गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,
आज मराठीतल्या त्या नावांचे अर्थ आणि तेव्हाचे अर्थ, जीवनसंबंध जसेच्या तसे असणार नाहीत. नाव, अर्थ आणि संदर्भ ह्यांची कॉजॅलिटी ऊलटीही असू शकते. म्हणजे समजा एखाद्याने आताचा संदर्भ घेऊन प्रश्न विचारला... ज्युलिअसचे सीझर असे विचित्र नामकरण का केले असावे. Proud
हजाराच्या आसपास वर्षात तीन मोठ्या टप्प्यात महाभारत घडले... आणि त्यानंतर रामायण. एवढ्या मोठ्या कालखंडात भाषा , लिपी, अर्थ सगळेच बदलू शकते.

जसे आपल्या अलिकडच्या कलाकृतीत हीरोचे नाव 'विजय' असे ईंडिकेटिव असते... दुर्जन, भुजंग वगैरे नसते ते खल प्रवृत्तींचे असते.. तसेच.

@मामी
मला ही असे अनेक प्रश्न पडतात पण जे आहे ते आहे

हजाराच्या आसपास वर्षात तीन मोठ्या टप्प्यात महाभारत घडले... आणि त्यानंतर रामायण.
>> बर्ग - आधी रामायण नंतर महाभारत ना ?

माझ्या माहिती प्रमाणे
सतयुग -रामायण
द्वापारयुग- महाभारत
कलयुग -सद्या सुरु आहे
बरोबर ना??

हाब, सहमत.

फक्त रामायण आधी घडले.

रामायण महाभारताच्या नंतर घडले असावे असं नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात वाचलंय. आर्यांचा दक्षिणेकडे झालेला शिरकाव, वापरात असलेले धातू असे काही मुद्दे आहेत असं आठवतंय.

आधी रामायण नंतर महाभारत ना ? >> पद्मावतची कहानी बाजीराव-मस्तानीच्या आधीच्या काळात घडते असे आपण सिनेमात पाहिले. ह्याचा अर्थ पद्ममावत सिनेमा सुद्धा बाजीराव-मस्तानीच्या आधी प्रदर्शित झाला असे म्हणता येत नाही ना? त्या दोन्ही कलाकृतींची निर्मितीमुल्ये तपासली ऊदा. व्हीएफ्क्सचा सफाईदार वापर तर आपल्याला पद्मावत सिनेमा बाजीराव-मस्तानी सिनेमाच्या नंतर बनला आहे असे अनुमान काढता येईल.

तर साहित्य संशोधकांचे असे अर्ग्यूमेंट आहे की भाषा, लिपी, लिहिण्याच्या साधनांचा वापर, लिहिणार्‍यांच्या ईतर कार्याचा ऐतिहासिक संदर्भ, त्यातून मिळाणारे त्यावेळच्या समाजपद्धतीबद्दलचे (उदा. मोजमापाची बदललेली एकके, जातीव्य्वस्था) ईत्यादी क्लूज बघता रामायण हे महाभारताच्या ऊत्क्रांतीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्याच्या आसपास लिहिले गेले असावे. कुठला तरी एक समाज (मला आता नाव आठवत नाही त्याचे) जो दोन्ही गोष्टींमध्ये येतो पण रामायणात तो जास्त प्रगत आहे. दोन्ही काव्यात आलेली वर्णव्यवस्थेमधले स्थित्यंतर हे सुद्धा एक मोठे प्रमाण होते ज्यावरून ती रामायण लिहिल्याच्या काळात जास्त कट्टर झाल्याचे दिसले.

ई.स.पूर्व ६०० ते गुप्त घराण्यापर्यंत म्हणजे साधारणातः ई.स. ४०० पर्यत महाभारताचे हजार वर्षाच्या आसपास तीन टप्प्यात लेखन झाले.
महाभारताचा पहिला टप्पा 'जय (व्यास कथित - आठ साडे आठ हजार श्लोक)' जे केवळ कुरू राजांच्या (जे एका प्रांताचे राजघराणे होते भोसले राणा प्रताप अर्थात मराठे-राजपूत होते तसेच) ईतर देशाशी चालेल्या युद्धाबद्दल होते. असे युद्द ई.स. पूर्व ८५० च्या आसपास म्हणजे 'जय' महाकाव्याचे लिखाण चालू होण्याच्या २५० वर्षांपूर्वी झाल्याचे संशोधनातून अनुमान काढले गेले.

