गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फरक पडला तो सामाजिक सभ्यतेत... माणसे मारणे ही पूर्वीसारखी नीतिमानता राहिली नाही >> बर्गा ह्यात गोच आहे, तू मापदंड कुठले लावणार ह्यावर तुझ्या सभ्य-असभ्यतेचा काटा बदलत राहणार आहे.

@वीरू
धन्यवाद,
बोकलत यांना माझा धागा आवडत असावा बहुतेक ;
बोकलत तुमचं चालू द्या पण बोकलत या शब्दाचा अर्थ काय? खूप दिवसा पासून विचारिण म्हणते?

अरे देवा !अहो असामी तुम्ही काय म्हणालात बर्गा
अहो अस काही तरी म्हणलेले बोकलत साहेबांना चालत नाही Happy

असामी,
नीटसे कळले नाही तुझे स्टेटमेंट, पण अंदाज लावला.
मापदंड म्हणुन मी well being of society at large, समान संधी (शिक्षण, आरोग्य, प्रगती, धर्म, ज्ञान, आध्यात्मिक विकास ) , समान कायदा, समान न्याय, समान सुरक्षितता असे जीवनमान सुखी करण्यासाठी लागणारे मुलभूत निकष लावले.

हाब खूप छान आणि सविस्तर प्रतिसाद दिलात तुम्ही, धन्यवाद.
पुर्वीची रामायण, महाभारत कालीन माणसेच होती यावर दुमत नाहीच आहे.
सामाजिक नियमांबाबत मागेही होती हे थोड पटतय विषेशत: शुंभकाच्या गोष्टीवरून. पण त्यावरून असं कसं म्हणता येईल की रामायण नंतर झाले?
अजून एक म्हणजे तेंव्हा सामाजिक प्रगती नसेल पण व्यक्तिगत मुल्ये जास्त असावीत म्हणजे दिलेला शब्द, दिलेले वचन न मोडणे, खोटे न बोलणे.. आता व्यक्तीगत आयुष्य जास्त गुंतागुंतीची झालीत, खोटे बोलणे तर कितीवेळा सहज होते..
आपल्याकडे दशावतारही मानवी उत्क्रांतीच दाखवतात. खरतर मूळ महाभारतच वाचायला हवे. मी सध्या वाचत असलेल्या महाभारताच्या खंडातही रामाचा उल्लेख आहे म्हणजे रामायणाचाच. जर त्यातही सांगतायत् की रामायण होऊन गेले म्हणजे महाभारत रामायणा नंतरच झाले ना.
बाकी राजवाड्यांनीही त्यांच्या "विवाह संस्थेचा इतिहास' यात हेच सांगितले आहे की पुर्वज किती रानटी होते. वर्तकांची पुस्तकेही वाचनीय आहेत यावरची.

हायझेनबर्ग यांच्या लिखाणावरुन :

पुर्वी म्हणजे सत्ययुगात प्राथमिक संस्कृती, प्राथमिक स्तरावरची आयुधे, शस्त्र, अस्त्र, वस्तू, कष्टाचा जीवनक्रम (लाईफ स्टाईल), जास्तीत जास्त निसर्गानुकूल जीवनक्रम, यंत्राचा कमीतकमी वापर, कमी सुखोपभोग आणि कमी Scatter झालेलं जास्त Focused मन..
म्हणून हे सत्ययुग...
क्रमाक्रमाने या सर्वांमधे प्रगती होत अत्याधुनिक आयुधे, शस्त्र, अस्त्र, निसर्गाला जास्तीत जास्त ओरबाडणारा, निसर्गापासून दूर जाणारा, यंत्राचा पुरेपुर वापर, अतिशय जास्त सुखोपभोगी आयुष्य (त्यातल्या अनेक सुखोपभोगांची तर गरजच नाही)... पण हे करताना अतिशय जास्त Scattered झालेलं आणि सतराशे साठ गोष्टींवर भिरभिरणारं Unfocused मन...
प्रचंड भौतिक सुख आणि शोध लावलेली असंख्य साधनं आणि तंत्रज्ञान यात आत्यंतिक गुरफटलेलं मनं असणारा कालखंड म्हणजे कलियुग..
आपल्या ज्ञानानुसार/मानण्यानुसार मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ... त्याचीच सर्वात जास्त कमतरता म्हणून हे शेवटचं युग ते कलियुग...

