पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.
गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)
Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इजिप्तचे पिरॅमिड पांडवानी
इजिप्तचे पिरॅमिड पांडवानी वनवासात असताना बांधले असावेत असा माझा अंदाज आहे.
बोकलत अहो कुठे होतात .मी नवीन
बोकलत अहो कुठे होतात .मी नवीन कथा लिहिलेय वाचून सांगा ना कशी वाटली .
इजिप्तचे पिरॅमिड पांडवानी
इजिप्तचे पिरॅमिड पांडवानी वनवासात असताना बांधले असावेत असा माझा अंदाज आहे.>
चंद्रावरचे खड्डे अर्जुनाने टारगेट प्रॅक्टिस म्हणून मारलेल्या बाणांंमुळे पडले असावेत अशी मला खात्रीच आहे.
तुमचे सगळ्यानचे मला पटत नाही
तुमचे सगळ्यानचे मला पटत नाही आहे
रामायण, महाभारतात आतापेक्शाही प्रगत विध्वंसंक शस्त्रे अस्त्रे दिसतात
कितीतरी क्लिष् िट technology दिसतात
तेव्हाचे विज्ञान आतापेक्शाही प्रगत आहे
एलियन सोबत जवळचा संपर्क आहे
जंगलात उतरु शकणारे विमान आहे
सोन्यासारख्या म ऊ धातुपासुन इमारती बनवल्या
ठरावीक नेमक्या लोकांना मारणारे अस्त्र आहे
मृताला जीवंत करण्याची technology आहे
माणूस उडू शकत असे
बाळ जन्माआधीपासूनच सज्ञान असे
लोकहो महाभारत रामायण अजून घडायचे आहे..!!
कारण ज्ञान वाढतच जाणार, हे महाभारत रामायण आधी घडले असते तर त्यंच्या tech technologies आतासुधा हव्या होत्या नाहि का!
व्वा रत्न व्वा....
व्वा रत्न व्वा....
चंद्रावरचे खड्डे अर्जुनाने
चंद्रावरचे खड्डे अर्जुनाने टारगेट प्रॅक्टिस म्हणून मारलेल्या बाणांंमुळे पडले असावेत अशी मला खात्रीच आहे.>>>अर्जुनाला दूरवरच्या लक्षाची प्रॅक्टिस करायची होती म्हणून भीमाने जमिनीला लाथ मारली आणि पृथ्वीचा थोडा तुकडा उडून आकाशात गेला, त्याला आपण आज चंद्र म्हणतो.
आणि ते १० डोक्याची सर्जरी
आणि ते १० डोक्याची सर्जरी राहिली की
आताचं मेडिकल सायन्स अजुन कुठे इतके प्रगत आहे की एखाद्या माणसाला दहा डोकी बसवुनही जीवंत ठेवू शकेल ? ह्याचा अर्थ अजुन रावण जन्मलाच नाहीये.
चक्क बोकलत मला वा म्हणाले..
चक्क बोकलत मला वा म्हणाले.. Id सफलझाला
चंद्र > बापरे माझ्या ज्ञानात
चंद्र > बापरे माझ्या ज्ञानात मोलाची भर पडली..!
भिकाजी
भिकाजी
हो तो रावण राहिलाच
दहा सोडा दोन डोकी बसवलेलेही कोणी पाहीले नाही
महाभारत हा इतिहास नाही,
'महाभारत हा इतिहास नाही, काल्पनिक कथा आहे.' असं म्हणत वाद घालणारी व्यक्ती इथे 'रामायण नंतर घडलं , महाभारत आधी' अश्या जाहीर असत्याला पाठींबा देत नेहमीप्रमाणे मुद्दा बदलत लांबलचक प्रतिसाद देते आहे.
चला, निदान महाभारत आणि रामायण घडले आहे, हे
मान्य केले, तेही नसे थोडके!
बाकीचे प्रतिसाद एका पेक्षा एक आहेत.
रत्नचा प्रतिसाद वाचून जब्बर हसू आले. मस्त!
अचाट, अतर्क्य कल्पना आम्हाला वाचायला मिळाल्या, त्या बद्दल ह्या धाग्याचेच आभार मानावे लागतील.
