फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो शुगोल, हे काही पटलं नाही, लोकसभेत विरोध केला असता तर ठीक होतं, एक धड भुमिका घ्यायची, हे सरळसरळ तालावर नाचणं झालं, so sad.

शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेत म्हणत होते पण त्याबाबतीत अजून निर्णय कुठे घेतला, दोन तीन दिवसांत घेणार होते.

प्रत्यक्ष शिवसेनाप्रमुख संजय राऊत राज्यसभेत असताना भाजपाला पाठिंबा कसा मिळणार?

त्याउलट लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांना जनाची नाही तर मनाची लाज तरी आहे....

>>>>>>>> कॅबला राज्यसभेत सेना पाठींबा देणार नाही म्हणे आता. लोकसभेत दिला आणि राज्यसभेत अडवणूक. <<<<<<<

ह्याला म्हणतात आदर्शवाद !! मोडेन पण वाकणार नाही !!

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !!
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !!
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !!

अदनान सामीचे घर काँग्रस काळात कोर्टाने जप्त केले होते,

भाजपाच्या काळात दंड आकारून घर दिले,

म्हणजे ह्यांना कायदा नेमका का हवा आहे ?

मोदीशहांच्या भाजपशी सामना करायचा तर सोज्ज्वळ सालस राहून कसं चालेल?

कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष होता, तसं गोव्यातही काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष होता. ४० पैकी १७ जागा. तिथे सरकार आलं भाजपचं. हे भलं मो ठं महत्त्वाचं राज्य सांभाळायला संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन पर्रिकर दिल्लीहून पणजीला धावले.

कोंग्रेसने कर्नाटकात जदला मुख्यमंत्रीपद दिलं तसंच गोव्यात आणि कर्नाटकात भाजपने या नव्या जोडीदारांना, आयातवीरांना अधिक मंत्रीपदं दिली.
कर्नाटकात एकूण ३३ पैकी किमान १२ हे आयातीत मंत्री असतील.

गोव्यात , मणीपपूर , मेघालयमध्ये भाजपने जे केलं ती चाणक्यनीती. तेच कर्नाटकात काँग्रेसने केलं तर अन्याय?

तसंही सरकारिया कमिशनने मार्गदर्शक तत्त्व घालून दिली आहेत.
एका पक्षा ला स्पष्ट बहुमत नसेल तर अनुक्रमे निवडणूकपूर्च युती केलेले पक्ष, मग सगळ्यात मोठा पक्ष, मग निवडणूक पश्चात युती यांना सत्ता स्थापन करायला बोलवावं.
राज्यपालांनी त्यानुसार येडियुरप्पांना बोलावलं. त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही, तेव्हा निवडणूक पश्चात युती केलेल्या जद- काँग्रेस यांना बोलावलं.

माझा दुसरा मुद्दा होता, आयातीत उमेदवारांना पक्षांतर करण्याची किंमत मोजून वर मंत्रीपद दिल्यावर मूळ भाजप चे लोक प्रतिनिधी पक्षनिष्ठेचा जप करीत हात चोळत बसतात त्यांचे कौतुक करावे.

अदनान सामीचे घर काँग्रस काळात कोर्टाने जप्त केले होते,
भाजपाच्या काळात दंड आकारून घर दिले,म्हणजे ह्यांना कायदा नेमका का हवा आहे ?.. त्याचे नागरिकत्व कुठले आहे सध्या?
माझ्या माहितीप्रमाणे त्याचे वडील खुप श्रीमंत उद्योगपती आहेत.

चूक
अदनान सामी यास भारतीय नागरिकत्व दिलेले आहे २०१५ मध्येच. त्याला पाकिस्तानने नागरिकत्व देण्यास नकार दिला होता.
https://www.timesnownews.com/entertainment/latest/bollywood/article/thre...

अदनान सामी.. सामी हिंदु आहे काय? कालच्या कायद्यानुसार नॉन मुसल्मानानाच भारतात सामावुन घेता येउ शकते/

कालच्या कायद्यानुसार नॉन मुसल्मानानाच भारतात सामावुन घेता येउ शकते>>>>>>>>

कालचे अजून बिल आहे, कायदा झालेला नाही.

