात वाटतं चेहर्यावर. बरं तो राग आहे, गिल्ट आहे, संधिसाधूपणा आहे काहीही कळत नाही.

त्या सोहम झालेल्या नटाला एक किंवा दोनच भाव दाखवता येतात वाटतं चेहर्यावर. >> हो ना नेहमी तुसडेपणाचे एक्स्प्रेशन देत असतो.
How boring is he!!

त्या काटेकोर ला घालवायचा सीन अगदी काहीतरीच होता. शुभ्रा ती अंगठी मागते काय? काहीही चालू होतं बावळटासारखं.

रस्ता क्रॉस करायचा सीन खरंच कुठल्यातरी गर्दीच्या भागात शूट केलेला दिसत होता.

लोक मालिका कशीही असली तरी कलाकारांना आदर देतात, त्याचाच फायदा घेतला असणार, गिओ आणि निजो ही मोठी नावं आहेत. व्हिवामध्ये निजोने किस्सा सांगितलाय की ती ट्रॅफिकमध्ये अडकलेली आणि शूटिंगला जायला उशीर होत होता तर एका बस वाहकाने स्वतः सगळ्या गाडयांना विनंती करून निजोला जायला जागा करून दिली.
आजोबा हॉटेलमध्ये बसल्यासारखे ऑर्डर सोडत असतात. वरून असावारीला म्हणतात तूच बाजारात जाऊन सगळं घेऊन ये आणि मग बनव, तीपण येडी खूष होते. रिक्षात बसून तिचा पाठलाग करू शकतात तर स्वतः का नाही जात भाजी आणायला.
शुभ्रा आज सोहमला म्हणाली की तू किती जेनुइन आहेस आणि तू खोटं वागूच शकत नाहीस Uhoh प्रेमात आंधळं होणं, लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपला तो बाब्या वगैरे वगैरे म्हणी आठवल्या.

शुभ्रा आणि आसावरी(आधीपासूनच) बबड्याशी तो १०-१२ वर्षाचा असल्यासारखेच बोलतात. त्यामुळे त्याची बौद्धिक वाढ खुंटली आहे.

राजे मॉर्निंग वॉक करायला आजोबांच्या बागेत का बर आले होते?
त्यांच्या सोसायटीत किंवा आजूबाजूला बाग नाहीय का?

मला एक कळत नाही हे सिरीयलमधले सगळे एकमेकांच्या जवळच रहातात का?
म्हणजे आली लहर की गेले एकमेकांकडे. प्रवासाचा वेळ, ट्रेन बस रीक्षा टॅक्सी वैगेरे नाहीच का लागत?
राजे उठसुट आसावरीकडे, ही फॅमिली उठसुट राजेंच्या रेस्टॉ. मधे.
ते विकीशा पण तसेच. लग्गेच ऑफिस, लग्गेच कर्जतचा बंगला, लग्गेच आईची चाळ. अरे काय???

बरं ती मॅडी खरंच मॅडच दाखवायला हवी का? एवढ्या मोठ्या शेफची असिस्टंट आणि लोकांना म्हणते तुमचा मिल्क्शेक बघुन मला पण मिल्क्शेक प्यावा वाटला म्हणून ते पैसे पण तुमच्याच बिलात अ‍ॅड होणार ना. Lol आवराच आता.

अतिशय निर्बुद्ध मालिका आहे. दातकोरे आला काय. शुभ्रा अंगठी काय मागत होती. लग्न करा काय म्हणत होती.
आणि माठ आसावरी षोडशेसारखी आजोबा जे काय सांगतिल ते ते मान खाली घालुन करत होती, त्याच्यासोबत फिरायला काय जात होती. लवकर आटपलं ते बरं झालं.
दिवाळखोरी आहे सगळीच.

रवी पटवर्धन जी, निजो गिओ इत्यादी ज्येष्ठ कलाकार असे माठ संवाद आणि सीन्स करायला का तयार होतात एभाप्र

षोडशेसारखी .. Biggrin

आजकालच्या षोडशा तरी ऐकतील का असं?

असावारीला धडा शिकवायचा म्हणून तिला असल्या घाणेरड्या माणसाबरोबर फिरायला पाठवणे ही किती नीच मनोवृत्ती आहे. धडा तरी का शिकवायचा तर तिने लग्नाचा विचार केला म्हणून. काटेकोरपण म्हणतो की बायकाना धाकात ठेवलं पाहिजे. झी मागासलेपणाचा कहर करतेय.

मै जबसे बोल रहि हुं पर तुम लोगां गुस्सा हो जारे. कोणतीही शहाणी स्त्री असले खपवून घेणार् च नाही. पण ह्या मालिकेत सर्व बायका मूर्ख व पुरुष शिकिवनारा बाबा असे दाखवले आहे. मे बी प्रेक्षकांची डिमांड असावी टी आर पी साठी पण धिस इस हाइट ऑफ स्टुपिडिटी. विनोद निर्मिती
सा ठी जेंडर बायस ठ्ळक करणे. नॉट डन यार धिस इज २०२०!!

