'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

Submitted by हरचंद पालव on 28 November, 2019 - 02:37

सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.

आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः

१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्‍या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?

तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण त्या दोघांचे ते शिवाजी महाराज असाच उल्लेख करणे कुठेतरी स्पर्शून गेले मला आणि खूप छान वाटले >>> मस्त.

केबीसी च्या बाबतीत प्रश्नावर आक्षेप घेणं योग्य होतं, वर राजधर्म यांनी लिहीलं तसंच झालेलं. तिथे शिवाजी महाराज तरी हवं होतं. मी केबीसी बघत नाही पण ती बातमी टीव्हीवर बघितली तेव्हा मला खटकलं होतं नुसतं शिवाजी लिहीण. बाकीच्यांच्या नावांना योग्य आदर देताना शिवाजी महाराजांना पण द्यायला हवा होता. नाहीतर सगळ्यांचीच नुसती नावं हवी होती, पुढे मागे पदवी नको होती.

नवीन Submitted by अन्जू on 28 November, 2019 - 14 >>>>> स ह म त

आपल्याकडे आदरार्थी वचन वापरण्याच्या बाबतीत समानता नाही. ते ज्नानदेव, ती मुक्ताबाई, ते नामदेव, तो चोखामेळा, तो सावता माळी, ती जनाबाई, ती वेणाबाई. ते शंकराचार्य, ते मध्वाचार्य, ते सायण्णाचार्य, तो नरहरी सोनार. तो महादजी तो दत्ताजी, तो यशवंतराव, तो मल्हारराव, तो बाजीराव (अलीकडे ते बाजीराव) वगैरे

बाल नरेंद्रच्या लीला पाहताना "लब्बाड नऱ्या". असंच काहीसं म्हणावंसं वाटतं ना? >> हे आणि तुम्ही आणखीही जी उदाहरणे दिलीत, त्या व्यक्तिंविषयी खरोखरच तुम्हाला आदर असेल आणि निखळ प्रेमापोटी तुम्ही म्हणत असाल तर काहीच हरकत नाही हो! फक्त तुम्ही मनापासून त्या व्यक्तिंच्या प्रेमात नसताना केवळ त्यांच्या अनुयायांना खिजवण्यासाठी हे संबोधन असेल तर मात्र निषेध आहे. अनेकांनी वरती हा मुद्दा मांडला आहे, की अश्या उल्लेखांमध्ये हेतु/भावना बघून, थोडक्यात म्हणजे कॉन्टेक्स्ट वरून तसे संबोधन हे अपमानकारक आहे किंवा नाही - हे ठरवता येऊ शकते. परंतु जरी मला तुमचा हेतु शुद्ध नसेल आणि त्यामुळे तुमचे संबोधन चुकीचे वाटले, तरी मी तुम्हाला 'तुम्ही अमुक एकच संबोधन वापरा' अशी सक्ती करू शकत नाही.

फायनली शिवाजी विद्यापीठाचे सीएसेम विद्यापीठ होणार :
लोकसत्तेत आलेली ही बातमी :
https://www.loksatta.com/maharashtra-news/chatrapati-sambhaji-raje-deman...

ह्या मूर्खांना कधी कळणार देव जाणे.

हे आणि तुम्ही आणखीही जी उदाहरणे दिलीत, त्या व्यक्तिंविषयी खरोखरच तुम्हाला आदर असेल आणि निखळ प्रेमापोटी तुम्ही म्हणत असाल तर काहीच हरकत नाही हो! फक्त तुम्ही मनापासून त्या व्यक्तिंच्या प्रेमात नसताना केवळ त्यांच्या अनुयायांना खिजवण्यासाठी हे संबोधन असेल तर मात्र निषेध आहे. अनेकांनी वरती हा मुद्दा मांडला आहे, की अश्या उल्लेखांमध्ये हेतु/भावना बघून, थोडक्यात म्हणजे कॉन्टेक्स्ट वरून तसे संबोधन हे अपमानकारक आहे किंवा नाही - हे ठरवता येऊ शकते. परंतु जरी मला तुमचा हेतु शुद्ध नसेल आणि त्यामुळे तुमचे संबोधन चुकीचे वाटले, तरी मी तुम्हाला 'तुम्ही अमुक एकच संबोधन वापरा' अशी सक्ती करू शकत नाही. >>>

मी खिजवण्यासाठी म्हटले की प्रेमपोटी म्हटले हे म्हणण्याचा अधिकार मलाच असेल ना ? जसा उआ धाग्याचा विषय छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पूर्ण घेणे आवश्यक आहे का असे आहे तसेच माननीय नरेंद्र मोदीजी असे नाव घेणे बंधनकारक आहे काय ? मी प्रेम आहे म्हणून न-या म्हणूच शकतो.