कलियुग सर्वोच्च पातळीवर पोहोचल्यावर प्रदूषणामुळे ओझोन थराला छिद्र पडणं असेल किंवा हिमनग वितळणं असेल किंवा वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीवर होणारे बदल असतील किंवा Biological Wars असतील किंवा अतिसंहारक शस्त्रं, ॲटम/हायड्रोजन बाँबचे स्फोट असतील यामुळे या अतिप्रगत संस्कृतीचा नाश अटळ आणि मग पुन्हा बार्बेरियन संस्कृती अर्थात सत्ययुगाचा उदय असे हे चक्र....

पृथ्वी ही क्षमा असल्यामुळे किंवा ती निसर्गाची मूलप्रकृती असल्यामुळे निसर्ग पुन्हा पहिल्या परिस्थितीत येतो पण अनेक वर्षांने...
म्हणूनच प्रत्येक युगाचा कालावधीही बराच मोठा...

असं हे असावं...
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा..

राम स्वतः शंभुकाला हुडकून त्याचा शिरच्छेद करतो.
>>> तुम्ही सोलापूरचे का ? हुडकून शब्द बऱ्याच दिवसांनी वाचला....

माफ करा मला हायझेनबर्ग खूप मोठं वाटलं म्हणून मी ते लिहल
हायझेनबर्ग sorry for that

Submitted by Swamini Chougule on 18 December, 2019 - 08:56
अहो सॉरी
काय म्हणताय उद्या तुम्हाला ते "हायझेनबर्ग - एक वाईट निपजलेला कथाकार" असे लिहायला सांगतील.

well being of society at large, समान संधी (शिक्षण, आरोग्य, प्रगती, धर्म, ज्ञान, आध्यात्मिक विकास ) , समान कायदा, समान न्याय, समान सुरक्षितता असे जीवनमान सुखी करण्यासाठी लागणारे मुलभूत निकष >> +१
एक समाज म्हणून झालेली प्रगती. वैयक्तिक पातळीवर कितीही अधोगती झालेली असू शकते. तेव्हाही आणि आताही. किंवा प्रगतीही कितीही झालेली असू शकते. तेव्हाही आणि आताही.
आज जसे क्रूर बलात्कारी, सिरियल किलर्स आहेत, तसे बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्यासारखे समाजसेवकही आहेत. शास्त्रज्ञ आहेत. आज गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था आहे, तसेच शास्त्रज्ञ, खेळाडू, संगीतकार, गायक इत्यादी गुणवंत व्यक्तींंना appreciate करण्यासाठी नोबेल, मॅगसेसे, पद्म, अर्जुन असे पुरस्कारही आहेत.
तेव्हाही शिक्षा देण्यासाठी काही व्यवस्था होतीच, पण गुन्ह्याची व्याख्या आणि शिक्षेचं स्वरूप आजच्या आपल्या हिशोबाने अन्यायकारक असू शकत होतं.

रामायणात महाभारताचे संदर्भ येत नाहीत, परंतु महाभारतात रामायणाचे संदर्भ येतात - या न्यायाने रामायण आधी लिहिले गेले असावे, नाही का? ते संदर्भ प्रक्षिप्त असल्याचे काही पुरावे आहेत का?

कसंय ना, आपला मुद्दा खोटा पडला, की लगेच एखादी कथा किंवा सखोल माहिती डकवून द्यायची. मग ती मुद्द्याला धरून असो वा नसो. Lol
हेच चालू आहे या धाग्यावर.

