Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी तर कालचा भाग पाहायला
मी तर कालचा भाग पाहायला सुरुवात केली पण 5मिनिटात बंद केलं.
कसे बोलत होते आजोबा.
काय तर म्हणे 2 वेळेसच खायला मिळतं होतं तर ही अवदसा का सुचली.. कसं वाटत होतं ते ऐकायला.
मी तरी एवढं टोकाचं ऐकू शकतं नाही म्हणून चॅनेल चेंज केलं.
आजही असंच दिसतंय सगळं
आजोबांना सूनवायला पाहिजे कोण
आजोबांना सूनवायला पाहिजे कोण तरी....काय ती आसावरी नुस्त रडत बसते
आता राजे घरासमोर तळ ठोकणार का
आता राजे घरासमोर तळ ठोकणार का?
सोमी वर ही बातमी पसरल्यावर आजोबा जीव देतील.
प्रत्येक सिरीयल मध्ये
प्रत्येक सिरीयल मध्ये प्रत्त्येक कथेत हट्टाने एक व्हिलन दाखवायलाच पाहिजे असा सगळ्या चानेल च्या क्रिएटीव्ह (?) हेड चा गैरसमज झालाय की काय ? काही वेळा परिस्थिती देखील व्हिलन असते . लोकांच्या मजबुरी / अगतिकता असतात . कर्तव्ये ही भावभावना पेक्षा महत्त्वाची ठरतात हे या तद्दन माठ सीरिअल लेखक अन त्याना तसे लिहायला भाग पाडणार्या रोजंदारी लोकाना समजत नाही का ? खरेतर ही मालिका खूप तरल भावनिक अंगाने मांडता आली असती पण तसे करतील तर झी च्या महान परंपरेला कलंक लागेल ना ...
तिकडे मानबा मध्ये तर तो केड्या एपिसोड वाढवण्यासाठी रोज नवीन अडचणी शोधत असतो . आणि मग त्या अडचणी सोडवण्यासाठी पाचपन्नास एपिसोड पाणी घालून वाढवतो ... वीट आलाय अगदी ! सरळ विचार करण्याची क्षमताच नष्ट झालीये का या लोकांची ?
काल शुभ्राने आजोबान्ना
काल शुभ्राने आजोबान्ना जेवणावरुन उठवल ते चान्गल केल. असच पाहिजे हयान्ना.
आता राजे घरासमोर तळ ठोकणार का? >>>>>> डबडयाने आयडिया दिली त्यान्ना.
डबडया राजेन्ना म्हणत होता की तुम्ही आजोबान्ना न घाबरता आईचा विचार करा. आईच्या जागी शुभ्रा असती तर मी हयव केल असत, त्यव केल असत. जेव्हा स्वत च्या लग्नाची वेळ आली होती तेव्हा ह्याने आसाला शुभ्राबद्दल कधीच काही सान्गितल नाही. पळपुटेपणा केला. मग शुभ्रालाच पुढाकार घ्यावा लागला लग्नासाठी. तिला याव लागल ह्यान्च्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी. डरपोक डबडया! त्यापेक्षा राजे बरे.
डबड्याचा डाव त्याच्यावरच
डबड्याचा डाव त्याच्यावरच उलटणार आहे.तेव्हा मजा येईल.
Maddy सोहमच्या दहशतीत येऊन
Maddy डबड्याच्या दहशतीत येऊन वेड्यासारखी वागत होती. ठणकावून सांगायचे ना की मी manager आहे. बावळट
काय राजेंनी तंबू ठोकलाय,
काय राजेंनी तंबू ठोकलाय, पहिले वाटलं बालिश आहे पण मग वाटलं आजोबांना पटवणार तरी कसं. आसावरी तर रडण्याशिवाय काही करणार नाही.
रच्याकने, धुमधडाकामध्ये महेश कोठारेने असाच तंबू ठोकला होता आणि त्यात निवेदिता खूप छान दिसत होती.
डास परवडले पण प्रज्ञा नको
डास परवडले पण प्रज्ञा नको
काल शुभ्राचा फुलका करपला होता
काल शुभ्राचा फुलका करपला होता.