आणि महारा़जांविषयी प्रेम नसताना शिवाजी, शिवा, शिवबा, शिवराय म्हणणे हे पण निषेधार्ह नाही का ?
तुमच्याच तर्काने बघा.

तुमचे विश्व स्वकेंद्रीत आहे का ? म्हणजे तुम्ही कराल ते योग्य आणि दुसरा करेल ते संशयास्पद. तर तुमच्याकडेही लोक तसेच बघत असतील कदाचित.

पुरोगामी गाढव, तुमची काहीतरी गफलत होते आहे. मी केवळ २ शक्यता मांडल्या: १. तुम्ही निखळ प्रेमापोटी म्हणता आहात आणि २. तुम्ही खिजवण्यासाठी म्हणता आहात. त्यांपैकी कोणती शक्यता खरी - हे काही मी जज केलेले नाही. त्यातल्या शक्यता १ नुसार तुमचे प्रेम खरे असेल तर काहीच हरकत तश्या हाका मारायला हे मी आधीच म्हटले आहे.

भारत पाक फाळणी झाली , अन 75 कोटी घेऊन ते गेले,
तेंव्हाच संस्थानिक विरुद्ध सामान्य जनता अशीही फाळणी झाली, संस्थानिकांना पेन्शन मिळाली ( मग ती इंदिराबाईनी बंद केली) चांगले राजमहाल राज वारसांना गेले, तिथे 5 स्टार हॉटेल्सही आहेत म्हणे,

आणि मोडके तुटके फुटके इतिहास अन संस्कृतीच्या नावाने सामान्य लोकांना मिळाले,
गणपतीला हिंदू लोक पंचखाद्य करतात , खडीसाखर , खोबरे , खजूर असे ख ख पदार्थ घालतात,
तसे इतिहास म्हणून सामान्य लोकांना पंचखाद्य घालतात , खंड , खिंड , खिंडार , खंडहर, खिद्रापूर वगैरे मोडके देऊळ , लेण्यांतले मोडके खांब अन म्युझियममधले खापराचे तुकडे दाखवतात

आणि पुन्हा नामांतर , हेच का नाही म्हणत अन तेच का नाही म्हणत, असले वारसांचे घोळ

खंड, खिंड , खिंडार , खंडहर, खंदक , खिद्रापूर वगैरे मोडके देऊळ , लेण्यांतले मोडके खांब अन म्युझियममधले खापराचे तुकडे दाखवतात

त्यात खंदक राहिले होते

BC,
हिंदु धर्माचा द्वेष करता करता एक चांगल काम घडत आहे तुमच्याकडुन, निदान हिंदुधर्माविषयी असलेली इतिहासाची किंव इतर माहिती अद्ययावत ठेवावी लागत आहे. (कुठे टोचुन बोलण्यासाठी किंवा डकवण्यासाठी). असाच अभ्यास सुरु ठेवा. न जाणो पुन्हा मुळांकडे कधी परतावस वाटल नेताजी पालकरांसारख, तर अडचण येणार नाही.
हिंदुधर्म धर्मांतरासाठी बळजबरी करत तर नाहीच उलट धर्मांतरीत लोकांना पुन्हा मोठ्या मनाने सामावुन घेतो. शुभेच्छा.

मानयोगीमधल्या श्री. नरहर कुरुंदकराच्या प्रस्तावनेत, 'भोसले घराण्यात सतीची प्रथा दिसत नाही. पुतळाबाई हा अपवाद. ती प्रत्यक्ष दहनावेळी सती गेली नाही.कारण प्रत्यक्ष दहन एक प्रकारे गुपचूप, घाईगर्दीने उरकले आहे. बहुदा शिवाजीस या मंडळींनी भडाग्नी दिला असावा. पुढे संभाजीने सर्व क्रिया १२ दिवसांपर्यंत - सुतक यांसह विधिपूर्वक केल्या आहेत. त्याने दर्भाच्या शिवाजीला मंत्राग्नी दिला.' असा उल्लेख आहे. हे सर्व वाचताना ज्याला शिवाजी महाराज, पुतळा राणी साहेब आणि संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख खटकणार नाही तो नक्कीच नरहर कुरुंदकराच्या विचारसरणीचा असेल असे सरधोपटपणे म्हणता येईल.