हे स्वामीराया वाचव माझ्या
हे स्वामीराया !वाचव माझ्या धाग्याला या प्रतिसादाच्या
महापुरा मधून:-)
या धाग्यानी सगळ्यांनाच कामाला
या धाग्यानी सगळ्यांनाच कामाला लावलेले दिसते.. एकेक कल्पना वाचून खूप हसले.. चंद्र तर भारीच.. कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच पाहिजे
>>Submitted by रत्न on 20
>>Submitted by रत्न on 20 December, 2019 - 11:24<<.
>>नवीन Submitted by मी मधुरा on 20 December, 2019 - 12:12<< +१
आय्ला, इथे तर फुल्टु धमाल आहे. आपलं विसंगत, अतार्किक ज्ञान (कुठुन प्राप्त झालं ते विचारु नका) पाजळणारे, आणि ते जबडा आ वासुन ग्रहण करणारे बघुन करमणुक झाली. हा धागा आता विरंगुळात हलवायला हरकत नाहि...
(No subject)
धागालेखिकेची क्षमा मागून..
धागालेखिकेची क्षमा मागून..
हायझेनबर्ग यांनी त्यांचे प्रतिसादात विचारणा केली त्याबद्दल...
(क्रमाक्रमाने या सर्वांमधे प्रगती होत अत्याधुनिक आयुधे, शस्त्र, अस्त्र, निसर्गाला जास्तीत जास्त ओरबाडणारा, निसर्गापासून दूर जाणारा, यंत्राचा पुरेपुर वापर, अतिशय जास्त सुखोपभोगी आयुष्य (त्यातल्या अनेक सुखोपभोगांची तर गरजच नाही)... पण हे करताना अतिशय जास्त Scattered झालेलं आणि सतराशे साठ गोष्टींवर भिरभिरणारं Unfocused मन...
प्रचंड भौतिक सुख आणि शोध लावलेली असंख्य साधनं आणि तंत्रज्ञान यात आत्यंतिक गुरफटलेलं मनं असणारा कालखंड म्हणजे कलियुग..)
>> निरू हे तुमचं मत आहे की निष्कर्ष/अनुमान? मत असेल तर काहीच म्हणणे नाही... निष्कर्ष असेल तर त्यामागची कारणीमीमांसा वाचायला आवडेल.<<
हा माझा निष्कर्ष नक्कीच नाही..
खरं तर मतही नाही…
तुम्ही जे रामायण, महाभारताच्या काळाबद्दल आणि त्यासंदर्भात चार युगांबद्दल जे विचार मांडले…
त्या अनुषंगाने माझ्या मनात जे आलं त्या विचारांची खरं तर ही चाचपणी आहे.. (Playing with the Thoughts..)
त्यामुळे मत कायम होण्यापर्यंतही मी अजून पोहोचलेलो नाही.
आणि ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे.
>>>>निसर्गाला जास्तीतजास्त ओरबाडणारा.... हे कसे काय? संशोधनातून निसर्गाबद्दलची जास्तीतजास्त कोडी जैविक/भौतिक्/वैद्यकीय/रासायनिक मागच्या दोन शतकात सोडवली गेली आहेत. निसर्ग(मानवी रचना, समुद्र, अवकाश, हवामान, पाताळ, वनस्पती) ह्याच्या जास्ती जवळ आपण गेलो आहोत. वैद्यकीय क्ष्रेत्रात केलेली प्रगती तर थक्क करणारी आहे.<<<
प्रगती केली हे मान्य. पण त्याची गरज आपल्याला आहे.
निसर्गाला कदाचित नसावी…
म्हणूनच आपण केलेले हस्तक्षेप प्रमाणाबाहेर झाले की तो त्यात हस्तक्षेप करतो.. (खर तर तो ही आपल्यामुळेच होतो.) किंवा आपलेच काही उद्योग (हिरोशिमा वगैरे त्याचं प्रलयाचं/विनाशाचं काम करतात)
>>>'निसर्गाला ओरबाडणे' म्हणजे मला वाटते तुमचा रोख झाडे कापणे, प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग अशा गोष्टींकडे आहे. तर हे प्रगतीचे (मोस्टली ईंधनाच्या शोधानंतरचे) टेंपररी-साईड ईफेक्ट आहेत आणि त्यांच्यावरही आज ना ऊद्या ऊपाय निघतीलच.<<<
कदाचित वैज्ञानिक उपाय निघतील किंवा कार्बन फुटप्रिंट वाढवण्यासाठी किंवा तत्सम रिपेअरिंग साठी आपण थोडे/बऱ्यापैकी बॅक टु नेचर जाऊ. पण हे करताना आपण स्वस्थचित्त होऊन हे करणार की उपाय शोधण्यात, त्याची टाईम टारगेट्स अचिव्ह करताना पुन्हा मनावरंच ताण देणार ते पहायला लागेल..