@नीलिमा
माफ करा मला हायझेनबर्ग खूप मोठं वाटलं म्हणून मी ते लिहल
हायझेनबर्ग sorry for that

Submitted by Swamini Chougule on 18 December, 2019 - 08:56
अहो सॉरी
काय म्हणताय उद्या तुम्हाला ते "हायझेनबर्ग - एक वाईट निपजलेला कथाकार" असे लिहायला सांगतील.
अहो इथे बोकलत तत्सम id कोणत्या गोष्टीचा इशू करतील सांगता येत नाही. आता मला प्रतिसाद देताना ही भीती वाटतेय:-(

क्रमाक्रमाने या सर्वांमधे प्रगती होत अत्याधुनिक आयुधे, शस्त्र, अस्त्र, निसर्गाला जास्तीत जास्त ओरबाडणारा, निसर्गापासून दूर जाणारा, यंत्राचा पुरेपुर वापर, अतिशय जास्त सुखोपभोगी आयुष्य (त्यातल्या अनेक सुखोपभोगांची तर गरजच नाही)... पण हे करताना अतिशय जास्त Scattered झालेलं आणि सतराशे साठ गोष्टींवर भिरभिरणारं Unfocused मन...
प्रचंड भौतिक सुख आणि शोध लावलेली असंख्य साधनं आणि तंत्रज्ञान यात आत्यंतिक गुरफटलेलं मनं असणारा कालखंड म्हणजे कलियुग.. >> निरू हे तुमचं मत आहे की निष्कर्ष/अनुमान? मत असेल तर काहीच म्हणणे नाही... निष्कर्ष असेल तर त्यामागची कारणीमीमांसा वाचायला आवडेल.
निसर्गाला जास्तीतजास्त ओरबाडणारा.... हे कसे काय? संशोधनातून निसर्गाबद्दलची जास्तीतजास्त कोडी जैविक/भौतिक्/वैद्यकीय/रासायनिक मागच्या दोन शतकात सोडवली गेली आहेत. निसर्ग(मानवी रचना, समुद्र, अवकाश, हवामान, पाताळ, वनस्पती) ह्याच्या जास्ती जवळ आपण गेलो आहोत. वैद्यकीय क्ष्रेत्रात केलेली प्रगती तर थक्क करणारी आहे.
'निसर्गाला ओरबाडणे' म्हणजे मला वाटते तुमचा रोख झाडे कापणे, प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग अशा गोष्टींकडे आहे. तर हे प्रगतीचे (मोस्टली ईंधनाच्या शोधानंतरचे) टेंपररी-साईड ईफेक्ट आहेत आणि त्यांच्यावरही आज ना ऊद्या ऊपाय निघतीलच.
एक विचार करा... तुमच्या आजूबाजूला साम्राज्यविस्तारासाठी कायम युद्धे चालू आहेत आणि लाखांवर माणसे मरत आहेत. केवळ सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्याने पूर्वी साथीच्या रोगात गावेच्या गावे दगावत. लस निघेपर्यंत देवी, पोलिओ लहान वयातच आयुष्य बरबाद करून टाकीत. लाखांचे पोशिंदे आजच्या जमान्यात अगदी आठवड्यात ठीक होऊ शकतील अशा आजारांना बळी पडले आहेत.
पूर्वी राजे महारांजाच्या खजिन्यात एकवटलेल्या संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले आहे.
सुख वाढण्याला जीवनमान ऊंचावणे असेही म्हणतात. आज आपण दोन वेगळ्या खंडात बसून एकमेकांना बघू/बोलू शकतो. पूर्वी आर्यभट्टाला त्याच्या समकालीन लोकांशी त्याच्या सिद्धांतावर चर्चा करायची म्हणजे महिनोनमहिने नुसते चालण्यात घालावे लागले असते.

आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या सुखांची गरज नाही... गरज तर सिविलायझेशनचीही नव्हती...युरोपात व्यापार, संस्कृती मूळ धरून शतके ऊलटली तरी अमेरिका खंडात नेटिव लोक आदिवासींप्रमाणे जंगलात रहात होते... साऊथ अमेरिकेत अजूनही आहेत ज्यांचा प्रगत मानवाशी संबंध नसल्याप्रमाणे आहे ... आपल्याकडेही आहेत. ज्याला असे आयुष्य हवे आहे तो ते ह्या घोर कलियुगापासून लांब जात आजही निवडूही शकतो.