पुरोगामी गाढव, तुमची काहीतरी गफलत होते आहे. मी केवळ २ शक्यता मांडल्या: १. तुम्ही निखळ प्रेमापोटी म्हणता आहात आणि २. तुम्ही खिजवण्यासाठी म्हणता आहात. त्यांपैकी कोणती शक्यता खरी - हे काही मी जज केलेले नाही. त्यातल्या शक्यता १ नुसार तुमचे प्रेम खरे असेल तर काहीच हरकत तश्या हाका मारायला हे मी आधीच म्हटले आहे. >>>> म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच मिळाले आहे असे म्हणायचे का ? किमान आता शक्यता आल्या तरी.

शिवाजी पार्क, शिवाजी विद्यापीठ, शिवाजीनगर हि नावे बदलू नये असे वाटते, पण उगीच कशाला रिस्क घ्या आणि एखाद्या बिनडोक पुरोगामी ब्रिगेडी कडून आपले डोके फोडून घ्या... त्या पेक्षा CSM पार्क, CSM विद्यापीठ, CSMNagar पत्करले.

@ guruji : शिवाजी पार्क, शिवाजी विद्यापीठ, शिवाजीनगर हि नावे बदलू नये असे वाटते >> बरोबर आहे... पण CSM पार्क, CSM विद्यापीठ, CSMNagar असे म्हणाल्याने फार काही बिघडणार नाही ना..?

यावरुन एक आठवण झाली..

आधी व्हीटी ला जाणार्‍या ट्रेन्स ची उद्घोषणा "अमुक-तमुक ते विक्टोरिया टर्मिनस मुंबई" अशी व्हायची त्यानंतर ती "अमुक-तमुक ते शिवाजी टर्मिनस मुंबई" अशी होऊ लागली त्यानंतर पुन्हा एकदा ती "अमुक-तमुक ते शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई" अशी व्हायला लागली.. तेव्हा काहीजणांच्या मनाला वेदना झाल्या त्यांनाच पुन्हा एकदा त्याच >>श्रेणीच्या<< वेदना "अमुक-तमुक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई" असं नामकरण झालं तेव्हाही झाल्या होत्या.

व्हिक्टोरिया टर्मिनस - छत्रपती शिवाजी टर्मिनस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास होता.
Cst पार्क आठवतंय.
मराठीत,/ देवनागरीत लघुरूप करावं लागतच असेल ना?

हे भगवान....
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर हे 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करण्यासाठी त्वरित कायदेशीर प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
https://www.bbc.com/marathi/india-50714186

संपूर्ण विचाराअंती निर्णय
या विषयावर 60 वर्षांपूर्वीच चर्चा होऊन सर्वांनी संपूर्ण विचारांती त्याचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवलं, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी दिली.

ते सांगतात, "स्थापनेच्या वेळी याबाबत चर्चा करण्यात आली होती. ज्यांनी हे विद्यापीठ स्थापन केलं त्यांनी या प्रश्नाचा निकाल लावलेला आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांनी हा निर्णय घेतला होता. त्यावेळीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देण्याची मागणी प्रा. एन. डी पाटील काही सदस्यांनी केली होती."

"पण यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना हा आग्रह सोडण्यास सांगितलं होतं. जर संपूर्ण नाव दिलं तर लघुरूप वापरलं जाईल. बडोद्याचं महाराजा सयाजीराव विद्यापीठाचं नाव एमएसयू असं वापरलं जातं. त्याचप्रकारे सीएसएम हे नाव वापरलं जाण्याची शक्यता आहे, असं चव्हाणांनी सांगितल्यानंतर हा निर्णय सर्वांनी मान्य केला होता, अशी माहिती पवार यांनी दिली.

"राजाराम महाराज आणि प्रा. डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाचं स्वप्न पाहिलं, शिवाजी विद्यापीठ हेच नाव त्यांच्या मनात होतं. बाळकृष्ण हे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी दीड हजार पानांचं इंग्रजी शिवचरित्र लिहिलं आहे. त्यातसुद्धा 'शिवाजी द ग्रेट' असाच उल्लेख आहे. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख नाही." असं पवार पुढे सांगतात.

१९९५ साली पहिल्यांदाच महाराष्ट्रात सेना-भाजप सरकार आलं तेव्हा बरीच नावं बदलली. बॉम्बे/बंबईचं मुंबई केलं. व्हिक्टोरिया टर्मिनसचं छत्रपती शिवाजी टर्मिनस, व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्युटचं वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई एअरपोर्टचं छत्रपती शिवाजी एअरपोर्ट.