>>>एक विचार करा... तुमच्या आजूबाजूला साम्राज्यविस्तारासाठी कायम युद्धे चालू आहेत आणि लाखांवर माणसे मरत आहेत. केवळ सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्याने पूर्वी साथीच्या रोगात गावेच्या गावे दगावत. लस निघेपर्यंत देवी, पोलिओ लहान वयातच आयुष्य बरबाद करून टाकीत. लाखांचे पोशिंदे आजच्या जमान्यात अगदी आठवड्यात ठीक होऊ शकतील अशा आजारांना बळी पडले आहेत.<<<
हा साम्राज्य विस्तार, युद्धे ही सुद्धा प्रगत होत चाललेल्या समाजाचंच देणं..
युध्द होणार, म्हणून लक्षावधी माणसे जमणार आणि त्यातली बरीचशी मरणार..
सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे पूर्वी जी माणसं मेली ती विज्ञानातील प्रगतीमुळे वाचली...
तरी विज्ञानाच्याच विशेष प्रगतीमुळे जैविक युध्दे, किरणोत्सारी युद्धे यामुळे हीच माणसे धडधाकट असतानाही मरण्याची शक्यता आहेच की..
हे मी लिहितो आहे ते प्रगती विरोधी आहे म्हणून नाही..
पण जे घडतं त्याचा एक तटस्थ निरिक्षक म्हणून माझे विचार मांडतोय..
>>>आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या सुखांची गरज नाही... गरज तर सिविलायझेशनचीही नव्हती...युरोपात व्यापार, संस्कृती मूळ धरून शतके ऊलटली तरी अमेरिका खंडात नेटिव लोक आदिवासींप्रमाणे जंगलात रहात होते... साऊथ अमेरिकेत अजूनही आहेत ज्यांचा प्रगत मानवाशी संबंध नसल्याप्रमाणे आहे ... आपल्याकडेही आहेत. ज्याला असे आयुष्य हवे आहे तो ते ह्या घोर कलियुगापासून लांब जात आजही निवडूही शकतो.<<<
सुखांची गरज आहे की नाही हा माझा मुद्दाच नाही.
या सर्व शोधांचे फायदे मी ही उपभोगतो. कदाचित आनंदाने, कदाचित माझ्याही नकळत..
माझं हे म्हणणं आहे की क्रमाक्रमाने प्रगती होते, ती लोकांना रुचते, पटते.. त्यापायी रिसोर्सेस वापरले जातात, कधी निर्माण केले जातात. आणि नंतर कदाचित सगळं नष्ट होतं.
संपूर्ण नसेल होत तर बर्यापैकी होत असेल..
हे चक्र मान्य करणं एवढाच भाग..
त्यात काय चांगलं काय वाईट हा वादाचाही विषय आणि व्यक्तीपरत्वे मतभिन्नता असण्याचाही विषय..
यात तुम्ही माझ्या विचारांना चालना दिलीत ती चार युगं आणि प्रगतीचा चढता/उतरता आलेख ह्यांचा परस्परसंबंध याबाबत.
मात्र या सर्वांबाबत मी अजूनही ठाम नाही.
तुमच्या विचारांचा हा प्रतिवाद नाही… कारण मीच हे विचार माझं जुनं वाचन, माझे समज, गैरसमज या विविध निकषांवर अजूनही पडताळुन पहातोय. आणि नवीन काही वाचणायासाठी तुम्ही संदर्भ दिलेत तर त्याचही स्वागतच आहे.
वर म्हटल्याप्रमाणे I am just Playing with the Idea or seeing them through a Kaleidoscope.
>>>आता महत्वाचा मुद्दा,
आपल्या ज्ञानानुसार/मानण्यानुसार मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ... त्याचीच सर्वात जास्त कमतरता म्हणून हे शेवटचं युग ते कलियुग... >> कमतरता कशावरून म्हणता आहात?<<<
मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ असं म्हणण्याचं कारण असं की ही युगं मानली गेली आपल्या भारतीय तत्वज्ञानात, त्यांचे तपशील आले आपल्या तत्वज्ञानात.