आता महत्वाचा मुद्दा,
आपल्या ज्ञानानुसार/मानण्यानुसार मनाचं आरोग्य सर्वश्रेष्ठ... त्याचीच सर्वात जास्त कमतरता म्हणून हे शेवटचं युग ते कलियुग... >> कमतरता कशावरून म्हणता आहात? "सूईच्या अग्रावर मावण्याएवढी जमीनही देणार नाही' म्हणणारा, धर्मयुद्धाच्या नावाखाली स्वजनांना मानणारा, अर्भकाला गंगापात्रात सोडून देणारी कुंती/गंगा, भोगविलासाआठी मुलाकडे त्याचे तारूण्य मागणारा ययाती, एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार करणारे परशुराम हे मनाच्या कुठल्या आरोग्याची ऊदाहरणे आहेत?
ह्या सगळ्या मनात क्रोध, स्वार्थ भरलेल्या वेळोवेळी त्यांचे प्रदर्शन केलेल्या कुठल्याश्या मिथिकल युगातल्या 'मिथिकल' देवदेवतांपेक्षा हाडामासाचे आकाशा एवढे ऊंच बुद्ध, महावीर ह्याच कलियुगाने दिले ना?

या न्यायाने रामायण आधी लिहिले गेले असावे, नाही का? ते संदर्भ प्रक्षिप्त असल्याचे काही पुरावे आहेत का? >> शंतनू 'प्रक्षिप्त' शब्दाबद्दल धन्यवाद. कधीचा आठवत होतो... सारखे प्रतिक्षिप्त, प्रतिक्षिप्त आठवत होते.
पुरावे माझ्याकडे सध्या नाहीत... पण हे वेल-नोन नसले तरी आणि वेल-डॉक्यूमेंटेड संशोधन आहे.. जे मी काही ठिकाणी तुकड्या तुकड्यात वाचले आहे आणि मला ते तेव्हा पटले होते.
माझ्या आधीच्या प्रतिसादात सुद्धा मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला... ही ढोबळ माहिती आहे आणि ईच्छा व आवड असल्यास ईथून धागा पकडून अजून माहिती जमवू शकता.

काही संशोधकांनी महाभारतात वर्णन केलेली काळवेळा संबंधीची माहिती ऊदा. मुहूर्त - पांडवांच्या ईंद्रप्रस्थात आगमनाची (थोडक्यात वास्तुशांतीची), अवकाशाची स्थिती (जयद्रथ ग्रहण प्रकरण, भीष्माचे ऊत्तरायणापर्यंत वाट बघणे) ह्यावरून ग्रह गोलांची रचना मांडून अशा युनिक गोष्टी कधी घडल्या त्याचे सॉफ्टवेअर वापरून संशोधनही केले आहेत. त्यांना जी ऊत्तरे मिळाली ती वैज्ञानिकांच्या पृथ्वीवरचे त्या कालखंडातले वातावरण, मानवी ऊत्क्रांतीचा सिद्धांत ह्या गोष्टींशी मेळ खात नाही.

सांगायचा मुद्दा हा की बरेच वेगवेगळ्या प्रकारे ह्या महाकाव्यांचे आणि त्यांच्यातील घटनांचे 'डेटिंग' करण्याचे संशोधन झाले आहे. एका गोष्टीवर बर्‍याच संशोधकांमध्ये एकवाक्यता आहे की... दरबार पद्धती, रितीरिवाज, राज्याभिषेकाच्या वेळी द्यूत खेळणे वगैरे अनेक गोष्टी गुप्त कालखंडातली परिस्थिती सांगतात. भासाची (जो ई.स. २०० मध्ये म्हणजे कालिदासाच्या दोनशे वगैरे वर्षे आधी होऊन गेला असे मानतात त्याची मभा. आणि रामा. नाटके सुद्धा संदर्भ म्हणून येतात कारण ह्या नाटकांमध्ये गाभा तोच असला तरी प्रसंग, घटना, व्यक्तिरेखांचे जनरली अ‍ॅक्सेप्टेड व्यक्तीमत्व हे सगळेच वेगळे आहे.