मग परत अनेक वर्षांनी पुन्हा सेना-भाजप सरकार आलं तेव्हा सरकारने टर्मिनस व एअरपोर्ट दोन्ही नावांत 'महाराज' शब्द घालून सुधारणा केली.

होता जिवा म्हणून वाचला शिवा... शिवा, शिवबा, शिवाजी, महाराज यातील प्रत्येक संबोधनामागे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर, प्रेम, कृतज्ञता, जिव्हाळा प्रत्येक मराठी मनामध्ये दाटून येतो. परंतु शिवाजी ह्या नावाचा राजकीय फायदा घेण्यासाठी हे मान्य करून चालत नाही. आम्हीच कसे शिवभक्त, तुम्ही कसे शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे वेळोवेळी अधोरेखित केलेच पाहिजे. त्यातूनच आम्ही जातीपातीच्या राजकारणाचे भांडवल उभे करणार आहोत... हे करणारे आम्ही कोण ते ओळखल्यास कुठलेही बक्षीस मिळणार नाही.

Guruji, त्या नरहर कुरुंदकर च्या (वरील प्रतिसाद तपासा) लिखाणाबद्दल पण आपले विचार मौकतिक उधळा बरं

@dj कुरुंदकरांनी प्रस्तावनेत शिवाजी महाराजांचा सन्मानच केला आहे, तुम्हाला त्यातला फक्त एकेरी उल्लेख तेवढाच दिसत असेल तर ती तुमची मर्यादा आहे.

स्वासा, लोटि, आक्रावाबफ, क्रांचा अशी लघुरूपंही प्रचलित असतीलच ना ?
>>>

एल.टि.एम.एच. (सायन हॉस्पिटल), टिमवि, एलटीटी (कुर्ला)

सावरकर, फडके, चाफेकरांच्या नावाने युनिवर्सिट्या आहेत की नाही माहिती नाही. चाफेकर चौक आहे बहुतेक एक चिंचवडला, त्याचा शॉर्टफॉर्म होतो की नाही माहिती नाही.

मला दोन्ही बाजूंचे म्हणणे पटले. मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा स्नातक आहे. बोलताना नेहेमीच शिवाजी विद्यापीठ असाच उल्लेख येतो पण तो करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होतेच असे नाही.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे पुन:नामकरण केले तर महाराजांचे स्मरण निश्चित होईल. पण इतर ठिकाणचा अनुभव पाहता या विद्यापीठाचा उल्लेख सी.एस.एम.युनिवर्सिटी असाच होईल. म्हणजे पुन्हा पर्पज डिफिटेड.

सगळ्याचेच shortforms होतात हे खरं आहे त्यामुळे ते तसं नकोच असं वाटतं.

माझ्या तोंडात शिवाजी महाराज हेच बसल्याने छत्रपती म्हणायचे कितीही ठरवलं तरी येत नाही पटकन तोंडात मग शिवाजी महाराज असंच म्हणते.

मुंबई एअरपोर्टचं नाव 'जे.आर.डी. टाटा एअरपोर्ट' करणार असतील तर 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' चालेल.

मी आईला ए आई म्हणतो. रिक्षावाल्याला अहो रिक्षावाले म्हणतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की तो कुणी रिक्षावाला मला आईपेक्षा आदरणीय आहे.
तसेच शिवाजीचे आहे. शिवाजी ही व्यक्ती राम, कृष्ण ह्या पातळीवरची आहे. रामाला प्रभू श्रीरामचंद्र म्हटले नाही नुसते राम म्हटले तरी चालते तसेच शिवाजीला शिवाजी म्हणणे.
जबरदस्तीने अमुक एक पदव्या वापरूनच त्याचा उल्लेख व्हावा असा हट्ट केला तर समाजापासून तो दुरावेल. उगाच कुणाच्या भावना दुखाव तील म्हणून लोक ते नाव वापरणे बंद करतील.
असा वेडेपणा केला जाऊ नये. काही धर्मात त्यांच्या देवाचा व प्रेषिता चा अपमान केल्यास मृत्युदंड मिळतो. शिवाजीच्या प्रतिमेची त्या दिशेने वाटचाल होऊ नये.

VJTI हा तर एक जोक आहे. आधीच्या नावाचे acronym VJTI असंच होतं. ते तसंच राहावं आणि आपल्या कृतक शिवप्रेमाचे समाधान मिळावं म्हणून त्याचे वीरमाता जिजाबाई असं केलं. याला काय म्हणणार ? आदर हा असतोच टवणे सर. नावं देण्यामागचा पहिला उद्देश स्मृती जिवंत ठेवणं हा असतो. मग बाकीचं.

Pages