त्यामुळे ज्या लोकांनी हे तत्त्वज्ञान घडवलं, वाढवलं, दर्शनशास्त्र निर्माण केलं, त्या तत्वज्ञांच्या तत्वानुसार जी गोष्ट सर्वश्रेष्ठ होती, सामर्थ्यशाली होती, परिणामकारक होती ती म्हणजे माणसाचं मन.
काम करायच ते मनावर. विजय मिळवायचा तो मनावर. ताबाही मिळवायचा तो मनावरच. (कलि शिरतो तो ही मनातच..)
पातंजलयोगसूत्रासारख्या ग्रंथातही मन हे मुख्य मानलं आहे आणि त्याच्या शांतीसाठी, सामर्थ्यासाठी उहापोह केला आहे.
त्यामुळे आज सत्ययुगापेक्षा प्रचंड प्रमाणात प्रगती होऊनही आजचा काळ जर कलियुग म्हणून मानला जात असेल तर ह्या प्रगतिच्या साधनांमुळे, त्यांच्या प्राप्तीच्या हव्यासामुळे जे मन विलक्षण विस्कटलेलं आहे, एकवटण्यासाठी असमर्थ बनलं आहे आणि म्हणूनच त्याची शांत होण्याची मूळ क्षमता आणि पर्यायाने सामर्थ्य घालवून बसलं आहे…
तर ही परिस्थिती, हे असमर्थ मन हेच कलियुग मानलं जाण्याचं कारण असावं का….?
>>>"सूईच्या अग्रावर मावण्याएवढी जमीनही देणार नाही' म्हणणारा, धर्मयुद्धाच्या नावाखाली स्वजनांना मानणारा, अर्भकाला गंगापात्रात सोडून देणारी कुंती/गंगा, भोगविलासाआठी मुलाकडे त्याचे तारूण्य मागणारा ययाती, एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार करणारे परशुराम हे मनाच्या कुठल्या आरोग्याची ऊदाहरणे आहेत?
ह्या सगळ्या मनात क्रोध, स्वार्थ भरलेल्या वेळोवेळी त्यांचे प्रदर्शन केलेल्या कुठल्याश्या मिथिकल युगातल्या 'मिथिकल' देवदेवतांपेक्षा हाडामासाचे आकाशा एवढे ऊंच बुद्ध, महावीर ह्याच कलियुगाने दिले ना?<<<
सत्ययुगात सर्वच जण मनाचे स्वामी असतील असं नाही..
) ही तुलनेने बऱ्याच कमी प्रमाणात असतील… "त्यामुळे मनाला अस्थिर करणारे घटक कमी आणि मन स्थिर करायचं असेल, एकवटायचं असेल तर त्याला अनुकूल असे घटक जास्त" अशा सुसंगत परिस्थितीचा काळ ते सत्ययुग.. आणि याउलट ते कलियुग…
आणि कलियुगात ते औषधालाही सापडणार नाहीत असंही नाही.
परंतु सत्ययुगात प्रगतीचा स्फोट सगळ्यात कमी असल्यामुळे मनाची बाह्य आकर्षणं (मग ते स्मार्ट फोन असतील, व्हाॅट्सॲप असेल किंवा इथे अधिक चपखल उदाहरण म्हणजे आपल्या "मायबोली" सारखा सोशल मिडीयाही असेल..
असं असावं का ह्याबाबत विचार करायला आपल्या लिखाणाने मला प्रवृत्त केलं...
लोकहो महाभारत रामायण अजून
लोकहो महाभारत रामायण अजून घडायचे आहे..!!>>>>
भन्नाट
@निरु
@निरु

धागालेखिकेची क्षमा मागून..
याची काहीच गरच नाही.कीप इट उप
अरे काय धमाल चालुये.
अरे काय धमाल चालुये.

हातभर लांब प्रतिसाद वाचुन कंटाळा येतो. लिहिताना येतो की नाही काय माहित.
काय अब्यास काय अब्यास
पण सगळ्या प्रतिसादात रत्न यांचा Submitted by रत्न on 20 December, 2019 - 21:54 प्रतिसाद भारी वाटला.
शंतनूhttps://archive.org
शंतनू
https://archive.org/details/greatepicofindia00hopk/page/60
पान साठ वर दुसर्या परिच्छेदापासून पुढे वाचा.