(कुरू (हस्तिनापूर) राजांचे शेजारच्या बलशाली पांचालाशी कायम वैर होते. ह्याचे पर्यावसानशेवटी एका मोठ्या युद्धात झाले ज्यात कनिष्ठ असल्याने वा अजून काही कारणाने हक्क डावलला गेलेला सिंहासनावर अधिकार नसणारा कुरूंचा भाऊ पांचालांना जाऊन मिळाला. मोठ्या युद्धानंतर कुरूंना हरवून पांचाल जिंकले आणि त्यांनी सिंहासनावर पुढचा दावेदार असलेल्या कुरूंच्या भावाला (जो आता कौरवाचा पांडव झाला) बसवले. मग जशी ही गोष्ट वाढत गेली तसे सिंहासनावरचा बलशाली कुरू राजा त्याच्या शंभर वाईट गोष्टी दाखवण्यासाठी एकाचे शंभर झाले... दुसरा गरीब अन्यायग्रस्त भाऊ त्याचे अनेक चांगले गूण दाखवण्यासाठी एकाचे पाच झाले )

त्यानंतरचा काव्यलेखनातला दुसरा मोठा टप्पा 'भारत (वैशंपायन कथित - चोवीस हजार श्लोक)' ज्यात कृष्ण आला, पांडवांची पूर्वपिठीका आली, गीता आली.

मग तिसर्‍या टप्प्यात 'भारता'चे अजून अनेक कथा, ऊपकथा मिळत राहून 'महाभारत (ऊग्रश्रवा कथित - सध्याचे लाखभर श्लोक )' झाले.

तर अशी जय-भारत-महाभारत ऊत्क्रांती घडली ह्या ग्रंथाची/काव्याची. पुढे ह्या ग्रंथांचा ऊपयोग धर्मशास्त्रात मानदंड म्हणून होऊ लागला. जसे आपल्याकडे कोर्टात आधी येऊन गेलेल्या ह्या-त्या केसेसचा दाखला देऊन काय न्यायसंमत होते सांगितले जाते ना ... तसेच.

आणि आता ह्याचा चौथा टप्पा महाविकास-भारत मायबोलीवर लिहिला जात आहे. Proud

ही आजवर वाचनात आलेली ढोबळ माहिती आठवली तशी लिहिली... चर्चा करायची असल्यास तयारी आहे. आपल्याकडे माहिती असल्यास जरूर शेअर करावी, ती वाचून अजूनही काही आठवेल. ईच्छा आणि आवड असल्यास ईथून प्रेरणा घेऊन आपला रिसर्च करावा. ऊगीच अक्कल काढत वाद घालायला येऊ नये. Proud

बर्ग - खतरनाक माहिती - महाभारत काल्पनिक आहे हे माझे मत आहेच त्यामुळे तुमचा प्रतिसाद मला तरी माहितीपूर्ण वाटला !
असे पर्स्पेक्टिव्ह असू शकेल असे वाटले हि नव्हते - जबरदस्त !!!!!!

बायदवे - इंटरनेट वर महाभारत आधी असे कुठेच मिळत नाहीय. खूप शोधले.

पद्मावतची कहानी बाजीराव-मस्तानीच्या आधीच्या काळात घडते असे आपण सिनेमात पाहिले. ह्याचा अर्थ पद्ममावत सिनेमा सुद्धा बाजीराव-मस्तानीच्या आधी प्रदर्शित झाला असे म्हणता येत नाही ना? त्या दोन्ही कलाकृतींची निर्मितीमुल्ये तपासली ऊदा. व्हीएफ्क्सचा सफाईदार वापर तर आपल्याला पद्मावत सिनेमा बाजीराव-मस्तानी सिनेमाच्या नंतर बनला आहे असे अनुमान काढता येईल>> Lol

बर्ग
खुपच रोचक माहिती तुम्हाला त्या हिस्टोरीवाल्या देवदत्त पटनायक(आडनाव निटस आठवत नाही) पेक्षा जास्त माहिती आहे स्क्रीन शॉट घेऊन ठेवते,धन्यवाद

मी माधुरी
त्रेता युग म्हणजेच सतयुग ना?

नाही हो, स्वामिनी.
कालचक्र चार युगांत विभागले गेले आहे.

सत्ययुग
त्रेतायुग
द्वापारयुग
कलियुग

कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग येणार अशीही आख्यायिका आहे.

वराह, मत्स्य, नृसिंह हे अवतार सत्ययुगातले. (सारे अमानविय अवतार.)
वामन, परशुराम आणि भगवान श्री राम हे त्रेतायुगातले.
कृष्ण द्वापारयुगातला.
कल्की कलियुगातला. (आख्यायिकेनुसार हा अवतार या युगाचा अंत करेल.)