महा. आणि रामा. च्या कालखंडा बाबतीत अजून एक मुद्दा आठवतो आहे...
महाभारतात जे कर्ण, अधिरथ, विदुर, एकलव्य यासारखे लोक येतात ते केवळ चार वर्ण, त्यांचा आपसातला संकर आणि संकरात पुरूष स्त्री पेक्षा वरच्या वर्णातला की खालच्या अशा गोष्टींच्या जनरल परम्युटेशन-कॉम्बिनेशनने येतात.

पण रामायणात शबरी, शंभूक, शरयू पार करवणारा नावाडी, सीतेबद्दल प्रश्न विचारणारा ह्या सर्वांच्या स्पेसिफिक जाती आल्या आहेत.
ज्या महाभारत आणि रामायणाच्या दरम्यानच्याकाळात ब्रॉड वर्णसंकरातून बनत गेल्या... असे संशोधकांचे म्हणणे आहे.

खूप छान चर्चा चालू आहे. केवढे वेगवेगळे दृष्टिकोन आणि केवढी अफाट माहिती...... या धाग्याचं भाग्य जोरदार आहे. इतर वेळेस चार ओळी वाचून अर्ध्या लोकांनी पास दिला असता.

मीरा..
तुम्हीं आत्ता पाहिलं हे माझं व माझ्या धाग्याचे भाग्य:-)

बर्गा काल लिहिताना मी संक्षिप्तपणे लिहिले होते. मला म्हणायचय कि तू महाभारत काय किंवा रामायण काय त्या कालखंडातल्या गोष्टींना सामाजिक मापदंड लावून त्यांची काल निश्चिती करायचा प्रयत्न केलास त्यात खोट अशी आहे कि लावलेले मापदंड आजच्या काळातले आहेत. त्यानुसार केलेले अनुमान आहे कि हे सामाजिक निकष उत्क्रांट झालेली आहेत ते एका नॅचरल ऑर्डर मधे झाली आहेत. पण तसे असणे जरुरीचे नसते. तू इरावती बाईंचे युगांत वाचले आहे का ? त्यात ह्यावर बर्‍यापैकी उहापोह आहे.

ज्या महाभारत आणि रामायणाच्या दरम्यानच्याकाळात ब्रॉड वर्णसंकरातून बनत गेल्या. >> हे नीटसे कळले नाही. वर्णसंकरातून जाती कशा बनल्या ? जातीं मधे कामाचा भाग असतो असे मला वाटत होते. वर्ण more refined झाले म्हणतोयस का ?

महाभारताचा कालखंड धूसर आहे कारण त्यावेळचे ग्रहतारे सॉफ्टवेअरमध्ये घालून पाहिले तर जो काळ मिळतो त्याचा व आपल्याला सध्या माहीत असलेला मानवी इतिहास याचा मेळ बसत नाही. सध्या ज्ञात असलेल्या ज्ञानानुसार हे खरे असेलही. तर मग महाभारत व रामायण दरम्यान वर्णसंकरातून जाती बनल्या हे कसे काय?

रामायण महाभारतात वर्णलेली काही पद्धती नंतरही आढळली असेल तर रामायण महाभारताचा काळ त्या नंतरच्या काळातील नसून महाभारताच्या काळातील काही पद्धती नंतरही प्रचलित राहिल्या असण्याची शक्यताही असू शकते ना.

हाब केवढा दीर्घ प्रतिसाद.
असामी बरोबर आहे, सामाजिक मापदंड हे अत्ताच्या प्रमाणे लावून नाही चालणार व तेंव्हा नक्की काय होते ते कळणे कठीण आहे.
माझा रुमाल.. टायपाला वेळ लागतोय

माझ्या धाग्याला इतके महत्व व प्रतिसाद दिला त्या बद्दल माबोकरांचे खूप आभार
हो ना त्या काळचे सामाजिक मापदंड कळणे खूप कठीण आहे.

