" बाय तुज नाव काय ? " विष्णू सरपंचाने घसा खाकरत प्रश्न केला.
" मंजुळा " साडीच्या पदराचे एक टोक बोटाला गुंडाळत , पायाच्या बोटाने जमीन उकरत, मंजु तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
" जवान-खान बनवता येत काय ? " लगोलग थोरल्या बाईसाहेबांचा प्रश्न आला.
" अहो ! अहह्ह्ह ! " सरपसर पुन्हा खाकरले.
" म्हंजी मला आस मनायच हुत की , भाकर तुकडा बनवती ना ? नाहीतर मी शिकवीनच हो . आपलं आसचं इचारती. " आपले अहो रागवलेले पाहून थोरल्या बाईसाहेबांनी थोडी विषय सारवासारव केली.
" सागुती मी शिकवेन हो ! अगदी तात्यांना आवडते तशी , चटकदार आणि स्वादिष्ठ . " मुरडत, लटक्या स्वरात धाकटी शहरी जाऊबाई , वैजू जरा मोठ्याने म्हणाली.
त्यावर तात्या म्हणजे विष्णू सरपंच कोपर्यातुन एक गोड कटाक्ष तिच्यावर टाकुन हसला.
थोरल्या बाईसाहेबांचा चेहरा रागाने लालेलाल झाला होता. स्वतःला सावरत त्या उठल्या...
" आमास्नी मुलगी पसंत हाय, तेवढा माज्या लेकाला इचारा ? काय म्हन्तुस दिग्या ?
तुला काय प्रस्न इचारायचा असल तर इचार ! "
दिगंबरने सुद्धा होकारार्थी मान हालवली, आणि साखर वाटून लग्नाची बोलणी पक्की करण्यात आली.
पाहुण्यांनी हसुन निरोप घेतला आणि ते जायला वळले. तोच मंजीने सरकन डोक्यातला गजरा ओढुन फेकुन दिला , आणि मागील दाराने अंगावरच्या नव्या साडीसह वार्यासारखी भिमपालाच्या दिशेने निघून गेली. तिचा जळफळाट झाला होता. पण बा पुढे काही चालेना.
" कुट्ट निघाली म्हनायची आता ? " मायने ओरडून विचारले.
" पेटोंगलीच्या ढव्हात " मंजी खासकन ओरडली.
" मंजे.... चांगल्या दिशी कायबी वंगाळ बोलु नग. फिर मागं . "
पण मायचे ऐकते ती मंजी कसली. दोन ढेंगात तिने भिमपाल गाठले.
०००००
" बबन्या , इपितारा ! ह्य बगं जर तू काय केल न्हाईस ना, त बा मला त्या सरपंचाच्या पोराच्या गल्यात बांधील. आन मग तू फकस्त सपान बघीत बसं. "
" मंजे तू आस काय बोल्तीस गं. म्या तरी काय करनार ? आपन पलुन जायाचा का ? तू फकस्त हो म्हन.... म्या सगली तयारी करतू. आपन लगीन करु. मग तुजा बा काय, त्याचा बा बी काय करु सकनार नाय. "
" आपन पलुन जायाचा ? कुट पलुन जायाचा ? तुझ्या त्या खोपटात ? आरर्र्र ! माजी चार कोमंडी बी त्याच्यापेक्षा मोट्या शिबाडक्यात र्हात्यात. तू कायतो इचार कर . नायतर मी सरपंचाची सुन व्हइन, आन तू भटक्या कुत्रावानी गावाला चकरा मारत र्हा ! "
" मंजे, माजा लय पिरेम हाय तुज्यावर. "
" बबन्या, माजा बी पिरेम हाय न्हव , पर तू काय कामाधंदयाच बगत न्हाईस, तोवर म्या बाला न्हाई सांगु शकत ना. कायतरी उपाय काड र्र "
" आयक , तूझ ठरलेल लगीन आंदी मोड, मग म्या बघ काय करतू त्ये. "
" आन ते कस ? "
" ये हिकड सान्गतू . "
बबन्याने कानात खुसुर-फुसुर केल, समजल्याची एक टिचकी वाजवत मंजी वार्यासारखी आल्यापावली घराच्या दिशेने निघूनही गेली. " मी त ह्यामन्दी म्हाईर हाय ."