आणि नी. जो. ला म्हणत होती की तुम्ही स्वयंपाक करा मी आजोबांना सांगेल मी केला म्हणून (eye rolling ईमोजी इमॅजिन करावी ) ती बिचारी आधीच रडून बेजार आणि ही शुभ्रा तील स्वयंपाक करायला सांगतीये.
आणि म्हणे भरल्या वांग्याची भाजी करायला मदत करा.
इकडे आजोबा केवढं बोलतायेत नी. जो. ला आणि हीच आपलं तिसरेच म्हणे स्वयंपाक करा.
त्या चेकवर पाणी पडल ते छान
त्या चेकवर पाणी पडल ते छान दाखवल. मस्त पोपट झाला डबडयाचा.
डबडयाला स्वतःची फाईल सुद्दा शोधता येत नाही. त्यासाठीसुद्दा त्याला शुभ्राला किव्वा आसाला बोलवाव लागत.
आजोबा कारखानीसान्ना बोलले ते ऐकून वाईट वाटल. ' तुला प्रज्ञाने हाकलल तेच योग्य केल' म्हणे. असा राग आला ना आजोबान्चा.
डास परवडले पण प्रज्ञा नको
इकडे आजोबा केवढं बोलतायेत नी.
इकडे आजोबा केवढं बोलतायेत नी. जो. ला आणि हीच आपलं तिसरेच म्हणे स्वयंपाक करा.>>> आता सगळेच काम तिच्या गळ्यात पडले आहे. स्पष्ट बोलता येत नाही म्हणून असे घुळूमुळू बोलते.
शुभ्राच्या चांगलंच जीवावर
शुभ्राच्या चांगलंच जीवावर आलंय कामं करायचं, म्हणून उगीच गूळ लावतीये. पोळी करपली होती तिची. बबड्या काय दीड-दोन लाख, अडीच लाख, तीन लाख करत बोली लावावी तसं करत होता, राजे एवढे भाबडे आहेत का, की कंगाल झाल्यावर आणि प्रेमाचा ज्वर उतरल्यावर डोळे उघडणार आहेत. असे चेक फाडत राहिले तर खरंच तंबूत राहावे लागेल आणि आसावरी स्वतःच नाही म्हणेल
आता सगळेच काम तिच्या गळ्यात
आता सगळेच काम तिच्या गळ्यात पडले आहे. स्पष्ट बोलता येत नाही म्हणून असे घुळूमुळू बोलते.>>नाहीतर काय 2 दिवस स्वयंपाक करायला लागला तर लगेच हिला कंटाळा आला.
आणि जेवणही यथातथाच बनवत असेल म्हणून तर आजोबा फक्त ताकभात खाऊन वेळ मारून नेत होते.
असे चेक फाडत राहिले तर खरंच तंबूत राहावे लागेल:D
आता सगळेच काम तिच्या गळ्यात
आता सगळेच काम तिच्या गळ्यात पडले आहे. स्पष्ट बोलता येत नाही म्हणून असे घुळूमुळू बोलते. >>>>>> अगदी अगदी. घरची कामे करा, वरती ऑफिसची कामे आहेच. दोन्ही कामात एक्सपर्ट असायला ती राधाक्का थोडीच आहे. राधाक्का प्रत्येकवेळी ' मी कशी सुपरवुमन आहे' हेच दाखवते. ह्यापेक्षा शुभ्रा बरी. शेवटी काल तिने आसाला जेवण बनवायला राजी केलच. आजोबान्ना आसाशिवाय कुणाचही जेवण पोटात जात नाही म्हणे.
असे चेक फाडत राहिले तर खरंच तंबूत राहावे लागेल >>>>>>>>
आजोबान्ना आसाशिवाय कुणाचही
आजोबान्ना आसाशिवाय कुणाचही जेवण पोटात जात नाही म्हणे.>>> म्हणूनच लग्न करून निघून जाईल या भितीने त्यांना परवानगी देत नसतील.