कालचे बिल धर्माच्या नावाखाली छळ झाल्यामुळे जे भारतात पळून आलेत आणि इथेच राहू इच्छितात त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासंबंधी आहे. असे नागरिकत्व मिळाले की त्यांना नोकरी, घर वगैरे गोष्टीत अडचणी येत नाहीत. नाहीतर जन्मभर अधांतरी राहावे लागते.

हे सोडून इतर कोणी स्वखुशीने भारतीय नागरिकत्व घेऊ इच्छित असेल तर त्याला ते मिळण्यासंबंधी वेगळा कायदा आहे, त्यातल्या अटींची पूर्तता केली असता नागरिकत्व मिळू शकते. फक्त सामीच नाही तर असे कित्येक आहेत जे इथे येऊन स्थायिक झाले आहेत.

बिल सुटं वाचण्यात अर्थ नाही. त्यांचा एन आर सी शी असलेला अन्योन्य संबंध माहीत नसल्याचं दाखवणारे दाखवतील.

एखादा परदेशी नागरीक, स्वखुशीने भारतात बरेच वर्षे राहीला असेल, त्याने सर्व कायदा नियम पाळले असतील आणी जर त्याच्या पासुन काही धोका नसेल ( संशयास्पद वागणूक वगैरे ) आणी त्याला नागरीकत्व हवे असेल तर अटी पूर्ण करुन ते देता येते.

सामी मुस्लिम आहे. पण त्याचे नातेवाईक व पूर्वज भारतातलेच आहेत.

सावरकरी व्याख्येनुसार , अखंड हिंदुस्थानातील सर्व लोकांचे पूर्वज हिंदूच आहेत,

अगदी रोहिनग्या चे देखील

धन्यवाद खरेजी

2015 चे अपडेट दिल्याबद्दल.

एक चांगला गायक व वजन कमी केलेला यशस्वी ओबेज माणूस नागरिक केल्याबद्दल व मुसलमान 1 ने वाढवल्याबद्दल मोदींचे अभिनंदन

मोदीशहांच्या भाजपशी सामना करायचा तर सोज्ज्वळ सालस राहून कसं चालेल? >>>

हे कोणासाठी ? सगळे डावपेच व लोकशाहीचे खुन करण्याचे प्रकार कोळुन प्यायलेल्या कॉन्ग्रेससाठी ? Lol Lol

सावरकरी व्याख्येनुसार , अखंड हिंदुस्थानातील सर्व लोकांचे पूर्वज हिंदूच आहेत,

अगदी रोहिनग्या चे देखील

Submitted by BLACKCAT on 11 December, 2019 - 12:46 >>>

रोहिन्ग्या हिन्दु आहेत काय ? त्यांना त्यांच्या देशातुन का हाकलले? तेही दोनदा ?

सावरकरी आसिंधु व्याख्येत ब्रह्मदेशही येतो ना ? म्हणजे त्यांचे पूर्वजही हिंदूच ना ?

इतिहास अभ्यासा

unnamed_0.png

नकाशा बघा

एन आर सी पण यावेच. नव्या मुंबईतही भरपूर बांगलादेशी राहतात, त्यांच्या स्त्रिया बंगाली व मुस्लिम घरांमध्ये घरकाम करतात,बाकी कोण त्यांना थारा देत नाही. त्यांचे व्यवस्थित नेटवर्क आहे ज्यायोगे काही शे रुपये टाकून नवी मुंबई ते बांगला देश ये-जाही नियमित होते. या सगळ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

सावरकरी व्याख्येनुसार , अखंड हिंदुस्थानातील सर्व लोकांचे पूर्वज हिंदूच आहेत>>>>

मग त्या सगळ्यांनी घरवापसी करावी आणि अखंड हिंदुस्तानात नागरिकत्वासाठी अर्ज द्यावा, हाकानाका

रोज सकाळी मुंबईत येणारी
हावडा-मुंबई मेल, बांग्लादेशी घूसखोर महाराष्ट्रात व इतर राज्यात पसरवण्याकरताच चालवली जाते की काय , अशी शंका कधी-कधी येते. इतकी ती हिरव्या घूसखोरांनी भरलेली असते.