मी आधीच्या प्रतिसादांमध्ये महाभारताची (जय-भारत-महाभारत) ही क्रोनोलॉजी दिलेली आहे. त्यातला भारत हा टप्पा सुरू झाल्यानंतर रामायण अस्तित्वात आले असे लिहिले होते.
https://archive.org/details/greatepicofindia00hopk/page/397
पान ३९७ वर शेवटच्या परिच्छेदात तुम्हाला भारत (ई.स.पूर्व ४००) आणि महाभारत (ईस.पूर्व २०० ते ईस. २००) ह्या कालखंडामध्ये लिहून पूर्ण झाल्याचे अनुमान आधीच्या ३९६ पानांवरच्या संशोधनावरून काढल्याचे दिसेल. ज्याबद्दल देखील मी आधी लोहिले होते.
पुढे तुम्हाला रामायण आणि महाभारत मधले साम्यस्थळे दाखवणारे सगळे श्लोक ऊद्धृत केलेले मिळतील. माझ्या आधीच्या पोस्टचे बहुतेक संदर्भ तुम्हाला ह्या संशोधनपर पुस्तकाममध्ये सापडतील
हे संशोधन जवळजळ सवाशे वर्षांपूर्वीचं आहे...ज्यांनी हे संशोधन केले ते डॉ, हॉपकिन्स १९०० मध्ये जगविख्यात संस्कृत स्कॉलर होते. साहित्यात डॉक्टरेट मिळवली होतीच शिवाय ते कोलंबिया आणि येल मध्ये प्रोफेसरही होते. त्यांच्याच कालखंडात त्यांच्यासारखेच डॉ. जेकोबी म्हणून अजून एक मोठे विख्यात संस्कृत स्कॉलर होते त्यांच्याही संशोधनाचे धागे हॉपकिन्सच्या पुस्तकात सापडतील.
माझ्या ह्या दोन कलाकृतींच्या कालखंडातल्या वर्ण आणि जाती संदर्भातले स्थित्यंतराबद्दलच्या पोस्टी आहेत त्यांचे काही संदर्भ सुद्धा तुम्हाला डॉ. हॉपकिन्सच्या 'ओरिजिन अँड ईवोल्यूशन ऑफ रिलिजन' आणि 'हिस्ट्री ऑफ रिलिजन' पुस्तकात सापडतील.
जर तुम्हाला अतिशय अलिकडचे संशोधन वाचायचे असेल, ज्यात वेन आणि ट्री डायग्रामचचा आधार घेत कशा ह्या काव्यांना - थेट श्रीलंका-थायलंड-कंबोडिया-ईंडोनेशिया पर्यंत आणि ग्रीस(अलेक्झांडर येऊन गेल्यानंतर त्याचे सरदार जे व्हर्जन घेऊन गेले होते) पुन्हा ईराण आणि तुर्की मध्ये सापडलेली सहाव्या का आठव्या शतकातले व्हर्जन जे आता भाषा नामशेष झाल्याने वाचणे शक्य नाही असे अनेक फुटत गेलेले फाटे व त्यांचा लेखाजोखा व मधल्या काळातले संशोधन वाचायचे असेल तर जॉन ब्रॉकिंग्टन ह्यांचे 'द संस्क्रिट एपिक्स' हे पुस्तक मिळते का बघा. हे सुद्धा असेच डॉ. हॉपकिन्सच्या पुस्तकासारखे ६००-७०० पानांचे बाड आहे. ह्या पुस्तकाचा आवाका एवढा मोठी आहे की पुस्तकाची समीक्षा करणारी अजून पुस्तके निघाली आहे. पण शेवटी त्यातही डॉ. हॉपकिन्सने दाखवलेल्या दोन्ही एपिक्समधली साम्यस्थळे (त्यातल्या गोष्टींच्या पेक्षाही साहित्य, व्याकरण आणि दर्जाच्या पार्श्वभुमीवर) आणि त्यांचे डेटिंग बद्दलचे अनुमान ह्या माहितीचे सखोल विश्लेषणानंतरही कायम रहाते.
मागच्या चार-पाच वर्षांमागे भांडारकर संस्थेने आता ही महाभारताचे अगदी फयनलातली-फायनल रिविजन बरंका असे काही तरी घोषित केल्याचे पुसटसे आठवते आहे.
खूपच संयत प्रतिसाद निरू.