०००००
" ह्हह्ह्हह्ह्ह्ह ! .... आहा हा हाहा ! ....ह्ह्ह्ह्ह्ह ! ...... ह्या ह्या ह्या ह्या ! .... मी तुला जीत्ता सोडनार न्हाई . हु हु हु हु .....आये..... आये मला वाचीव... मला ह्यो पेटोंगलीच्या ढव्हात घेऊन जातुय बगं.... मला वाचीव. "
" सरपंच आज दोन आठवडा झाल हायत. मंजी त्या ढवा नजदीक झपाटली...कन्दी बी हासती. कन्दी बी रडती. जोराजोरान हातपाय आपटती... कायबी कळना झालं.... बुवा येऊन गेले, बामुभट भी बगुन गेला. कवडीचा सुदीक फरक नाय. लग्नाच फुड काय करायच तुमी सांगा . तुमच्या लेकाला आडकवुन ठेवायची आमची आजाबात इच्चा नाय बगा. " मंजुचा बा काकुळतीला येऊन सरपंचा समोर उभा राहीला होता.
" रघु ह्य बग, आता ती आमची बी लेक हाय. आपन वाट बघु. ती बरी व्हयल ह्यातून. काय तरी दवा-उपचार असलच ना ? " सरपंच त्याला समाजवत होते.
" आहाहा हु हु ! पेटोंगलीच्या ढव्हात झपाटले ती सरपंच... आता तीची सुटका नाय. " म्हणत मंजुच्या मायने पदर डोळ्याला लावला..... मगापासुन रडुन-रडुन तीचा आवाज ही बसला होता.
" वैनी.. असा काव म्हणता तुमी ? आपन तालुक्याला घिऊन जाव तिला. " थोरल्या बाईसाहेबांनी समजुद्दारपना दाखवत पुढाकार घेतला. "
" नाय थोरल्या बाईसाहेब.... गावचा इतीहास हाय. प्रत्येक तीन वर्साला तो ढव गावातल्या एकाला तरी खातू. आन तीथ यकदा झपाटला, की मग ह्यातून सुटका नाय... परवा पुनवचा चंद्र निगाला की तो त्याच सावज गीलनार... आन आजपातुर ह्यातून कुनाची बी सुटका न्हाय झालेली. लगान ठरल त्या सांचीच ही तीकड गेली हुती. तवाच झपाटली. आमच नशीब फुटक ते आमच्याच लेकराला धरल त्याने. मेल्यांचा जागा बशीवला तो. " असे म्हणत मंजुच्या मायने हंबहर फोडला.
शेवटी ना ईलाजाने सरपंच जायला उठले. " बोलन्यासार कायबी र्हायल न्हाय. आम्ही निघतु मग. संभाला लेकराला. "
" एक मिनीट बा ! मी लगीन करीन त मंजीशीच न्हायतर कुनाशी बी नाय. ती बरी व्हईल. मी वाट बगीन तोवर. " एवढा वेळ शांत बसलेल्या दिगंबरने अखेर तोंड उघडले होते. यावर कोणीही काहिही बोलले नाही.
" पावन परत यकदा ईचार करा. " एवढे म्हनत मंजीचा बा डोळे पुसत उठला.
" जशी तुमची इच्चा. " म्हणत सरपंच ही उठले.
मंजी मात्र अवाक होऊन डोळे विस्फारुन पहात होती. आपला प्लॉन फिसकटला हे तीला आता पक्के समजले होते. आजुबाजुचे लोक पांगताच बबन्याला भेटून पुढे काय करायचे याचा विचार तीच्या मनात चालू होता. ती संधीच्या शोधात होती.