हाब यांच्या लिखाणावरून :

आत्तापर्यंत झालेल्या चर्चेमधे माझा मुद्दा असा आहे की केवळ सामाजिक मापदंड लावून रामायण आधी झाले की महाभारत हे ठरवणे चूक होइल.
सामाजिक प्रगती देखील कुठल्या प्रक्रारची त्यावर मते बदलतील. जसे स्त्रियांच्या बाबतीत पाहिले असल्यास, रामायणात लढाऊ स्त्रिया, राजकारणातील स्त्रियांचा सहभाग हा फार कमी दिसतो, उलट महाभारतात तो जास्त आहे.म्हणजे स्त्रियांची प्रगती महाभारत काळात जास्त झाली व तेंव्हा प्रगती असल्याने महाभारत नंतर झाले असे म्हणता येइल. कृष्णाने द्वारका संरक्षणासाठी स्त्रियांचे एक पथकही तयार केले होते असा उल्लेख आहे.

कुठलीही घटना / काल याविषयी बोलायचे / अनुमान काढायचे झाल्यास त्याबाबत सर्वांगिण अभ्यास / विचार करणे जरुरीचे आहे. केवळ तुकड्या तुकड्यातील माहीती वाचून (जरी ते पटले तरी) असे निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल. उदा.: रामायणातील शस्त्रे पाहिली तर ती धनुष्य, गदा, दगड यांचा उल्लेख आहे. महाभारतात या बरोबरच चक्र, तोफा इत्यादींचा उल्लेख आहे. मग महाभारतातील शस्त्रे प्रगत नाहीत का ? प्रगती जर शस्त्रांतील पाहीली तर महाभारत नंतर घडले असे म्हणावे लागेल.

शंतनूच्या म्हणण्यानुसार जशी एखादी कथा महाभारतात प्रक्षिप्त असू शकते तसेच रामायणातही असू शकते. तसेच अनेक संदर्भ / उल्लेख तपासावे लागतील. मुळात रामायण, महाभारत हा इतिहास आहे हे विद्वानांनी मान्य केले आहे. इतिहास आपल्या पर्यंत येताना त्यात भर पडत गेली हे खरे असले तरी त्यातली आपण जर त्यातली पात्रे एकेक घेऊन अभ्यास केला तर ते लोक आजच्या बुद्धांपेक्षा सरसच ठरतील असे मला वाटते. आजचे बुद्ध जर प्रगत समाजाचे होते तर त्यांनी घर सोडून जाताना आपल्या कुटुंबीयांना त्याची कल्पना देणे त्यांचे कर्तव्य नव्हते का? निदान आपल्या पत्नीलाही त्यांनी सांगू नये. त्यांच्या जाबाबदारी पासून त्यांनी पळ काढला असे म्हटले तर.. परत त्यांनीच सांगून ठेवले आहे की त्यांचे ज्ञान / धर्म हे १००० वर्षांनंतर नामषेष होइल. तसे आपल्या वेदांबाबत होत नाही जे युगानुयुगे आहेतच. मग बुद्ध धर्म प्रगत काळाचे प्रतिनिधित्व करतो का तसेच बुद्धही.

मराठी वाङमयाचा इतिहास - खंड१ यात पांगारकरांनी महाभारत युद्ध ख्रिस्ताब्दपुर्व १५२५ साली झाले असे मांडले आहे जे सर्व इतिहास कारांनी मान्य केले आहे. महाभारतकार चिंतामण वैद्य यांचे मत असे आहे की श्रीकृष्णाचा जन्म शकपूर्व ३२६३ साली झाला. ३२६३+ चालू शक १९४१ = ५२०४ वर्षापूर्वी श्रीकृष्ण जन्माला आला असे अनुमान निघते. हे सर्व अनुमान ह्या मोठ्या लेखकांनीं वेगवेगळे निकष लावून मांडले आहेत, ज्यात आपण म्हणता त्याप्रमाणे अवकाशनोंदीही आल्या. यावरुनच वर्तकांनीही काळाचा अभ्यास केला आहे. त्यांच्यामताचा काळही साधारण वर दिलेलाच आहे. रामायणाचा काळ त्याही पूर्वीचा.