खूपच संयत प्रतिसाद निरू.
मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ असं म्हणण्याचं कारण असं की ही युगं मानली गेली आपल्या भारतीय तत्वज्ञानात, त्यांचे तपशील आले आपल्या तत्वज्ञानात.
त्यामुळे ज्या लोकांनी हे तत्त्वज्ञान घडवलं, वाढवलं, दर्शनशास्त्र निर्माण केलं, त्या तत्वज्ञांच्या तत्वानुसार जी गोष्ट सर्वश्रेष्ठ होती, सामर्थ्यशाली होती, परिणामकारक होती ती म्हणजे माणसाचं मन.
काम करायच ते मनावर. विजय मिळवायचा तो मनावर. ताबाही मिळवायचा तो मनावरच. (कलि शिरतो तो ही मनातच..)
पातंजलयोगसूत्रासारख्या ग्रंथातही मन हे मुख्य मानलं आहे आणि त्याच्या शांतीसाठी, सामर्थ्यासाठी उहापोह केला आहे.>>>
ह्यावर मला मन षष्ठानी इंदियाणी... हा गीतेतला श्लोक आठवलेला..
तुम्ही जसं म्हणता तसं प्रत्येक गोष्टीच एक चक्र असतच की. युगाचही असणार.
मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ असं
मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ असं म्हणण्याचं कारण असं की ही युगं मानली गेली आपल्या भारतीय तत्वज्ञानात, त्यांचे तपशील आले आपल्या तत्वज्ञानात.
त्यामुळे ज्या लोकांनी हे तत्त्वज्ञान घडवलं, वाढवलं, दर्शनशास्त्र निर्माण केलं, त्या तत्वज्ञांच्या तत्वानुसार जी गोष्ट सर्वश्रेष्ठ होती, सामर्थ्यशाली होती, परिणामकारक होती ती म्हणजे माणसाचं मन.
काम करायच ते मनावर. विजय मिळवायचा तो मनावर. ताबाही मिळवायचा तो मनावरच. (कलि शिरतो तो ही मनातच..)
पातंजलयोगसूत्रासारख्या ग्रंथातही मन हे मुख्य मानलं आहे आणि त्याच्या शांतीसाठी, सामर्थ्यासाठी उहापोह केला आहे.
त्यामुळे आज सत्ययुगापेक्षा प्रचंड प्रमाणात प्रगती होऊनही आजचा काळ जर कलियुग म्हणून मानला जात असेल तर ह्या प्रगतिच्या साधनांमुळे, त्यांच्या प्राप्तीच्या हव्यासामुळे जे मन विलक्षण विस्कटलेलं आहे, एकवटण्यासाठी असमर्थ बनलं आहे आणि म्हणूनच त्याची शांत होण्याची मूळ क्षमता आणि पर्यायाने सामर्थ्य घालवून बसलं आहे…
तर ही परिस्थिती, हे असमर्थ मन हेच कलियुग मानलं जाण्याचं कारण असावं का….?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> क्या बात है निरु! एकदम मस्त! भयंकर आवडलं हे.....
हाब.पुस्तकाच्या रेफेरेन्ससाठी
हाब.पुस्तकाच्या रेफेरेन्ससाठी धन्यवाद! वाचनयादीत नोंद केली आहे.
तुमचे सगळेच प्रतिसाद विचार करायला लावणारे होते, त्यासाठी खरच धन्यवाद !
निरू,
निरू,
युगे वगैरे संदर्भातला तुमचा मोठा प्रतिसाद बराचसा फिलॉसॉफिकल आहे.. मला त्याबद्दल काही मतप्रदर्शन करावयाचे नाही.
मला जे प्रश्न पडतात ते फार बेसिक असतात. ऊदाहरणार्थ...
असे बरेच काही.
--------
हा युगांचा घोळ आर्यभट्टाच्या काळात (पाचवे शतक) चालू झाला, ज्याकाळी गणिते सुद्धा संस्कृत श्लोकातून लिहिली जायची. आर्यभट्टाने खगोलशास्त्रात (जे फक्त निरिक्षण आणि बेसिक आकडेमोडीवर आधारित होते) गणितांचा वापर केला. ( हा शोध एवढा प्रागतिक होता की आताच्या काळाच्या अनुषंगाने सांगायचे झाले तर बेसिक नोकियाचा फोन आपण दशकभर वापरत आहोत आणि आर्यभट्टाने थेट अॅपल आयफोन सिक्स सिरिज आपल्यासमोर ठेवला).