नव्या मुंबईतही भरपूर बांगलादेशी राहतात, त्यांच्या स्त्रिया बंगाली व मुस्लिम घरांमध्ये घरकाम करतात, बाकी कोण त्यांना थारा देत नाही. त्यांचे व्यवस्थित नेटवर्क आहे ज्यायोगे काही शे रुपये टाकून नवी मुंबई ते बांगला देश ये-जाही नियमित होते.>>
याचा काही डाटा, विदा? की साप पहा आणि धोपटा भुई? आसामात NRC चा खेळ खेळून झाला आहे. हाती काही लागले तर नाहीच उलट ज्यांनी मते दिली त्यांनाच नागरिकत्व नाकारण्याची घोडचूक झाली. खरेतर विरोधीपक्षात असताना चघळायला, सनसनी मजवयाला असले मुद्दे बरे होते. म्हणून भाजप आणि त्याच्या समर्थकांनी आजन्म विरोधात रहावे हे देशाच्या दृष्टीने हितकारक आहे. Wink

नव्या मुंबईतही भरपूर बांगलादेशी राहतात, त्यांच्या स्त्रिया बंगाली व मुस्लिम घरांमध्ये घरकाम करतात, बाकी कोण त्यांना थारा देत नाही. त्यांचे व्यवस्थित नेटवर्क आहे ज्यायोगे काही शे रुपये टाकून नवी मुंबई ते बांगला देश ये-जाही नियमित होते.>>
याचा काही डाटा, विदा? की साप पहा आणि धोपटा भुई? आसामात NRC चा खेळ खेळून झाला आहे.>>>> फिल्मी, हे सिद्ध झाले आहे. स्वतः शिवसेनेनेच ती कबुली दिली होती असे लोकसत्तात आले होते. काँग्रेसने सुद्धा मान्य केलयं. ही कबुली मोदी प्रप व्हायच्या आधीची आहे, त्यामुळे नक्की साल मी सांगु शकत नाही.

ही कबुली मोदी प्रप व्हायच्या आधीची आहे, त्यामुळे नक्की साल मी सांगु शकत नाही. >> हे कसलं लॉजिक? तुमची मे २०१४ आधीची मेमरी पुसली गेली आहे का?

Lol
ठेवणीतली आयडिया आहे.
आधी भाजपच्या कोण्या मुस्लिम नेत्याचं दफन करू दिलं नाही अशी बातमी होती.

हसायचे तितके हसा. पण लिंका नाही दिल्या तर लगेच ती बातमी खोटी. लोकसत्तावाले फारच मुर्ख आहेत की जे असल्या बातम्या छापतात. आणी लिंक एखाद्याने दिली तर त्यावर मग उत्तर देताच येत नाही यांना, लगेच विषय बदलुन मोकळे. कित्येक धाग्यांवर बघीतले आहे हे.

ईशान्येकडच्या दोन राज्या़त र्आमी आणावी लागलीय.
आसाम एन आर सी वर आरक्षण किती झाला?
अठराव्या देशात किती होईल?
तोही फक्त सरकारचा.
नागरिकांचे मनुष्यतास वेगळे.
This is mother of demonetisation and so will be the outcome.

>>>> This is mother of demonetisation and so will be the outcome. >>>

म्हणजे भारत व भारतीयांसाठी हितकारक आणि कॉंग्रेसी व देशद्रोह्यांसाठी घातक.

...तर सरकारला बाहेरुन पाठिंबा देऊ, खातेवाटपावरुन काँग्रेसचा इशारा
https://marathi.abplive.com/news/mumbai/congress-ncp-congress-threaten-t...
>>

सत्ता स्थापन करुन इनमीन दोन आठवडे होत नाहीत तोच यांच्या तथाकथित महाविकास आघाडीमधे, कोणाला कोणत्या मंत्रालयात चरायला अधिक मिळेल यावरुन भांडणे सुरु झाली आहेत.

Pages