रामायणात असे म्हणतात प्रजा सुखी होती, राजा हा खरोखर प्रजेचा सेवक होता, ज्यामुळे केवळ धोब्याच्या म्हणण्यामुळे त्यानी आपल्या पत्नीला वनवासात पाठवून दिले जराही तिचा विचार न करता. दुष्काळात स्वतः राजा देखील जनतेसाठी मार्ग काढण्यात सहभागी असे जसे राजा जनक.
पुढे महभारतात राजे स्वतःचा विचार करून युद्ध करु लागले, अगदी घरातील स्त्रीला भर सभेत अपमानीत करतानाही त्यांना काही वाटले नाही. आता कलियुगात तर स्त्रियांचे शोषण अगदी सहज होताना दिसते आहे.

पण या सगळ्या वरून आजचा समाज अप्रगत आहे असे म्हणणे जसे चूक होइल तसेच त्याकाळचा समाज अप्रगत होता असेही म्हणणे चूक होइल. जी टेस्ट ट्युब बेबी आपण आताचा शोध म्हणतो तो तर कौरवांसाठी व्यासांनी वापरलेलाच की. हा आता चे टेक्निक वेगळे असू शकते तेव्हा पेक्षा. यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच रामायणाच्या वेळी रामजन्म हा पायसामुळे झालेला आहे. ते नेमके कोणते औषध होते, दशरथ व राण्या यांनी काही ट्रीटमेंट घेतली होती का हे आपल्याला माहीत नाही.

तसेच संपत्तीचे वाटप / विकेंद्रीकरण आता झाले आहे असे तुम्ही म्हणता हे खरच तुम्हाला मान्य आहे का ? आजही मी म्हणेन संपत्ती ही भांडवलदारांकडे, जे केवळ मूठभर लोक आहेत. पुर्वी राजाकडे जास्त संपत्ती असे तर आता भांडवलदारांकडे. समाज जीवन उंचावले आहे हे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा आपण काही शतकांशी comparison करतो.

एकूणच रामायणकालातील समाज, तेंव्हाचे समाज जीवन त्यांचे निकष आपल्याला माहीत नाहीत, त्यातील कागदपत्रे फारशी उपलब्ध नाहीत. तेच महाभारताविषयी म्हणेन. या दोन्ही काळातील माणसे नक्की कशी होती, त्यांच्या सुखाच्या अपेक्षा काय होत्या, समाधानाच्या काय होत्या हे कुठे आपल्याला माहितेय. मी असे म्हणेन तेंव्हा लोकांच्या गरज कमी होत्या, म्हणून प्रगती कमी. गरज ही शोधाची जननी असते हे खरेच आहे शेवटी. (मी भरकटतेय का?)

पूर्वीची माणसे, त्यांचे खरे वंशज, त्याकाळची परीस्थिती याविषयी जी माहीती उपलब्ध आहे त्यानुसार जाणकारांचे म्हणणे असे आहे की रामायण आधी घडले मग महाभारत. मी वर दिलेली वंशावळही जाणकारमान्य आहे. अजूनतरी याविरोधी असे काही माझ्या वाचनात आले नाही. म्हणून मी म्हणते रामायण आधी आले.

तुमच्याप्रमाणे माझेही मत आहेच की अभ्यास व्हायला हवा आणि म्हणूनच काळ ठरविण्यासाठी केवळ सामाजिक मापदंड वापरणे हे चूकीचे आहे. हे.मा. वै. म.

माझे वरील लिखाण कदाचित मुद्देसूद नसेल परंतू माझा मुद्दा व आशय समजेल अशी आशा करते व लिखाण थांबवते.

भरतजी तेच तर केवळ सामाजिक मापदंड लावून ती लोकं अप्रगत ठरवून रामायण नंतर झाले असे म्हणता नाही येणार.

टेस्ट ट्युब बेबी १९७८मध्ये ह्या समाजाकडे आली. आणि इंद्रजिताने सोडलेला अणुबॉम्ब म्हणजे ब्रह्मास्त्र १९४५ मध्ये समाजाकडे आलं. त्यामुळे आधी महाभारत आणि मग रामायण असंच असणार.

हा.आ
तुम्हीं तेच विमान चालवून इतक्या लांब माबोवर येण्याचा त्रास कशाला घेतलात?

Pages