आर्यभट्टाने त्याच्या आर्यभट्टीय(म) मध्ये हा युगे, महायुगे, मन्वंत्तरे सिद्धांत संस्कृतातून मांडला. त्याने एका दिवसात किती तास आणि एका वर्षात किती दिवस हे सुद्धा कॅल्क्यूलेट करून दाखवले.
त्या काळातल्या महाभारताच्या एडिशनच्या लेखकांनी ही आयतीच मिळालेली संस्कृत मेजवानी तोडून मोडून तिचा विपर्यास करून त्यांच्या एडिशन मध्ये वापरायला आणि त्याच्या अवतीभोवती कथा गुंफायला चालू केले.
आणि आजच्या काळातले महाभारत लेखक त्यावर कळस चढवित युग म्हणजे यंव असतंय नि महायुग म्हणजे त्यंव असतंय करत त्याबद्दल गमजा मारत सुटतात. काय बोलणार?
रेफरंस दिल्यानंतर काही भांड
विसंगत आणि अतार्कित ज्ञानाचे सुसंगत आणि तर्काधिष्ठित रेफरंस दिल्यानंतर काही भांड लोकांची अडचण होऊन जबडा बंद झाला वाटते.
आपापले संशोधन करण्याचा आळशीपणा आणि आपल्याकडे आयती कोणीतरी दिलेली माहिती हेच सर्वोत्तम ज्ञान, अशा गर्वाची खाज अजून असेल तर रेफरंसच्या सुरळ्या अजूनही पुरवेन.
___/\__ बास
___/\__ बास

रेफरंस दिल्यानंतर काही भांड
रेफरंस दिल्यानंतर काही भांड लोकांची अडचण होऊन बोलती बंद झाली वाटते.
आपापले संशोधन करण्याचा आळशीपणा आणि आपल्याकडे असलेली माहिती हेच सर्वोत्तम ज्ञान, अशा गर्वाची खाज अजून असेल तर रेफरंसच्या सुरळ्या अजूनही पुरवेन.>>
कसली ही भाषा.. आवरा जरा.. प्रत्येकाचे जसे वाचन, अभ्यास तसे मत असते. ते प्रत्येकाचे जुळायलाच पाहिजे असं नाही.
माझ्या वाचनाचे रेफरन्सेस् मी दिले आहेतच, माझा दृष्टिकोनही मी सविस्तर लिहीला आहे आणि सांगून चर्चेवरील लेखन थांबविले आहे.
मला इथे छान चर्चा चालू आहे असे वाटत होते, ज्यात विचारांची देवाण घेवाण होते. ही असली असभ्य भाषा वापरून जे काय मिळते ते तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. चालू दे तुमचे.
ही माझी येथील शेवटची पोस्ट.
निलाक्षी,
निलाक्षी,
चर्चा, विचारांची देवाणघेवाण कोण करतंय आणि त्याला खीळ बसावी म्हणून भांडगिरी कोण करतंय हे मला खूपच चांगले कळते.
माझी पोस्ट तुम्हाला किंवा ईतर कोणालाही ऊद्देशून लिहिलेली नाही.. आपण कृपया गैरसमज करून घेऊ नये.
ती पोस्ट ज्या आयडीसाठी लिहिलेली आहे त्याला ती बरोबर कळेलच, भाषाही त्याबरहुकूम मोजूनमापूनच लिहिली आहे.
तुम्हाला विनाकारण मनस्ताप झाल्याबद्दल दिलगीर आहे, संभ्रम टाळण्यासाठी माझी आधीची पोस्ट एडिट केली आहे.
कसली ही भाषा.. आवरा जरा..
कसली ही भाषा.. आवरा जरा.. प्रत्येकाचे जसे वाचन, अभ्यास तसे मत असते. ते प्रत्येकाचे जुळायलाच पाहिजे असं नाही.>>>>> +१
काही दर्जेदार चर्चा वाचायला मिळते आहे, असे वाटत होते. पण इथे तर....
सत्यं ब्रूयात् प्रियं
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥
अर्थात युगांतराच्या नावाखाली खोट्या आणि बनावट गमजा मारत राहणे हाच आमचा प्रिय सनातन धर्म आहे.
चालू द्या.
Pages