गावचे लोक मंजीला बघायला येत होते. त्या संधीचा फायदा घेऊन बबन्याही त्याच्या माय सोबत आला होता.... आजुबाजुचा कानोसा घेऊन दोघांनी प्लान बनवला.... आता सरपंचांच्या लेक दिगंबर, याचा कायमचाच काटा काढायचा होता.
०००००
पुनवेच्या सांचीला मंजीला गलका करुन सगळे बसले होते. जागता पहारा होता तो. ईकडे दिगंबरच्या हातात एक निनावी चिठ्ठी पडली होती.
" एक अक्खा कोंबडा पुनवेच्या सांचीला त्या पेटोंगलीच्या ढव्हात देऊन ये. म बग तुझी मंजुळा लगोलग बरी व्हती. "
चिठ्ठी वाचताच क्षणाचाही विलंब न करता, कोणालाही न सांगता, आपल्या भाबड्या प्रेमापायी दिगंबर डोहाकडे निघाला.
' कोंबडा पाण्यात टाकुन तो निघणार तोच कुणीतरी मागुन जोराचा धक्का दिला. आणि धाडकन तो पाण्यात पडला.... हातपाय मारून, आरडाओरड करुन काहिही उपयोग झाला नाही. बिच्यार्याचा नाहक बळी गेला होता. '
काम झाले होते. दिगंबरला धक्का देऊन झाल्यावर ईकडे बबनने ठरल्याप्रमाने, विशीष्ठ आवाजात मोठ्याने आरोळी दिली. " हूऊऊऊ "
आरोळी ऐकताच क्षणी मंजीचा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढ्यात घराबाहेर गडबड ऐकु आली. दिगंबर घरात नाही म्हणुन शोधाशोध चालु झाली.... इकडे आला आहे का ? ते पाहण्यासाठी दारात सरपंच उभे होते. सगळ्याचा कल्ला उडाला होता.
आपण पकडले तर जाणार नाही ना, या भितीने मंजी थंडगार पडली. त्यापेक्षा आत्ताच बबन्या बरोबर लांब कुठेतरी पळुन जाऊ.... हा विचार तिच्या मनात आला. क्षणाचाही विचार न करता, आपल्या जवळपास कोण नाही आणि बाहेर उडालेला गोंधळ बघुन मिळालेल्या संधीचा फायदा घेत ती तडक मागच्या दाराने पळत सुटली.... कुणालाही न कळता तिने डोहाचा रस्ता धरला होता.
हे लक्षात येताच, ईकडे सगळे लोक मिळेल त्या रस्त्याने तिला शोधत सुटले होते.
" बबन्या ! ए बबन्न्न्न ! कुट्ट हाईस." तिने आवाज दिला. पण पेटोंगलीच्या ढव्हावर स्मशान शांतता पसरली होती.
एका बाजुला टरटरीत फुगलेला दिगंबरचा देह पाण्यावर तरंगत होता. ती अक्षरशः किंचाळली.
इतक्यात बाजुच्या झुडुपा लगत आवाज आला. " मी हित हाय. "
मंजीला हायसे वाटले. दोन-तीन पायर्या उतरुन ती डोहाच्या अगदी जवळ आली. पुनवेच्या चंद्राचे प्रतिबिंब त्या डोहाच्या पाण्यावर उतरले होते. बाजुलाच दिगंबरचा मृतदेह तरंगत होता. पण बबन्या तिथे न्हवताच. तो केव्हाच तिथून निघून गेला होता.
दोन सेकंदाचा अवधी..... सरकन एक सावली तिच्या अंगावरुन गेली. पुढच्याच क्षणी तिच्या पायाला एका काटेरी झुडुपाचा विळखा बसला . तो तिला सरळ डोहाच्या तळाशी घेऊन गेला. अगदी शेवटच्या क्षणी तिला मायचे बोल आठवले. " गावचा इतीहास हाय. प्रत्येक तीन वर्साला तो ढव गावातल्याच एकाला तरी खातू. आन तीत यकदा झपाटला, की मग ह्यातून सुटका नाय... परवा पुनवचा चंद्र निगाला की तो त्याच सावज गिलनारच. "
शेवटी ठरल्याप्रमाने पेटोंगलीच्या डोहाने त्याचे सावज गिळले होते.समाप्त.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही ग्रामीण शब्द -
ढव्ह - डोह (नदीच्या पाण्याच्या वाहण्याच्या तळात मृदु भाग आल्यामुळे पात्राएवढा रुंद आणि पुन्हा कठीण भाग येइपर्यंत लांब-खोल असा निर्माण झालेला मोठा टाक्यासदृश्य खड्डा.)