त्या मॅडीच काही कळतच नाही. कधी बावळट तर कधी हुशार! त्या MCP, डिसगस्टिन्ग काटेकोरला न घाबरता त्याला बरोब्बर हॅण्डल करते, पण सोहम समोर आला ( त्याची लायकी माहित असूनही) की हिच गुडमॉर्निन्ग सर चालू होत ( तेरे नाम मधल्या निर्झरासारख). त्या काटेकोरची तर शेळी होते तिच्यापुढे.

राजेंकडे पैसे झाडाला लागले बहुतेक. कारखानीसांना जास्त पगार काय, वर्क फ्रोम होम काय? गिफ्ट काय? सोहम ला ४-५ लाख रू देतात काय?
कस्टमर्सला किती वेळा फुकट काय काय देत असतात. मज्जाच आहे सगळ्यांची. Proud

सोहमला नऊ लाख दिलेत आत्तापर्यंत. पगाराचं बोलणं आधी करतात ना. आम्हाला नाही दिला कोणी आजपर्यंत सरप्राईज जास्त पगार, कमी पगाराचं सरप्राईज मिळालंय पण जास्त नाही. मॅडीला रोज एवढं खायला देतात की तिला पगार दिलाच नाही पाहिजे. राजेंचा सगळा दिखाऊपणा तर नसेल ना, लग्न झाल्यावर असावारीला धुणी भांडी करायला पाठवतील आणि म्हणतील तुझ्यापायीच एवढा शो ऑफ करत होतो. आज औषधं घेऊन येणं म्हणजे अगदीच हे होतं आणि रात्रभर पायरीवर बसणं ही त्याच्या पुढची पायरी.

रात्रभर पायरीवर बसणं ही त्याच्या पुढची पायरी.>>:D
खरंतर आजोबांनी राजेंना बसूच कसं दिल?
त्यांच्या टिपिकल स्टाइल मध्ये "चप्पलचोर "म्हणून काठीनी हाकलून लावायला हवं होत Happy

राजे अतिरेक करतात. खोटं वाटतं ते.गुडी गुडी राजे आणि कुट्ट काळ्या मनाचा खलनायक डबड्या. सर्व अतिशयोक्ती. मधलं काही असतं हे माहिती नाहीये का सिरीयल वाल्यांना

त्या डबड्याला नक्की कसं दाखवायचं आहे हेच क्लीअर नाहीये मालिका लेखकाला किंवा दिग्दर्शकाला , आता एकदाचं लग्न लागणार की राजे कफल्लक होणार डबड्याला पैसा पुरवून पुरवून मग राजासवरी / अभिवरी / आसाजीत नावाने नवीन हॉटेल काढणार Proud Lol

काल पतंग पतंग खेळत होते सगळे. सोहमला लहानपणी हाताला मांजा लागला होता म्हणून त्याला खेळायची भीती वाटते. सोहम आणि मॅडी लहान मुलांसारखे भांडत होते. सोहमने नऊ लाख चॉकोलेट खाण्यात घालवले असणार.

काहीही म्हणजे काहीही.......... मॅडी काय पतंग बनवून आणते, गच्चीवर पतंग काय उडवीत असतात सर्वजण...इव्हन ग्रँडपा'ज फ्रेंड सुद्धा, आसावरी सगळ्याम्ना चहा कॉफी काय आणते....कैच्या कैच!
नॉन रिअलिस्टीक!
... मला तरी इतक्या जोशात पतंगोत्सव साजरा करणारी कुठ्लीही फॅमिली माहिती नाही!!! Uhoh

आज खुप दिवसांनी बघितला एपी.. सोम्या माडीची पतंग काय फाडतो! ती भोकाऽड काय पसरते. Lol
कैच्याकै दाखवत सुटलेत.

राजे घरजावई व्हायला तयार आहेत हे आधी नाही बोललं कोणी. किती तो लोचटपणा. आता आजोबा बाहेर हॉलमध्ये झोपणार का. अगंबाई सासूबाई कसं नाव आहे मग मालिकेचं, अरे बापरे सासरेबुवा, असं पाहिजे ना.
सोहम बायकोला किती घाबरतो, हात पुढे केला तिने तर हात देतो, ठाम मत काहीच नाही. वर कुणीतरी म्हटलंय त्याप्रमाणे तो लबाड, भोळा, दुष्ट की मूर्ख आहे हे दिग्दर्शकालाच माहित नाही.

मला तरी इतक्या जोशात पतंगोत्सव साजरा करणारी कुठ्लीही फॅमिली माहिती नाही!!! >>> सरंजामेंना इतक्यात विसरलात ????

Pages