अवांतर: माझं नाव मधुरा आहे.

हाब, +१ नविन माहिती.

हाब म्हणजे मायबोलीला मिळालेलं वरदान आहे.>>>
वीश्नूचा अकरावा अवतार Lol

मी माधुरी >> Lol Lol Lol

हे खरंच टायपो आहे की मुद्दाम केले आहे? आधी वाटले नव्हते पण आता शंका यायला लागली आहे. पण मुद्दाम असेल तरी चालू द्या, मजा येते आहे. मला आता कुठल्या नावावरनं हाक मारतील कुणास ठावे! काल-परवा कधी तरी त्या मला 'हरचंद्र' म्हटल्याचे स्मरते.

सत्ययुग
त्रेतायुग
द्वापारयुग
कलियुग

कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग येणार अशीही आख्यायिका आहे.

वराह, मत्स्य, नृसिंह हे अवतार सत्ययुगातले. (सारे अमानविय अवतार.)
वामन, परशुराम आणि भगवान श्री राम हे त्रेतायुगातले.
कृष्ण द्वापारयुगातला.
कल्की कलियुगातला. (आख्यायिकेनुसार हा अवतार या युगाचा अंत करेल.)? >> खरं आहे मधुरा, पूर्ण सहमत

कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग येणार अशीही आख्यायिका आहे. >> मग या नियमानुसार रामायण आत्ता परवाच्या त्रेतायुगात आणि महाभारत हे त्या पूर्वीच्या द्वापरयुगात झाले असेल तरी आधी महाभारत मग रामायण हा हिशेब लागतो.

स्वामिनी, तुम्हाला चार युगांची नावं नीटशी माहीत नाहीत. सत्ययुगात रामायण घडलं असं म्हणताय. त्रेतायुग म्हणजे सत्ययुग का असं विचारताय. का तुम्ही डायरेक्ट महाभारतावर उडी घेतली? मला पण वाटतंय हे सगळं मुद्दाम केलं जातंय.

आईने अकबरी मध्ये रामायण व महाभारत हे उल्लेख नाहीत. म्हणजे अकबराच्या नंतर दोन्ही गोष्टी घडल्या असाव्यात.

हाब, आपण दिलेली माहिती नवीन आहे मात्र महाभारतातील युद्धात रामाचे वंशज कौरवांच्या बाजुने लढत होते असा उल्लेख आहे.

महाभारत काल्पनिक होते असे अनेकांना वाटते आणि त्यावर बरेच वाद झालेत, द्वारका समुद्रात बुडाली असं म्हटलंय, 1963 मधे डॉ सांकलिया यांनी पुरातत्व विभागातर्फे केलेल्या उत्खननात द्वारकेच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत, मग जर श्रीकृष्ण होता तर महाभारत ही होते..

आईने अकबरी मध्ये रामायण व महाभारत हे उल्लेख नाहीत. म्हणजे अकबराच्या नंतर दोन्ही गोष्टी घडल्या असाव्यात. >> Lol

आता आईने अकबरी पण आली का इथे Lol

हाब, आपण दिलेली माहिती नवीन आहे मात्र महाभारतातील युद्धात रामाचे वंशज कौरवांच्या बाजुने लढत होते असा उल्लेख आहे.

महाभारत काल्पनिक होते असे अनेकांना वाटते आणि त्यावर बरेच वाद झालेत, द्वारका समुद्रात बुडाली असं म्हटलंय, 1963 मधे डॉ सांकलिया यांनी पुरातत्व विभागातर्फे केलेल्या उत्खननात द्वारकेच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत, मग जर श्रीकृष्ण होता तर महाभारत ही होते..>>
मीही याविषयी वाचले आहे.

मध्यंतरी एक वंशावळ वाचनात आलेली, त्यानुसार तर कौरव रामाचे वंशजच वाटतात.
मिळाली तर डकवते इथे.

हाब - नवीन माहिती मिळाली वाचायला.. धन्यवाद! मला जय हे काव्य आधी लिहिले गेले हे माहीत होते पण एकच कौरव व एकच पांडव होता हे नव्हते माहीत.

आईने अकबरी
>>
ते फक्त 'अकबरी' आहे. लेखिका - आई.

आईने लिहिलेली अकबरी आजही स्मरली जाते, इलियड आणि ओडिसी च्या तोडीस तोड.

Pages