सांचीला - तिन्हीसांजेला
पुनव - पौर्णिमा
आजपातुर - आजपर्यंत
इपितारा - विचित्रा सारखे
शिबाडके - कोंबड्या झाकण्याचा मोठा टोपला. काही ठिकाणी खुराडे असा शब्द वापरला जातो.
(कथेची संपूर्ण भाषा ग्रामीण आहे. अशिक्षीत व निरक्षर गावरान लोकांना समोर ठेवून रचलेली एक काल्पनिक कथा आहे. न समजणारे शब्द विचारु शकता.)
सिध्दि.. खुप छान कथा.. पण
सिध्दि.. खुप छान कथा.. पण भाषा मध्ये मध्ये कळत न्हवती.. २ दा वाचल्यावर कळत होतं.. शेवट भयावह.
पहिल्या-वहील्या प्रतिसादासाठी
पहिल्या-वहील्या प्रतिसादासाठी धन्यवाद भावनातै.
अशिक्षीत व निरक्षर लोकांना समोर ठेवून कथा रचलेली आसल्यने भाषा समजने थोडे अवघड आहे.
शेवटी खरंच भीती वाटली..
शेवटी खरंच भीती वाटली..
छान लिहितीयेस. लिहित राहा. पुलेशु!
शेवट अनपेक्षित.... छान वाटली.
शेवट अनपेक्षित.... छान वाटली.
भयानक.
भयानक.
अशिक्षीत व निरक्षर लोकांना
अशिक्षीत व निरक्षर लोकांना समोर ठेवून कथा रचलेली आसल्यने भाषा समजने थोडे अवघड आहे. >>>>>पण वाचणारा वर्ग (मायबोलीकर) तर सुशिक्षित आणि अक्षर ओळख असलेला आहे ना. (मस्करीत घ्या)
छान आहे कथा.
छान आहे, ग्रामीण बोली जमलीय
छान आहे, ग्रामीण बोली जमलीय चांगली.. ते फकसत ऐवजी फकस्त करा तेवढं..
आणि, " आहाहा हुहु... पेटोंगलीच्या ढव्हात झपाटले ती सरपंच... आता तीची सुटका नाय. " म्हणत मंजुच्या मायने पदर डोळ्याला लावला..... मगापासुन रडुन-रडुन तीचा आवाज ही बसला होता. >> इथं मंजुची माय का आहाहा हुहु... करत आहे ते समजलं नाही.
मस्त.मजा आली वाचताना. शेवट
मस्त.मजा आली वाचताना. शेवट अपेक्षितच तरीही गोष्ट आवडली.
मन्या ऽ, माऊमैया ,मी मधुरा
मन्या ऽ, माऊमैया ,मी मधुरा,Ajnabi , अजिंक्य, अंकु - प्रतिसादासाठी धन्यवाद.
Ajnabi - मस्करीत घेतल हो !
अजिंक्य - ' आहाहा हुहु ' हे रडण्याचे सुर आहेत. लिहिताना ते असे लिहावे लागले, सगळ्याना समजेलच असे नाही, म्हणुन त्याच स्पष्टीकरण पुढे झालेल आहे. (मगापासुन रडुन-रडुन तीचा आवाज ही बसला होता. )
फकसत शब्द बदलला आहे, धन्यवाद.
मला वाटले कथा विनोदी अंगाने
मला वाटले कथा विनोदी अंगाने जाऊन शेवट गोड होईल. घो मला असला हवा या सारखी. पण शेवट भयंकरच केलाय. मस्तच! आवडली कथा.