@सुलू, शुभ्रा आणि सोहम वेगळे
@सुलू, शुभ्रा आणि सोहम वेगळे होतील म्हणजे वेगळे राहायला लागतील या अर्थी म्हटलं होतं पण तुम्ही म्हणताय तसंही होऊ शकतं, फक्त शुभ्राचे कन्यादान करेपर्यंत म्हणजे अजून किमान एक वर्ष, गिओ आणि निजो मालिका करतील असं वाटत नाही.
काय वाट्टेल ते चालू आहे...
काय वाट्टेल ते चालू आहे... बेक्कार होत चालली आहे दिवसेंदिवस ही सिरीअल.
काटेकोर
काटेकोर
अनाजीपंत काटेकोरच्या भूमिकेत
अनाजीपंत काटेकोरच्या भूमिकेत.अतिशय भंपकपणा सुरू आहे
काय वाट्टेल ते चालू आहे...
काय वाट्टेल ते चालू आहे... बेक्कार होत चालली आहे दिवसेंदिवस ही सिरीअल. >>>>>>> अगदी अगदी
काय वाट्टेल ते चालू आहे...
काय वाट्टेल ते चालू आहे... बेक्कार होत चालली आहे दिवसेंदिवस ही सिरीअल.>>+१
व्हिवामध्ये मुलाखत आली आहे
व्हिवामध्ये मुलाखत आली आहे निजोची. काटेकोर आडनाव कधी ऐकलं नव्हतं. सोहम पैशाचा इतका हपापलेला आहे की काटेकोर काय आणि राजे काय, आईची त्याला काही पडलेलीच नाही तद्दन फिल्मीपणा चालू आहे. आजोबांचे विचार अगदी चिप आहेत. चांगल्या विषयाची वाट लावली.
एवढी चांगली स्टार्कास्ट
एवढी चांगली स्टार्कास्ट असताना अग्गंबाईचं इतक्या लवकर मातेरं करतील असं वाटलं नव्हतं. अग्गंबाईपेक्षा ती मिसेस मुख्यमंत्री लाख पटीने चांगली.
रजिस्टर लग्नासाठी एक महिना
रजिस्टर लग्नासाठी एक महिना आधी नोटीस द्यावी लागते ना.
आजोबान्ना आसाशिवाय कुणाचही
आजोबान्ना आसाशिवाय कुणाचही जेवण पोटात जात नाही म्हणे.>>> म्हणूनच लग्न करून निघून जाईल या भितीने त्यांना परवानगी देत नसतील.---- बरोबर आहे आजोबांचं, ते फक्त स्वतः चा विचार करत आहेत. (मी ही सेरिअल बघत नाही फक्त इथल्या चर्चेवरुन मताची पिंक टाकली !)
हम्म.. आता काय आसा आणि त्या
हम्म.. आता काय आसा आणि त्या काटेकोरच्या साखरपुडयाच्या जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट राजेंना मिळालंच आहें मग DDLJ स्टाइल राजे आजोबांना खूष करतील आणि शेवटी राजे आणि आसा चा साखरपुडा संपन्न होईल...
त्या काटेकोरने आसावरीला
त्या काटेकोरने आसावरीला त्याच्या दुसऱ्या बायकोचा जो फोन दिला आहे त्यातल्या त्या वाजणाऱ्या रिंगटोनचे नाव काय आहे?
आजोबांचं सुरु झालं.. पालकाची
आजोबांचं सुरु झालं.. पालकाची भजी आणि वांग्याची ढेपसे कर म्हणे.
आ. सा ला भाजीला पाठवलं बाहेर आणि स्वतः तिचा पाठलाग करायला गेले शुभ्रा सोबत ती राजेंसोबत बोलते का ते बघायला....
बादवे ढेपसे की ढेमसे म्हणजे काय? भरीत का?
त्या डबड्याचा नवीन सिनेमा येतोय शाहिद भाई कोतवाल नावाचा
त्याला थेटरात बघायला कोण जाणार..??
भयंकर दिसतोय तो,त्या पोस्टर
भयंकर दिसतोय तो,त्या पोस्टर मध्ये.
Pages