" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
धन्यवाद देवकी.
धन्यवाद देवकी.
3.6 महिन्यांनी मिरचीची फुले यायला सुरुवात >>>>>>३ते ६ महिने ???
3.6 महिन्यांनी .
3.6 महिन्यांनी .
सस्मित गावी आम्ही घराच्या
सस्मित गावी आम्ही घराच्या बाजूला घरच्यासाठी मिरच्या लावतो. लावल्यानंतर साधारण अडीच महिन्यांनी मिरच्या तोडण्याइतक्या मोठ्या होतात. व फुले जर व्यवस्थित आली, गळाली नाहीत तर पुढील अडीच ते तिने महिने मिरच्या येत राहतात. आम्ही फक्त शेणखत वापरतो.
पाषाण तलाव
पाषाण तलाव
ओह हाच का तो पाषाण तलाव. भारी
ओह हाच का तो पाषाण तलाव. भारी आहे की.
मला पाषाण म्हटले की बनवाबनवी मधली सुप्रिया आठवते रिक्षावाल्याला पाषाण रोडला रिक्षा न्यायला सांगते ती.
आज बरेच दिवसांनी ईथे येऊन
आज बरेच दिवसांनी ईथे येऊन छान वाटतय!!!!
घरी कुंडीत फुललेला कवठी चाफा..:)
चाफा दिसेना
चाफा दिसेना
कवठी चाफा कुंडीत? मस्तच की
कवठी चाफा कुंडीत? मस्तच की! फुलही अगदी टपोरं आहे.
शाली, पाषाण लेक सुंदर फोटो.
धन्स माधव.. पहिलच फुल आहे,
धन्स माधव.. पहिलच फुल आहे, अजुन पाच कळ्या आहेत.
शाली तुमचे सगळेच फोटोस छान असतात
पाषाण तलाव काय सुंदर टिपलाय
पाषाण तलाव काय सुंदर टिपलाय शालीदा.
चक्क कुंडीत कवठी चाफा? मस्तच.
काय हे सायुताई! एवढे फुलांचे
काय हे सायुताई! एवढे फुलांचे फोटो काढतेस आणि इकडे देत नाहीस!
मी कवठी चाफा प्रथमच पाहिलाय. पुर्ण उमलल्यावर एक फोटो दे येथे. की असाच असतो फुललेला?
थँक्यू किट्टु!
मला एकटीलाच कवठी चाफा दिसत
मला एकटीलाच कवठी चाफा दिसत नाहीये..
मन्या आता दिसतोय का?
मन्या आता दिसतोय का?
अप्पा, हो.. आता दिसतोय.
अप्पा, हो.. आता दिसतोय.
@ सायु, कवठीचाफा पहिल्यांदाच बघतीये..
गुहाघरजवळ असलेलं शिरवली येथील
गुहाघरजवळ असलेलं शिरवली येथील खाजगी अभयारण्य ....... नंदूचं अभयारण्य... विनया जंगले यांचा लोकप्रभातील लेख
http://epaper.lokprabha.com/2481581/Lokprabha/03-01-2020#dual/46/1
पाषाण तलाव ....सुंदर
पाषाण तलाव ....सुंदर
कवठी चाफा ..... मस्तच
धन्स सगळ्ञांनाच!
धन्स सगळ्ञांनाच!
अप्पांचे विशेष आभार... ++++ पुर्ण उमलल्यावर एक फोटो दे येथे. की असाच असतो +++++++ असच असतं.
कवठीचाफा पहिल्यांदाच बघतीये..++++ सुवास वेड लावणारा असतो.
चक्क कुंडीत कवठी चाफा?++++ हल्ली ग्राफ्टेड / कलमी व्हेरायटी मिळते..
पाषाण तलाव आणि कवठीचाफा
पाषाण तलाव आणि कवठीचाफा दोन्हीही मस्त
हस्तीशुंडीवरील फुलपाखरे . . .
हस्तीशुंडीवरील फुलपाखरे
.
.
.
फुल पाखरे फारच सुरेख..
फुल पाखरे फारच सुरेख..
जबरी फोटो एकेक.
जबरी फोटो एकेक.
सायली किती छान कवठी चाफा, तुझे हात हिरवेगार आहेत, कुंडीत काय काय फुलवतात.
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा निगकर्स..
एक प्रश्न आहे.
कुंडीतल्या टोमटोच्या झाडावर पांढरे बारीक किडे झालेत. काही उपाय आहे का?
Happy New Year 2020
Happy New Year 2020
टोमॅटो तर छान दिसतायेत. ते काढून घ्या.
अन्जु ताई . आभार.
अन्जु ताई . आभार.
टोमाटो छानच, पण किडेचा बंदोबस्त लगेच करा.
हॅपी न्यू इयर!
नूतनवर्षाभिनंदन निगकर्स!
स्ट्राईप्ड टायगर.
तंबाखू,/ हळद/हिंग यापैकी एक
तंबाखू,/ हळद/हिंग यापैकी एक पाण्यात घालून झाडावर त्या पाण्याची फवारणी करणे ही माहिती या धाग्यावर मिळाली होती.पण माझीही झाडे अशा व्हाईट बगमुळे मेली आहेत.
M.Mya ,तुम्हाला शुभेच्छा! तंबाखू मात्र उकळून घ्यायला लागतो
साबणाचे पाणी फवारून पहा
साबणाचे पाणी फवारून पहा
Thanks देवकी ताई, ऋतुराज,
Thanks देवकी ताई, ऋतुराज, अन्जुताई, सायुताई. उपाय करून बघते
वर्षा यांनी ईतका भारी फोटो
वर्षा सुरेख फोटो. नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Pages