जमलीये कथा.
जमलीये कथा.
मस्त कथा आहे, आवडली !
मस्त कथा आहे, आवडली !
आता पुढे बबनचं काय होतं तेही लिहा दुसऱ्या भागात.
छान लिहलं आहे, आवडली कथा.
छान लिहलं आहे, आवडली कथा.
ग्रामीण भाषेत लिहायचा यव्ढा
ग्रामीण भाषेत लिहायचा यव्ढा आट्टापिट्टा कर्राय्ची गरज काये हे सम्जना.
हरिहर, सस्मित , आनंद, सोहनी -
हरिहर, सस्मित , आनंद, सोहनी - प्रतिसादासाठी धन्यवाद.
आनंद - बबनचं काय होतं तेही वाचुया पेटोंगलीचा ढव्ह रिटर्नमध्ये (लवकरच)
labad kolha - तुम्हाला का समजेना, हे तुम्हीच शोधा हो. बाकीच्याना समजल हेच माझ्या कथेच सार्थक आहे.
आणि ग्रामीण भाषेत लिहिलेले वाचण्याचा यव्ढा आट्टापिट्टा केलात त्यासाठी धन्यवाद.
भारीच ग सिद्धी
भारीच ग सिद्धी
मस्तच जमलीये कथा.
मस्तच जमलीये कथा.
Submitted by भिकाजी on 27 December, 2019
{उद्या पर्यन्त इकडे बिंदु मात्र कथा टिंब स्वरुपात न उरता आहे तशीच आजच्या सारखी असली तर ही कमेंट ग्राह्य धरावी
}
ठेंकू.
ठेंकू.
जोपर्यंत लव इन क्यूबेक पूर्ण
जोपर्यंत लव इन क्यूबेक पूर्ण होणार नाही, तोपर्यंत ही कथा वाचणार नाही.
- (अज्ञातवासींची भीष्मप्रतिज्ञा)
किल्ली - धन्यवाद
किल्ली - धन्यवाद
भिकाजी - उद्यापर्यन्तच नाही तर, नेहमीच ही कथा आहे तशीच राहिल. धन्यवाद.
अज्ञातवासी - तुमजी भीष्मप्रतिज्ञा अगदी मनावर घेतली आहे.
लव इन क्यूबेक नेक्स्ट पार्ट उद्या टाकते. मग एकच राहिलेला शेवटचा पार्ट new year च्या शुभमुहूर्तावर टाकेन. नक्की वाचा.
राखेचा आठवले बरीचशी साम्ये
राखेचा आठवले बरीचशी साम्ये
ते "आहाहा हु हु !" वाचल्यावर
ते "आहाहा हु हु !" वाचल्यावर आसं वाटलं की कोनी आफ्रिकेच्या जंगलातुन बाबाजी तर नाय ना आला भूत उतरवायला.
बाकी मस्तच.
मला वाटले कथा विनोदी अंगाने
मला वाटले कथा विनोदी अंगाने जाऊन शेवट गोड होईल>>>>ते अहाहा हु वगैरे वाचून मला पण तेच वाटले
प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार.
प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार.
- वीरु , आदू - पुढच्या कथेत आपण भूत उतरवायला आफ्रिकेच्या जंगलातुन कोणतरी बाबाजी नक्की बोलवुयात.
points to be noted... थॅक्स
मस्त कथा आहे.
मस्त कथा आहे.
@अज्ञातवासी
@अज्ञातवासी
- (अज्ञातवासींची भीष्मप्रतिज्ञा)>> आपली कथा पूर्ण करा आधी पाटील vs पाटील
आपली कथा पूर्ण करा आधी पाटील
आपली कथा पूर्ण करा आधी पाटील vs पाटील.
डोंगर पोखरून झाले की मग मनावर घेतील अशी अपेक्षा करुया. (

कृपया हासण्यावारी घ्यावे)Good
Good
मस्त कथा आहे, आवडली !
मस्त कथा आहे, आवडली !
जमलीय... छान
जमलीय... छान
Pages